एक दिलखुलास व्यक्तिमत्व हरवले: मिपा संस्थापक तात्या
इथे असलेल्या नव्या सदस्याना कदाचित ठाऊक नसेल मिसळ पाव हे संस्थळ तात्या अभ्यंकर या कलंदर माणसाने सुरू केले.
संगीत साहित्य खादाडी अशा अनेक विषयाम्मधे उत्तम गती असलेला तात्या एक भन्नाट व्यक्तिमत्व होता . होता म्हणताना वाइट वाटतेय.
मिपच्या रुपाने आपल्या सर्वांना व्यक्त होण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ तात्याने दिले .
तात्या आणि त्याच्या मुशाफिरीवर खूप काही लिहून होईल.
बोलायला वागायला बिंदास असणारा तात्या गाण्यातला दर्दी होता. त्याने खूप ऐकले होते. तो स्वतः गायचा.
तात्या ने मिपावरचा वावर बंद केला त्यालाही बरीच वर्षे झाली. फेसबुकावर त्याने शिळोप्याची ओसरी नामक पेज सुरू केले होते तो तेथे लेखन करायचा
मिपावर विसोबा खेचर या नावाने लिहीलेल्या त्याच्या संगीतविषयक चित्रपट विषयक लेखांची जंत्री देता येईल .
https://www.misalpav.com/node/10995 देवगंधर्वांचं 'पिया कर..', थोडं गोविंदरावांचं आणि थोडं नारायणरावांचं 'मधुकर वन वन'
https://www.misalpav.com/node/2455 बसंतचं लग्न ( ही आख्खी लेखमाला आहे)
तात्याची रौषनी तर मला कित्येक संस्थळावर वाचायला मिळाली.
https://www.misalpav.com/node/1901 गोपाला मेरी करुना
https://www.misalpav.com/node/1346 काही ऍब्स्ट्रॅक्ट रागचित्रे!
https://www.misalpav.com/node/20610
https://www.misalpav.com/node/805 आज़ जाने की जि़द ना करो...
कालच तात्याच्या रौषनी धाग्यावर तात्या भेटणार नाही असे कोणाला तरी म्हणालो आणि आज तात्या गेल्याची बातमी येते हे धक्कादायक आहे.
तात्या ने मिपाला आणि मिपाकराना खूप काही दिलंय.
या धाग्यावर तात्या तुम्हाला भेटला त्या च्या काही चांगल्या आठवणी शेअर कराव्यात ही विनंती.
इश्वर मृतात्म्यास सद्गती देवो ही प्रार्थना _/\_
🗣 चर्चा
(152)
उ
उपाशी बोका
Wed, 05/15/2019 - 20:18
नवीन
तात्याला विनम्र श्रद्धांजली !
- Log in or register to post comments
क
कुसुमिता१
Wed, 05/15/2019 - 20:21
नवीन
फारच वाईट बातमी... भावपूर्ण श्रद्धांजली तात्यांना!
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
Wed, 05/15/2019 - 20:35
नवीन
श्रद्धांजलि
- Log in or register to post comments
भ
भाग्यश्री
Wed, 05/15/2019 - 21:43
नवीन
धक्कादायक बातमी! श्रद्धांजली !
- Log in or register to post comments
ज
जुइ
Wed, 05/15/2019 - 21:56
नवीन
खूप दुर्दैवी बातमी. तात्या अभ्यंकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
- Log in or register to post comments
म
मिसळपाव
Wed, 05/15/2019 - 22:47
नवीन
"तात्याबा, 'मिसळपाव' आयडी घेतलाय. चालेल ना?" विचारल्यावर 'खुशाल घे, हे संस्थळ तुझंच आहे' असं दिलखुलासपणे सांगणारा तात्याबा गेला.....छ्या...... :-(
- Log in or register to post comments
न
निशाचर
Wed, 05/15/2019 - 23:50
नवीन
भावपूर्ण आदरांजली!
- Log in or register to post comments
स
सोन्या बागलाणकर
गुरुवार, 05/16/2019 - 00:44
नवीन
विनम्र श्रद्धांजली!
- Log in or register to post comments
झ
झेन
Fri, 05/17/2019 - 03:34
नवीन
__/\__
- Log in or register to post comments
न
निनाद
Fri, 05/17/2019 - 04:01
नवीन
धक्कादायक बातमी!
तात्याने मिपा सुरू केल्यावर आगदी आग्रहाने उपक्रमावरून येथे आणले.
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
Fri, 05/17/2019 - 04:10
नवीन
आदल्या दिवशी संध्याकाळी का कुणास ठाऊक, कधी नव्हे अशी तात्यांची खूपच आठवण मला येत होती. त्यांचे फेसबुकाचे पान उघडले परंतु त्यात काहीच नव्हते. मग विचार केला सकाळी कुणा मिपाकराला विचारू तात्यांचे काय हालहवाल आहेत ते. पहाटे जाग आल्याआल्या मिपा उघडतो, तो तात्या गेल्याची बातमी. सुन्न, सैरभैर झालो. त्यांचेशी प्रत्यक्ष परिचय वा भेट कधीच झालेली नसली तरी मिपामुळेच मी लिहिता झालो, माझे लिखाण तात्या आवर्जून वाचायचे आणि कौतुक करायचे.
आपणा सर्वांच्या स्मरणात ते सदैव रहातील.
तात्यांच्या सौंदर्यासक्तीला भावेल, अशी एक सुंदर चित्रमय सुमनांजली लवकरच वाहण्याचा विचार आहे.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Fri, 05/17/2019 - 04:42
नवीन
तात्यांच्या सौंदर्यासक्तीला भावेल, अशी एक सुंदर चित्रमय सुमनांजली लवकरच वाहण्याचा विचार आहे.
कराच.
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
Fri, 05/17/2019 - 05:17
नवीन
अतिशय धक्कादायक बातमी!
खादाडी सदर व त्यासोबत एखाद्या सुंदर ललनेचा फोटो व सोबतची "ही आमची अनुष्का हीच्यावर आमचा फार जीव"
किंवा
फाट्यावर मारण्यात येत आहे.
चपला घाला आणि त्वरीत चालु लागा.
आणि ते सर्वात लोकप्रिय बाझवला भेंचोद
अश्यासारखे इतर शालजोडीतले खास तात्यांचेच असे ट्रेडमार्क्स होते.
व्यक्तिश: परिचय नसला तरी नेहेमी ओळख असल्यासारखेच वाटायचे.
तात्यांना भावपूर्ण श्रध्दांजली.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Fri, 05/17/2019 - 06:26
नवीन
आणी अनुष्का म्हणजे कोहलीचे बदक नाही, बाहुबलीतली देवसेना शेट्टी.
2007 सालीच तिच्यातला चार्म तात्यांनी ओळखला होता. तेव्हापासून मिपाच्या दिवाळी शुभेच्छा ब्यानरावर अनुष्का शेट्टी विराजमान होती
- Log in or register to post comments
स
संत घोडेकर
Fri, 05/17/2019 - 05:32
नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली !
- Log in or register to post comments
भ
भारद्वाज
Fri, 05/17/2019 - 05:38
नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Fri, 05/17/2019 - 05:58
नवीन
खरे तर मी बराचसा तात्यासारखा आहे असे वाटतेय .... यमन , भीमसेन बालगंधर्व , शिव्या ,,,,मुक्त स्वभाव हे माझयाकडे आहे. मला ही व्यक्ती माझया पेक्षा १६ वर्षाने लहान आहे हे आज कळत आहे. माझा स्वभाव कितीही दिलखुलास असला तरी आपण होऊन परिचय करून घेण्याचा मात्र नाही. त्यामुळे मी विसोबा खेचर या आय डी शी परिचय करून घेतलाच नाही. मला इथे हे काही विद्वान , रसिक ,वात्रट मित्र भेटले त्याचे श्रेय नीलकांत व पर्यायाने तात्यांना जाते. सबब एक मिपावाला म्हणून अपरिचित आप्त गेल्याचे मला दुःख आहे. आत्मा बीत्मा मी काही मानत नसल्याने "सदगती " वगैरे सोडा , जिवंतपणी अभ्यंकर यांनी जे कार्य केले त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे !
- Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी
Fri, 05/17/2019 - 06:12
नवीन
.
- Log in or register to post comments
स
सुधीर
Fri, 05/17/2019 - 06:26
नवीन
२००२ मध्ये याहू चॅट आणि चॅट रूमची एक क्रेझ होती. मी कधी कधी याहू चॅट रूम्स मध्ये चॅट करायचो. पण कधीतरी २००७ मध्ये काही मराठीतले ब्लॉग्ज नजरेस पडले, तिथूनच मग मनोगत आणि मायबोली या संकेतस्थळाविषयी कळलं. मायबोलीचा पसारा जास्त होता. पण मनोगत खूपच आकर्षक वाटलं. का कुणास ठावूक मायबोलीचा इंटरफेस तितकासा आवडला नाही. मग मायबोली पेक्षा उपक्रम जास्त आवडू लागलं. कारण तिथे "त्यामानाने" फारशी बंधनं नव्हती. लोक खूप चांगल्या विषयावर चर्चा करायचे. मी वाचनमात्रच असायचो, पण चर्चा वाचायचो. बर्याच आयडींचा छाप होता. काहींची विद्वत्ता आवडायची. तर काहींचा व्यासंग. त्यातला एक आयडी आठवतो. तो आयडी होता सर्कीट. आणि काहींची काळजाला हात घालणारी पुलं सारखी शैली, अर्थात ती व्यक्ती होती, तात्या अभ्यंकर. तात्या आणि सर्कीटचा याराना त्यावेळेच्या सदस्यांना आठवत असेल. रोशनी सारखे लेख अर्थात उपक्रमच्या एकंदर चौकटीत बसत नव्हते. रोशनी मध्ये उत्सुकता होती आणि तात्यांची बंडखोरी वृत्ती तेव्हा आवडली होती. निलकांत-तात्यांनी मिळून रातोरात नवं संकेतस्थळ उभं केलं ते होतं 'मिसळपाव'. मी पहिल्यादिवशीच आयडी घेतला. लेख सोडा, पण प्रतिसाद तरी लिहिन का? हे माहीत नव्हतं. पण मी या संकेतस्थळाच्या पहिल्या दिवशीच आयडी बनवला. तात्याशी प्रत्यक्षात कधी संबंध आला नाही पण तात्यांच्या मिसळपावने मला अभिव्यक्त व्हायला शिकवलं हेही तितकच खर. आणि तात्यांमुळे मला थोडीफार मराठी गाणी, नाट्यसंगीत आवडू लागलं. तात्यांना शेअर बाजार पण खूप आवडायचा. आणि त्यावेळेस मला शेअर बाजाराविषयी फक्त आकर्षण होतं. संकेस्थळावर पडीक असणं परवडनारं नव्हतं, त्यामुळे पुढे संकेतस्थळावर अधनं मधनं येणं व्हायचं. मधले काही संदर्भ लागले नाहीत पण काही व्यवहारांमध्ये इतर सदश्यांशी आलेल्या कटूतेमुळे "कदाचित" तात्या मिपा सोडून गेले असावेत असा अंदाज मी बांधला. तात्या त्यांच्या 'वल्ली' चितारताना काहीसा उदास शेवट लिहायचे. तात्यांच्या स्वतःच्या कथानकाचा शेवट सुद्धा असा चटका लावून जाणारा असेल असं वाटलं नाही.
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Fri, 05/17/2019 - 06:43
नवीन
श्रद्धांजली! मिपामुळेच मराठीब्जालविश्वाची ओळख झाली होती.
- Log in or register to post comments
च
चंबा मुतनाळ
Fri, 05/17/2019 - 07:21
नवीन
तात्याना भावपूर्ण श्रद्धांजली.
- Log in or register to post comments
आ
आवडाबाई
Fri, 05/17/2019 - 07:31
नवीन
तात्या गेले, धक्का बसला.
मिसळपाव सुरू केले तेव्हा मनोगतवर संदेश करून इकडचे सदस्यत्व घेण्याचा आग्रह केला होता.
बंडखोर आहेत हे तर दिसतच होते, पण किती बंडखोर आहेत हे इथे आल्यावरच कळले. कधी त्यांचे म्हणणे पटायचे, अनेकदा नाही. शिवराळपणा जास्त झाला की कित्येक आठवडे मग फिरकायचे नाही इकडे. पण शेवटी यावेच लागायचे, काहीतरी छान लेखन तेवढ्यात मिस झाले असेल ह्याची जवळ जवळ खात्री असायची.
काहीतरी वेगळाच बिनधास्तपणा होता इथे. असो.
तात्यांचे वय एवढे कमी असेल ह्याची कल्पना नव्हती. त्यांच्या आईंबद्दल वाचून तर दु:खाला काळजीची किनार लागली. (त्यांच्यासाठी काही आर्थिक मदत गोळा होत असेल तर नक्की आवडेल भर घालायला.)
तात्यांना श्रद्धांजली ..
- Log in or register to post comments
स
सूर्यपुत्र
Fri, 05/17/2019 - 08:04
नवीन
तात्यांना श्रद्धांजली!
माझा आणि त्यांचा व्यक्तिशः संपर्क फक्त आयडी अॅक्टिव्हेट करण्यापुरता झाला होता. त्यांच्या लेखनाचा पंखा आहे.
-सूर्यपुत्र.
- Log in or register to post comments
उ
उपेक्षित
Fri, 05/17/2019 - 08:06
नवीन
अशावेळी काय बोलाव खरच समजत नाही.
फेसबुकावरती ओळख होती आणि २ वेळी बोलणे पण झाले, घरातले कोणीतरी गेल्यासारखे वाटत आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली _/\_
- Log in or register to post comments
ज
ज्ञान
Fri, 05/17/2019 - 08:22
नवीन
दुःखद बातमी..
- Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत
Fri, 05/17/2019 - 08:47
नवीन
ईश्वर त्यांना सद्गती देवो. त्यांचे लेख त्यांच्या ब्लॉगवर वाचले आहेत.
- Log in or register to post comments
इ
इरामयी
Fri, 05/17/2019 - 08:52
नवीन
मिसळपाववर बऱ्यापैकी नवी असल्याने मला तात्यांंबद्दल काही माहित नव्हतं. ते त्यांच्या मृत्यूमुळे कळलं हे फार वाईट वाटतं. ईश्वर त्यांच्या पुण्ण्यात्म्याला सद्गती देवो ही प्रार्थना.
- Log in or register to post comments
न
नेत्रेश
Fri, 05/17/2019 - 09:08
नवीन
जुन्या काळात रमणारा हरहुन्नरी माणुस.
जिद्दीने मिसळपाव चालु करुन यशस्वी करुन दाखवले.
तात्यांना श्रद्धांजली =/\=
- Log in or register to post comments
व
वाहीदा
Fri, 05/17/2019 - 09:38
नवीन
मैं क्या कई लोग तात्या को रुबरु जानते थे ..उनसे कई बार मुलाकात भी हुई २००८ - २००९ के दरमीयान !वोह दौर हि कुछ और था नायाब दौर ! तात्याके वजह से कईयोंके कलम, तीर - कमान की तरह तरकश से बाहर निकाले जाते और लफ्जोंमे पिरोए जातें.. उन्होंने कईयों को लिखना सिखाया और कईयोंको अच्छा पढना | तात्याने लिखे लेख पढना एक मेजवानी हुआ करती .. तात्या मेजबान और हम सब मेहमान :-) और उन्ही के वजह से मिसलपाव याने आला दर्जे की मेजवानी !! कई लेखकों की एक से एक नायाब तहरीर हमें पढने मिलती और उससे भी ज्यादा उसपर आए हुए एक से एक कमेंट्स याने प्रतिसाद पढना याने Intellectual मेजवानी !
खैर, तात्या जिंदगी के उतार और चढाव बहोत देख चुके थे उस वजह से अज़ीम बनना मुश्किल था लेकीन अजी़ज़ जरुर थे.. उन्हें नसीब ने साथ नहीं दिया शायद उस वजह से दिलफरेबी भी हो गएं लेकीन दिलकश जरुर बनें रहे . माली हालात Financial Situation के वजह से गमगीन थे लेकीन फिर भी लिखते बहोत हि बढिया थे ..आला किस्म की उनकी कलम बहोत हि बढिया तरीके से चलती उस कलम को सलाम !! खुदा ने उन्हें कई फन (कलाओं) से नवाजा अगर वक्त साथ देता तो न जाने उडान भर के किस बुलंदी पे चले जाते | उन्होंने अपने अम्मी की काफी खिदमत की और जिसे अपने अम्मी के खिदमत का मौका मिला उसे खुदा ने और ज्यादा तकलीफ नहीं दी ..खुदा की मर्जी , अपने तरफ जल्द हि बुला लिया . अगर जिंदगी ने इतना बुरा बर्ताव न किया होता तो शायद Financial मामुले में दिल-फरेबी नहीं बनते |
अब खुदा से एक हि गुजारीश, ऐ खुदा, तात्याने जो कुछ जाने - अनजाने गुनाह किए उन सारे गुनाहोंको बक्श दें और उनके बुजुर्ग अम्मी को हौ हिम्मत दें के वोह इस गम बर्दाश्त कर सकें आमीन !! Allah Does not Burden a Soul with more than it can bear : Al-Quran 2:286
अल्लाह, तुम तो गफ्फुरो रहीम हो . तात्या की रुहपर रहमत नाजील फरमा , उनकी रुह को सुकून दें ! अल्लाह उनकी बुजुर्ग अम्मी जो अब भी इस दुनिया में है उनकी हिफाजत फरमा . आमीन !!
~ तात्या के खातीर १० साल बाद मिसलपाव पे कदम रखनेवाली 'वाहीदा'
(विजू भाऊ तुम्हारे लिए वही प्रतिसाद यहां पर भी लिख रही हुं .. अब कलम टुटती हुई सी लग रही है जो लिखता था वोह चला गया ...)
- Log in or register to post comments
व
वाहीदा
Fri, 05/17/2019 - 09:47
नवीन
उस खुशनुमा माहौल को सलाम ! उस खुशनुमा नूर की शुरुवात जिसने की उनकी रुह को , तात्या की रुह को सलाम !!
उनकी रुह फरेबी नहीं थी वोह बेचारे वक्त के मारे थे. अगर वक्त ने सही वक्तपे करवट ली होती तो वोह दौर आज भी बरकरार होता.
खैर अब जो भी था जैसा भी था तात्या शख्स दिल का अमीर था यह बात तो हम नहीं नकार सकतें | उन्ही के वजह से हमारी कई आला writer हस्तीयों के articles से मुलाकात हो पायी जैसे के आप , रामदास काका , प्रभूसर , बिपीन कार्यकर्ते, पिवळा डैंबिस , प्राजू, राज जैन , राजेंद्र बापट कितनोंकी किताबें छपी और कितनोंकी सोशल मिडीयापे एक नई पहेचान बन के उभरें. कितने तो आजभी यु-टुब्स पे एक नए इतमाद confidence से घुम रहे हैं ..यह बिल्कुल तात्या की और मिसलपाव कि हि देन हैं. we can never forget what Tatya and 'Misalpav' has given all of us indirectly.
~ वाहीदा
- Log in or register to post comments
ट
टीपीके
Fri, 05/17/2019 - 09:52
नवीन
फारच वाईट झाले.
२००८ ला मी भारताबाहेर गेलो. दिवाळी मध्ये मटा वाचताना ऑनलाईन दिवाळी अंकांचा लेख वाचनात आला, त्यात मराठी आंतरजाल याची ओळख झाली. मला वाटते पहिल्याच वर्षी मिपाने दिवाळी अंक काढला होता.
पहिली काही वर्षे तात्यांचा वावर जबरजस्त होता, त्यांचे लिखाण, प्रतिक्रिया , व्यक्त होणे जानवण्या इतके मोकळे होते, आणि विषयांची व्याप्ती तर फार होती. मला वाटते रामदास यांच्या नंतर इतके अनुभव असणारे मराठी आंतरजालावर फार कमी लोक असतील.
झाले ते वाईट झाले, तात्यांना श्रद्धांजली
- Log in or register to post comments
ट
ट्रम्प
Fri, 05/17/2019 - 12:17
नवीन
मनःपूर्वक श्रद्धांजलि !!
/\ /\
- Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर
Fri, 05/17/2019 - 13:02
नवीन
तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
- Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश
Fri, 05/17/2019 - 13:30
नवीन
वाईट बातमी,
स्वाती
- Log in or register to post comments
प
प७९
Fri, 05/17/2019 - 14:14
नवीन
__/\__
- Log in or register to post comments
श
शिव कन्या
Fri, 05/17/2019 - 17:27
नवीन
गेले दोन दिवस तात्यांचे लेखन मिळेल तिथून वाचत आहे.
अशा सच्च्या माणसाने, आमच्या सारख्या मराठी मुलुखापासून हज्जारो मैल दूर राहणाऱ्याना मराठीशी बांधून ठेवले.
मिपा म्हणजे हक्काने लिहिण्याचे माहेरघर. या माहेर रातला बापमाणूस गेला.
कायम हुरहूर.
- Log in or register to post comments
V
vcdatrange
Fri, 05/17/2019 - 19:08
नवीन
फेसबुकवर सुपर अॅक्टीव असणार्या अपेक्षित मंडळींचे तात्यावरचे मृत्युलेख वाचुन आठवण झाली ती अश्याच एका शापित गंधर्वाची.
संगमनेरातल्या नव्याने वयात येवु घातलेल्या सर्वांना जणु चंद्रशेखर चौकात हजेरी लावल्याशिवाय मिसरुड फुटत नाही , याकारणे आमची पहिली ओळख झाली. .इनमिन काही महिने सुरु झालेल्या आयुर्वेद कॉलेजला अॅडमिशन घेवुन संगमनेरला आला होता. पण त्या थोड्या काळातही तो लक्षात राहिला. पुण्यात शिकायला आल्यावर हा आमचा सिनियर. सु शिच्या दुनियादारीचा अंमल डोक्यात होताचं, त्यात नेमकं सदाशिवातच वर्दळ असल्याने टुकारगिरी या समवाय संबंधाने आमचं लगेचच सूत जुळलं. हडपसरहुन जीप घेवुन यायचा हा. या गाडीतल्या टेपरेकॉर्डरवर मल्लिका शेखचं ' तू तलम अग्निचं पातं' हजार वेळा तरी ऐकलं असेल. . जे काही करायचा ते जीव ओतुन. . आमच्या क्लासचे सर्वजण भर पावसात भुशी डॅमला गेलो होतो. हा आमच्या आधी मोटारसायकलवर तिथे हजर. . .
मध्येच अभ्यासाचं भूत संचारलं , मग आयुर्वेदाचा अभ्यास , मास्तरशी घसट , तीही इतकी मास्तरच्या नव्या कोर्या आयकॉनची चावी याच्याकडेच असायची. . . मग अध्यात्म . . . वारी . . सगळं सगळं.
खुनशीवर सदा शिवातच भलं थोरलं चकाचक क्लिनिक टाकलं. आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केल्या जाणार्या क्लिनिकल मिटिंगला मान्यवर लेक्चरर म्हणून शेवटचा कधीतरी भेटला. .
अन् मग अदृश्य झाला. . कायमचा।
- Log in or register to post comments
स
सुनील
Sat, 05/18/2019 - 15:46
नवीन
त्याला दोन गोष्टींचा फार शौक! एक म्हणजे गाणे आणि दुसरे खाणे!!
हे दोन्ही शौक पूर्ण करणारे शहर म्हणजे लखनौ. त्याचे आवडते. लखनौच्या रसभरीत आठवणी त्याच्याच तोंडून ऐकाव्यात. अशीच लखनौची एक खासियत म्हणजे हलीम!
दहा वर्षे झाली ह्या गोष्टीला आता.
एकदा घरी हलीम करण्याचा घाट घातला होता. आणि अगदी योगायोगाने म्हणा वा अन्य काही, पण तात्या घरी आला. ग्लेन कुळातील कुठलीशी स्कॉच घरी होतीच. आग्रह झाला.
परंतु, हलीम हा अगदी निगुतीने करण्याचा पदार्थ! तिथे घाई-गडबड करून चालत नाही. पदार्थच बिघडतो. आणि इथे त्याला फार काळ थांबता येणार नव्हते. जाणे भागच होते. आणि तसा तो निघालादेखिल. पण, एकदा अगदी ठरवून, हलीम-स्कॉचचा बेत करायचा, हे पक्के ठरवूनच!
दुसर्या दिवशी मिपावर फोटो चढवला आणि त्याची प्रतिक्रिया आली - अरे, कालचा चान्स हुकला रे!
दहा वर्षे झाली. तो चान्स नंतर कधी आला नाही आणि आता तर येणारही नाही!!!
- Log in or register to post comments
च
चतुरंग
Sun, 05/19/2019 - 04:29
नवीन
परवा बातमी ऐकून धक्का बसला. मनस्वी, हरहुन्नरी आणि बेधडक तात्याची आणि माझी वैयक्तिक भेट कधी झाली नाही. फोनवरती दोन चारदा बोलणे झाले तेवढेच.
जालावरती मराठीतून मुक्त विचार मांडता यावेत या एका बंडखोर विचारातून आणि जिद्दीतून मिसळपाव संकेतस्थळाची उभारणी तात्याने केली हे त्याचे सर्वात मोठे काम असावे आणि याचसाठी तो कायम स्मरणात राहील. तात्याला असे अकाली मरण यायला नको होते अशी चुटपुट लागून राहिली आहे.
मराठी संकेतस्थळांच्या इतिहासात मिसळपावची झणझणीत तर्री देणार्या तात्याला मनःपूर्वक श्रद्धांजली! __/\__
-चतुरंग
- Log in or register to post comments
न
नंदू
Sun, 05/19/2019 - 11:51
नवीन
दुःखद बातमी..
- Log in or register to post comments
म
मित्रहो
Mon, 05/20/2019 - 06:19
नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
Mon, 05/20/2019 - 08:55
नवीन
तात्यांना श्रध्दांजली
- Log in or register to post comments
स
स अर्जुन
Mon, 05/20/2019 - 14:13
नवीन
भावपूर्ण आदरांजली !
- Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे
Mon, 05/20/2019 - 20:53
नवीन
भावपूर्ण आदरांजली.
- Log in or register to post comments
व
विंजिनेर
Tue, 05/21/2019 - 17:44
नवीन
गेल्या आठवड्यात जेव्हा व्हॉटसअॅप वर दुखःद बातमी कळाली तेव्हा धक्का बसला... त्यांच्या आईच्या परिस्थितीबद्दल विचार करवत नाहीये...
मीही मिपामुळे लिहिता झालो. मिपामुळेच आंतरजालावर (मराठी)वाचताही झालो. पूर्वी मनोगत/उपक्रम, आता ऐसी - अश्या ओळखी झाल्या ... छान कसदार वाचायला मिळतं. मध्यंतरीच्या काळात "तात्यांच्या" मिपावर बर्याच घडामोडी झाल्या होत्या. आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. असो. आता तात्याही नाहीत.
ह्या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करायला बरीच जूनी मंडळी आलेली दिसतायेत - बरं वाटलं एका अर्थाने.
- Log in or register to post comments
त
तर्री
Wed, 05/22/2019 - 15:03
नवीन
तात्याशी माझा परिचय ठाण्यातल्या खवय्या हॉटेलमध्ये एका समान मित्राबरोबर मिसळ मिसळ खाता खाता झाला. त्या देहाचा टेबलावरचा अर्धाच भाग हाफ शर्ट मध्ये कोंबला गेला होता. त्रिकोणी चेहरा , कंगव्या पासून फारकत घेतलेले केस , जाडगेले खांदे , बारीक आणि वेधक डोळे एवढेच दिसत होते. माझा परिचय नव्हता म्हणून मी थोडा गप्प होतो पण त्याचा तात्यावर काहीही परिणाम नव्हता. शाळू सोबती असल्याप्रमाणे तो सलगीने बोलत होता.
त्याचा तो खास आवाज , थांबून थांबून बोलणे, मोकळे दिलखुलास हसणे , शिव्यांचा मुक्त वापर , दुसर्याचा विचार पुढे नेत नेत गप्पा हाकण्याची हातोटी हे गुण विशेष माझ्या लक्षात आले होतेच.
"मिसळपाव सुरु करतोय , आय. डी. घे " तात्याने पावाचा तुकडा तर्रित बुडवत विनंती काम धमकी काम आज्ञा केली.
" अरे वाह ! कधी होणार चालू?" मी
गणपती पर्यंत होईल चालू - "तर्री आणि पाव दे रे शिवराम." तात्याला हॉटेल बरेच परिचित असावे.
दोन तीन जादा पाव आणि दोन तीनदा तर्री घेवून , चहा पिवून आम्ही उठलो. तात्याचा उर्वरित भक्कम देह त्या " तात्या " नावाला साजेसाच होता.
"आणि काय समजले विषयाचे बंधन नाही" विजार वर करत तात्या बोलत होता.
"चालू झाली साईट कि फोन करतो" बोलता बोलता गाल्याशी पोहोचलो . तेथे ही प्रदीर्घ परिचय होताच. मित्राने बिल दिले आणि कोणीतरी सोलकढी , ताक प्यायचा आग्रह केला.
" ताजी आहे का सोलकढी ? कि कालची फ्रीज मध्ये ढकललेली? तात्या ह ह हसत हसत विचारत होता जो मला उद्धटपणा वाटला.
एकदम ताजी असेल तर येतो १० मिनिटात.
आम्ही बाहेर आलो आणि तात्याने बार बनवायला घेतला आणि परत मिसळपाव.कॉम वर येण्याची दरडावणी केली . त्या आग्रहात आपण आता चांगले मित्र आहोत ही आपुलकीची भावना ओथंबून वाहत होती. मिसळपाव.कॉम हे तात्याचे जणू स्वप्न होते जे सत्यात येवू घातले जात होते.
पुढे काही दिवसातच मिसळपाव.कॉम सुरु झाले. मी तर्री बनून जो आलो तो येथलाच झालो. आज १२ वर्षे , १ तप होते आहे पण मिपा ची नशा उतरली नाही. धन्यवाद तात्या !!!
सुरवातीचे दिवस अक्षरशः सुगीचे होते. तात्याने मधुकर वृत्तीने जमवलेले लेखक मित्र होते आणि ते सगळे प्रचंड धुमाकूळ घालत होते. ऑफिस मध्ये काम कमी असेल तेंव्हा आणि प्रसंगी कामात टंगळमंगळ करून सुद्धा मिपा वर पडीक राहणे सुरु होते. तात्या संगीतातले दर्दी होते हा आमची मैत्री जुळणारा आणखी एक बंध तयार झाला.
असे एकंदर सुरु असताना तात्याचा परिचय वाढला आणि त्याच्या स्वभावाची दुखरी बाजू दिसू लागली. आज तो गेल्यावर लिहितो आहे म्हणून तो विषय टाळतोय. पण माझ्या स्वभावानुसार मी त्याचाशी झालेल्या मैत्री ला लगाम घातला. त्याचीही तात्याला सवय असावी. तो त्यावाद्दल कधीही विव्हळला नाही. मित्र जोडणे आणि मित्र तुटणे हे जणू एक चक्र होते आणि तो त्यात गुरफटला होता आणी काही मित्रांना गुरफटले होते.
मीपाची मालकी लवकरच बदलली आणि प्रथमच मी तात्याला दुखावलेले पहिले. तात्याचा लेखनाचा चाहता होतो म्हणून त्याच्या ब्लॉग , फेसबुक वर होतोच. त्याचे लेखन अनामिक होवून वाचत राहिलो. आपण फारच कातडी वाचवून राहिलो कि असे नसते केले तर तात्याशी वैयक्तिक दुरावा झाला असता हे माहिती नाही. आज त्याला असे टाळल्याचे दुखः होते आहे. त्याच्या जाण्याने एक आनंदाचा अखंड वाहणारा झरा आटला आहे.
पु . ल. हे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व होते आणि त्यांचे सगळे साहित्य मी वाचले आहे. ह्या जालीय जगात तात्या हा असाच एक लेखक कि त्याचे सारे लेखन मी वाचले आहे.
सावरकरांनी मराठी भाषेला अनेक शब्द रत्ने दिली. अनुदिनी, संकेतस्थळ , विदा असे अनेक शब्द येथे मिपा वर समजले. त्यातील काही तात्याने त्याच्या भाषा सिद्धीने निर्माण केलेही असतील.
तात्या एक चांगला लेखक होता . पु. ल आणि सावरकर ह्या महान लेखकांचा काही अंश तात्यात नक्की होता. गेला बाजार प्रभाव तर होताच होता.
भावपूर्ण श्रद्धांजली :(
- Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके
Wed, 05/22/2019 - 15:52
नवीन
मला वाटते की श्री. निलकांत यांनी येथे चार शब्द लिहिल्याशिवाय ही श्रद्धांजली पुर्ण होणार नाही.
मधे घडलेला दु:खदायक आणि तापदायक प्रकार विसरुन आपण आपले चार शब्द लिहिले तर आनंद होईल.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Wed, 05/22/2019 - 19:48
नवीन
धर्मराजमुटके,
तुमच्याशी सहमत आहे. मात्र नीलकांत यांची इच्छा बलीयसी.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
P
palambar
Sat, 05/25/2019 - 16:55
नवीन
मिपा आता एक साहित्यीक ठेवा झाले आहे
जिवनात, तात्यांना भावपूर्ण श्रध्दांजली!
- Log in or register to post comments
ए
एस
Mon, 05/27/2019 - 06:46
नवीन
आंजाचा बालगंधर्व गेला. त्याच्या सगळ्या बऱ्यावाईट गुणावगुणांना सलाम!
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- ›
- »