Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

कोबीची खुसखुशीत वडी by namrata's cookbook

N
Namokar
Wed, 06/19/2019 - 08:58
लागणारा वेळ: ४० मिनिटे लागणारे जिन्नस: बरीक चिरलेला कोबी(२०० ग्रॅ ) १ वाटी बेसन पीठ (१०० ग्रॅ ) १/२ वाटी तांदळाचे पीठ (५० ग्रॅ) १/२ चमचा हळद 3 मिरची 3 लसूण पाकळ्या १/२ आल कोथिंबीर २ छोटे चमचे लाल तिखट (optional) २ छोटे चमचे जिरे २ छोटे चमचे ओवा २ छोटे चमचे तिळ तेल मीठ लिंबाचा रस पाणी K1.png क्रमवार पाककृती: १. कोबी बारीक चिरुन धुवून घ्या २. प्रथम लसूण + अदरक + मिरची + जिरे पेस्ट करुन घ्या ३. स्टीमर प्लेट घ्या आणि त्याला तेल लावून घ्या ४. आता बेसन पीठ, तांदळाचे पीठ, लसूण + अदरक + मिरची + जिरे पेस्ट, कोथिंबीर, ओवा, जिरे, तिळ, मीठ, लिंबाचा रस, हळद घाला. ५. पाणी न घालता सर्व एकत्र करा. ६. आता थोडे थोडे पाणी घालत, जाडसर मिश्रण बनवा ७. स्टीमरमध्ये ३ ग्लास पाणी घाला (१ इंच पाणी पातळी) ८. आता स्टीमर प्लेटमध्ये मिश्रण पसरवा ९. आता प्लेट स्टीमर मध्ये ठेवा २० मिनिटे वाफवून घ्या १०. स्टीम झाल्यावर प्लेट बाहेर कढून घ्या आणि वडी थंड होऊ द्या ११. आता वाडी कट करुन घ्या १२. पॅन घ्या आणि शॅलो फ्राय करण्यासाठी तेल घ्या १३. गोल्डन रंग होईपर्यंत वडी दोन्ही बाजूने शॅलो फ्राय करुन घ्या तयार आहे आपली खुसखुशीत कोबीची वडी Kobichi vadi अधिक टिपा: *ही वडी तळूनही घेऊ शकता * स्टीमर ऐवजी कुकर वापरु शकता **नमस्कार नम्रताज् कूकबुक हे माझ नवीन चॅनेल आहे युटूब वर . https://www.youtube.com/channel/UCjsh6KtuWdhxlOjL5nqH6HQ Namrata's CookBook या चॅनेलला सबस्क्राईब करा हि विनंती . बेल आयकॉन दाबा म्हणजे जेव्हा मी रेसिपी अपलोड करेन तेव्हा तुम्हला नोटिफीकेशन येईल . रेसिपी आवडलीतर नक्की लाइक करा,शेअर करा . जर काही प्रश्न असतील तर कृपया कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. काही चूक झाली असेल तर नक्की सांगा , बदल करेन .

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4704 views

💬 प्रतिसाद
श
श्वेता२४ Sun, 06/23/2019 - 07:36 नवीन
तुमच्या दोन्ही पाककृती आवडल्या. ही वडी जरुर करुन बघेन.
  • Log in or register to post comments
N
Namokar Mon, 06/24/2019 - 16:06 नवीन
धन्यवाद @श्वेता२४
  • Log in or register to post comments
इ
इरामयी Mon, 06/24/2019 - 16:29 नवीन
व्वा! छान कृती. यूट्यूबवरची तुमची निखारा मिसळसुद्धा मस्तच!
  • Log in or register to post comments
N
Namokar Tue, 06/25/2019 - 09:05 नवीन
धन्यवाद @ इरामयी
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 24 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 28 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 31 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा