Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

मतदान केलं काय ?

ध
धर्मराजमुटके
Tue, 04/30/2019 - 17:18
🗣 1 प्रतिसाद
नमस्कार ! काल मुंबई, ठाणे येथील मतदान पार पडले. मी ठाणे येथे राहतो मात्र मतदार कार्ड चांदिवली (उत्तर मध्य मुंबई ) मतदान क्षेत्रात असल्यामुळे त्या विभागात जाऊन मतदान करावे लागते. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा त्रास फारच वाढल्यामुळे सकाळी लवकर उठून उन्हाला चकवून मतदान पार पाडायचे असा निश्चय केला मात्र नेहमीप्रमाणे उशीरच झाला. केंद्रावर पोहोचलो तर वेगवेगळ्या पक्षांचे बुथ लागले होते. निवडणूक याद्या तपासून मतदान करण्यासाठीची चिट्ठी बनवायला गेलो तर तिथले कार्यकर्ते ऑनलाईन यादी चेक करुन तुमचे नाव यादीत नाही असे सांगू लागले. एकंदरीत सगळ्याच बुथ वर अनुभवी कार्यकर्त्यांची वानवा जाणवत होती. शेवटी स्वतःच छापील मतदार यादीतून नाव शोधून काढले. यावेळी मोबाईल जवळ बाळगण्यास बंदी असल्यामुळे बायको, मुलगा आणि माझी चुकामुक झाली. एकमेकांना शोधण्यात अर्धा तास गेला. मोबाईल नव्हता तेव्हा माणसे एकमेकांना कशी शोधत होती ते आठवून हसू आले. आमच्या विभागात प्रिया दत्त आणि पुनम महाजन हे दोन तुल्यबळ आणि बाकी १४-१६ लहान मोठे उमेदवार उभे होते. यावेळेस व्हीव्हीपॅट चा प्रथमच उपयोग केला. मतदान यंत्रावर बटन दाबून बीप आवाज येणे आणी व्हीव्हीपॅट मधे आपण मतदान केलेल्या उमेदवाराचे नाव, निशाणी दिसेपर्यंत साधारण १०-१५ सेकंदाचा कालावधी लागत होता. त्यामुळे यावेळी मतदान करण्यास लागणारा कालावधी वाढला होता. मात्र आपले मत आपल्या आवडीच्या उमेदवारालाच गेले आहे याची खात्री आणि त्याचा पुरावा पाहणे हा एक आनंददायक अनुभव होता. मात्र तरीही काही लोक यावर ही शंका घेतीलच म्हणा ! आजचे वर्तमानपत्र वाचल्यावर मुंबईत सगळ्याच ठिकाणी २०१४ पेक्षा २-३ टक्के जास्त मतदान झाल्याचे समजले. एकंदरीत निवडणूक प्रक्रिया चालवणार्‍या यंत्रणेने, विविध पक्षांनी केलेल्या आवाहनाचा चांगला परीणाम जाणवला. मात्र कल्याण आणी पुणे इथे कमी मतदान झाल्याच्या बातम्यांनी थोडासा भ्रमनिरास झाला. ठाण्यात प्रशांत कॉर्नर ने मतदानाचा पुरावा दाखविल्यास १ ग्लास मोफत कैरी पन्हे आणि ५० रु. ची पाणीपुरी ३० रु. मधे मिळेल अशी आकर्षक सवलत दिली होती पण दुर्दैवाने त्याचा लाभ घेता आला नाही. योगायोगानेच मतदानाच्या दिवशी आमच्या विवाहाचा वर्धापन दिन होता. त्यामुळे पत्नीने सहकुटूंब सेल्फी घेऊन व्हाटसअप वर प्रकाशित करुन अभिनंदन आणि आशिर्वादपर शुभेच्छांचा आनंद लुटला ! एकंदरीत कालचा दिवस उत्साहाने साजरा झाला. आम्ही मतदान करुन आपले कर्तव्य बजावले ! आपणही मतदान केलेच असणार ! मतदान केल्याबद्दल आपले अभिनंदन ! नसेल केले तर पुढच्या वेळी नक्की करा ! धन्यवाद !

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1525 views

🗣 चर्चा (1)
M
mayu4u Wed, 05/01/2019 - 10:03 नवीन
आणि विवाहवर्षपूर्तीच्या अनेकोत्तम शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा