Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
भटकंती

इंटरनॅशनल ट्रॅव्हल साठी एखादी चांगली टुरिस्ट कंपनी सुचवा ....

प
प्रिया१
Wed, 06/05/2019 - 09:00
💬 72
सगळ्या मिपाकरांना नमस्कार .... मी पुण्यात राहते ... पुढील एक वर्षभरात माझ्या फॅमिली आणि relatives बरोबर परदेशी फिरायला जायचा विचार आहे ... आमचा ९-१० जणांचा ग्रुप असेल ...ह्या यादीमध्ये अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, Singapore , Thiland , मलेशिया, बाली ह्यापैकी एक देश निवडून प्रवास करायचा विचार आहे ...USA ला एकटीने प्रवास मी केला आहे पण टुरिस्ट म्हणून नाही ... मध्यंतरीच्या काळात वीणा वर्ल्ड आणि केसरी बद्दल चौकशी केली होती ... दोन्ही टूर कंपनी बद्दल चांगली आणि वाईट अशी दोन्ही मत आहेत ... अर्थात ती तशी असणार हे हि मान्य ... हि फॅमिली ट्रिप असल्यामुळे सगळ्या दृष्टीने योग्य होईल अशी टूर कंपनी निवडायची आहे ... पण इंटरनेट वरून मिळालेली माहिती पाहता गोंधळ उडालेला आहे ... तरी जास्तीत जास्त ठिकाणे बघता येतील, राहायची आणि commutation ची सोय चांगली पुरवत असतील, affordable असेल अश्या तत्वांवर बसू शकेल अशी एखादी ट्रॅव्हल कंपनी सुचवावी .... तसेच वीणा वर्ल्ड आणि केसरी ने कोणी प्रवास केला असेल तर त्या बाबतची आपली मते मांडावीत म्हणजे निर्णय घेणे सोपे होईल .... पैशाची अडचण नाही ... परंतु बाकीच्या गोष्टींचे टेन्शन ना घेता ट्रिप चा आनंद द्विगुणित व्हावा एवढी अपेक्षा आहे ... सुहास म्हात्रे काका ... तुमचा guidance तर अगदीच हवा आहे ...मिपावरचे तुमचे सगळे ब्लॉग्स मी वाचलेत ... तुम्हाला travelling चा खूप experience आहे ... इथे तुमच्याकडून काही suggestion मिळाले तर मस्तच .... धन्यवाद !!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 43573 views

💬 प्रतिसाद
स
सुबोध खरे Mon, 06/10/2019 - 17:15 नवीन
पर्यटन कंपन्या आपल्या कडून किती पैसे जास्त घेत आहेत (उदा. ७ दिवसाच्या सहलीसाठी त्यांचे एक लाख रुपये होत असतील आणि आपण स्वतः आरक्षण केल्याने जर ६०००० रुपयात होणार असेल) तर ४०००० रुपये अतिरिक्त होत आहेत. आता आपला पगार ८०००० रुपये असेल तर हेच ४०००० रुपये मिळवण्यासाठी आपल्याला १५ दिवस मान मोडून( आणि मन मारून) काम करावे लागते मग आपल्याला आरक्षण करण्यासाठी किती दिवसाचे कष्ट होतात आणि त्यासाठी किती पैसे आपण खर्च करायचे हा हिशेब करून ज्याचा त्याने करावा. असेच एक उदाहरण-- माझ्या पुतणीचे लग्न पुण्यात होते. तेंव्हा माझ्या बायकोच्या मेकअप आणि हेअर स्टाईल साठी तेथील ब्युटी पार्लर वालीने सकाळी ७ वाजता घरी येण्यासाठी ६००० रुपये सांगितले होते. आम्ही विचार केला कि माझी बायको( एम बी बी एस आहे ), कुणा रुग्णाच्या घरी जाऊन त्याला दम्यावर इंजेक्शन देते तेंव्हा लोक ५०० रुपये देण्याला फार काचकूच करतात आणि इथे हि "१० वि पास" मुलगी घरी येण्याचा दर ६०००( रुपये सहा हजार फक्त) कोणत्या हिशेबाने लावते आहे. यावर माझ्या बायकोने स्वतः मेक अप केला आणि माझ्या मुलीने तिला काही तरी हेअर स्टाईल( त्याला काय म्हणता माहित नाही) करून दिली. त्यात कोणताही भडक मेक अप ना होता बायको छान दिसत होती. मी हसत ६ हजार रुपये बायकोला खरेदी साठी देईन. किंग ऑफ गुड टाइम्स आपल्याला किती थुका लावत आहेत म्हणजे आपल्या आनंदात थोडासा भर घालण्यासाठी आपण किती पैसे खर्च करत आहोत/उधळतो आहोत याचा विचार बहुतेक लोक करत नाहीत हि दुर्दैवी गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments
स
समीरसूर Tue, 06/11/2019 - 13:16 नवीन
बरोबर आहे पण माझ्यामते केसरी/वीणाची सहल आणि आपण स्वतः आखलेली सहल या दोहोंमध्ये खर्चाच्या दृष्टीने फारसा फरक पडत नसावा. मी ६ दिवस केरळला गेलो होतो त्याचा माणशी खर्च साधारण ४०,००० (विमानप्रवासासह) पडला. केसरीची अशी सहल साधारणपणे तेवढ्याच (५००० अधिक/उणे) पडली असती. केसरीमध्ये मला अलेप्पी + कन्याकुमारी अशी सहल मिळाली नाही. बहुतेक कुठेच अशी सहल मिळाली नाही म्हणून मी स्वतंत्र एजंटकडून सहल आखून घेतली. स्वतः हॉटेल्स आणि वाहन बुक करून गेलो असतो तर कदाचित अजून स्वस्त पडली असती. केसरीचा फायदा हा आहे की हॉटेल्स सहसा चांगली मिळतात. कधी कधी चांगली रिसॉर्ट्सदेखील मिळतात. केरळमध्ये आम्हाला हॉटेल्स यथातथाच मिळाली. जेवण बर्‍याच ठिकाणी काँप्रोमाईज करावे लागले. शिवाय बल्क बुकिंगमध्ये केसरी/वीणा या कंपन्यांना ज्या दरात हॉटेल्स मिळतात त्या दरात आपल्याला मिळत नाहीत. केसरी/वीणासारखीच सोय-सुविधा आपण स्वतः बुक करायला गेल्यास किंमतीमध्ये बहुधा फार फरक पडणार नाही; किंबहुना आपल्याला चार पैसे जास्तच लागतील. ज्यांना आरामदायी, विनाकटकट सहल करायची आहे त्यांच्यासाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, लहान मुले असलेल्या कुटुंबांसाठी, हनिमूनला जाणार्‍या जोडप्यांसाठी केसरी/वीणा/मँगोसारख्या कंपन्यांतर्फे सहलीला जाणे हा चांगला पर्याय असू शकतो. माझ्या आई-वडिलांनी केसरीसोबत केरळ, काश्मीर, हिमाचल प्रदेश, युरोप, सिंगापूर, हाँग काँग, मकाऊ वगैरे सहली केल्या. त्यांचा अनुभव खूप चांगला होता. वयानुसार ज्या समस्या होत्या त्यांचा थोडा प्रॉब्लेम झाला खरा पण मोठा गृप असल्याने सगळ्यांनी, टूर मॅनेजरने सांभाळून घेतले. वैयक्तिक सहलीत हे थोडे अवघड होते. आणि ज्येष्ठ नागरिक एकटेच वैयक्तिक सहलींवर जाऊ शकतदेखील नाही.
  • Log in or register to post comments
स
समीरसूर Tue, 06/11/2019 - 13:38 नवीन
प्रत्येकाच्या सहलीचा आनंद कसा घ्यावा याच्या वेगळ्या कल्पना असतात. अगदीच खाणे-पिणे, शॉपिंग यावरच सहल दवडणे मूर्खपणाचे असले तरी काही किमान सुविधा असायलाच पाहिजे असा आग्रह असणारे बरेच पर्यटक असतात. त्यासाठी त्यांची थोडे जास्त पैसे खर्च करण्याची तयारी असते. ते त्यांना परवडतदेखील असते. केसरीटाईप सहलींना जाणारे स्वतः बुकिंग करून सहलीला जाणार्‍यांना वेड्यात काढतात आणि स्वतः सगळं प्लॅनिंग करून सहलीला जाणारे केसरीटाईप पर्यटकांना आळशी, मूर्ख पर्यटक समजतात. हे असे चालायचेच. पसंद अपनी अपनी.... :-) मी वेगळे अनुभव मिळणार असतील तर सहसा पैशांचा फार विचार करत नाही (आवाक्यात असेल तर). केरळमध्ये पुवर आयलंडची बोट क्रुझ माझ्या प्लॅनमध्ये नव्हती. सहल संपत आली होती आणि माझ्याकडे फारशी रोख रक्कम नव्हती. माणशी तीन हजाराची ती सुंदर क्रुझ न करणे माझ्या जीवावर आले होते. पुण्यात आल्यानंतर पुन्हा हिंजवडीच्या चक्रात अडकणे असतेच. रोज रोज थोडेच मी रिव्हर क्रुझ करणार होतो. आम्ही दोघांनी ती क्रुझ केली. खूप मजा आली. मुलाने खूप एंजॉय केले. पैसे वसूल झाले. मी पुण्यात उतरलो तेव्हा माझ्याकडे ५०० रुपये शिल्लक होते.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sat, 06/15/2019 - 17:08 नवीन
मी स्वतः माझ्या नातेवाइकांसाठी २ आठवड्यांची युरोप टुर प्लान करुन देत आहे, काही मदत लागल्यास बिंधास्त व्यनी करा थोडा लाल डबा कम झैरात या वर्षी माझ्या मैत्रीणींना २ आठवड्यांची बजेट युरोप ट्रिप प्लान करुन दिलेली....त्यांची भारताबाहेरची पहिलीच ट्रिप होती...मस्त ट्रिप झाली इथल्या १-२ मिपाकरांना आठवडाभराची थायलंडची ट्रिप प्लान करुन दिलेली थायलंड - ८ दिवस ट्रिप प्लान (स्वतःच्या फॅमिलीबरोबर जाणार्यांसाठी) http://misalpav.com/node/42369 स्वतःची कस्टमायझेशन करुन ट्रिप प्लान करुन देणारी टुर कंपनी असावी अशी इच्छा आहे :)
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Sun, 06/16/2019 - 23:37 नवीन
हि हातोटी असेल तर ... मागे हटू नका टका हा बिझिनेसच टाका !!
  • Log in or register to post comments
स
सुजल Sun, 06/16/2019 - 11:17 नवीन
मी स्वतः केसरी किव्वा वीणा च्या ग्रुप टूर्स प्रिफर करते . दोन्ही कंपन्यांमध्ये डाव -उजवं काही तरी आहेच आणि ते असणारच आपण आपल्या चॉईस नुसार दोन्ही कंपन्यांमधून निवडावी काही वेळा मी किव्वा आजकाल बरेच वेळा केसरी ला प्रेफरन्स देते याच अर्थ असा नाही कि वीणा वाईट आहे पण तुलनेने बऱ्यापैकी उजवा आहे तो केसरीच . वीणाच्या काही टर्म्स आणि कंडिशन्स पटत नाहीत . खर्च दाखवण्याची पद्धत पण वेगवेगळी आहे. दोन्ही मधला काही ठळक फरक लिहिते कारण मी दोन्ही कंपन्यांचा अनुभव घेतला आहे १ ) केसरीच्या टूर्स प्रथम दर्शनी महाग वाटतात पण त्या तशा नसतात हे बारकाईने बघितलं तर लक्षात येत . वीणा व्हिसा चा खर्च समाविष्ट न करून सहल खर्च दाखवते . तिथे केसरी मध्ये मात्र व्हिसा चार्जेस इन्क्लुड करून सहल खर्च दाखवते म्हणून त्यांच्या टूर ५-१० हजार ने महाग वाटतात पण प्रत्यक्षात तस नसत . वीणा ची टूर खर्च कमी दाखवण्याची हि चलाखी आहे . त्याला लोक भुलतात २ ) वीणा च्या टूर मध्ये ओरिएंटल टूर्स खूप असतात. म्हणजे बाहेरूनच बस मधून ती ती ठिकाण दाखवली जातात . फार फार तर काही ठिकाणी फोटो काढायला ५-१० मिनिटांचा स्टॉप घेतात . तिथे केसरी मध्ये मात्र बरिचशी ठिकाण हि आतून दाखवली जातात . त्यामुळे त्यांची एंट्री फी चा खर्च टूर मध्ये समाविष्ट असतो पर्यायाने टूर खर्च वाढतो . वीणा मध्ये डेस्टिनेशन्स पण कमी दाखवल्या जातात केसरीच्या तुलनेने ३ ) टूर कॅन्सल केली तर वीणा मध्ये पैसे परत मिळत नाहीत त्याच्या जागी त्या आणि तेवढ्याच खर्चात ( थोडं फार इकडे तिकडे ) तुम्हाला दुसरी टूर घ्यावी लागते . केसरी मध्ये मात्र काही दिवसांच्या आधी टूर तुम्ही कॅन्सल केलीत तर सगळे पैसे परत मिळतात . असं संगितलं गेलं . अनुभव नाही कारण मी कॅन्सल केली नाहीये पण केसरीच्या टूर मध्ये तीन बहिणींनी हा विणा चा अनुभव सांगितला आणि आता त्या वीणा बरोबर कधीच फिरत नाहीत असं सांगितलं . कारण त्यांनी फिक्स डिपॉझिट मोडून वीणामध्ये टूर खर्च भरला पण नंतर आजारपणाच्या कारणाने टूर कॅन्सल केली तर त्यांना दुसरी टूर घ्यायला सांगितली ती पण एक वर्षाच्या आत . पैसे परत नाहीत . दुसरी टूर त्यांना तारखांच्या हिशोबाने जमत नव्हती त्यामुळे त्यांचे पैसे वाया गेले असं त्यांचं म्हणणं ४ ) एकदा वीणा च्या टूर वर मी गेले असताना क्रूझ वर केसरीचा ग्रुप पण होता . त्यांची छान खाण्यापिण्याची बडदास्त ठेवलेली दिसली आम्हाला मात्र वीणाने एक १०० रुपयांचा चहा पण दिला नाही . तुम्ही स्वतःच्या खर्चाने प्या असं सांगितल गेलं .केसरीची खाण्यापिण्याची बडदास्त टूर खर्चात समाविष्ट होती ५ ) वीणा मध्ये काही वेळा दुपारच्या चहा स्किप करतात .माझ्या सिंगापूरच्या टूरला मी हा अनुभव घेतला . दुपारचा चहाच देत नव्हते . किती सांगितलं तरी . केसरी मध्ये मात्र दोन वेळच जेवण / नाष्टा / दुपारचा चहा सगळं सगळं दिल जात ६ ) वीणाने आता बॅग्स देणं बंद केलं आहे . टूर खर्चात कपात . केसरी अजूनही बॅग्स देत आहे म्हणून त्यांच्या टूर महाग . ब्यागेचा इश्यू काही एवढा मोठा नाहीये पण त्याने टूर खर्चात थोडासा फरक पडतो . त्यातून काही जणांना वीणामध्ये बॅग मिळत नाही याचंही दुःख झालेलं मी बघितल आहे वीणाच्या बाबतीत दोन वेळा मी स्ट्रॉंग कंप्लेंट्स नोंदवलेल्या आहेत . अतिशय वाईट आणि तापदायक अनुभव . बाकी समीरसूर म्हणतात त्याप्रमाणे " मला स्वत:ला व्हिसा, हॉटेल, टॅक्सी, जेवण, विमानप्रवास, वगैरे सगळे सतत लक्ष ठेवून अरेंज करण्याचा खूप कंटाळा येतो. त्यातच वेळ आणि ऊर्जा जाते. " याच्याशी मात्र १०० टक्के सहमत . त्यामुळे मी पण केसरी / वीणा ग्रुप टूर्स ना प्राधान्य देते
  • Log in or register to post comments
स
सुजल Sun, 06/16/2019 - 12:28 नवीन
त्यातून काही जणांना तेच तेच घरातले लोक घरी पण आणि बाहेर पण सहन करायचे नसतात. तीच तीच तोंड . तेच तेच स्वभाव . तीच तिच घरची भांडण . जी घरी भांडायची तिच बाहेर जाऊन भांडायची / ज्या घरी शिव्या खायच्या त्या टूर वर पण खायच्या असं नको वाटत. त्या पेक्षा जरा अनोळखी लोकांबरोबर गेलेल कधीही चांगले म्हणून अशा ग्रुप टूर्स :)
  • Log in or register to post comments
म
महेश जोगलेकर Mon, 06/17/2019 - 06:08 नवीन
प्रिया मी आपल्याला वरील पैकी अमेरिका सोडल्यास इतर देशांची माहिती देऊ शकतो परंतु त्याआधी १-२ नम्र सूचना आपण दिलेल्या देश हे फार वेगळ्या पद्धतीचे आहेत त्यामुळे सल्ला देणे सोपे होण्यासाठी तुमचाच या सहली मागचा उद्देह्स काय ते सांगितलेत तर बरे पडेल - उदाहरण काय बघणे: मानव निर्मित? इतिहास वस्तू? निसर्ग? काय खाणे? नेहमीचे कि जरा वेगळे? इतर धडपड ( ४ व्हील ड्राईव्ह) ट्रेकिंग इत्यादी कला ? - एकूण वेळ - वयोगट ( कुटुंब?) - कोणता काळ? ( डिसेंबर मध्ये उत्तर अम्रेईकेत थंडी वेगळे आणि ऑस्ट्रेलियात उन्हाळा सिंगापोरे ला १२ महिने सारखेच - अगोदर काय बघितले आहे? सर्वसाधार गट असे करू शकता - निसर्ग+ मानवनिर्मित, + पाहिलं विकसतीत देशातील प्रवास = उत्तर अमेरिका निसर्ग + पाहिलं विकसतीत देशातील प्रवास = ऑस्ट्रेलिया + न्यू झीलंड निसर्ग + ऐतिहासिक वस्तू वेगळी संस्कृती / खाणे = थायलंड + बाली खाणे / जर फार धाडसी नसाल तर आणि मीठही सहल असले तर भारतीय मराठी विना / केसरी वगैरे उत्तम वेळ:(त्याप्रमाणे खर्च ) ३+ आठवडे उत्तर अमेरिका / ऑस्ट्रेलिया + न्यू झीलंड १.५ आठवडे = सिंगापोरे इत्यादी धडपड: उत्तर अमेरिका/ ऑस्ट्रेलिया + न्यू झीलंड
  • Log in or register to post comments
म
महेश जोगलेकर Mon, 06/17/2019 - 08:30 नवीन
प्रिया , आपला मूळ प्रश्न परत वाचला आणि माझी चूक लक्षात आली कि आपण " कोणती टूर कंपनी " याबद्दल विचारले आणि मी लिहून राहिलो काय तर कोणते देश आणि काय या बद्दल! तर परत तीच चूक करीत आहे पण कदाचित आपल्याला आणि इतरांना थोडा फायदा होईल - आटोक्याची कौटिम्बिक सुटसुटीत टूर म्हणाल तर मी सिंगापोरे + बाली सुचवेन तसे सिंगापोरे बरोबर मलेशिवाय पण करतात पण नुसते गेंटिंग हीघलांड चाय बाजारू गावात जाण्यापेक्षा बाली मध्ये जास्त वेळ घालवलेला बारा , आणि सिंगापोरे बघितल्यावर कवळ लॅम्पर बघण्यात काही विषे नाही म्हणून यःची करणे अशी व्हिसा सोप्पे हवमान १२ महिने सारखे २७-३० जवळ आधुनिक सिंगापोर + वेगळी संस्कृती अजूनही शिल्ल्लक असणारे बाली बेट असे दुहेरी काही गोष्टी सुचवीत आहे या कदाचित टूर कंपन्यांचं "साच्यातलंय" टूर चा भाग असण्याची शक्यता कमी बघ आवड असलॆ आणि वेळ असाल तर विचारात घाई सिंगापोरे: पाहणे: सेंट जॉन आणि कुसू बेट (वेगळं व्हिसा अलगत नाही : अर्धा दिवस पुरतो साधारण बोट भाडे $१८ रात्री ८ किंवा ८.३० चाय सुमारास, मरिना बे सँड्स येथील लाईट शो MacRitchie Reservoir पार्क खाणे: खादाड पांढरी नेहमीचं टुरिस्ट ठिकाणी ना जात स्थानिक छोट्या HAwKAR सेन्टर ला जावे हैनान चिकन राइस पोपेय नावाचे पात्तळ स्प्रिंग रोल ( ना तळलेले आणि शाकाहारी) मलेशिअन पद्धतीचे रोटी मर्तबा ( रोटी चनय नाही) मारशे नावाचे स्विस पद्धतीचे जेवणगृह बाली: पाहणे: उलुवातु मंदिरातील संध्यकाळचा रामायण नृत्य सोहळा उबूड गावात राहणे १-२ दिवस ( कुटा भाग टाळा फार बाजारू) अंग रगडून घेणे ( दोन्ही पुरुष आणि स्त्रियांसाठी आणि सभ्य ) खाणे: नासी लेमक : नारळ दुधातील भात + कोरडे चिकन + इंडोनेशियन पद्धतीचे लोणचे + तळलेले दाणे + बारीक तळलेले खारट मासे ( खरं सान्गतो पुण्याच्या जुन्या स्वाद भेळेची आठवण झाली वरून चुरलेला खमंग पोह्याचा पापड + खारे दाणे घालायचे ते मालक) विविध फळांचे रस ( अवाकाडो) भाजलेले साते कबाब ( तळलेलं नाही) लेमन ग्रास चा स्वाद असलेला कोणताही पदार्थ असो सध्या एवढेच
  • Log in or register to post comments
म
महेश जोगलेकर Mon, 06/17/2019 - 08:34 नवीन
अरे बापरे किती मुद्रा राक्षस विनोद केले मी ! क्षमा करा मंडळी पण देवनागरीत कसे लिहावे , मी इसकाळ वर लिहितो आणि त्याचे कॉपी पेस्ट करतो दुसरे असे कि एकदा प्रकाशित केल्यावर त्यात दुरुस्ती कशी करावयाची?
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 06/17/2019 - 10:00 नवीन
१. इ-सकाळ वर पण असेच लिहिता का ? चालून जाते का ? २. माझ्या अनुभवानुसार एकदा प्रकाशित केल्यावर त्यात सुधारणा धागाकर्त्याला करता येत नाही. त्याची विनंती संपादक मंडळाला करावी लागते. (बहुतेक वेळा त्यांना सुधारणा करायला वेळ नसतो) जाणकार मिपाकर आणखी सांगतीलच. ३. देवनागरीत कसे लिहावे : सध्या मिपावर मराठी टंकन करण्यास अडचणी येत आहेत. https://www.google.com/intl/mr/inputtools/try/ ही गुगल लिंक वापरा, आधी टंकन करा. योग्य शब्द आणि शुद्धलेखनाची खात्री करा मगच मिपावर पेस्ट करा. हा सोपा प्रकार आहे. बाकी, प्रतिसाद छान माहितीपूर्ण दिलेत +१
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Mon, 06/17/2019 - 10:40 नवीन
तुमच्याकडे पुरेसा वेळ आहे.स्वतः व्यवस्थित कार्यक्रम आखून सहल आयोजकांशिवाय जाऊ शकाल. सुमारे दीड वर्षांपूर्वी असेच स्वनियोजन करून एक आठवड्याची दुबई सहल आम्ही कुटुंबीय करून आलो. आंतर्जालाद्वारे विमानाची तिकिटे, व्हिसा, हॉटेल आरक्षण आदी सर्व कामे घरबसल्या होऊ शकतात. स्वनियोजित सहल किफायतशीर नक्की पडते.
  • Log in or register to post comments
म
महेश जोगलेकर Mon, 06/17/2019 - 11:05 नवीन
सिंगापोर मध्ये मोठा खेकडा ( मिरची वाला ) प्रसिद्ध आहे ..लाल तिखट गोड असा घट्ट रस्सा ( पिठल्यासारखा) परातीत असतो आणि मध्यभागी मोठा उकडलेले आणि बहुतेक थोडासा तळलेलं खेकडा ) सोबत पांढऱ्या लुसलुशीत पावाचे तुकडे . पण खरं सांगू यातला तो रस्सा म्हजे फारच गुळमात केचप सारखा लागतो त्यापेक्षा काळ्या मिरी तीl खेकडा जास्त चांगला लागतो - मश्रुम चे विविध प्रकार - मलेशिअन रेंदान्ग ( खोबरे + कँडल नट व इतर मसाले ) यातील सुके असे कोंबडीचे गोड: आइस कचान्ग पेय: सावर ( तुरट + आंबट) चेरी लिंबू पाणी इच्छा असले आणि खात असाल तर तर बालीतील खासियत म्हणजे बेबेक नावाचाच डुकरांचा पदार्थ ( माफ करा सरळ शब्द वापरला)
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 06/17/2019 - 14:55 नवीन
त्या सिंगापोरी खेकड्याच्या रश्श्याच्या आठवणीने लाळ टपकायला लागली :)
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Mon, 06/17/2019 - 11:23 नवीन
तुमचा मोठा ग्रुप असेल व डोक्याला काही ताप नाही असा प्लान हवा असेल तर यात्रा कंपनीच चान्गली. मी भारतात सुमारे १८ ट्रीप्स सहकुटुंब केल्या आहेत . चार जणांचा ग्रुप सबब मतभेद नाहीत .कोणत्याही वहानाने प्रवास करून पुढे जायची तयारी ठेवली की सगळे जमते. मी २०१७ मध्ये युरोपातील ३ देश पाहिले यात अशी काही स्थळे होती जी वीणा केसरी दाखवत नाही. उदा. शामोनी, मौंतरू ,मिलान जिनेव्हा ई. बर्निना पास ( तिरानो ते लुसर्न ) कोणतीही यात्रा कंपनी दाखवीत नाही .भारतातील १८ पैकी एकाही ट्रीप मध्ये मी वीणा किंवा तत्सम ट्रीप सह गेलो नाही. पण किरकोळ मनस्ताप सोडला तर काही फारसे बिघडले नाही .