Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

मी तुझा विचार करते

श — शिव कन्या, गुरुवार, 06/13/2019 - 21:06
मी तुझा विचार करते, मी तुझ्या वयात रमते.... माझे खळाळणारे हसू अनुभवांच्या भोवऱ्यांतून तरून सुशांत जलाशयातल्या शांत स्मितासारखे तुझ्या ओठांशी येऊन थांबेल...... मी तुझा विचार करते, मी तुझ्या वयात रमते...... तुझ्या एवढी होईन तेव्हा शब्दांची झोळी बाहेर खुंटीला टांगेन अर्थाच्यामागे धावणे थांबेल आणि, उंच झाडांच्या गहन जंगलातून निवांत चालत तुझ्या डोळ्यांच्या वाटेशी थांबेन ....... मी तुझा विचार करते, मी तुझ्या वयात रमते..... माझे निर्झर गहिवर ओले राग लोभ वा हसू रडूही तुझ्या ओंजळीत हरवून जातील, नखाइतकीच कोरीव आठवण तुझ्या उरात जीव जागवेल शांत रात्रीच्या निश्चिंत प्रहरी, माझे वय तुझ्या वयाला ओलांडून जाईल...... मी तुझा विचार करते, मी तुझ्या वयात रमते.... Shivkanya

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2314 views

💬 प्रतिसाद
य
यशोधरा Fri, 06/14/2019 - 07:35 नवीन
वा!
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Fri, 06/14/2019 - 08:27 नवीन
छान !
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा