Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

अश्वत्थ

अ — अन्या बुद्धे, Tue, 04/09/2019 - 08:57
अनंत पानांचा अश्वत्थवृक्ष सळसळतो आहे.. विशाल खोडावर अवकाशात घुसलेला खोड फांद्यांचा पसारा.. सृष्टीतून जीवनरस शोषून घेत, ऊन पाऊस झेलत त्याचा उत्सव सुरू आहे.. प्राचीन खोडावर जाड सालींच्या वळ्यामधून मुंगी किटकांच्या वसाहती फोफावल्या आहेत.. तरहतर्हेचे पक्षी तिथे येऊन 'हे माझं जग' असं म्हणतात गाणी गात पानांना ऐकवतात.. जरठ जाड पाने शांत समाधानी मनाने जीवनरसाचा शेवटला थेंब मिळेतो थांबतात.. हिरवेपणा टिकवून अन्न तयार करतात.. निवृत्त मनाने गळून जातात पिंपळाच्या मुळांचे अन्न होत मातीत मिसळतात.. लाल तजेलदार नाजूक पाने वाऱ्यावर हलतात, कुतूहलाने जगाकडे बघतात कुंभार माशी 4 पाने कातरते फेऱ्या मारत घेऊन जाते.. तिच्या पिल्लांसाठी घर बांधायचं काम उत्साहात सुरू असत.. सर्वत्र जीवनाचा उत्सव सुरू आहे! झाडाखाली पारावर.. काही माणसे बसली आहेत, एकटी, पेपर वाचत, वा तावातावाने वाद करत.. कुणी नोकरी नाही म्हणून चिंतेत, कुणी मित्राशी पैशावरून भांडलेला.. कुणाच्या सुरकूतलेल्या चेहऱ्यावर दुष्काळाचं सावट, मनात मुलीच्या लग्नाची काळजी.. सगळे जीवनोत्सवाच्या छायेत आहेत, तरी त्यापासून वंचित.. त्यांच्या जगण्यातला उत्सवाचा आनंद हरपलेला, फक्त कोरडा व्यवहार शिल्लक उरलेला.. -अनुप

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2131 views

💬 प्रतिसाद
प
पद्मावति Wed, 04/10/2019 - 13:34 नवीन
मुक्तक आवडले.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 04/10/2019 - 13:41 नवीन
अनंत पानांचा अश्वत्थवृक्ष सळसळतो आहे.. विशाल खोडावर अवकाशात घुसलेला खोड फांद्यांचा पसारा.. सृष्टीतून जीवनरस शोषून घेत, ऊन पाऊस झेलत त्याचा उत्सव सुरू आहे.. प्राचीन खोडावर जाड सालींच्या वळ्यामधून मुंगी किटकांच्या वसाहती फोफावल्या आहेत.. तरहतर्हेचे पक्षी तिथे येऊन 'हे माझं जग' असं म्हणतात गाणी गात पानांना ऐकवतात.. जरठ जाड पाने शांत समाधानी मनाने जीवनरसाचा शेवटला थेंब मिळेतो थांबतात.. हिरवेपणा टिकवून अन्न तयार करतात.. निवृत्त मनाने गळून जातात पिंपळाच्या मुळांचे अन्न होत मातीत मिसळतात.. लाल तजेलदार नाजूक पाने वाऱ्यावर हलतात, कुतूहलाने जगाकडे बघतात कुंभार माशी 4 पाने कातरते फेऱ्या मारत घेऊन जाते.. तिच्या पिल्लांसाठी घर बांधायचं काम उत्साहात सुरू असत.. सर्वत्र जीवनाचा उत्सव सुरू आहे!
सुंदर. डोळ्यांपुढे चित्र उभं राहिलं.
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Wed, 04/10/2019 - 15:06 नवीन
सुंदर झाली आहे ... आवडली पण शेवट जरा थोडा वेगळा हवा होता असे राहून राहून वाटतेय..
  • Log in or register to post comments
अ
अन्या बुद्धे गुरुवार, 04/11/2019 - 18:57 नवीन
सुचवा की.. किमान दिशा तरी..
  • Log in or register to post comments
अ
अन्या बुद्धे गुरुवार, 04/11/2019 - 19:01 नवीन
मुक्तक.. आवडला शब्द..
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Sun, 04/14/2019 - 18:13 नवीन
खूप सुंदर मुक्तक . अजून झाडांवर लिहलेल्या कविता येवू द्या .
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा