पोहे
नमस्कार मंडळी,
"माझा आवडता पदार्थ" असा निबंध मला कोणी लिहायला सांगीतला तर मी अगदी परात भर लिहू शकेल. अगदी रोज तिन्ही त्रिकाळ पोहे खायला घातले तरी मी नाही म्हणणार नाही. लग्न जुळविण्या निमित्त अजून ५-२५ घरी पोहे खायला मिळतील म्हणून एकेकाळी मी कोण आनंदलो होतो पण हाय रे दैवा, १-२ प्रयत्नांतच लग्न जमले आणि ती इच्छा अपूर्णच राहिली.
एवढेच काय पण पुढचा जन्म मला मानवाचा मिळाला तर साबूदाण्या सारखेच पोहे देखील उपवासाला मंजूर असावेत म्हणून मी देवाला साकडे घालणार आहे.
पण हल्ली चांगले पोहे मिळणं दुर्मिळ झालयं काय ? मी आमच्या घराच्या बाजूला मिळणार्या दुकानातून "स्वस्तिक" ब्रॅन्ड चे पोहे घेतो. पण त्यांच्या चवीत देखील बदल झाल्यासारखा जाणवतो. डिमार्ट सारख्या ठिकाणी मिळणारे सुटे पोहे खाण्यालायकच नसतात. मध्यंतरी "बिग बजार" मधे सुरती पोहे, इंदोरी पोहे नामक काही पोहे घेऊन बघीतले पण मजा नाही आली. एकदा नाशिक वरुन पोहे आणले होते ते अप्रतिम होते. ब्रॅन्ड चे नाव आता आठवत नाहिये. डिमार्ट मधे बासमती पोहे नावाचा एक प्रकार उपलब्ध आहे तो कोणी खाऊन बघीतला आहे काय ?
तर ठाण्या, मुंबईत कोठे उत्तम प्रति चे पोहे मिळत असतील तर नक्की सांगा ! अलिबाग, रोहा इकडे चांगले पोहे होतात असे ऐकून आहे, इथे त्यांची विक्री होते काय ? नक्की सांगा !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Jiyo Re Baahubali |Drums Version | Baahubali 2 The Conclusion | Prabhas & Anushka Shetty |M.M.Kreemकोल्हापुरा सारखे चुरमुरे जगात कुठेही मिळणार नाहीतमाझ्यासाठी हे त्रिकालाबाधीत सत्य आहे.