माझा असा अनुभव आहे की वीणाच्या एका तिकिटात मी सारे कुटुंब भारतात फिरवू शकलेलो आहे. १४ रात्री युरोपचा खर्च मला फक्त १ लाख ५ हजार प्रत्येकी इतका आला. ( व्हिसा , विमा सह ). मी स्थळ दर्शनात एक तडजोड मात्र करतो ती अशी की समजा नॉट्रे देम हे चर्च फुकट आहे तर चर्च पाहायचा आनंद तिथे मिळवायचा . त्याच्याच शेजारी एक अप्रतिमी चर्च आहे पण ते फुकट नाही सबब टाटा .केसरी तुम्हाला युंगफ्राऊ ला बर्फ पाहण्यासाठी नेईल . पण तुम्ही जर स्वीस पास काढलात तर माउंट रिगी हे तितकेच बर्फाळ ठिकाण मोफत .स्वीस सारखा महागडा देश देखील डोके लढविले तर कमी खर्चात पहाता येतो. खाण्याचा हव्यास न करणे हे स्वीस मध्ये जमले पाहिजे. तिथे राईस प्लेट २५०० रु ला आहे .
  • Log in or register to post comments
म
महेश जोगलेकर Mon, 06/17/2019 - 11:28 नवीन
अरे अजून एक आठवले, महत्वाचे, खास करून New Zealand आणि ऑस्ट्रेलियातील काही भाग यात अर्थात जोखीम हि आहे पण मजा येऊ शकते खास करून कुटुंब आहे म्हणून ते म्हणजे स्वतः गाडी/ भाड्याने घेऊन फिरणे, राहण्यासाठी गावोगावी मोटेल , - भारतासारखेच उजव्या बाजूचे चालक - भारतीय ड्रायविंग परवाना चालतो ( स्मार्ट चिप ) - दिवसाचा kharch ८ जण व्हॅन = अंदाजे ७०- १०० औस्ट्रेलिअन डॉलर
  • Log in or register to post comments
ह
हर्मायनी Mon, 07/01/2019 - 14:10 नवीन
परवाच ५ दिवसांची स्वतः आखलेली बाली ट्रिप करून आलेय. त्याबद्दल काही माहिती हवी असल्यास व्यनि करू शकता.
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Mon, 07/01/2019 - 14:32 नवीन
मस्त बाली भटकंती वृत्तांत लिहा की. सगळ्यांनाच फायदा होईल.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 07/01/2019 - 17:55 नवीन
+१ मुख्य म्हणजे भरपूर चित्रे टाकून बालीच्या सौंदर्याला न्याय द्या. :) लेखाच्या प्रतिक्षेत आहे.
  • Log in or register to post comments
ह
हर्मायनी गुरुवार, 07/04/2019 - 10:20 नवीन
तोच विचार आहे..
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 07/02/2019 - 02:09 नवीन
कुटुंबातल्या कुणास अओफिस कामानिमित्ताने परदेशी फिरण्याचा अनुभव असला तरच त्यास "स्वत: आखलेलली ट्रिपचा" उपयोग करता येईल. कारण वाहनव्यवस्था, हॅाटेल्सचे नियम ,चेकइन, विमान प्रवास याची थोडी ओळख असते.
  • Log in or register to post comments
भ
भटक्या फोटोग्राफर Sun, 09/15/2019 - 07:20 नवीन
मला सम्पर्क करा मी स्वत: फिरतोच पण माझा व्यवसाय पण हाच आहे मला सम्पर्क करा विहार होलिडेज नावानी आहे
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 10 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 10 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 10 hours ago
  • सुंदर !!
    1 day 10 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 10 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा