Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

तळवे

श — शिव कन्या, Sat, 04/13/2019 - 20:26
हेच ते जीवघेणे हळवे तळवे ज्यावर तू तुझे काळीज काढून ठेवलेस!! शक्य वा हिंमत असती तर हे तळवे बाजूला काढून फोटोत घडी घालून पुरून टाकले असते... ना ही असोशी असली असती... ना अंधारात डोळे खुपसून न उजळणार्या पूर्वेकडे पहात राहिले असते.... ना रक्तातून तुझे भिरभिरणे ऐकत राहिले असते.... नाहीतर, माझ्या दोन्ही तळव्यांना पंख व्हायची शक्ती घटकाभर देता, तर विधात्याचे काय जाते? -शिवकन्या

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 10650 views

💬 प्रतिसाद
प
प्रचेतस Sun, 04/14/2019 - 03:53 नवीन
जबरदस्त
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 04/14/2019 - 07:48 नवीन
सुंदर !
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sun, 04/14/2019 - 09:19 नवीन
आरं बाब्बो, लईच शरिराची मोडतोड चालू हाये. ते अमुर्त चित्रेकारी का काय असते तशी कविता दिवसेंदिवस होते आहे. म्हणजे एक डोळा दोन नाक. मेंदू गुढग्यात. हात पायच्या जागी. गझल वाचून कसे गरगरायला होते तसे वाटते आहे. नकोच त्या वाटेने जाणे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 04/14/2019 - 10:30 नवीन
लिहिते राहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 04/14/2019 - 12:57 नवीन
हे तळवे बाजूला काढून फोटोत घडी घालून पुरून टाकले असते..
नाहि_समजले.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Sun, 04/14/2019 - 13:31 नवीन
काहीच नाही समजले.
  • Log in or register to post comments
स
सोन्या बागलाणकर Mon, 04/15/2019 - 00:42 नवीन
हे एक विरहगीत आहे. कवयित्री म्हणते आहे की शक्य असते तर तिने आपल्या तळव्यांना एखाद्या फोटोप्रमाणे (किंवा आठवणीप्रमाणे) फोटोफ्रेममध्ये फोल्ड करून दूर ठेवून दिले असते ज्याने की तिला तिच्या प्रियकराची आठवण येणार नाही. असं करता आलं असतं तर सगळे प्रश्नच सुटले असते. शेवटी ती देवाला आर्ततेने म्हणते की माझ्या हातांना निदान पंख तरी द्यायचे म्हणजे मी माझ्या सख्याकडे उडून गेले असते (बघा: पंख होते तो उड आती रे)
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Mon, 04/15/2019 - 08:54 नवीन
तिच्या तळव्यांचा अन प्रियकराचा काय संबंध ? हृदयाचा अन प्रियकराचा समजू शकतो.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 04/15/2019 - 09:19 नवीन
पंख मिळालेले तळवे, उडत उडत जाऊन, दूर गेलेल्या प्रियकराच्या गालांवर जोरात... असे काहीसे असावे. ;) :) (हघ्याहेवेसांन)
  • Log in or register to post comments
स
सोन्या बागलाणकर Mon, 04/15/2019 - 09:26 नवीन
हाहाहा... गालावर तळवे उमटले असतील.
  • Log in or register to post comments
स
सोन्या बागलाणकर Mon, 04/15/2019 - 09:24 नवीन
पैलवान साहेब, याचे उत्तर कवितेच्याच पहिल्या वाक्यात आहे.
हेच ते जीवघेणे हळवे तळवे ज्यावर तू तुझे काळीज काढून ठेवलेस!!
बोले तो त्याने तिच्या हातावर पेनने हृदय वगैरे काढले होते. (कृ ह घेणे)
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Mon, 04/15/2019 - 08:55 नवीन
हे असलं हुच्च काव्य पार डोक्याच्या वीतभर वरून जातं!
  • Log in or register to post comments
स
सिक्रेटसुपरस्टार Mon, 04/15/2019 - 09:31 नवीन
आवडलं मुक्तक.
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Mon, 04/15/2019 - 10:14 नवीन
हुच्च् अतिहुचक काव्याआरास इथे मांडिली तळवे गार पडले , चमकले काजवे तरीही काहीच नाही समजली गहन ग्रहण लागले ग्रहणात गहन काय होते ? छायेचा खेळ सारा डोक्याचे पार लागले
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Fri, 04/19/2019 - 02:59 नवीन
सगळ्यांचेच आभार.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Fri, 04/19/2019 - 09:00 नवीन
ते ठीके, पण अर्थ सांगा की!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा