Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

हाटेल साठी नावे सुचवा

न
निशांत_खाडे
Mon, 05/20/2019 - 21:42
🗣 116 प्रतिसाद
सर्व मिपाकरांना नमस्कार! मी औरंगाबादेत २०-२५ ची सीटिंग असणारे एक नाश्ता व ज्यूस सेंटर सुरु करत आहे. दुकानाची जागा अंदाजे २८० स्क्वेअर फीट आहे. लोकेशन कॉलेज आणि शिकवण्याच्या परिसरात असल्याने कमीत कमी किमतीत पोटभर(Filling) आणि उत्तम दर्जाचे पदार्थ ठेवण्याचा विचार आहे. चहा, पोहे-जलेबी, शिरा, उपमा, उसळ, मिसळ पाव, बटाटे वडा,समोसे, पालक वडा, दही धपाटे, दोन तीन प्रकारचे पराठे, छोले भटुरे, पुरी भाजी, मसाले भात, पुलाव, डाळ खिचडी, राजमा चावल, छोले चावल व चार-पाच प्रकारचे ताज्या फळांचे ज्युसेस आणि शेक्स, लस्सी, ताक, रबडी, बासुंदी, होममेड श्रीखंड, होम मेड कुल्फी, असा मेन्यू करण्याचा विचार आहे. माझ्या या छोटेखानी उपक्रमासाठी नावे सुचवावेत तसेच काही सल्ला किंवा आयडीयाज असतील तर त्याही शेयर करावयात. या धाग्यास प्रतिसाद देणाऱ्या प्रत्येक मिपाकराला आभार म्हणून आपल्या हॉटेल चे एक कुपन व्य.नि. द्वारे दिले जाईल. तसेच जर हॉटेलचे नाव या धाग्यावर सुचवलेल्या पैकी ठेवले गेले तर ते नाव सुचवणाऱ्या मिपाकराला आमच्याकडून भेट म्हणून ३० कुपन दिले जातील. औरंगाबादकर मिपाकरांनी जरूर व्य.नि. करा तसेच वेळ काढून भेटायला या. हॉटेल आपलेच आहे. प्रतिसादांच्या प्रतीक्षेत!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 112374 views

🗣 चर्चा (116)
प
प्रमोद देर्देकर Mon, 05/20/2019 - 21:55 नवीन
1:- रुचकर 2:- औरंगाबाद *** (* च्या जागी तुमचा पिनकोड जसे दादर 28 हॉटेल आहे. अजून सुचवतो.
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत Tue, 05/21/2019 - 19:43 नवीन
पम्याभाऊ, दादर 28 सारखं नको,ते बंद पडलं,
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Mon, 05/20/2019 - 22:02 नवीन
3:- समाधान 4:- स्वाद 5:- नाश्ता सम्राट (जरा हटके आणि वेगळं ) 6:- न्याहरी भवन
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Mon, 05/20/2019 - 22:18 नवीन
जिव्हाळा (श्रेयअव्हेर: पु. ल.)
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Tue, 05/21/2019 - 03:12 नवीन
7:- आस्वाद 8:- रुचीरा 9:- पोटभर 10:- खवय्येगिरी
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Tue, 05/21/2019 - 03:41 नवीन
१) पोटभर नाश्ता सेंटर २) झटका मिसळ व नाश्ता ३) मराडवाडा (औ'बाद मधे आहे म्हणून ) ४) कटींग चाय ५) मराठवाडी नाश्ता ६) चहा पोहे ७) निवांत ८) हटके ९) नमो / रागा (तुमच्या पसंतीनुसार ;) ) १०) आईच्या गावात (फुकट पब्लिसिटी ;-) ) ११) तात्या / दादा / आप्पा / आज्जा / भाऊजी / दाजी ची मिसळ १२) पुणे / कोल्हापूर / नाशिकची मिसळ १३) MH 12, 14, 09
  • Log in or register to post comments
स
सोन्या बागलाणकर Tue, 05/21/2019 - 04:14 नवीन
भारी नावं!
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Tue, 05/21/2019 - 06:52 नवीन
१४) सासूरवाडी १५) चायपाणी
  • Log in or register to post comments
ग
गुंड्या Tue, 05/21/2019 - 03:42 नवीन
खादाडी
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Tue, 05/21/2019 - 04:07 नवीन
लाईफ It's all about college life. म्हणून हे नाव सुचलं
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Tue, 05/21/2019 - 04:10 नवीन
किंवा थंडक
  • Log in or register to post comments
स
सोन्या बागलाणकर Tue, 05/21/2019 - 04:13 नवीन
आपल्या बापाचं हाटेल (भाडीपा फेम) किंवा आपलेच हॉटेल पोटोबा पोटपूजा जेवून जा न्याहारी
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Tue, 05/21/2019 - 04:17 नवीन
हॉटेलची लगेच सुचलेली नावे - १. हॉटेल मिसळपाव डॉट कॉम* २. हॉटेल खात रहा ३. हॉटेल खा-प्या-मजा करा ४. हॉटेल पोटपूजा ५. हॉटेल खादाडी ६. हॉटेल आधी पोटोबा अजून नावं सुचली तर सांगतो. प्रतिसादांना कुपनं ही कल्पना आवडली. * प्रताधिकार तपासून पहा.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Tue, 05/21/2019 - 04:19 नवीन
1) क्षुधाशांती. 2) पोटपूजा.
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 05/21/2019 - 05:07 नवीन
चाय- फाय (Chai-Fi) कटिंग कट्टा चावडी किटली चा-पाणी शिदोरी अट्टल खाणी-गाणी (गाण्यांचं उत्तम कलेक्शन नेहमी वाजत असल्यास) कट्टा रिपब्लिक नाश्ता नेशन (Nashta Nation) छोटा ब्रेक अनवाईंड
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Tue, 05/21/2019 - 05:57 नवीन
गविंची सगळीच नावे आवडली
  • Log in or register to post comments
स
सोन्या बागलाणकर Tue, 05/21/2019 - 06:21 नवीन
झक्कास! खास करून चा-पाणी आणि चाय-फाय
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Tue, 05/21/2019 - 05:55 नवीन
माझी नावे- १) कट्टेबाजी २) कॉलेज कट्टा ३] ऐस-पैस-बैस ४) खाबुगिरी ५) कल्ला पार्टी/कल्ला ६) ऑल्वेज फ्रेश ७) फ्रेशर्स ८) बॅचलर्स
  • Log in or register to post comments
स
सोन्या बागलाणकर Tue, 05/21/2019 - 06:24 नवीन
अजून एक - हॉटेल चाय-सुट्टा कॉलेजच्या जवळ असल्याने हे नाव फेमस नाही झाले तर मिपाचा आयडी बदलून घेईन :=D
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 05/21/2019 - 06:34 नवीन
१) चाय कट्टा नाष्ता नेशन आणि कट्टा रिप्ब्लीक ही दोन्ही नावे आवडली आहेत.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Tue, 05/21/2019 - 06:46 नवीन
१) लाईट मामला २) मिसळकट्टा ३) खाऊ कॉर्नर ४) या, खा, प्या ५) हंग्री नेशन ६) खंग्री फूड ७) फूड पॅलेस ८) मॉर्नींग कॅफे (झैरात: माझ्या एका कथेत हे नाव आहे.) ९) न्याहारीगड १०) निखारा Sandy
  • Log in or register to post comments
र
रमेश आठवले Tue, 05/21/2019 - 07:01 नवीन
१अमदावाद मधील एका हॉटेलचे नाव त्याच्या प्लॉट नंबरचे आहे. २. तृप्ति ३. अन्नदाता ४. पोटभरे
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 05/21/2019 - 07:04 नवीन
'मिपा' च ठेवा ना!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 05/21/2019 - 07:10 नवीन
शुभेच्छा तुम्हाला.
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 05/21/2019 - 07:22 नवीन
१ भेट कट्टा २ अल्पोपहार ३ मिसळायण ४ थेट भेट ५ निव्वळ निवांत ६ कट्टा माझा आणि आपल्या व्यवसायाला भरघोस शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Tue, 05/21/2019 - 07:40 नवीन
१. ब्रोचा कट्टा २. आबाचा ढाबा
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Tue, 05/21/2019 - 07:56 नवीन
तुमच्या हॉटेलसाठी शुभेच्छा...!! पोटोबा, पोटभर, भरपेट, ढेकर असली नावे एक-दोन दिवस चांगली वाटतात. पण या नावांमध्ये ग्रेस नाही. तरूणांना आकर्षित करायचे असेल तर हाय-फाय नाव लागेल. त्यातल्या त्यात इंग्रजी नाव असेल तर बरे. कॉलेज मध्ये बाहेर गावची (किंवा दुसर्‍या राज्यातील) मुले आहेत का? त्या नुसार तुम्हाला नाव ठरवावे लागेल. कॅफे होमली मम्माज डेली (Mummy's Daily) मम्माज रेसिपी (Mummy's Recipe) तसेच फक्त शाकाहारी मेनू असेल तर नावात सुद्दा तसे दर्शवले गेले तर उत्तम. कॅफे वेजिटार अशा प्रकारचे नाव ठेवा.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Tue, 05/21/2019 - 08:59 नवीन
१. खा की मग २. झनझनाझन ३. खा-पी-लूट ४. ह्योच त्यो
  • Log in or register to post comments
श
शब्दानुज Tue, 05/21/2019 - 09:09 नवीन
कॉलेज आहे म्हणजे कशाचे आहे ? (इंजिनियर , मेडीकल , ११वी १२वी ? ) त्या अनुशंगाने नाव ठेवल्यास संयुक्तिक ठरेल.कारण तुलनेने ११वी १२ वी मुले आणि या पुढची मुले यात फारच फरक पडलेला असतो.
  • Log in or register to post comments
त
तनमयी Tue, 05/21/2019 - 09:28 नवीन
औरंगाबाद ला बीड bypass रोड ला MIT कॅम्पूस sb बँकेच्या अगदी लागत त्या गाल्यातच एक नाश्ता कॉर्नर आहे कांदा भजी ,sandwich असे पदार्थ होते भाव २० रुपाये ओन्ली भजी चटणी अप्रतिम होती तुम्ही जावून याच खूप idea मिळेल
  • Log in or register to post comments
त
तनमयी Tue, 05/21/2019 - 09:31 नवीन
मुल पोटभरी चे खातात नाश्ता type ती पदार्थ ठेवा पोटभरी नाव ठर्वा
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Tue, 05/21/2019 - 09:36 नवीन
हार्दिक अभिनंदन आणि या नविन उपक्रमास ट्रकभरून शुभेच्छा ! तुमच्या हाटिलात दर दिवसाआड मिपाकड्ट्टा होवो ! तुमचं हाटील आख्ख्या जगात फेमस होवो ! तुमच्या हाटीला भायर रांगाच्यारांगा लागोत ! तुमच्या हॉटेलाची अर्रर्रर्रारा खतरनाक म्हणण्या इतकी भरभराट होवो !
  • Log in or register to post comments
उ
उपेक्षित Tue, 05/21/2019 - 09:54 नवीन
नवीन धंद्यासाठी आपल्याला शुभेच्छा, काही आगाऊ सूचना देतोय जरूर विचार करा. हॉटेलचे नाव इत्यादी मध्ये खूप जास्ती विचार नगा करू मालक आणि तुमचा वेळ पण नका घालू यात. खालील गोष्टींचा विचार करा::- - सुरवातीला भारंभार मेन्यू ठेवण्यापेक्षा मोजके पण हुकुमी पदार्थ ठेवा (कारण गर्दी झाली हॉटेल मध्ये तर manage करायला अवघड जाते सुरवातीला नवीन असताना) - त्यांची चव मेंटेन ठेवा, कारण बर्याच ठिकाणी आधी चांगली चव पण नंतर फरक असे होते. - नंतर प्रतिसाद प्रमाणे पदार्थ वाढवत न्या आणि त्याची जाहिरात पण करा वेळोवेळी. - तुम्ही जो मेन्यू ठेवणार आहात तो जास्ती सुटसुटीत कसा असेल हे बघा - स्वच्छता आणि टापटीप महत्वाची.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Tue, 05/21/2019 - 10:20 नवीन
बाबाची चड्डी !!!
  • Log in or register to post comments
श
शब्दानुज Tue, 05/21/2019 - 10:23 नवीन
मी जवळपास याच वयोगटातला असल्याने काही सल्ले देतोय. जे पटतील ते ते घ्या. कमीत कमी हॉटेलचे नाव होईपर्यंत कोणत्याही वारी हॉटेल बंद ठेवू नका. मुले जर तिथे रहात असतील तर रविवारी का होईना ती तुमच्याकडे येऊ शकतात. एकदा जर आत आली आणि अनुभव चांगला वाटला तर इतरदिवशी पुन्हा येऊ शकतील. समोर पोर आहे असे समजून वागणूक देऊ नका. या वयात अहं जागा झालेला असतो. मानानेच समोरच्याला वागवा. समोरच्याचे नाव लक्षात ठेवण्याचा प्रयत्न जरुर करा. दाखवलेली अोळखही हा अहं सुखावते.पण सगळ्यांना एकसारखाच भाव ठेवा. एकाला/ ग्रूपला भाव कमी एकाला जास्त असे करू नका या वयातल्या चवीच्या आवडी आणि तुमच्या आवडी यात फरक पडतो. त्या वयोगटातल्या इतरांना चवीबद्दलचे अभिप्राय मागत रहा. इतर हॉटेलमद्धे जे मिळते ते सोडून आणखी काही देता येते का पहा. पदार्थांची व्हरायटी जास्त असू द्या. (कॉलेजच्या बाजुला तेच तेच खाऊन मुले कंटाळलेली असतात) उदा- पिझ्झा सारखे पदार्थ बाहेर खुप महाग मिळतात. तुम्हाला घरगुती बेस वापरून बनवता आला तर नक्की विचार करा. जर कोणी मुले मुलींना घेऊन येत असतील (अौरंगाबादमद्दे असे होईल असे फारसे वाटत नाही ..पण तरीही) आणि तुम्ही येऊ देत असाल तर मुले महागडा खर्च करण्याची तयारी ठेवतात. तेव्हा तसे पिझ्झा सारखे थोडेसे (थोडेचेस म्हणजे ५०-१००) खर्चिक प्रकार ठेऊन बघायला हरकत नसावी. आधी प्रायोगिक तत्वावर करुन पहा आणि पुढे तो वाढवा. चायनिज पदार्थ तुमच्या यादीत नाहीत. त्याचाही विचार करा. हे पदार्थ लोकप्रिय आहेत. लस्सी ताक सारखे पदार्थ उन्हाळा वगळता फारसे खपणार नाही असे वाटते. नुसती चांगली फळे ठेवा.(पपई सारखी )प्लेटमद्दे व्यवस्थित काप करून द्या.ज्युससोबत हाही पर्याय असू द्या. या वयात घरून फळे खा असा आग्रह असतो. एखादा तसा ऐकण्यातला असेल वा आयोग्याबद्दल जाग्रूत असेल तर तो घेऊ शकतो. मुली जर येत असतील तर ते फळांचा पर्याय स्विकारू शकतात. मेन्यू कार्ड छापा. साधेच असू द्या पण असू द्या.प्रत्येक टेबलावर ते हवे. इथे बरेच पदार्थ मिळतात हे त्यातून कळते. हे तेव्हाच करा जेव्हा खप जास्त होत जात आहे, मेन्युवरचे ब-यापैकी पदार्थ आत आहेत. शेवटी पदार्थ किती आणि कुठले ठेवायचे हे तुम्हालाच ठरवावे लागणार. जर आजूबाजूला आधीच खायची दुकाने असली तर तुम्हाला व्हरायटी द्यावी लागेल. जर हॉटेल नसली , वा तुम्हाला झेपत नसेल तर पदार्थ कमी ठेवा. धोका कमी तर नफाही कमी हे सुत्र इथेही लागू पडते. मुलांच्या येण्याच्या वेळा जाणून घ्या. जास्त पदार्थ ठेवणे परवडत नसेल तर त्या वेळेला अनुरूप जे आहे ते ठेवा. (म्हणजे सकाळी गर्दी पडत असेल तर फळे , चायनिजला फारशी मागणी नसेल. तेच दुपारी गर्दी होत असेल तर फळे , ज्यूसला मागणी असेल. ) कॉलेजकुमारांना स्वच्छता नसेल तर चालते असे वाटत असेल तर ते साफ चुक आहे. स्वच्छ हॉटेल सर्वांनाच आवडते. चव- व्हरायटी - किंमत - स्वच्छता असा क्रम तुमचा असायला हवा. नवीन गाणी हलक्या आवाजात लावून ठेवा. स्वभाव बोलघेवडा नसेल तर तसा करा. त्या वयोगटांतले चर्चांचे विषय समजून घ्या. हस-या चेह-याने दिलखुलास गप्पा मारत राहा.त्यांना अजून काय हवे , नको ते बोलण्यातून काढून घ्या. एक पाटी लावा. त्यावर रोज काहीतरी विनोदी लिहीत जा.(आम्ही कॉलेजमद्धे ब-याच सरबातवाल्यापैकी एका सरबतवाल्याकडे जात होतो कारण तो पाटी लावून त्यावर काहीबाही लिहायचा. जिज्ञासा या वयात प्रभावी असते. ) डिस्काऊंट आॉफर देण्यास आपण तयार आहात असे वाटते. लकी ड्रा सारखे प्रकार सुरवातीला ठेऊन बघा. ३६० कुपन मधून १ ला पेन ड्राईव्ह दुस-याला अमूक तमूक असे. त्याची जाहिरातबाजी करा. नाव झाल्यावरही दर्जा कायम ठेवा. मोहासाठी जास्त लोकांना सेवा देण्याच्या नादात नाव खराब होत जाते. ते टाळा. कॅमेरा जरुर लावा. देव न करो पण छेड, मारामारी सारखे प्रकार झाले तर आपली बाजू मांडायला कॅमेरा महत्वाचा ठरतो. मला व्यवसायाचा अनुभव नाही. त्यामुळे सारासार विचार करून जे मुद्दे पटतील तेच आचरणात आणा.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Tue, 05/21/2019 - 12:34 नवीन
+१
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Wed, 05/22/2019 - 08:10 नवीन
सुंदर आणि माहितीपूर्ण विवेचन दिलेलं आहे . ते इतरांनाही उपयुक्त ठरेल पुढील वाटचालीसाठी
  • Log in or register to post comments
M
mayu4u Tue, 05/21/2019 - 10:36 नवीन
Quick Bites Tasty & Healthy Super Snacks Spice Corner Munch n Sip
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Tue, 05/21/2019 - 10:38 नवीन
नाश्टा नेशन एकदम झ्याक ! कारण नाश्टा आहे , कॉलेज असल्याने नाव मराठी देऊ नाय ! गवि च्य ३० कुपनातील दोन कुपने मला द्या ! मी व प्रा डा बिरूटे खायला येऊ ! एका कुपनात कितीही खा अशी सवलत आहे का ?
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Tue, 05/21/2019 - 11:10 नवीन
धंदा जोखमीचा आहे पण कमाई उत्कृष्ट होऊ शकते , जर खालील बाबी कटाक्षाने पाळल्या तर १) स्वच्छता नितांत गरजेची आहे २) दर्जेदार आणि वाजवी दरात उपलब्ध असलेले पदार्थ ३) जागा मोकळी आणि हवेशीर असू द्या ४) कुठलाही पदार्थ पंधरा ते वीस मिनिटांत तयार करून वाढला पाहिजे , कारण कॉलेजात तासांना/वर्गात हजर राहणे गरजेचे आणि तेही योग्य वेळेत .. ५) कुठल्याही धंद्यात उभं राहण्यासाठी आपली क्षमता कमीतकमी दोन वर्षे असावी . लगेच अनुमान काढू नका , पुढे जाऊन भलेच होईल .. मला सुचलेली नाव पॉटबार किंवा हेल्थबार किंवा पोटोबा शुभम भवतु
  • Log in or register to post comments
स
समीरसूर Tue, 05/21/2019 - 12:46 नवीन
Tasty Times – Have a good time; enjoy our tasty food… Hot ‘n’ Fresh – Enjoy every fresh moment of life… Awesome Snack Bar – Believe us, it’s truly awesome! झन्नाट एक्सप्रेस - या, बसा, जरा निवांतपणा अनुभवा! अच्छे दिन कॅफे - इथला प्रत्येक क्षण सुपर अच्छा! जस्ट धमाल! Apple & Onion – We make every moment memorable… काही नावं सुचवली आहेत. व्यवसायासाठी अनेक शुभेच्छा! मला वाटतं काही कॅचफ्रेज असेल तर अधिक मजा येईल. हॉटेल तुफान चालणार यात शंकाच नाही. आम्ही आल्यावर झणझणीत मिसळ खाणारच! :-)
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Tue, 05/21/2019 - 12:50 नवीन
१) कॅण्डीज्यूस २) हेल्दीबाईट ३) निशान स्नॅक्स, टी अँड ज्यूस ४) कट्टा कॉलेजकूल ५) यंगस्टर्स कट्टा ६) कॉलेजस्टार्स ७) युथअड्डा ८) हॉट अँड कूल ९) कॅम्पसकिंग १०) युथ-बूथ ११) कॅफे कुछ और रंग १२) एनके'ज बाईटस्पॉट
  • Log in or register to post comments
स
समीरसूर Tue, 05/21/2019 - 13:00 नवीन
Spicy ‘n’ Sweet – As delicious as our life… Garlic ‘n’ Grapes - स्वाद ऐसा जो हर पल बना दे मसालेदार... #एकनंबर - अजून काय नको! टेस्टी पॅटर्न - खतरनाक टेस्ट औरंगाबदची!
  • Log in or register to post comments
त
तनमयी Tue, 05/21/2019 - 13:10 नवीन
soda corner theva aurangabad hot ahe tyamule chalel khup
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 05/21/2019 - 13:13 नवीन
सुरुची स्वाद रेंगाळणाऱ्या,क्षुधा तृप्त करणारा
  • Log in or register to post comments
भ
भीमराव Tue, 05/21/2019 - 13:35 नवीन
नवीन उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
अ
अमोल काम्बले Tue, 05/21/2019 - 14:00 नवीन
१. Ghaas Phoos २. Chay Khopcha ३. SodaBottleOpenerWala
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Tue, 05/21/2019 - 14:52 नवीन
मला वाटतंय नाव शक्य तितकं न्युट्रल ठेवा .. म्हणजे नावावरुनच काहीतरी प्रतिमा तयार व्हायला हवी अशी गरज नाही. म्हणजे 'अन्नपुर्णा' वा तत्सम जुनाट आणि पारंपारिक नावं पण ठेवू नका आणि उगाच उथळपणाची प्रतिमा बनेल असंही ठेवू नका... नावात फार काही नसतंच. पुण्यात 'वैशाली' हे साधंसच नाव असलेलं हॉटेल खूप लोकप्रिय आहे. ..तुम्हीही असं काही ठेवू शकता तुमच्या घरातील मुलांपैकी कुणाचं नाव, अगदी तुमचं नाव 'कॅफे निशांत' वगैरेही चालू शकेल.
  • Log in or register to post comments
स
समीरसूर Wed, 05/22/2019 - 06:22 नवीन
हे पटलं. ब्रँड नंतर तयार होतो. आणि तो बर्‍याच इतर घटकांवर अवलंबून असतो. गुगल, अ‍ॅपल, ओरॅकल, चितळे, जोशी वडेवाले, बेडेकर मिसळ, अ‍ॅमेझॉन, वगैरे ब्रँड्स नंतर आयकॉनिक झाले. या नावांचा आणि त्या ब्रँड्सच्या व्यवसायांचा तसा काहीच संबंध नाही. या धाग्यावर आलेल्या नावांपैकी (मी सुचवलेली ग्राह्य धरून) बरीचशी नावे उथळ वाटतात. पण अशा हॉटेलला ब्रँड करण्याची फारशी गरजही नसते. एक ठराविक ग्राहकवर्ग असतो आणि त्यावर या प्रकारच्या हॉटेल्सचा व्यवसाय उत्तम चालतो. या केसमध्ये कॉलेजची मुले हा मुख्य ग्राहकवर्ग आहे. त्यांना मुख्यत्वेकरून एक स्वस्त, टाईमपास करता येण्याजोगी, नेहमी सहजपणे जाता येईल अशी, फॅमिली टाईप नसणारी, उधारी ठेवू शकणारी, पटकन भूक भागवणारी अशी एक निवांत जागा हवी असते. इथे मालकाशी, स्टाफशी उत्तम संबंध हादेखील एक महत्वाचा घटक असतो. चव हा फार महत्वाचा मुद्दा खरं तर नसतोच. अर्थात, चव चांगली असणं चांगलंच आहे. त्यामुळे ब्रँडिंगचा फार विचार करण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही. त्यामुळे तुम्हाला आवडेल ते नाव (उथळ किंवा गहन) ठेवायला हरकत नसावी. हॉटेल जोरात चालणारच! :-)
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 05/22/2019 - 10:01 नवीन
+१
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा