Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

" कशी आहेस ? "

फ — फिझा, Mon, 05/20/2019 - 02:13
" कशी आहेस ? " वेशीमधून बाहेर पडताना उरले सुरले बळ एकवटून त्याने शेवटी विचारलेच " कशी आहेस ? " निर्विकार डोळ्यांनी निर्विचार मनाने मग मीही फक्त मान हलवली . शब्द खूप जड असतात ........ परत कोण ..... ... ते ओझं वाहणार........ नाहीतर सांगितलं असतं त्याला "जशी सोडून गेलास ....... तशीच आहे !" -----------------फिझा !

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5810 views

💬 प्रतिसाद
स
सोन्या बागलाणकर Mon, 05/20/2019 - 05:21 नवीन
वा मस्त!
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 05/20/2019 - 05:59 नवीन
जे घडाघडा बोलायला ते न बोलता समोरच्याने समजावून घ्यावे अशी त्यांची अपेक्षा असते. त्यामुळे अपेक्षाभंगाचे दु:ख आयुष्यभर वागवत बसावे लागते, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
स
सोन्या बागलाणकर Mon, 05/20/2019 - 08:31 नवीन
आणि पुरुषांचा हा प्रॉब्लेम आहे की तिच्या मनात आपल्याबद्दल काही भावना आहेत की नाही ते कळायला मार्ग नाही. त्यामुळे उगाच सॅंडलचा टॅटू कशाला गालावर गोंदवून घ्या म्हणून ते पण दुसऱ्या मुली शोधायला लागतात. =)))
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Mon, 05/20/2019 - 10:18 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Mon, 05/20/2019 - 07:39 नवीन
क्या बात!
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 05/20/2019 - 12:28 नवीन
याला म्हणतात खरी कविता. किमान शब्द कमाल आशय. छंदफंद याच्या चरकातून काढला आणि उपमा चंद्र यांच आलं लिंबू मारून केलेल्या ऊसाच्या रसाच्या कविता महीनाभर धुमाकूळ घालत होत्या... दिवस सार्थकी लागला. चुकार आडवाटेचा पांथस्थ वाचकांची पत्रेवाला नाखु
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Wed, 05/22/2019 - 08:08 नवीन
दोन चारोळीच्या तुकड्यानी जीवन घट्ट पेलून धरलं तू निघून गेलास जिथून तिथेच मनाला पुरून टाकलं तेच तेच बघून बघून मी पुन्हा पुन्हा तिथेच जाते त्याच प्रहरांशी , झाडावेलींशी खेळत तुझी वाट बघत असते माझी स्वाक्षरी ( प्रेरणा मदनबाण साहेब ) सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Wed, 05/22/2019 - 11:37 नवीन
जमलीये...
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन Wed, 05/22/2019 - 12:25 नवीन
+१
  • Log in or register to post comments
अ
अन्या बुद्धे गुरुवार, 05/23/2019 - 14:37 नवीन
आवडली.. नेमकी तरीही सूचक
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Sat, 05/25/2019 - 15:05 नवीन
प्रभावी झाली आहे.
  • Log in or register to post comments
व
वरुण मोहिते Sat, 05/25/2019 - 15:44 नवीन
लिहा अजून
  • Log in or register to post comments
व
वरुण मोहिते Sat, 05/25/2019 - 15:44 नवीन
लिहा अजून
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा