Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

महाराष्ट्रातील चालू घडामोडी १

स
स्वामि १
Wed, 05/01/2019 - 05:53
🗣 105 प्रतिसाद
भारतात लोकशाही व कथित कायदा मुळे महाराष्ट्रात मानवी मुल्ले, अधिकार, राहणीमान, भाषा व संस्कृती जपली जाते का? प्रतेक जनतेला प्राथमिक गरजा, आरोग्य व पायाभूत सुविधा मिळत आहेत का? तरूणांना शिक्षणा नंतर योग्य नोकरी ची शाश्वती आहे का? वृद्धांना आपले उर्वरित आयुष्य सुख समाधानाने जगता येइल का?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 35468 views

🗣 चर्चा (105)
अ
अभ्या.. Sat, 05/04/2019 - 09:45 नवीन
आमच्याकडे त्यालाच एक छिद्र जोडायची पध्दत आहे. ;)
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन Tue, 05/07/2019 - 12:23 नवीन
म्हण आठवत नाहिका? स्वामी तिन्ही जगाचा. .. . .. . .
  • Log in or register to post comments
स
सोन्या बागलाणकर Wed, 05/08/2019 - 00:18 नवीन
अरारारा! हसून हसून पडलो अभ्यारौ!
  • Log in or register to post comments
न
नाखु Sun, 05/05/2019 - 04:40 नवीन
अगदी दिवसाच चांदण्या दाखविल्यास रे,बाकी असे धागे वाचल्याने खोटं खोटं हसायला हास्यक्लबात जायची गरज पडत नाही,असे आमच्या ह्यांचे मत... मिपा सार्वकालीन माई
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Sat, 05/04/2019 - 16:20 नवीन
का कोण जाणे. "नाडी" ची आठवण आली. :-)
  • Log in or register to post comments
न
नाखु Sun, 05/05/2019 - 10:37 नवीन
मागे आहेत हेच सत्य तुम्ही दाखविलेत. परवाच बसमध्ये कंडक्टर ओरडला मागे कोण राहलयं,तर सात आठ जण म्हणाले आम्ही राहलोयत तिकिट काढायचे. मी अंदाज काढला की त्या आठांपैकी पाच जण मराठी होते. अशा मागे राहणार्या लोकांमुळे महाराष्ट्राची प्रगती होत नाही.मी गर्दी असल्याने त्यांचे संपर्क क्रमांक घेउ शकलो नाही,अन्यथा तुमच्या पर्यंत पोहोचवले असतेच. मागच्याच गल्लीत राहणारा खालमान नाखु
  • Log in or register to post comments
फ
फुटूवाला Sun, 05/05/2019 - 10:44 नवीन
जागतीक हास्य दिन ईथेच साजरा होणार बहुतेक... :))
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Mon, 05/06/2019 - 09:24 नवीन
धन्य आहात तुम्ही आणि ती तुमची पी एम टी.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 05/05/2019 - 13:42 नवीन
बरेच दिवस चाललेल्या राजकिय रणधुमाळीच्या धाग्यांच्या भडीमारामुळे, मिपाकर हसायचे पार विसरून गेले होते. त्या पार्श्वभूमीवर, असले धागे व त्यावरचे प्रतिसाद, मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात गार हवेच्या झुळूका आहेत ! याबद्दल संबंधिताचे आभार मानावे तितके कमीच ! ;) :)
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 05/05/2019 - 18:55 नवीन
खऱ्या आयुष्यात एकदा वेडा लोकांवर दगड मारत असेल तर लोक shahnya सारखी काही प्रतिसाद न देता बाजूने जातात . पण mipa वर उलट दिसतेय ज्यांना वेडा ठरवले जाते आहे तो दगड मारत नाहीत तर कथित हुशार ठरवलेल्या वेड्या वर दगड मारत आहेत गंगा उलटी वाहते आहे
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Sun, 05/05/2019 - 18:59 नवीन
आयडिला पंख लागायची वेळ नजिक आली आहे वाटते!
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Mon, 05/06/2019 - 12:52 नवीन
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Mon, 05/06/2019 - 12:54 नवीन
सगळे सूतार हे उत्तरभारतीय/ राजस्थानी आहेत. आणी सगळे चांगले कारागीरच आहेत. *उत्तम फर्निचर* बनवतात. दिवसभर मेहनत करतात. सिंगल हजेरी .... म्हणजे सकाळी नऊ ते पाच पाचशे आणि सकाळी नऊ ते रात्री अकरा *ड़बल हजेरी* .... म्हणजे दिवसभराची अधिकतम मजूरी एक हजार. या सगळ्यांचा *म्होरक्या* जो आहे तो उत्तर भारतीय तरूण तिशीतला मुलगा. तो आपल्या गावातून उत्तम कारागीर शोधून आणतो. हे कारागीर तरुण असतात. *मोठ्या कारागीरांच्या हाताखाली* पंधरा सोळा तास राहतात, शिकतात आणि कौशल्य कमावतात. *विनातक्रार दिवसभर* काम करतात. सकाळी यांचा नास्ता म्हणजे भिजवलेले कच्चे चणे, दुपारी वरण भात आणि रात्री अकरा नंतर यांच्या मधील एक शिकाऊ मुलगा *सगळ्यांचे जेवण* बनवतो. ह्या उत्तर भारतीय तरूण म्होरक्याच्या हाताखाली निव्वळ गोरेगाव ते विरार या विभागात असे सत्तरेक कारागीर काम करतात..... मन लावून काम करतात. कुठेही *खळखळ* दिसत नाही फारशी आणि बघता बघता उत्तम असे फर्निचर घरात आकार घेत जाते. तेव्हा प्रश्न पडतो... *मराठी सूतार गेले कुठे सगळे?* समोरच्या गल्लीत दहा वर्षांपूर्वीपासून आत्ता आत्तापर्यंत एकच भाजीचे दुकान होते एवढ्या परिसरात. उत्तर भारतीय नवरा बायको आणि त्यांचे तीन मुलगे ....सगळे भाजीच्या दुकानात *राबत* असत. दुकानात तोबा गर्दी दिवसभर. एका गाळ्यावर आज हळूहळू दोन गाळे, दोन फ्लॅट्स घेतले त्या कुटुंबाने.. मेहनत सकाळी पाच वाजल्यापासून रात्री अकरा पर्यंत सारे कुटुंब राबत असते. तेव्हा मला प्रश्न पडतो... *मराठी बेरोजगार तरुणांना हे धंदे का खुणावत नाहीत?* कारण *मेहनतीची तयारी* नाही आणी हे रहस्य मला रिनोव्हेशनच्या वेळीच जाणवले. वायरींग करण्यासाठी आलेला इलेक्ट्रिशियनवाला म्हणाला की मेहनत खूप आहे कन्सिल वायरिंग करण्यात. शिवाय *कौशल्य* ही आहेच पण हल्ली मराठी तरूण या कामात येतच नाहीत फारसे. मला प्रश्न पडला *मराठी तरूण गेले कुठे..?* माझ्या घरापासून ते स्टेशनपर्यंतच्या परिसरात फक्त एक किराणा दुकान मराठी माणसाचे आहे. बाकी सगळी दुकाने उत्तर भारतीय, राजस्थानी, गुजराती लोकांची आहेत. आपल्या छोट्याशा दुकानात लागणारी चार पाच माणसे ते आपल्या गावाहून आपल्या समाजातली घेऊन येतात. आणि त्यांची संख्या इथे वाढत जाते. आणि त्यांची प्रगतीही होत राहते. इकडे मला प्रश्न पडतो.. *मराठी तरूण काय करतो...?* परिसरात इस्त्रीवाला मराठी नाही..दूधवाला, ब्रेडवाला मराठी नाही..पानवाला हजाम बाहेरचा.(हे भाईंदर /वसई /विरार/ पालघर सारख्या मराठी बहुल विभागातील परिस्थिती) माझ्या ओळखीचा एक कोकणी तरुण आहे. तो मुंबईत सरकारी कार्यालयात शिपायाची नोकरी करतो. सुरुवातीला दहा पंधरा हजार पगार होता फक्त. आणि कोकणात त्याची हापूसची पस्तीस कलमं धूळ खात पडलीत म्हणे......चोरापोरापायी जातात. पण याला गावी जायला, तिथं राहायला आवडत नाही... मग अशा कोकणात उ. भारतीय लोक जाऊन तिथली कलमं *भाडेपट्ट्यावर* घेतात आणि त्यांची राखण करत आंब्याचा व्यवसाय वाढवतात. अशा प्रकारच्या अनेक कारागिरांची, मेहनतकारांची गरज असते. आहे आणि पुढेही लागणार आहे. *तेव्हा मराठी तरूण कुठे असतात? सगळ्याच जाती धर्माचे...??* तर याचे मला भरपुर मंथन केल्यावर सापड़लेले उत्तर आहे की... *मराठी तरुण चळवळी, संघटना, आणि युनियन,क्रांती मोर्चा, ब्रिगेड बांधण्यात मशगूल असतात नको तेथे उसळतात* *सार्वजनिक गणपती, मोहरम बसवण्यात मशगुल असतात. मिरवणुका काढण्यात मशगुल असतात.* *राजकारण्यांच्या हाताखाली कार्यकर्ते म्हणून नाचण्यात मशगूल असतात. शिवाजी राजे, टिळक, आंबेडकर, याबद्दलचे वाद घालण्यात मश्गूल असतात.* *नाचायचे, मारामारी , फोड़ाफोड़ी, दारू, तंबाखू आणि "मी कुठला धंदा करु याचा विचार" यातच दिवस काढ़तो* ठीक तर....हे सगळं करायलाही कुणी तरी हवंच आहे नाही का ?. पण मग परप्रांतियांच्या नावाने खडे फोडू नये. हजारो किमी दूर अनोळखी प्रदेशात येऊन, ते रिस्क घेतात, मेहनत करतात, *पंधरा सोळा तास* राब राब राबतात ... माझ्या मराठी बंधूनो खर सांगा ... विचार करून सांगा *आपल्याला ....आपल्या तरूणांना आपल्याच गावात राहून ते करता येत नसेल तर हा दोष कुणाचा...??* मराठी माणसाचे अस्तित्व नक्कीच आहे।पण कुठे *गल्ली बोळात* टिंगल टवाळी करायला फक्त आपलेच असतात. गल्ली मध्ये दादागिरी भाईगिरी, गाड्या जाळायला, पोलिसांची डोकेदुखी वाढवायला आपलेच असतात. वाढदिवसाला *फ्लेक्स लावून भावी* आमदार, खासदार नाहीच तर नगरसेवक लिहून नाहक खर्च करणारे आपलेच असतात. मोठं मोठ्या गाड्या घेऊन फुकट खर्च करायला आपलेच असतात. सणावाराला *दादागिरी करून* वर्गणी जमा करायला आपलेच असतात. शाळा, कॉलेज, मध्ये तोढफोड करायला आपलेच असतात। कोण म्हणतं मराठी माणसाचा अस्तित्व नाही???????? *बघा अजूनही वेळ गेली नाही* विचार करा आणि आपलं अस्तित्व निर्माण करा. फक्त बार रेस्टऔरंट मध्ये *संध्याकाळी बसून* गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या नाहक चर्चा न करता प्रत्यक्ष कृती करून दाखवून द्या *नाहीतर एक दिवस आपल्याच एक एकरावर आपल्याला काम करायचे दिवस लांब नाही* सर्व महाराष्ट्रीयन तरुणांना समर्पित. उघडा डोळे वाचा नीट !
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Mon, 05/06/2019 - 13:17 नवीन
दादरला काही टॉप स्वस्तात मिळाले म्हणून 5 टॉप खरेदी केले. जवळच एक नवीन टेलरचे दुकान निघालेले म्हणून गेले त्याच्याकडे. आमच्याकडचे इतर प्रस्थापित (सगळे मराठी आहेत)टेलरलोक शक्यतो टिपा मारणे, बाह्या लावून देणे अशी 'फडतूस' कामे करत नाहीत. पण हा नवखा होता म्हणलं बघू विचारुन. तर म्हणाला एका टॉपला टिपा मारणे व बाह्या लावणे याचे 80 रु. होतील. तेही 4 दिवस लागतील. मी त्याला म्हणलं 200 रु. च्या एका टॉपला 40 ऐवजी 80 रु. ? काहीच कमी करायला तयार नाही. शेवटी नाईलाजाने एक टेलर जी लांब राहते तिथे गेले. नेमके ते दुकान बंद पडले होते. पण जवळच दुसरे दुकान कोणीतरी तुरु केले होतेे. बाई हिंदी होती. मराठी समजत नव्हते. तिला काय करायचे ते समजावून सांगितले. एका टॉपचे 30 रु. घेतले आणि सगळं काम संध्याकाळीच करुन दिलं. आमच्या इथे मराठी सुतार, इलेक्ट्रीशिअन, प्लंबर. अशा कामांना कोणी ओळखीचे मराठी लोक येत नाहीत. एखादेवेळेस आला तर नंतर कारणे सांगतात. पण आता याच कामांसाठी हिंदिवाले ओळखिचे झालेत. ते फोन केला की त्याच दिवशी येतातही आणि कमी किमतीत कामे करुन देतातही. मराठी लोकांनी आपल्याला निर्माण झालेले हे आव्हान ओळखून धंदा करण्याच्या पद्धतीत बदल केला पाहिजे. मोडेन पण वाकणार नाही चे दिवस गेले आता. मुळात मराठी माणसाला रोजगार मिळवणे आणि तो टिकवणे (धंद्याच्या बाबतीत) हे फारसं कळलेलं नाही. ज्याला कळलं ती मराठी माणसे व्यावसायात यशस्वी झाली व टिकून राहीली. नुसतंच मराठी माणूस वाकणार नाही, अन्याय सहन करणार नाही असल्या भंपक घोषणा देण्यापेक्षा ही मानसिकता मराठी माणसाच्या अवनतीला कारणीभूत आहे हे मान्य करावे व या मानसिकतेतच बदल करायची गरज आहे हेही मान्य करावे. आणि जर तसे होणार नसेल तर हिंदि भाषिकांच्या महाराष्ट्रात सामावून जाण्याला ही असली मराठी माणसेच जबाबदार असतील.
  • Log in or register to post comments
झ
झेन Mon, 05/06/2019 - 14:54 नवीन
तूमचं बरोबर आहे पण हे सगळं ज्यांना खरंच कळकळ आहे त्यांच्यासाठी. आवेश आणि आस्मिता फुलवून खेळ करणारे दरवेशच आवडतात त्यांना काय सांगणार. मराठी माणूस, महाराजांचा मावळा, रमाबाईंची लेकरं, जगाचा पोशिंदा, जातधर्म ह्या गोष्टी, कुठे आर्ची मिळते का बघणे हे सोडून कुठे त्या परप्रांतीयांसारखी लोकांसारखी मेहनत करायला सांगता मराठी माणसांना. कधी अनवाणी ऊन्हातून ज्योत घेवून पळणाऱ्या, टिनपाट भाई-दादांसाठी मारामारी करणाऱ्या, केसेस अंगावर घेणाऱ्या बेकार मुलांना सांगायचा प्रयत्न सुध्दा करू शकत नाही. मी पदवीधर आहे मला सरकारने नोकरी दीलीच पाहीजे असली दीवास्वप्न घेवुन जगणारे मराठी तरुण बघितले कि आपणच गल्ली चुकलो असे वाटते.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 05/06/2019 - 15:05 नवीन
हिंदी भाषिक लोकांची संख्या वाढण्यासाठी तुम्ही जी कारण दिली आहेत . मराठी तरी काम करत नाही आळशी,दारुडा,आहे. अभ्यास काय आहे तुमचा महाराष्ट्र विषयी.आज अमेरिकेत सुधा मराठी तरुण विजयाची पताका उंच फडकवत आहेत. क्रिकेट,संगीत,राजकारण,संरक्षण क्षेत्र,सर्वच ठिकाणी मराठी लोकांनी ठसा उमटवला आहे उत्तम डॉक्टर्स,इंजिनिअर,मराठी तरुण आहे आणि त्या मराठी तरुणांना तुम्ही दारुडे म्हणताय आपल्या अल्प अभ्यासावर . पहिले शीख लोकं मुंबई मध्ये टॅक्सी चालवायचे त्यांची जागा up ,Bihari I घेतली ती काय शीख लोक कष्टाळू नव्हते, महणून जरा अभ्यास करा
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 05/06/2019 - 17:34 नवीन
अमेरिकेतून त्या मराठी तरुणांना हाकलले नाही अजून अमेरिकन लोकांनी आणि सरकारने? महाराष्ट्रातून परप्रांतीयांना हाकलून द्यायचंय, त्याप्रमाणे?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 05/06/2019 - 16:37 नवीन
MEDICAL DIALOGUES HomepageProfession Md Team 10.41 lakh Registered Doctors in India, Maximum in Maharashtra: Health Minister It is estimated that around 8.33 lakh doctors may be actually available for active service giving an approx doctor-population ratio of 1:1596 much below the WHO norms prescribes that there should be 1 doctor amongst the population of 1,000 New Delhi: Recently, through a written reply to a question in Rajya Sabha, Minister of State ( Independent Charge) Smt Anupriya Patel informed about the Registration of Allopathic Doctors with various medical councils across the country. The minister informed that as per information provided by Medical Council of India, there are a total 10,41,395 allopathic doctors registered with the State Medical Councils/Medical Council of India as on 30th September, 2017. Assuming 80% availability, it is estimated that around 8.33 lakh doctors may be actually available for active service. It gives a doctor-population ratio of 1:1596 as per current population estimate of 1.33 billion. However, WHO norms prescribes that there should be 1 doctor amongst the population of 1,000. As per records, Maximum number of registered medical practitioners have their registrations in Maharashtra with 153513 registered doctors. This is followed by Tamil Nadu and Karnataka who also account for more than 1 lakh registered doctors each.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 05/06/2019 - 17:25 नवीन
माझे गावचे पोलिस फोजदार आहेत मुंबई मध्ये पण जेव्हा ते गावी सुट्टीवर येतात तेव्हा मी त्यांना अगदी घरच्या गुरांचे शेन काढण्या पासून सर्व काम करताना bagto माझे मित्र आहेत बालपणीचे सैन्यात ते जेव्हा सुट्टीवर असतात तेव्हा सुट्टी संपेपर्यंत शेतातील आणि घरातील कामे करताना बघतो माझे मित्र,नातेवाईक,जी काही मी मराठी माणसं बागितली त्यात कोणीच दारुडे,kamchor, उगाचच नेत्या chya पाठीमागे पळणारे नाहीत. उलट,प्रामाणिक,मेहनती,आणि सज्जन आहेत. मग ठराविक लोकांनाच Maharashtra मधील तरुण कामाचा नाही असा साक्षात्कार होतो हे काही समजत नाही. मुंबई मध्ये मराठी माणूस कमी नाही झाला बाकी लोकांची संख्या वाढली आहे . ते कष्टाळू मेहनती आहेत म्हणून संख्या वाढली नाही तर त्यांच्या राज्यात रोज १०० रुपये सुधा कमवण्याचे साधन नाही म्हणून त्यांची संख्या इथे वाढली आहे हे सत्य नाकारून मराठी तरुण कसे कामाचे नाहीत हे सांगण्या पाठीमागे कोणती. मनोवृत्ती आहे .
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Mon, 05/06/2019 - 20:39 नवीन
आपल्या मुंबईत किती मराठी लोक गाड्या लावून मसाला डोसा , पानीपुरी, दाबेली असे पदार्थ विकतात? बिर्यानी हा पदार्थ फक्त मुसलमान लोकांनी बनवायचा आहे असा गैरसमज मराठी माणूस का बाळगतो? मी काही वर्षासाठी कर्जतजवळील एका गावात राहिलो होतो. तिथे घराघरातून म्हशी पाळल्या जात होत्या. पण हे लोक त्यांचे दूध उल्हासनगर, कल्याण या ठिकाणी जाऊन मोठ्या तबेलेवाल्याला देत. आता तुम्ही अनुभव घेतला आहे ना? मग मुंबईत किती मराठी लोक तबेल्याच्या दुधाचा धंदा करतात? चहाची टपरी, पानवाला मराठी बघितला आहे का हो? एक वेळ अशी होती कि कोळीनी घरोघर जाऊन मासे विकत, तिथे आता भय्ये व मुसलमान का झाले? या मुसलमानानी तर मराठी लोकांना पळवून नाही लावले? रोजगार म्हणजे सरकारी नोकरी या मांनसिकतेतून बाहेर पड़ा. मी मुंबईत ज्या ऑफिसमधे काम करतो तिथे एक शेट्टी मसाला डोस्याचा धंदा लावतो. त्याच्या हाताखाली मराठी पोरे काम करतात. त्यातल्या एकाही पोराने हिमंत करून दुसरीकडे गाडी टाकन्याचे साहस केले नाही. कारण ती मानसिकता नाही हो आपल्या मराठी मुलांकडे!
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 05/07/2019 - 06:11 नवीन
http://www.misalpav.com/node/40590 मागे मी चेलिया मुसलमानांबद्दल एक लेख लिहिला होता त्यात त्या समाजाचे लोक आपल्याच समाजातील गरीब मुलांना कसा हात देऊन आपली प्रगती करत आहेत हे लिहिले आहे. मराठी माणसांबद्दल असे कुठे होताना दिसत नाही. आपली माणसे निर्भीड आणि निष्पक्ष पणा कसा चांगला आणि आम्ही सर्वांचा उद्धार करणार अशा काहीतरी मनोवृत्ती मध्ये वावरत असतात. याउलट बृहन्महाराष्ट्रात( महाराष्ट्राच्या बाहेरील) मराठी माणसे आपल्या लोकांना धरून चांगली प्रगती करताना दिसतात असा माझा वैयक्तिक अनुभव आहे.
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Tue, 05/07/2019 - 06:38 नवीन
माझे एक मित्र श्री गोपाल पुजारी मुंबईत आले तेव्हा एका होटेलात फडके मारायचे काम करीत. हळूहळू पाणी देणे, वेटर अशी प्रगति करत त्या धंद्यातल्या खाचाखोचा शिकुन घेतल्या. चर्चगेटमधे सिंडिकेट बैंकेचे कैंटीन चालवायला घेतले. चारकोप कांदीवलीला तुलसीविहार हे रेस्टोरेंट उभे केले. त्यात गावावरुन अनेक लोकांना आणून कामधन्द्याला लावले. आजही आपल्या स्वतःच्या होटेलात ना बसता कैंटीन चालवतात व त्यांच्या गावाकडील जे शिकाऊ उमेदवार आज होटेलात गल्ल्यावर बसून होटल चालवतात. मराठी माणूस असा विचार करताना फार कमी दिसतो.
  • Log in or register to post comments
स
स्वामि १ Tue, 05/07/2019 - 14:48 नवीन
आपण चेलीया मुसलमान च्या आसपासातील सहकार्या बद्दल सांगितले. असेच सहकार्य किंवा Syndicate जैन, केरळ, गुजराती पटेल व (बराचशा महाराष्ट्र बाहेरून आलेल्या) मुस्लिम समाजात उघड पणे व गुप्त पणे धंद्यात व्यहवारी सहकार्य असते पण असे मराठी मध्ये नाही आहे. असे गुप्त सहकार्य मराठी मध्ये का नाही?
  • Log in or register to post comments
स
स्वामि १ Tue, 05/07/2019 - 05:40 नवीन
सर्वांच्या चर्चेत निच्छित होते की हल्ली मराठी माणूस आळशी होत चालला आहे व तो सकारात्मक कामाशिवाय इतर निरर्थक कामा कडे लक्ष घालतो व ते सत्यच आहे. Rajesh 118 नीं सांगितले की मराठी माणूस कर्तबगार व हुशार आहे व तशी उदाहरणे ही दिली व तेही तितकेच सत्य आहे. मराठी माणूस माघे पडायला तो स्वःताच कारणीभूत आहे. मग ही होत असलेली चुक सुधारणारा कोणी तरी पाहिजेच ना? ही चुक संपूर्ण मराठी समाजाकडून होत आहे मग ह्या तुन मार्ग काय काढायचा?
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Tue, 05/07/2019 - 06:30 नवीन
ही चुक संपूर्ण मराठी समाजाकडून होत आहे मग ह्या तुन मार्ग काय काढायचा?
आता तुम्हीच सांगा सकारात्मक उपाय ?
  • Log in or register to post comments
L
lakhu risbud Tue, 05/07/2019 - 08:41 नवीन
खरंच आहे सर्वात पहिल्यांदा "त्या" मराठी माणसाने हे रिकामटेकडे पणाचे उद्योग असणारे धागे काढणे बंद केले पाहिजे. कोणत्यातरी संकेतस्थळावर वायफळाचे मळे पिकवण्यापेक्षा त्याच माणसाने स्वतःचा एखादा उद्योग उभा करून तो पुढे आणला पाहिजे. तुम्हाला कुठे "तो" मराठी माणूस दिसला तर त्याला पकडून पकडून हे ऐकवा.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 05/07/2019 - 06:42 नवीन
महाराष्ट्र बरोबरच अमेरिका, ब्रिटन,गल्फ मधले देश,austriliya,न्यूझीलंड,अशा जगातील सर्वच देशातील नागरिकांना सुधा आपण संदेश पाठवला पाहिजे की कामे करा ,मेहनत करा तुम्ही आळशी असल्या मुळे बाकीच्या देशातील म्हणजे बांगलादेश,भारत,पाकिस्तान,नेपाल,आफ्रिकन देश ह्या सर्व देशातील कामसू लोकांना तुमच्या कडे येवून तुमची अर्थ व्यवस्था चालवावी लागत आहे . समाज कार्य आणि विश्वबंधुत्व म्हणून ते हे काम करत आहेत.त्यांनी तरी तुम्हाला किती दिवस सेवा म्हणून हे काम करायचे . आणि महारष्ट्र नी सुधा परप्रांतीय लोकांच्या भोळे पणाचा फायदा घेवून सर्व राज्याचा बोजा त्यांच्या वर न टाकता स्वतः काम केले पाहिजे . भारतात महाराष्ट्र आणि जगात वरील सर्व देशाची सेवा सेवा करता करता त्यांना स्वतःच्या राज्याकडे सुधा लक्ष द्यायला वेळ न मिळाल्यामुळे त्यांचे स्वतःचेच प्रदेश अनेक अडचणींना तोंड देत आहेत .तरी कृपया अजून जास्त सेवेची त्यांच्या कडून अपेक्षा ठेवू नका
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Tue, 05/07/2019 - 07:35 नवीन
तुम्हाला खरंच असं वाटते का की त्या त्या भागातल्या लोकांनी त्यांच्याच भागात राहुन प्रगती करावी ? असं नसतं हो. आदीमानवापासुन आज पर्यंत स्थलांतर होतच आलंय हो. प्रत्येक गोष्टीचे फायदे तोटे असतातच तसेच याचे पण असणारच. मराठी व्यक्ती बेंगलोर, दिल्ली, अमेरीकेत गेली तर भारी आणी हिंदी व्यक्ती मुंबईत आली तर समस्या ! जाऊ द्या तुमच्या बेसीक मध्येच काहितरी गफलत वाटतेय.
  • Log in or register to post comments
ग
गब्रिएल Tue, 05/07/2019 - 07:42 नवीन
तुम्चा सर्व्या जगाला आसलेला निरोप वाचुन लई म्हंजी लई म्हंजी लईच मराटी आसल्याचा आबिमान वाट्ला. आख्ख्या जगाचे तारणहार आसलेले स्वामि Rajesh188 ह्येंचा जयजयकार हाये! आता आपन सगळ्ये सगळ काय ते टाकून देऊन आदीमानवा सारके आपापल्या जमिनिवर शिकार आणि वनस्पती गोळा कराय्ला लागू (त्येच त्ये, हंटर-गॅदरर का काय म्हंतात त्येच). आपल्या हद्दीत दुसरा कोनी घुस्ला रे घुस्ला की त्येला चांगला पोकल बांबूने फोकलवून काढू. म्हंजे कसं जगभर चांगभलं व्हईल. काय म्हंता?
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Tue, 05/07/2019 - 08:07 नवीन
ळॉळ ! असं काही नका लिहीत जाऊ साहेब ! ऑफिसमधे आहे. हसु अजिबात कंट्रोल नाही होतंय. :D :D :D
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 05/07/2019 - 10:22 नवीन
विनाकारण हसत जावू नका. Konhi ऑफिस मध्ये बागितल तर गैरसमज होईल .आणि बचाव साठी माझी पोस्ट वाचून दाखवलं तर हस होईल तुमचं
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Tue, 05/07/2019 - 11:28 नवीन
विनाकारण नाही हो साहेब,
आपल्या हद्दीत दुसरा कोनी घुस्ला रे घुस्ला की त्येला चांगला पोकल बांबूने फोकलवून काढू. म्हंजे कसं जगभर चांगभलं व्हईल. काय म्हंता?
हे वाचलं आणि हसु आलं बघा.
Konhi ऑफिस मध्ये बागितल तर गैरसमज होईल
धन्यवाद! आपल्या बहुमोल सल्ल्याबद्दल. यापुढे निश्चित काळजी घेतल्या जाईल.
आणि बचाव साठी माझी पोस्ट वाचून दाखवलं तर हस होईल तुमचं
नाही हो असं काही नाही. अर्ध्याअधीक लोकांना कळणारच नाही. कारण आजबाजुचे लोक पश्चीम बंगाल, केरळ, कर्नाटक, आसाम आणि पॅरीसचे आहेत. त्यांना मराठी नाही वाचता येत. ज्यांना वाचता येते त्यांना तुमच्या पोस्ट दाखवुन मी स्वतःचे हसे करुन नाही करुन घेणार. काळजी नसावी.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 05/07/2019 - 10:17 नवीन
मी जी पोस्ट केली आहे त्याला संदर्भ आहे . इथे सर्वच जन असे सांगत आहेत की महाराष्ट्रात वाढलेले परप्रांतीय लोकांचे प्रमाण ह्याच एकच कारण आहे मराठी कामचुकार,व्यसनी लोक. हे कारण खरे असेल तर अमेरिका,ब्रिटन,आणि जेवढे प्रगत देश आहे त्या देशातील जनता कमचोर आणि व्यसनी आहे असे समजायचं का . खरे कारण अप्रगत देश आपल्या जनतेच्या गरजा भागवू शकत नाहीत म्हणून एक पर्याय म्हणून आपण तिथे नोकरी करायला जातो हे आहे . आणि हाच नियम महाराष्ट्र ल सुधा लागू आहे
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 05/07/2019 - 11:51 नवीन
ए बास कर ए आता, ना आगा ना पिछा, बिनबुडाचे काहीही लिहायचे, ना मुद्दा ना एक ठाम भूमिका, कैतरी लिहिता बसायचे अन चार लोक चांगले सांगतात त्याकडे दुर्लक्ष करून परत एकेक प्रतिसाद रेटत राहायचे. किती ती फालटूगिरी. दुसऱ्या संस्थळावर अकलेचे वाभाडे काढूनही शहाणपण न येता इथे अक्कल पाजळायची असेल तर बाकी साऱ्या सुज्ञ मिपाकरांना माझी हात जोडून विनंती आहे. हे चर्चा किंवा संवाद करायच्या लायकीचे रसायन नाहीये. ह्याच्या नादी लागू नका. विषयाचा किंवा चर्चेचा बट्ट्याबोळ आपल्या हवेत बाण टाइप प्रतिसादाने करत राहायचा हाच एकमेव अजेंडा ह्या आयडींचा आहे. धन्यवाद
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Tue, 05/07/2019 - 12:51 नवीन
शांत गदाधारी भीम शांत
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 05/07/2019 - 14:42 नवीन
बुद्धिमान माणसांनी असे अशिक्षित लोकांसारखे रागावू नये. असतात माझ्या सारखी लोक बिचाऱ्या ना काहीच (न्यान) नसते . आपण जाणते समजावून सांगावे . राग आणि blood pressure ह्याचा जवळचा संबंध आहे असे एका तुमच्या सारख्या शाण्या लोकांचे तोंडून ऐकले होते . तेव्हा control Kara mi नाही लिहीत आता . पण तुम्हाला जे आवडते तेच वाचत जा न आवडणारे दिसले की डोळे बंद करून घ्यायला विसरू नका. डोळे बंद केले की न आवडणारी मते नष्ट होतात अशी एक अंधश्रद्धा आहे
  • Log in or register to post comments
स
स्वामि १ Wed, 05/08/2019 - 03:42 नवीन
राजेश१८८ बोलतात ते बरोबर आहे, मराठी माणसे कतृवात व हुशार आहेत म्हणूनच भारतात महाराष्ट्र सर्वात जास्त प्रगतीशील आहे. पण परप्रातीयाचे प्रचंड लोंढे आल्याने व प्रतेक राज्यातील आपापसात भाषेचे गुप्त वाटाघाटी व syndicate मुळे मराठी माणूस बाहेर फेकला गेला किंबहुना मराठी माणसाला दुर ठेववे गेले. काही वेळेस मराठी माणसाला एखादे विशिष्ट पक्ष देउन शांत बसउन ठेवले. त्यात मराठी माणसाने खूप मोठी चुक केली म्हणजे महाराष्ट्र व मुंबईच्या अर्थ व्यहवारात कघिच लक्ष घातले नाही. किंबहुना त्यांना हेतुपूर्वक बाहेर ठेवले. हे आज आपण बदलले पाहिजे. मुंबई व महाराष्ट्रा ची अर्थ (पैसा) व्यवस्था मराठी माणसाच्या हातात आणली पाहिजे.
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Tue, 05/07/2019 - 06:59 नवीन
कमीत कमी धाग्याच्या आशयाला तरी चिटकून रहा. हे बाकीच्या देशातील लोक तिकड़ूंन हाकलून दिल्यावर भारतात आल्यावर तुम्ही त्यांना आपल्या घरी भांडी घासायला ठेवणार आहात क़ाय? धागा चिंतनपर विषयावरून विनोदाकडे वळतो आहे. पण तुम्हाला क़ाय? दर दोन वाक्याआड प्रगति झाली पाहिजे एवढे टंकले की तुम्ही मराठी माणसावर फार मोठे उपकार केले आहेत असा आव आणत आहात. काहीतरी मुद्देसुद मांडा हो!
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Tue, 05/07/2019 - 07:00 नवीन
कमीत कमी धाग्याच्या आशयाला तरी चिटकून रहा. हे बाकीच्या देशातील लोक तिकड़ूंन हाकलून दिल्यावर भारतात आल्यावर तुम्ही त्यांना आपल्या घरी भांडी घासायला ठेवणार आहात क़ाय? धागा चिंतनपर विषयावरून विनोदाकडे वळतो आहे. पण तुम्हाला क़ाय? दर दोन वाक्याआड प्रगति झाली पाहिजे एवढे टंकले की तुम्ही मराठी माणसावर फार मोठे उपकार केले आहेत असा आव आणत आहात. काहीतरी मुद्देसुद मांडा हो!
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 05/07/2019 - 09:07 नवीन
स्थलांतर होण्याची मुख्य ढोबळ कारणांचा आपण विचार केला तर 1) उत्तम शिक्षणासाठी जे आपल्या प्रदेशात उपलब्ध नसते किंवा आपल्याच प्रदेशात संधी मिळत नाही २)लग्न झाल्या मुळे स्त्रियांचे स्थलांतर( सुधारित राज्यात राहणारा नवरा हा हट्ट हे उप कारण) ३) शिक्षित लोकांना त्यांच्या शिक्षणाला पूरक नोकऱ्या chya सुविधा नसल्या मुळे दुसऱ्या प्रदेशात स्थलांतर करावे लागते. ४) कामगार आणि कष्ट करणारा वर्ग हा त्यांचा कष्टाला जास्त भाव जिथे मिळतो त्या प्रदेशात स्थलांतर करतात ही काही ठराविक करणे झाली. ज्या प्रदेशात ही लोक जातात त्या प्रदेशाला आपण प्रगत प्रदेश म्हणुया जिथे सर्व प्रकारच्या लोकांची प्राथमिक गरजा भागण्या ची क्षमता असते. आणि प्रगत प्रदेशाला आपली मनुष्य शक्तीची गरज भागवण्यासाठी खूप अप्रगत प्रदेशांचा लोकांचा समज असतो पण अप्रगत प्रदेशातील लोकांना प्रगत प्रदेशमध्ये जाणे हा एकमेव पर्याय असतो. त्या मुळे आपण ज्या भागात जातो आणि आपली स्वप्न पूर्ण करतो तो प्रदेश आपल्या मुळे प्रगत झालंय ही भावना अत्यंत चुकीची आहे हे माझे स्पष्ट मत आहे. पण काही विचारवंत ,media migration चे समर्थन करताना अशा स्थलांतरित लोकांच्या मनात अशी. भावना निर्माण करतात की. तुम्ही इथे आलात म्हणून हा प्रदेश प्रगत झाला .ही फक्त भावना चेत्वण्याची एक dhurth खेळी असते. त्यामुळं अप्रगत प्रदेशातील लोक आपल्या प्रदेशात काहीच सुविधा नाहीत ही गोष्ट विसरून जातात .त्या मिळाव्या म्हणून आंदोलन करणे, तशी मागणी लावून धरणे हे सर्व करण्या साठी परावृत्त होत नाहीत .तशी भावनाच त्यांच्या मनात निर्माण होवू नये म्हणून स्थलांतर ह्या शब्दाला सोन्याचा मुलामा चढवला जातो . ह्यातून दोन प्रकारचं नुकसान होते एकतर अविकसित प्रदेश अविकसित च राहतो.आणि पोट पाण्यासाठी स्थलांतर हे निरंतर चालू राहते. दुसरे नुकसान हे होते काही ठराविक प्रदेश हा आर्थिक क्षेत्र म्हणून विकसित होतो आणि अर्धिक नाड्या ह्या अश्या प्रगत प्रदेशकडेच राहतात आणि बाकी प्रदेशावर अन्याय ,अत्याचार होण्याची शक्यता वाढते. अमेरिका ही अशी अर्थ क्षेत्र एकवटलेला देश आहे ती कोणत्याही अप्रगत देशा वर आर्थिक बंदी खालून हुकूमत गाजवतो ही उदाहरण सर्वांना माहीतच असेल त्या मुळे गरज असेल तर स्थलांतर करावच लागते पण जिथून हे होते त्या प्रदेशाचा विकास होणे तशी मागणी होणे खूप गरजेचं असते पण जेव्हा स्थलांतर हे लजा spad नसून गर्व करण्या सारखे हा विचारच आर्थिक विषमता वाढवत आहेत ह्याची जाणीव राहत नाही
  • Log in or register to post comments
स
स्वामि १ Tue, 05/07/2019 - 13:22 नवीन
आज जगभरात स्थलांतराला स्थानिकांनकडून विरोध होत आहे. आपण आत्ता केवळ महाराष्ट्रातीलच विचार करूया. आज मराठी भाषा व संस्कृती संपण्याच्या मार्गावर आहे व त्याला एकच कारण आहे ते म्हणजे प्रचंड प्रमाणात परप्रातीयाचे रोज होणारे स्तलानतर. राजेश११८ नीं योग्यच सांगितले मराठी माणूस हुशार व कतृवात आहे. १९८० साला पासून मी मुंबईत बांधकाम व्यवसायात आहे. त्या काळात इमारती च्या कारागीर मध्ये कोकणातून सुतार येत होते. नांदेड मधून गवंडी व कामगार आमच्या कडे होते व ते आळशी किंवा कामचुकार करणारे मुळीच नव्हते. नंतर Up हुन माणसे स्थलांतरित होउ लागली व ती खूप कमी पगारात काम करु लागले व इथेच मराठी माणसासाठी कुचंबणा झाली व तो आळशी व कामचोर ठरला गेला.
  • Log in or register to post comments
फ
फुटूवाला Tue, 05/07/2019 - 16:28 नवीन
ते राजेशभाईच्या आयडीत दोन एक्के नाहीत दोन अष्ठे हैती. बाकी चालुद्या.
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Tue, 05/07/2019 - 20:50 नवीन
ते स्वामि बिचारे मराठी माणसाच्या उद्धारासाठी इतके तळमळीने लिहितात आणि तुम्ही त्यांच्या क्षुल्लक चुका शोधता. अशाने मराठी आणि महाराष्ट्र राज्याचा विकास कसा होणार?
  • Log in or register to post comments
फ
फुटूवाला Tue, 05/07/2019 - 21:06 नवीन
:)
  • Log in or register to post comments
न
नाखु Wed, 05/08/2019 - 04:54 नवीन
अठ्ठी लावलेल्या तरी आम्हाला. ईस्पिक सत्त्या मिळण्यापासून रोखू शकणार नाहीत.मराठी मानुस जागा झाला आहे फक्त कुठे जायचं ते ठरलं नाही,एकदा ठरलं की बघाच तुम्ही. किलवर तिर्री नाखु
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Wed, 05/08/2019 - 09:07 नवीन
ते घोडा चतुर- घोडा चतुर सारखं आहेत. आता आयडी बदलून लिवायचं म्हणजे तेव्हढा गोंधळ चालतुया
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 05/08/2019 - 10:11 नवीन
आज इथे ३३% लोक आपल्या राज्यातील नाहीत देश भर चे भिकारी आहेत तरी मराठी संकेस्थळांवर असणाऱ्या हुशार लोकांना ही समस्या आहे ह्याची पुसटशी पण जाणीव नाही . शिवसेना, मनसे ह्यांची प्रतिक्रिया काय असते ह्याची जाणीव असल्या मुळे 33% गैर मराठी माणसा सारखे वागत आहेत . लढणाऱ्या मराठी लोकांनी अंग काडून घेतले की हे कथित देशप्रेमी ची देशाचा कायदा सुधा रक्षण करू शकणार नाही
  • Log in or register to post comments
फ
फुटूवाला Wed, 05/08/2019 - 13:30 नवीन
आज महारष्ट्रात जी पाणि टचांई आहे याला सुद्धा हे ३३% परंपरांतीय लॉक्स कार्निबुत आहेंत...
  • Log in or register to post comments
स
स्वामि १ Wed, 05/08/2019 - 13:40 नवीन
आपले राजकीय पुढारी परप्रातीया बद्दल काहीच बोलत नाही, त्याची स्वताची पोट भरून झाली की शांत राहतात किंबहुना राष्ट्रीय पक्षा मध्ये मान डोकावून गप्प बसणारे नेते निवडले जातात व ह्या कचखाउ नेत्यांनी मराठी व महाराष्ट्रा चे नुकसान झाले आहे. सर्वच नेत महाराष्ट्र सुजलाम सुफलाम असल्याचे भासवतात. आज मराठी माणूस शहरा पासुन ते गावापर्यंत जमीनी विकत आहेत. परप्रातीय वेवसाय करतो पैसे कमावतो व मराठी काहीच प्रगती करत नाही. दुदैवाने मराठी माणसानेही प्रगती करावी अशी तरतूद किंवा प्रयत्न आपल्या महाराष्ट्राच्या कायदा व घटणेत नाही आहे. हे आपले दुदैवं आहे.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Wed, 05/08/2019 - 13:50 नवीन
चला, ह्या दुर्दैवासोबतच धाग्याची शंभरी भरली आहे असे मी याटिकानी जाहिर करतो, शंभर प्रतिसाद येउनही दलिंदरी हटली नसल्याने नवीन मुद्द्यानिशी स्वामी अजुन एकांदा धागा काढतील त्याटिकानी मी राजेशरावासहित त्यांचे हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद, जयहिंद जयमहाराश्ट्र जय मराठी. अरे ह्या महाराष्ट्राचे दुश्मन कोन? जातीय आनि प्रप्रांतीय हेच दोन.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा