Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
भटकंती

माचीप्रबळ येथील कॅम्पिंग

S
saumitrasalunke
गुरुवार, 06/13/2019 - 09:04
💬 3
पनवेल जवळील शेडुंगच्या साधारण दहा किलोमीटर पूर्वेला प्रबळगड स्थित आहे. यापूर्वीही अनेकदा इथे जाणं झालं होतं मात्र तेव्हा इथे येणाऱ्यांची संख्या तुरळक होती. पायथ्यापासून साधारण दीड तासांत आपण माचीप्रबळ या पाड्यावर/पठारावर येतो. कलावंतीण दुर्ग अथवा प्रबळगडावर जाण्यासाठी हा बेस. गडांवर जायचे नसेल तर या इथे मुक्काम करता येतो. निलेश भुतांबरा या स्थनिक युवकाने इथे निवासाची आणि भोजनाची उत्तम सोय केली आहे. माती आणि घराच्या ओढीने निलेशने चेन्नईतल्या नोकरीला रामराम केला आणि घरी परतला. प्रचंड शारीरिक मेहनत, कौशल्यपूर्ण योजना आणि चिकाटीच्या जोरावर या 'इको टुरीझम'ची स्थापना झाली आहे. निलेशच्या दोन्ही हातांची सोलवटलेली त्वचा या परिश्रमाची साक्ष आहे. काजव्यांच्या शोधात काही दिवसांपुर्वी आम्ही गेलो तेव्हा निलेशच्या या वननिवासाचा अतिशय उत्तम अनुभव आम्ही घेतला. नीटनेटके पिच केलेलं उत्तम दर्जाचे टेंट, स्वच्छ परिसर, साधे आणि आरोग्यदायी जेवण, स्वच्छ पाणी, आणि हवं नको ते बघण्याची अंगभूत वृत्ती या सर्व जमेच्या बाजू. काही अतिशहाणी मंडळी ब्लुटूथ स्पीकर आणून शांततेचा भंग करतात. सदर परिसर वनविभागाच्या अखत्यारीत येत असल्याने आता पायथ्याला चौकी बसवली आहे. दारू, सिगरेट, अंमली पदार्थ आणि स्पीकर्स यांना संपूर्ण बंदी आहे. याचा फरक लवकरच जाणवेल अशी आशा आहे. आपण जेव्हा जाऊ तेव्हा आपल्याला आवश्यक त्या कमीत कमी गोष्टी घेऊन जाणे आणि इथल्या निरव शांततेचा आणि सौंदर्याचा आस्वाद घेणे इतक्याच गोष्टी कराव्यात. सौजन्याने आणि जबाबदरीने वागावे आणि आपल्या सोबतच्या सदस्यांना तशी सूचना द्यावी. साधारण या काळात या परिसरात काजव्यांची जत्रा भरते. फांद्यांना जणू काही चांदण्या लगडाव्यात असे काही वृक्ष आम्ही आणि आमच्यासोबतच्या बालचमूने पाहिले. काजव्यांच्या जीवनचक्राची आणि निसर्गातील त्यांच्या भूमिकेची माहिती असेल तर काजवे बघणे हा "अनुभूतीचा सोहळा" होतो. "बाबा, हे तर मनमंदिरा गाण्यातल्यासारखे काजवे आहेत'... लहानग्यांच्या विस्फारलेल्या डोळ्यांतला आनंदाचा डोह खोल असतो. माझी अडीच वर्षांची भाची टक लावून या तरंगणाऱ्या सोनबिया पाहत होती! वर्षातून एकदाच घडणारी ही गोष्ट आवर्जून पहावी. अर्थात जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात हा सोहळा संपेल. मात्र हे ठिकाण जायला सोपे असल्याने मोठ्यांसाठी पावसाळ्यात आणि कुटुंबासाठी-लहानांसाठी हिवाळ्यात जाणे उत्तम ठरेल. संपर्क: १. निलेश भुतांबरा: 08056186321 २. खासगी वाहन नसल्यास श्री. अशोक पाटील (पनवेल पासून ऑटोरिक्षा): 09322580995 वरील दोघांना माझा संदर्भ देता येईल. आणि जाता जाता इतकंच: Take only memories Leave only footprints © सौमित्र साळुंके १२ जून, २०१९

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4387 views

💬 प्रतिसाद
क
कंजूस Fri, 06/14/2019 - 08:33 नवीन
प्रबळगड एरवीसुद्धा छान असतो.
  • Log in or register to post comments
स
सही रे सई Fri, 06/21/2019 - 16:05 नवीन
साधारण या काळात या परिसरात काजव्यांची जत्रा भरते. म्हणजे नक्की कुठला काळ आणि हे काजवे कधीपर्यत (महिना) बघायला मिळतात? बाकी लेख उत्तम. काही फोटो सोबत जोडले असते तर अजून छान झाले असते.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 06/21/2019 - 16:07 नवीन
पाऊस लागल्यावर दुसऱ्या अमावस्येपर्यंत.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 9 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 9 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 9 hours ago
  • सुंदर !!
    1 day 9 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 9 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा