सॅनिटरी नॅपकिन चॅलेंज
दहा पंधरा वर्षा अगोदरच्या सॅनिटरी नॅपकिनच्या जाहिराती आठवतायेत का? काचेच्या बरणीतल्या निळ्या शाईत खडू बुडवताना दाखवायचे. . केवळ सुचकतेने मांडणी करुन निम्या लोकसंख्येच्या अपरिहार्य बाबी बद्दल अजुनही म्हणावं त्या खुलेपणानं बोलणं,वागणं होत नाही.
आपल्याकडे तर मासिक पाळी सारख्या किरकोळ शारिरीक घटनेला धार्मिक कोंदण जोडलय. इतरांचं तर दूर राहील, आम्हा डॉक्टरांमध्ये देखिल असलेला हा बडगा पदोपदी जाणवलाय! व्यक्तिगत बाब म्हणुन दुर्लक्षित केलं तरी जेव्हा आपणचं अजुनही मासिक पाळी दरम्यानच्या शिवाशिवीबद्दल ठाम भुमिका घेणार नसू तर समोर येणार्या रुग्णास काय समुपदेशन करु शकणार आहोत? अज्ञान, गैरसमज आरोग्यशिक्षणाने दूर होतिलही पण हा अंधश्रद्धांचा अन् चालिरितींचा पडदादेखिल फाडावाच लागणार आहे.
मागे आदिवासी आश्रमशाळातील शिक्षकांकरीता प्रशिक्षकांचे प्रशिक्षण घेत असताना एका सत्रादरम्यान मासिक पाळीविषयी बोलताना, पुरुष प्रशिक्षकांना सहज विचारलं की "तुमची आई, बहीण, पत्नी वापरत असलेल्या सॅनिटरी नॅपकिनचा ब्रांड कोणता आहे?" वर्गभर सन्नाटा छा गया. शेजारच्या टेबलवरचं डेमो करिता आणलेला सॅनिटरी नॅपकिनचा पुडा हाताळायला त्यांच्याकडे सरकवला. ४०प्रशिक्षकांकडुन फिरुन जसाच्या तसा पुडा परत आला. एकानेही पुडा फोडुन नॅपकिन हाताळायची हिम्मत दाखवली नाही. .
२८ मे 'वर्ल्ड मेन्स्ट्रुअल हायजिन डे'
सर्व पुरुष मित्रांनो! माझं चॅलेंज स्विकारालं?
मागच्याच महिन्यात बोटं काळं केलेला जसा एक सेल्फी अपलोडवला तसाच आजही सोशल मिडियावर तुमचा एक सेल्फी सॅनिटरी नॅपकिन, सॅनिटरी कप सोबतचा . . .
चला मासिक पाळी बद्दलची अळीमिळी गुपचिळी मोडुयात .
(सॅनिटरी नॅपकिन हा काही एकमेव व सर्वोत्तम पर्याय नाही. निसर्गपुरक सस्टेनेबल मेन्स्ट्रुएशन बद्दल सविस्तर बोलायचंच आहे, पण पुन्हा कधीतरी )
इतके असले तरीही आजही सॅनिटरी नॅपकिन सह सेल्फी काढून खुल्या माध्यमांवर टाकणे हे मला अप्रस्तुत वाटते. ह्याचा संकोच न वाटणे , मोकळी चर्चा करणे वेगळे आणि मला संकोच वाटत नाही ह्याचे प्रदर्शन करणे वेगळे असे माझे मत आहे . कोणी आरोग्य व्यावसायिकाने कामाकरिता , लॉक शिक्षणाकरता असे केले तर त्याचे स्वागत आहे. पण काही कारण नसताना असे फोटो टाकणे मला प्रशस्त वाटत नाही हे खरे.याला १००% सहमती. या विषयावर मोकळेपणाने चर्चा होत नाही आणि ती व्हावी यासाठी प्रयत्न करावेत, यात अजिबात संशय नाही. अश्या विषयांवर सामाजिक माध्यामांवर चर्चा होणेसुद्धा आवश्यक आहेच. कोणत्याही नाजूक/खाजगी विषयावरील सामाजिक मोहिमेत आयोजित केलेली प्रत्येक कृती; लक्ष्य असलेली जनता आणि कृती करणारे कार्यकर्ते; या दोन्हींना मनमोकळेपणे आणि कोणत्याही संकोचाशिवाय (किंबहुना, जमल्यास उघड अभिमानाने) आचरण्याजोगे असल्यासच, जास्तीत जास्त सहभाग, आणि पर्यायाने, यश अपेक्षित असते. भारतातील या विषयासंबंधातील सद्य परिस्थितीकडे (पक्षी : उघड चर्चेसाठी असलेला सामाजिक मोकळेपणा किंवा त्याच्या अभावाकडे) पाहता, मोहिमेतीतील एक किंवा अनेक कृतींनी सीमारेषा ओलांडल्यास, सर्वसामान्य भारतिय स्त्री आणि पुरुषांना, इच्छा असूनही, त्या मोहिमेत सहभागी होण्यास कसनुसे (ऑकवर्ड) वाटेल, हे नक्की. याचा परिणाम मोहिमेत भाग घेणार्यांची संख्या फार कमी होऊन, मोहिमेला यश मिळण्याऐवजी विपरित परिणाम (पक्षी : चेष्टा आणि/किंवा दुर्लक्ष) होण्याचीच जास्त शक्यता आहे. अश्या मोहिमांची सुरुवात सावगिरीने करून, मग लोकांची मनोवस्था जसजशी जास्त तयार होत जाईल त्याप्रमाणे मोहिमेत अधिक धाडसी बदल करत गेल्यास, यशाची जास्त खात्री असेल.मेडिकल दुकानदार नेपकीन देताना पेपर मधे गुंडाळून किंवा काळ्या पिशवीत का देतात? मला कोड आहे. मी तसे न घेता उघड उघड आणले तर आमची होममिनिस्टर उखडते! :-| नक्की लोचा कात आहे?तसे करणे अवैध नसले तरी, नवीन खरेदी केलेल्या अंडरवेअर्स, दुकानापासून घरापर्यंत, सगळ्या जगाला दिसतील अश्या आणल्या जात नाहीत... कोणी तसे केले तर तो चेष्टेचा विषय बनेल, हेवेसांन. हेच कारण इथे (स्त्रीसुलभ लज्जेला जमेस धरून, जरा जास्त तीव्रतेने) असते. अवैध नसलेली प्रत्येक गोष्ट सार्वजनिकपणे करणे योग्य/शहाणपणाचे होईलच असे नाही. काही गोष्टींसाठी एखादी सामाजिक सीमा बाळगणे जास्त योग्य असते.