Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

बहावा

ब — बिपीन सुरेश सांगळे, Sun, 05/12/2019 - 18:56
बहावा -------------------------------------------------------------------------------------- घोस लगडले सोनसळी मन खुलते या तरुतळी वसंताची बहार ही झाली टपोर मनकळी की पांघरला पिवळा शेला की सोनसाज याला केला रूप देखणे याचे वरती सोन झळाळी तो करतो कसा नजरबंदी सोनपिवळी गारुड धुंदी सय कवळ्या प्रेमाची देई शहाणा कवळी ----------------------------------------- बिपीन

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5053 views

💬 प्रतिसाद
इ
इरामयी Mon, 05/13/2019 - 08:18 नवीन
कविता छान आहे. कोण म्हणतं उन्हाळा सुंदर नसतो? उन्हाळ्याचं masculine देखणेपण कवितेत छान प्रकटलं आहे. वसंत-ग्रीष्मात आसमंत सुंदर करून टाकणारी ही झाडं उन्हाळयाचं सौन्दर्य खुलवतात. का ते माहीत नाही. रानावनात घुमते बाई शीळ या कवितेची आठवण झाली. ती कविता आंतरजालावर कुठे असेल आणि कोणाला ते माहीत असेल तर कृपया दुवा शेअर करा. माझ्याकडून दुवा मिळेल. रच्याकने.. कवळी या शब्दाचा अजून एक अर्थ होतो, त्यामुळे तो शब्दप्रयोग जरासा खटकला.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 05/13/2019 - 10:00 नवीन
रानावनात घुमते बाई शीळ या कवितेची आठवण झाली. ती कविता आंतरजालावर कुठे असेल आणि कोणाला ते माहीत असेल तर कृपया दुवा शेअर करा. माझ्याकडून दुवा मिळेल. हा घ्या दुवा. कविता आणि अजून बरीच माहिती आहे इथे... https://jaganyachajugar.wordpress.com/2012/09/12/33/
  • Log in or register to post comments
इ
इरामयी Tue, 05/14/2019 - 03:06 नवीन
धन्यवाद, डॉ सुहास.
  • Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे Mon, 05/13/2019 - 16:13 नवीन
| इरामयी पुन्हा एकदा आभारी आहे कवळी शब्दाचा प्रॉब्लेम मला माहित होता पण तालात बसण्या साठी मी तो तसा घेतला आणखी एकदा विनंती बहावा हि कथा वाचावी
  • Log in or register to post comments
इ
इरामयी Sat, 05/18/2019 - 07:53 नवीन
कृपया कथेचा दुवा द्यावा.
  • Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे Mon, 05/20/2019 - 07:49 नवीन
इरामयी . https://www.misalpav.com/node/44535 आभारी आहे
  • Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे Mon, 05/20/2019 - 07:51 नवीन
इरामयी . https://www.misalpav.com/node/44349 कृपया आधीचे इग्नोअर करा आभारी आहे
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा