Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

मोदी मंत्रीमंडळ २.०

म
माहितगार
Fri, 05/31/2019 - 15:15
🗣 65 प्रतिसाद
विरोधी पक्ष सत्तेत आलाय आणि टिकेची पहिली संधी म्हनून नवीन मंत्रीमंडळात मानव संसाधन मंत्रालय मिळाले की केवळ मोदी विरोधासाठी स्मृती इराणींचे शिक्षण काढा असाही माझा स्वभाव नाही. मंत्रिमंडळे - शैक्षणिक मिक्स अँड मॅच की मिसमॅच ? , आंतरराष्ट्रीय राजकारण आणि भारतीय वाचाळ वीरता,प्रश्न राष्ट्रीय सुरक्षेचा - गल्लत नेमकी कुठे होते आहे ? अशा लेखातून मी मंत्रिमंडळांच्या स्वरुपावर यापुर्वी टिका केली आहे. (या किंवा त्या पक्ष किंवा व्यक्तींना अपवाद करणे माझा स्वभाव नाही हे. वे. सा. न. ल.) उपरोक्त टिका लेख मी पुरेसे उशिराने लिहिले आहेत. मोदी सरकारच्या दुसर्‍यांदा निवडून येण्याबद्दल लेखन मी मुद्दामच अंमळ उशिराने करायचे ठरवले. त्यामुळे तुर्तास ह्या धाग्याचा तो चर्चा विषय नाही. मोदींच्या मंत्रिमडळ क्रमांक २ चा शपथविधी काल जल्लोशात पार पडला. माझ्या पुरते नवीन मंत्रीमंडळ फेरबदला बद्दल काही मर्यादीतच निरिक्षणे तुर्तास नोंदवावीत असा मनोदय आहे. केवळ घराणेशाहीशी प्रतिस्पर्धा असल्यामुळे राजकीय वर्णी लागणार्‍या मनेका गांधी मंत्रिपदावर सध्यातरी दिसणार नाही, स्मृती इराणींनी घराण्यातील व्यक्तीला हरवून दाखवल्याने प्रतिस्पर्धी प्रदर्शनाची गरज मोदींना कमी जाणवली असेल तर एकुणच राजकारणातून (सार्‍याच) घराण्यांना दूर करण्याचे फायदे सर्वसामान्य माणसांना लक्षात यावेत. सर्वच घराणेशाहीला मतपेटीतून मतदार राजा अद्याप संपवत नाही लोकशाहीचा घोर अपमान सहन करत रहातो किंबहूना त्यात सहभागी होत रहातो हि अद्यापही चिंतेची बाब आहे. बाकी राजकीय प्रभावाच्या दृष्टीने मनेकांना दुसरे काही महत्व नव्हतेही राजकीय दृष्ट्या प्रभावशाली व्यक्ती सुषमा स्वराज यावेळी मंत्रीमंडळात दिसणार नाहीत. माझ्या मागच्या लेखांमधूनही त्या परराष्ट्र्खात्यापेक्षा मानव संसाधन खात्यात अधिक योग्य होत्या. वकीली भाषेत तरबेज असूनही आंतरराष्ट्रीय राजकारणातील डिप्लोमॅटीक लँग्वेज मध्ये कच्च्या होत्या असे माझे मत होते. नवाज शरीफ काळात स्वतः नवाज शरीफांपेक्षा त्यांचे परराष्ट्रमंत्री वाचाळ वीरता दाखवत आता स्वतः इम्रानखानच वाचाळ वीरता दाखवतो. त्याला भारताच्या परराष्ट्रमंत्रीपदावरून सडेतोड पण डिप्लोमॅटीक भाषेत उत्तरे जावयास हवी होती. काही टिका सरकार मध्ये राहून करता येत नाही ती मंत्रिमंडळाबाहेरच्या भाजपा नेत्यांनी आणि विरोधी पक्ष नेत्यांनी पुढे न्यावयास हवी होती पण त्यासाठी लागणार्‍या इच्छाशक्ती कौशल्य दोन्हीची कुठे कुठे कमतरता असावी. विरोधीपक्षाकडे थरूर सारख्या व्यक्तीकडून इम्रान खानवर सडेतोड टिका व्हावयास हवी होती त्या एवजी सिद्धूची वाचाळ्वीरता चालू होती. भाजपा विरुद्ध बोलण्यासाठी थरूरांकडून पढवून घेणारे राहूल गांधींनी थरूरची मदत घेऊन आधीच इम्रानखानी धोरणावर कडकडून टिका केली असती तर एका दगडात दोन कामे झाली असती इम्रानखानला उत्तरे मिळाली असती आणि राष्ट्रवादावर मोदींना जो एक्रेरी क्लेम मिळाला तो मिळाला नसता. पण यासाठीची राजकीय परिपक्वता थरूर आणि जयशंकरात नसते ती राजकारण्यात असावी लागते आणि तिथे राहुल पेक्षा मोदींचे वेगळेपण का जाणवतय हे सांगता आले नाही तरी जाणवत असते. अर्थात मी ज्या आंतरराष्ट्रीय राजकारणात लागणारे सडेतोडपणा पण डिप्लोमॅटीक लँग्वेज न सोडता (जे कौशल्य इम्रान खान दाखवतो) त्याचा भाजपाई राजकारण्यांमध्ये सुद्धा अभाव जाणवतो . काँग्रेस असो की भाजपाइ नेते सर्वसाधारण वाचाळ वीरता दिसते पण त्यातील डिप्लोमसी कौशल्याच्या आंतरराष्ट्रीय नॅरेटीव्हवर प्रभावी वापर करता येत नाही.. त्यामुळे परदेशातून होणार्‍या भारत विरोधी पाकीस्तान आणि चीन पुरस्कृत गाजावाजास चपखल आणि चोख उत्तरे देण्यास भारतीय कमी पडतात. भारतीयांना परकीयानी केलेल्या वरवरच्या दिखाऊ कोडकौतुकाची लगेच भुरळ पडते स्वतःची पाठ थोपाटून घेतात प्रत्यक्षात परकीय देशांचे बरेचसे निर्णय भारतीय हितांना अनुकूल नसतात. याचे विश्लेषण भारतीय माध्यमातून अभावानेच पहाण्यास मिळते. नव्या मोदी मंत्रिमंडळाच्या बाबतीत दोन आनंदाच्या बाबी परराष्ट्र वाटाघाटीत वाकबगार व्यक्ती जयशंकर आणि निर्मला सितारामन अनुक्रमे परराष्ट्र आणि अर्थमंत्रालय सांभाळात असतील. ट्रंपानॉमीक्स चे अमेरीकन आर्थीक हितरक्षणास्त्र बद्दल मी मागेच लेखन केले आहे. सर्वसाधारणपणे बरेच मोदीभक्त ट्रम्पभक्त सुद्धा असतात हे मी मिपावर अनुभवले आहे. पण ट्रंपनितीमुळे भारताचे इराण रशिया सोबतचे बाधीत होणारे संबंध तसेच पडद्या आडून भारतावर असलेले अमेरीकेचे सातत्याचे ट्रेड विषयक दबाव या काळजी करण्याजोग्या गोष्टी आहेत . जयशंकर आणि सितारामन असल्याने आमेरीकेसोबतचे व्यापार विवाद चुटकी सरशी सुटतील असे नाही. पण त्यांचा अभ्यास आणि काही कौशल्य आहे ते ऊपयूक्त ठरू शकावे असे वा वाटते. *लेखन चालु - अनुषंगिकाव्यतरीक्त अवांतरे टाळण्यासाठी धागालेखक आणि आणि मिपाकरांवर व्यक्तिगत टिका तसेच शुद्धलेखनाचे अगाध ज्ञान न देण्यासाठी अनेक आभार

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 27194 views

🗣 चर्चा (65)
स
सुबोध खरे Tue, 06/04/2019 - 15:56 नवीन
माहितगार मोदी बरेचसे काम सेक्रेटरी मंड्ळींकडून करून घेत असल्यामुळे काही अपवाद वगळता मंत्र्यांकडे केवळ निरीक्षणाचेच काम शिल्लक रहाते हे आपले निरीक्षण चुकीचे आहे. कारण श्री मोदी माणसं निवडतात ती त्यांची कार्यक्षमता आणि स्वच्छ प्रतिमा पाहूनच. यात अनेक आय ए एस अधिकारी, लष्करी अधिकारी आणि मंत्री येतात. वाचाळ वीरांना शक्यतो दूर ठेवले जाते. त्यांनी अनेक गुजरात केडरचे आय ए एस अधिकारी केंद्रात नेले. तसेच जे मंत्री कार्यक्षम म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांना परत खाती दिली आहेत. उदा अमित शाह, राजनाथ सिंह, पियुष गोयल, निर्मला सीतारामन इ. केवळ सचिवांकडून काम करून घेणे आणि त्यांनाच उत्तरदायीत्व देणे हे श्री मोदी करत नाहीत. सर्व मंत्र्यांना आपल्या कामकाजाची माहिती दर आठवड्याला पंतप्रधानांच्या कार्यालयाकडे पाठवावी लागते आणि श्री मोदी रोज दिवसा अखेरीस थोड्या थोड्या खात्यांच्या कामकाजाचा आढावा घेत असतात. यामुळेच श्री मोदी आणि श्री अमित शाह हे हुकूमशाही वृत्तीचे आहेत असा समाज सर्वत्र पसरला आहे. आणि अनेक केंद्रातील आय ए एस अधिकारुयानी आपल्याला आपल्या मूळ राज्यात परत पाठवा असे अर्ज केले आहेत. https://timesofindia.indiatimes.com/india/Delhi-too-hot-56-IAS-officers-opt-for-states-just-4-come-to-Centre/articleshow/48011536.cms बरेच अकार्यक्षम आय ए एस अधिकारी त्यांनी सक्तीने निवृत्त करून घरी पाठवले आहेत. अर्थात मंत्री हा समोर दिसतो आणि आय ए एस अधिकारी पडद्या मागे असतो म्हणून तुम्हाला कळत नाही. https://www.livemint.com/Politics/a6XeMF2cgTvbhesASU7RDM/Government-makes-129-nonperforming-officers-retire-in-pub.html
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 06/04/2019 - 15:58 नवीन
https://timesofindia.indiatimes.com/india/Modiversary-This-PM-drives-babus-hard-leaves-them-weary-and-wary/articleshow/47392249.cms https://timesofindia.indiatimes.com/india/Gadkaris-perform-or-take-VRS-message-to-red-tape-obsessed-babus/articleshow/48009281.cms हेही वाचून घ्या
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 06/04/2019 - 15:58 नवीन
https://timesofindia.indiatimes.com/india/Modiversary-This-PM-drives-babus-hard-leaves-them-weary-and-wary/articleshow/47392249.cms https://timesofindia.indiatimes.com/india/Gadkaris-perform-or-take-VRS-message-to-red-tape-obsessed-babus/articleshow/48009281.cms हेही वाचून घ्या
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 06/04/2019 - 16:09 नवीन
१२९ आय ए एस अधिकाऱ्यांना घरी पाठवल्यामुळे अनेक आय ए एस अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. आपल्या बापाचे राज्य आहे समजणाऱ्या किंवा ज्यांचे हात बरबटलेले आहेत अशा अनेक अधिकाऱ्यांनी मुदतपूर्व/ ऐच्छिक निवृत्ती सुद्धा घेतली आहे.
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन Tue, 06/04/2019 - 20:12 नवीन
अमित शहांना खुनाच्या खटल्यात गोवण्याचा प्रयत्न त्याने केला होता. आता परिस्थिती ऊलट झाली आहे.चिदंबरम भ्रष्टाचाराच्या खटल्यात अडकला आहे. हि पाश्व्रभुमी असु शकेल काय?
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Mon, 06/03/2019 - 20:50 नवीन
गेल्या लोकसभेत मंत्री असलेले राज्यवर्धन राठोड ह्यांना ह्यावेळेला मंत्रीमंडळात शामिल न करता त्यांना खास कामासाठी राखीव ठेवल असल्याची बातमी आहे. राजस्थानात वसुंधरा राजे यांची प्रतिमा खालावत असताना तेथे नविन दमाचे नेते राज्यवर्धन राठोड हे मुख्य मंत्री पदासाठी दावेदार असणार आहे ! राजस्थानात पक्षाला चांगला सपोर्ट आहे तो जनाधार टिकवुन ठेवावा व वाढवावा अशी जवाबदारी राज्यवर्धन राठोड यांच्यावर असेल !!
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 06/04/2019 - 05:41 नवीन
हे कसं पॉलीटीकली राईट विधान आहे. पॉलीटीकली राईट बोलण्यात भाजपाई सावकाशपणे वाकबगार होतील. अर्थात ओव्हर ऑल मंजील अद्याप दूर आहे.
  • Log in or register to post comments
र
रणजित चितळे Mon, 06/03/2019 - 08:05 नवीन
वसुंधरांनंतर मुख्यमंत्री
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sat, 06/01/2019 - 15:13 नवीन
राज्यवर्धन राठोड was minister for Sports , Information & Broadcasting. He is replaced by Kiran Rejiju as Minister for Sports , Information & Broadcasting
  • Log in or register to post comments
भ
भीमराव Sat, 06/01/2019 - 15:16 नवीन
बाकी महत्वाच्या पदांसोबत युवा वर्गात जास्त चर्चा होती क्रिडा मंत्री पदांची, गौतम गंभीर चा भाजप प्रवेश व कर्नल साहेबांच्या काळात मिळालेली पदके यामुळे कोणाची वर्णी लागते याची चर्चा होती. पण दोघांना न मिळता ते पद दुसऱ्या व्यक्तीला मिळाले.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Sun, 06/02/2019 - 04:34 नवीन

ईव्हीएम मशीन आणि त्यांच्या संख्येबाबत माझ्या मनात फार आधीपासून शंका होती. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड इथे भाजपची सत्ता असताना भाजपाचा पराभव झाला आणि काँग्रेस पार्टी विजयी झाली. पण कदाचित हा पराभव देशाच्या निवडणुका जिंकण्यासाठी तर नाही, अशी शंका माझ्या डोक्यात आली होती. pic.twitter.com/NishwWZJ7h

— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 1, 2019
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Sun, 06/02/2019 - 06:16 नवीन
मुरलेले लोणचे आहे. त्यांनी आतापर्यंत केलेल्या निवडणूक प्रचारात कुठेही भारताच्या विकासाची गोष्ट केली नव्हती. त्यांना आता आपल्या मर्यादा पूर्णपणे माहित झालेल्या आहेत. ईवीएम मधे घड्याळ दाबल्यावर मत कमळाला गेले असे बालिश विधान करायला पण त्यांना काही वाटत नाही. मुम्बर्यामधे यांचे नेते अल्पसंख्याकाचे पाय चाटतात आणि मुंबईत राज ठाकरेना प्रचारात उतरवतात. एकच जमेची बाजू म्हणजे यांनी बारामतीत मात्र खरोखरच विकास केला आहे. पण फक्त तिथेच ,इतर ठिकाणी बोंब! आता पण विधानसभेत ईवीएम मुद्दा उकरुंन काढून मतदाराचे ध्यान भरकटवण्याचे कामच हे करतील.
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन Sun, 06/02/2019 - 09:29 नवीन
बारामतीत विकास केलेला नाही. इंग्रंंजानी बांधलेल्या भाटगर धरणाच्या पाण्यावर फक्त अर्ध्या बारामतीत विकास झालेला आहे. ह्याना अजुन सुपा, शिर्सुफळ च्या पिण्याच्य पाण्याचीसोय करता आली नाही आहे. ऊगाच नाही जानकरांनी सुप्रियाच्या तोंडाला फेस आणला होता!
  • Log in or register to post comments
M
mayu4u Sun, 06/02/2019 - 12:10 नवीन
त्याचा सदुपयोग करावा. https://twitter.com/mayu4u/status/1135063489855283200
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 06/02/2019 - 14:13 नवीन
प्रसादराव इव्हीएम आणि इतर विषयांना वाहीलेले इतर अनेक धागे आहेत. आपण इथे मांडलेला इव्हीएमचा मांडलेला विषय आणि त्यास येणारे प्रतिसाद या धागा लेख चर्चा उद्देशाच्या परिघाबाहेरचे ठरतात घागाचर्चेच्या परिघा बाहेरील विषयांतर टाळावे अशी आग्रहाची विनंती आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा