Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

हिंदीला पर्याय असू शकतो?

उ
उपयोजक
गुरुवार, 05/30/2019 - 08:38
🗣 65 प्रतिसाद
मराठी तसेच अन्य हिंदीतर भाषांवर हिंदीचे आक्रमण वाढते आहे.आपल्या मराठी बाबत सांगायचे झाले तर तरसणे,बातचीत असे कितीतरी मराठी नसलेले शब्द वृत्तवाहिन्यांमुळे मराठीत शिरतायत.हिंदी व्याकरणाचाही प्रभाव पडून 'मी बोलली',मी आली,मी गेली,आवाज दिला का?(हाक मारली का?) हे असे कितीक हाल मराठी सोसतेय.वर्धा महाराष्ट्रात असूनही तिथे हिंदी विद्यापीठ आहे. केवळ मराठीच नव्हे तर बाकीच्याही हिंदीतर भारतीय भाषांबाबतही होतंय.फेसबुकवर या हिंदीच्या आक्रमणाची खंत मांडणारी पाने,समूह सुरु झाली आहेत.खालील दुव्यांवर आपण ते पाहू शकता. मातृभाषेबाबत आग्रही राहण्याचं एक उदाहरण म्हणून तामिळनाडूचं नाव नेहमी पुढं केलं जातं.त्याच कट्टर अशा तामिळनाडूतल्या बांधकाम व अन्य क्षेत्रातल्या अभियंत्याना,कंत्राटदारांनाही या हिंदीनं वाकवलेलं आहे.दि हिंदूमधील ही ९ वर्षांपूर्वीची बातमी वाचा.यावरुन आता तिकडे किती हिंदी पसरली असेल याचा विचार करा. T Selvakumar Chennai Posted: 10 May 2010 by 00:00 IST Tamil architectures and field engineers are learning Hindi in order to work in 80% of North Indian workers engaged in construction work in Tamil Nadu. Hindi, Polytechnic, ITI, and those who come to work in Hindi are preferred. A large number of North State workers are working in various industries, including the construction industry, hotels, small shops and the supermarket, beauty products and sales centers. There are substantial numbers of Bihar, Odisha and Rajasthan. There are also workers in Andhra Pradesh. Particularly 70 to 80 percent of North Indian workers work in the construction industry. Since they know only Hindi language, there is a great deal of difficulty for the Tamil-speaking maestro, field engineer, project engineer, project manager and contractor during construction. So they have been forced to learn Hindi. At the same time, interested North American workers are also learning Tamil. Tamil and Telugu In this regard, Sivagurunathan, Vice Chairman of the Chennai Real Estate Corporation Association (Gretai) The workforce in Tamil Nadu is about 70 to 80 percent of the workers from the North. It is inevitable that they speak Hindi. The remaining 20 percent are Tamils ​​and Telugu people. Most of them do the same as a field supervisor, manager, and a senior officer. Therefore, Hindi has to know the building designer, field engineer, project engineer and project manager to work with the Northern state workers during construction. It is essential that the Knight Engineer and the field engineer in particular need to know Hindi. Last 5 years ago, the architect did not know Hindi. Let's say that there is no magician who does not speak Hindi today. The field engineers who come to work after completing the PE, Polytechnic and ITI have become basic knowledge in Hindi because of the priority in the work. Thus, there are no restrictions on 400 construction projects in Tamil Nadu that cost around Rs 28,000 crore. He said so. Job integration Nandakumar, former head of the Tamil Nadu unit of the Federation of Real Estate Management Societies (Gretai) said, "The integration of work in the construction industry is essential. Most of the people in the industry are in the Northern province, and even 10 to 15 years of professional experience, even building materielals can not afford them to work properly. The Hindi masters have learned to speak half-spoke to them, since they have learned Hindi to be able to easily work in the North. But they do not know how to write Hindi. " या उत्तर भारतीय,बिहारी कामगारांना स्थानिक भाषा शिका म्हटलं तर ते शिकत नाहीत.आपली हिंदीच सुरु ठेवतात."अरे भैय्या हम तो पेट भरने के लिए आए हैं।ये नई भासा वगैरा सीखना हमसे तो ना हो पाएगा।" अशी उत्तरं मिळतात.कंत्राटदारसुद्धा कुठं यांना समजावत बसता? कमी दरात मजूर मिळतोय त्याबदल्यात मोडक्या तोडक्या हिंदीत का असेना संवाद साधा आणि काम उरकून घ्या असा विचार करतात. तामिळनाडूतल्या शाळांमधेही आता हिंदी शिकवा असा सूर उमटू लागला आहे.हा व्हिडिओ पहा. https://youtu.be/18ilO98UhUg हिंदीच्या आक्रमणामुळे कट्टर असा तमिळनाडूसुद्धा आता हळूहळू असा बदलतोय. थोडक्यात हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नसूनही ती भारतात वेगानं हातपाय पसरते आहे. नोटा,सेन्सॉरकडून मिळणारं प्रमाणपत्र या गोष्टी सर्व भारतीयांसाठी आहेत.पण यांवरचा मुख्य मजकूर हा फक्त हिंदीत असतो.हे कशाकरता? एकीकडे हिंदी ही राष्ट्रभाषा नाही म्हणायचं आणि दुसरीकडून असा प्रचार आणि लादणूक करायची,शासकीय बँकांमधून हिंदी दिन साजरा करण्याची सक्ती करायची.कस्टमर केअरवाले थेट हिंदीतंच सुरु करतात. याबदल्यात हिंदी भाषिक काय करतात ते बघा.ते दुसर्‍या राज्यात गेल्यावर स्थानिक भाषा शिकत नाहीत.त्रिभाषासूत्रातून हिंदी आपल्या माथी मारली आहे.पण हे लोक स्वत:च्या हिंदी पट्ट्यात मात्र हिंदीतर भारतीय भाषा जसे की मराठी, तामिळ, तेलुगू , बंगाली, कन्नड शिकवत नाहीत.असं का? ज्यांना भारतातल्या भारतात बराच प्रवास करावा लागतो त्यांना प्रत्येक राज्याची भाषा शिकणं शक्य नाही.किंवा हल्ली फेसबुक,व्हॉटसअॅप अशा समाज माध्यमांद्वारा बहुभाषिक लोक मित्र म्हणून जोडले जाणे शक्य होते.त्या प्रत्येक मित्राची मातृभाषा शिकणं काही शक्य नाही. सर्वांना जोडणारी भाषा म्हणून हिंदी स्विकारल्याचे दुष्परिणाम म्हणजे हिंदीची दादागिरी आणि हिंदीभाषिकांचा वरचष्मा, स्थानिक भाषा न शिकणे,हिंदी राष्ट्रभाषा आहे असा खोटा प्रचार करणे. ही दादागिरी टाळण्यासाठी काय करता येईल? किंवा हिंदीला पर्याय म्हणून कोणत्याच राज्याची किंवा भाषिक पट्ट्याची स्थानिक भाषा नसणारी 'भारती' किंवा असंच काहीतरी चांगलंसं नाव देऊन नवीन भाषा व लिपी निर्माण करावी का? जिच्यात प्रत्येक राज्यातले शब्द समान संख्येने असतील? कारण भारत जोडला गेला पाहिजे हे खरं असलं तर तो एकाच भाषेच्या मिंध्यात राहणेही चांगले नाही.ही मक्तेदारी मोडून काढणे कसे शक्य व्हावे? तुम्हाला काय वाटतं? पर्याय निर्माण होऊ शकतो हिंदीला?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 28810 views

🗣 चर्चा (65)
उ
उपयोजक Sat, 06/01/2019 - 16:49 नवीन
https://mobile.twitter.com/ANI/status/1134828963132575744?s=19
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sat, 06/01/2019 - 19:32 नवीन
हिंदी भाषेबद्दल इतकी अढी का आहे तुमच्या मनात? भाषा हे संवादाचे माध्यम आहे. भारतासारख्या खंडप्राय देशात जिथे जवळपास प्रत्येक राज्याची स्वतःची भाषा आहे तिथे इतर राज्यातील वेगळी भाषा बोलणाऱ्या लोकांशी संवाद साधायचा म्हटलं की एका सामायिक भाषेची गरज भासते. सुशिक्षितांमध्ये ही गरज इंग्रजी पूर्ण करते. मात्र ज्यांना इंग्रजी येत नाही त्यांना अशा वेळी हिंदी उपयोगी पडते. जो महाराष्ट्राबाहेर इतर राज्यांत जातो त्या प्रत्येकाला हे जाणवते. तुमचा राग हिंदी भाषिक राज्यातील लोकांवर असावा असं वाटते. काही नगण्य अपवाद वगळता हे लोक आडमुठेपणा करतात, हिंदीवर अडून बसतात. पुण्यासारख्या मराठी भाषिक शहरात दहा बारा वर्षे राहूनही मराठी न येणारे लोक माझ्या पाहण्यात आहेत. मात्र हे होतंच राहणार. त्यासाठी नवी भाषा तयार करणे हा पर्याय होऊ शकत नाही. जाता जाता, उत्तरेकडील हिंदीभाषिक राज्य वगळता जवळपास प्रत्येक राज्याची स्वतःची वेगळी भाषा आहे आणि तरीही आपल्या पंतप्रधानाना देशाला संबोधित करताना "मेरे प्यारे देशवासियों" म्हणावे लागते. आणि शेवटी, वृत्त वाहिन्यांवरील या ठिकाणी, त्या ठिकाणी, हे आहे, जे आहे, ते आहे प्रकाराबद्दल काय मत आहे?
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Sun, 06/02/2019 - 05:22 नवीन
ज्यांना इंग्रजी येत नाही त्यांना अशा वेळी हिंदी उपयोगी पडते. दक्षिणेतल्या लोकांना हिंदी समजत नाही.अगदी व्यवस्थित इंग्रजी येणार्‍या, शिकलेल्या द.भारतीयांनासुद्धा! मी स्वत: तमिळ लोकांना हिंदी शिकवायचो.त्यांच्या चुका आणि घाबरत घाबरत हिंदी शिकणं पाहिल्यावर हे लोक का अट्टहास करतायत हिंदी शिकायचा असा प्रश्न पडायचा. हिंदी न आल्यामुळे इतका न्यूनगंड येण्याचं खरंतर काही कारण नाहीये. मी ज्यांना शिकवायचो ते चेन्नई,बंगळूर,कोईंबतूर अशा दक्षिण भारतीय शहरांमधलेच लोक होते.म्हणजे हिंदी आलीच पाहिजे अशी काही सक्ती नव्हती त्यांच्यावर.मोठ्या शहरात ही अवस्था असेल तर छोट्या शहरात काय अवस्था असेल याचा विचार करा.तामिळनाडू वगळता अन्य चार द.भा राज्यांत हिंदी भाषा शाळांमधे शिकवली जाते तरीही ही अवस्था आहे.उत्तर भारतातल्या नेत्यांना प्रचारासाठी दक्षिण भारतात जागोजाग दुभाषा घ्यावा लागतो.अगदी जिथे हिंदी शाळेत शिकवली जाते त्या केरळ,कर्नाटक,आंध्र,तेलंगणातसुद्धा! आता मला सांगा दक्षिण भारतीय राज्ये येतात की नाही येत भारतात? हिंदी तिथल्या शाळेत शिकवूनही व्यवस्थित बोलता येत नसेल,समजत नसेल तरीही हिंदी ही देशाला जोडणारी भाषा आहे हा दावा कशाच्या आधारे? पुण्यासारख्या मराठी भाषिक शहरात दहा बारा वर्षे राहूनही मराठी न येणारे लोक माझ्या पाहण्यात आहेत. मात्र हे होतंच राहणार. तुमच्याच राज्यात येऊन अनेक वर्षे राहून ते लोक त्यांची भाषा तुमच्यावर लादत राहणार.वर तुम्ही म्हणता हे होतंच राहणार.इतकी लाचारी का करावी हिंदी भाषिकांची?कारण कळेल का? जाता जाता, उत्तरेकडील हिंदीभाषिक राज्य वगळता जवळपास प्रत्येक राज्याची स्वतःची वेगळी भाषा आहे आणि तरीही आपल्या पंतप्रधानाना देशाला संबोधित करताना "मेरे प्यारे देशवासियों" म्हणावे लागते. ते जे काही म्हणतात ते फक्त जिथपर्यंत हिंदी समजते तिथपर्यंतच पोहचतं.जिथं पोहचत तिथं काय?का ती राज्य,तो प्रदेश भारतातून काढून टाकायचा?"हिंदी समजत नसेल तर वेगळे व्हा भारतापासून" असं सांगायचं का?
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sun, 06/02/2019 - 05:36 नवीन
कुण्या हिंदी भाषिकाने तुमची ठासलेली दिसते. त्याचा राग ईथे धाग्यावर मत व्यक्त करणाऱ्या लोकांवर नका काढू :)
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Sun, 06/02/2019 - 14:45 नवीन
वगैरे शब्द वापरावे लागले यातूनच कळालं राग कुणाला आलाय ते! :-)) बाकी हिंदीच्या पायावर लोळण घ्यायची ठरवलंच असेल तर चालू द्या! :))
  • Log in or register to post comments
फ
फेरफटका गुरुवार, 06/06/2019 - 15:33 नवीन
हिंदी न समजणारे / बोलता येणारे द. भारतीय हे प्रामुख्यानं तमिळ आहेत. बाकी तेलगू, मल्याळी आणी कानडी लोकं हिंदी समजू / बोलू शकतात. ज्यांना हिंदी येत नाही त्यांच्यासारखं बनायचं ध्येय ठेवण्यापेक्षा, बहूभाषिक बनायचा प्रयत्न करावा. बरेचदा अशा 'विविधतेनं नटलेल्या' ग्रूपमधे केवळ हिंदी समजत नाही म्हणून गप्प राहिलेले तमिळ मित्र आहेत आणी त्यांना त्याची हळहळ सुद्धा वाटते. असो. भारतभर वापरता येण्यासारखी एक भाषा असावी आणी जर ती हिंदी असेल, तर ती बोलता, लिहीता, वाचता यावी.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 06/02/2019 - 12:26 नवीन
हिंदी ला विरोध नाही . पण हिंदी पाठोपाठ ज्या अप्रवृती हिंदी भाषिक पट्ट्यात आहेत त्या देशभर पसरतील ह्याची भीती सर्वांना वाटत आहे. हिंदी सर्व देशात शिकवण्याचा अगोदर काही गोष्टी केंद्राने स्पष्ट करावीत आणि तशी हमी द्यावी . भविष्यात कधीच कोणत्याही राज्याची राजभाषा बदलता येणार नाही . अल्पसंख्य लोक बोलत असतील तरी सुधा . कोणत्या ही राज्याच्या भौगोलिक सीमा बदलता येणार नाहीत. राजभाषेचा अनादर कोणत्या ही सरकारी खात्याने केला तर असा गुन्हा करणारा व्यक्ती आजन्म करावासा साठी पात्र राहील. बिगर हिंदी राज्यात फक्त संपर्क भाषा एवढीच तिची किंमत असेल कोणत्याही राज्य सरकारच्या कारभारात तिचा वापर करायची मागणी करता येणार नाही असे खास कायदा केंद्रांनी करावा आणि नंतर देशभर हिंदी शिकवावी
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Sun, 06/02/2019 - 14:50 नवीन
The Government of India has invited comments and suggestions till June 30th 2019 from the public . So I request all the members to send the mail to the government of India mail id: NEP.EDU@NIC.IN The Draft National Education Policy 2019 has been released and can be accessed at https://mhrd.gov.in/relevant-documents. Comments and suggestions are invited till 30th June, 2019 on NEP.EDU@NIC.IN
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 06/02/2019 - 18:22 नवीन
हिंदी भाषा महत्वाची राज्य यूपी आणि बिहार सर्व प्रकारच्या संकटात आहेत . बेरोजगारी,लोकसंख्या वाढ. गुंडगिरी,ठिसूळ प्रशासन,जातीयवाद . ह्यांचा कडे कोणताच प्लस पॉइंट नाही तरी उसने अवसान आणून त्यांचे पुढारी सिंह गर्जना करत आहेत . ह्या दोन्ही राज्यावर प्रगत राज्यांनी शेवट चा एकच प्रहार केला पूर्ण बंदी चा व तर ही दोन्ही राज्य नेस्तनाबूत होतील
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Sun, 06/02/2019 - 19:46 नवीन
पहिल्यांदा एक काहीतरी नक्की करा. कोणाला संपवायचे आहे? हिंदी भाषेला , हिंदी भाषिकाना का हिंदी बोलण्यार्या राज्याना?
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 06/06/2019 - 10:12 नवीन
जब बी हिंदी बोलने/ लिखने का टायम आयेगा तो बाबुराव जैसा बोलने का रे बाबा ! हम जैसा घाणेरडा इंग्रजी बोलके इदर से इंग्रज लोक को पळव्या ऐसाच हिंदी लोक को भी पळव सकता है ! वो नही पळ्या तो कमसे कम उनके कान के केस तो जळ जायेंगे ! तुम को ऐसा हिंदी बोलने का ट्रेनिंग होना तो हिंदी न्युज चॅनेल पे महाराष्ट्र के दुष्काळी भाग का रिपोर्टींग देखना, वो शेतकरी भाऊ का बो लना चालना देखकर तुम भी शिक जायेगा ! है क्या न नय क्या !! नायतर ये विडिओ देख लेना
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 06/06/2019 - 10:41 नवीन
बाबूभैय्यासे डायरेक्ट बाबूराव? लगता है तुम्हारा भाडा बढाना पडेगा रे बाबा.. ;-)
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 06/06/2019 - 16:28 नवीन
लग्नात बूट चोरणे नवऱ्या मुलाची ही आपली रीत नाही . पण ती रीत आली ना महाराष्ट्रात हिंदी सिनेमा बघून . बहिणीच्या नवऱ्याला दाजी किंवा काही ठिकाणी भावजी सुधा म्हणतात . जिजू जिजु जे बोलतात ते सुधा हिंदी सिनेमाची च देणं आहे . असे रीतिरिवाज भाषे बरोबर बदलतात आणि संस्कृती नष्ट होते म्हणून च स्वभाषा टिकणे खूप गरजेचं असते .
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 06/06/2019 - 17:30 नवीन
दिदी हे संबोधन पण मराठी नाहीय. जबाबदारी हा शब्द देखील मराठी नाहीय. कबूल हा शब्द देखील मराठी नाहीय. सुधा हा हा शब्द देखील मराठी नाहीय.
  • Log in or register to post comments
फ
फेरफटका गुरुवार, 06/06/2019 - 21:39 नवीन
संस्कृती ही कालानुरूप बदलत जाणारी असते. आणी तशी ती बदलते म्हणूनच टिकते. ज्ञानेश्वरांच्या काळातली - ७०० वर्षं जुनी मराठी सुद्धा आता कळणार नाही वगैरे उदाहरणं जाऊ द्या, पण २५-३० वर्षापूर्वीचे संदर्भसुद्धा आता लागत नाहीत. त्यामुळे त्या संदर्भासहित, काळाबरोबर अबदलत जाणार्या गोष्टींनाच त्या त्या काळची संस्कृती म्हणतात. आता भाषेविषयी आणी शुद्धता / प्रमाणभाषा वगैरे विषयाकडे गाडी वळतेच आहे तर हे सुद्धा नमुद करेन की, 'जिजू जिजू बोलत' नाहीत, 'म्हणतात'.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा