राजीव गांधी, भा नौ पो विराट, लक्षद्वीप, सुट्टी वगैरे...
राजीव गांधींनी आय एन एस विराट विमानवाहु नौकेचा टॅक्सी सारखा वापर केला होता, असा आरोप मोदींनी केल्यानंतर जालावर थोडी शोधाशोध केली. त्यात खालील माहिती मिळाली:
डिसेंबर १६, १९८७
गेल्या वर्षी डिसेंबरअखेरीस राजीव गांधींनी आपली मित्रमंडळी व सोनिया गांधींचे कुटुंबीय यांच्या समवेत अंदमानमध्ये सुट्टी साजरी केली होती. यंदाच्या वर्षी त्यासाठी राजीव गांधी यांनी लक्षद्वीपमधल्या एका निर्मनुष्य बेटाची निवड केली आहे. सुरक्षारक्षक, कंत्राटदार व काँग्रेसचे नेते पंतप्रधानांच्या या सहलीसाठी विशेष मेहनत घेत आहेत… सध्याच्या कार्यक्रमानुसार पंतप्रधान व त्यांच्यासोबतचे पाहुणे ख्रिसमसनंतर एक आठवडा येथे व्यतित करणार आहेत.
अभियंते आणि कामगार हेलीपॅड, तात्पुरती निवासयोजना आदी उभारण्यात मग्न आहेत. नारळ व मासे वगळता बाकी प्रत्येक गोष्ट मुख्यभूमीवरून म्हणजे २०० ते ४०० किलोमीटरवरून आणावी लागत आहे, ज्याद्वारे आधुनिक सोयीसवलती देता येतील. या सगळ्या गोष्टी हवाई मार्गाने आणण्यात येत आहेत. यामध्ये आचारी, पाणी, जनरेटर्स आणि सुरक्षारक्षक व अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
डिसेंबर २८, १९८७
सामान्यांसाठी बेटांवर जाण्याचा मार्ग बंद
पंतप्रधानांच्या निर्मनुष्य अशा आर्चिपेलागोतल्या बेटावरील सहलीसाठी मुख्यभूमीपासून लक्षद्वीपपर्यंतची माणसांची वाहतूक अक्षरश: बंद करण्यात आली आहे. ज्या कोणाला लक्षद्वीपला जायचं आहे त्यांना पंतप्रधानांची सहल संपेपर्यंत थांबावे लागणार आहे. जानेवारी १५ पर्यंतचं सगळ्या बोटींचं तिकिट वितरण बंद करण्यात आलं आहे.
जानेवारी २४, 1988
किमान आठ विदेशी नागरिकांचा समावेश पंतप्रधान व त्यांच्या कुटुंबीयांच्या नववर्षाच्या या सहलीमध्ये होता. या सगळ्या ताफ्यामध्ये पुरूष, महिला व मुलं मिळून २४ जण होते. विविध गोष्टींसाठी या २४ जणांची खातिरदारी करण्यासाठी ७० कर्मचाऱ्यांची फळी सज्ज होती. बंगारामच्या सर्व बाजुच्या सुरक्षेसाठी लक्षद्वीप पोलिस व मध्यप्रदेशच्या विशेष पोलिस पथकासह १,२०० पोलिसांची फौज बंगाराम बेटाच्या परीघावर तैनात होती.
नौदलाची २४ तास नजर या परीसरावर सुरक्षेच्या दृष्टीनं होती. विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्यानुसार या सहलीसाठी चोख बंदोबस्त पुरवण्यासाठी भारतीय नौदलाच्या आएनएस विराट, आएनएस विंध्यगिरी, आएनएस तारागिरी व आएनएस मगर या युद्धनौका सज्ज होत्या.
बातम्यांमध्ये विराट किंवा अन्य युद्धनौकेवर पार्टी करण्यात आल्याचं म्हटलेलं नाही. मात्र, राहुल गांधी यांनी ते राजीव गांधींसोबत विराट वर गेल्याचं कबूल केलं आहे. तसेच, नेहरू पंतप्रधान असताना त्यांच्यासमवेत इंदिरा गांधी आणि बालवयातले संजय आणि राजीव गांधी युद्धनौकेवर असल्याची प्रकाशचित्रं पाहिली. हे सर्व वाचल्यावर काही प्रश्न मनात आले:
१. पंतप्रधानांच्या कुटुंबियांना युद्धनौकेवर प्रवेशाची अनुमती असते का? असावी का?
२. पंतप्रधानांच्या सुटीकरता एवढा खर्च करावा का? त्यांच्या संरक्षणाकरता विराट आणि सोबत अन्य युद्धनौका तैनात करणं हा नक्कीच खर्चिक मामला असावा. शिवाय मुख्य भूमीवरून सगळी सामुग्री द्वीपांवर नेणं हे पण स्वस्त नसावं.
३. पंतप्रधानांचं संरक्षण करताना राष्ट्राची सुरक्षा कमजोर झाली असावी का?
जाणकारांच्या आणि अन्य सदस्यांच्या मतांच्या प्रतीक्षेत.
===========================================================================
संदर्भ:
https://www.indiatoday.in/magazine/indiascope/story/19880131-idyllic-vacation-for-the-gandhis-in-the-lakshadweep-archipelago-769007-2013-11-21?fbclid=IwAR383AgGJHae9RgXmcC4Ie8BTaZ9l3S0wLLDOdnJHd8qzjTGB1YD2p3Ddko
https://www.tv9bharatvarsh.com/loksabhaelections/nehrus-grandsons-rajiv-gandhi-and-sanjay-gandhi-on-board-the-ins-delhi-which-took-part-in-naval-exercises-44170.हटमळ
https://www.inmarathi.com/rajiv-gandhi-family-picnic-photos-revealed/
https://news.google.com/newspapers?nid=P9oYG7HA76QC&dat=19871230&printsec=frontpage&hl=
https://www.indiatoday.in/elections/lok-sabha-2019/story/ins-viraat-rajiv-gandhi-wajahat-habibullah-1520966-2019-05-०९
https://indianexpress.com/article/explained/30-yrs-ago-rajiv-gandhi-in-lakshadweep-5720030/
https://www.loksatta.com/elections-news/indian-express-archives-30-years-ago-1891311/
तिकडे इमरान खान ने 2 आठवड्यापुर्वीच आपला राजिनामा आर्मीला सादर केला आहे. ही पण बातमी आहे...
- पं तप्रधानांनी खासगी सुट्टीवर जाणे गैर नाही.
- पंतप्रधानांनी कुटुंबाला म्हणजेच बायको आणि मुले (स्वतःची) सोबत नेणे गैर नाही.
- पंतप्रधानांनी शासकीय दौऱ्यावर म्हणजेच बायको आणि मुले (स्वतःची) सोबत नेणे गैर नाही.
- पंतप्रधानांनी शासकीय दौऱ्यावर कुटुंब सोडून इतरांना स्वखर्चाने नेणे गैर नाही .
- पंतप्रधानांनी शासकीय दौऱ्यावर कुटुंब सोडून इतरांना शासकीय खर्चाने नेणे गैर आहे.
- पंतप्रधानांनी खासगी सुट्टीवर जाण्यासाठी नौदलाच्या जहाजाचा वापर करणे गैर आहे.
नौदलाने अद्याप तसा खुलासा केल्याशिवाय व्यक्त होऊ शकत नाही.