Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

विहीर खोदण्याचा विचार

श — शिव कन्या, Fri, 05/03/2019 - 04:54
विहीर खोदण्याचा विचार... डोळ्यांतील उजेड कमीकमी होऊ लागला हसण्यातील सच्चेपणा संपू लागला तेव्हा मी विहीर खोदण्याचा विचार करू लागले.... जमिनीला भेगा, उन्हाच्या झळा पाण्याची पातळी इतकी खोल इतकी खोल.... कि आतला लाव्हाच दिसू लागला! विहीर खोदल्यावर पाणीच लागेल हे मी तरी कशाच्या आधारावर ठरवले? डोळ्यांतील उजेड संपताना, संपू द्यावा उन्हात हसू हरवताना, हरवू द्यावे दुष्काळात विहीर खणू नये जमिनीला कष्ट देऊ नयेत ..... इतकेच काय पावसाचीही वाट पाहू नये आता, डोळ्यातील क्षीण उजेडाला फसवू नये संपू पाहणाऱ्या हसण्याला धरून ठेवू नये..... विहीर खोदण्याचा विचार मात्र.....?? विचार काही माझ्या आधीन नाही...... -शिवकन्या

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 8751 views

💬 प्रतिसाद
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 05/03/2019 - 05:52 नवीन
तहान लागल्यावर विहीर खोदणे यालाच म्हणत असावे पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
र
रातराणी Fri, 05/03/2019 - 06:25 नवीन
सुरेख नेहेमीप्रमाणे!!
  • Log in or register to post comments
स
सोन्या बागलाणकर Fri, 05/03/2019 - 08:16 नवीन
इच्छामरणावरती आहे का ही कविता?
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Fri, 05/03/2019 - 09:12 नवीन
कि आतला लाव्हाच दिसू लागला! विहीर खोदल्यावर पाणीच लागेल हे मी तरी कशाच्या आधारावर ठरवले?
  • Log in or register to post comments
श
शब्दानुज Fri, 05/03/2019 - 09:56 नवीन
म्हातारपणावर आहे का हो कविता ? वय झाल्यावर जीवनरस संपत जाणारी कविता ?
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Sat, 05/04/2019 - 07:26 नवीन
आपण लावू तितके अर्थ. कविता आहे, कोडे नाही. :))
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sat, 05/04/2019 - 10:07 नवीन
खॅ खॅ खॅ विहीर नको पण पाऊस पडण्यापुर्वी जमीनीची नांगरट करावीच लागते ना? नांगरट खोल झाली तर जमीन भुसभूशीत होते. बी बियाणं चांगलं रुजते. वरून पाऊस असतोच दणकेबाज. मग पीकही चांगले जोमदार येते. आमची माती अन त्यांची झालेली माती. खॅ खॅ खॅ
  • Log in or register to post comments
अ
अन्या बुद्धे Sat, 05/04/2019 - 17:30 नवीन
आवडली.. पण नेहमीप्रमाणे बांधीव नाही वाटली..
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Sun, 05/05/2019 - 15:30 नवीन
चांगली आहे, पण काही तरी मिसींग वाटले. बाकी "धागा काढण्याचा विचार" असे विडंबन कोण लिहीतयं बघू. ;-)
  • Log in or register to post comments
न
नाखु Sun, 05/12/2019 - 19:29 नवीन
आम्ही पूर्ण केलेली आहे. कर्ता करविता स्वामि,आम्ही निमित्त पात्र
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 05/13/2019 - 09:54 नवीन
कर्ता करविता स्वामि हा हा हा !
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 05/07/2019 - 12:19 नवीन
खोल आहे.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 05/13/2019 - 09:55 नवीन
जीवनरस शुष्क करणारे असे काही शब्द पाहून चटके बसले डोळ्यांना. घश्याला कोरड पाडणारी कविता !
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन Mon, 05/13/2019 - 11:45 नवीन
लिहले आहे छान पण एक शब्द कळला नाही.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा