Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
भटकंती

रायरेश्वर - दुर्ग संवर्धन

व
व्लॉगर पाटील
गुरुवार, 04/04/2019 - 18:34
💬 16
नेहमी प्रमाणे एका नवीन गडाच्या मोहिमेसाठी बाहेर पडलो होतो, आजची माजी मोहीम होती ती "रायरेश्वर". रायरेश्वर हे सह्याद्री डोंगररांगामधील एक ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळ आहे. या पठारा वरील रायरेश्वर मंदिराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. हे मंदिर प्राचीन आहे. हिंदवी स्वराज स्थापनेचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या १६व्या वर्षी म्हणजेच २७ एप्रिल १६४५ ला येथेच स्वराज्याची शपथ घेतली होती. त्यामुळे या मंदिराला मराठा रियासतीच्या इतिहासात याला खूप पवित्र स्थान आहे. गडावर फिरत असताना तिथे वरती जाण्यासाठी लोखंडी जिना, मंदिरा पर्यन्त जाण्यासाठी tiles चा रस्ता, गडावर राहणाऱ्या लोकांसाठी पिण्याचे पाण्याचे बांधीव टाके, मंदिराच्या आवारातील स्वछता विशेष उल्लेखनीय होती. हे सगळं कोणी केलं होतं हे जाणून घेत असतानाच हे महान निस्वार्थ शिवकार्य करणाऱ्या दुर्गवीरयांची योगायोगाने भेटच झाली आणि जाणून घेतली त्यांच्या कडूनच त्यांच्या कार्याची माहिती . तुम्ही ही नक्की पहा दुर्ग संवर्धन साठी झटणाऱ्या लोकांच्या कार्याची माहिती आपल्या "youtube channel स्पॉटवर". आणि विडिओ आवडल्यास नक्कीच like share आणि Subscribe करायला विसरू नका .. रायरेश्वर - दुर्ग संवर्धन https://youtu.be/Xcw7MEGbaX4

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 11034 views

💬 प्रतिसाद
क
कपिलमुनी गुरुवार, 04/04/2019 - 18:45 नवीन
दुर्ग संवर्धन करणाऱ्या लोकांचे कार्य कौतुकास्पद आहे. आमच्या पर्यंत पोचवल्या बद्दल धन्यवाद ! मराठी vlogging बघायला छान वाटते. अजून पोस्ट येऊ द्या
  • Log in or register to post comments
व
व्लॉगर पाटील Fri, 04/05/2019 - 08:43 नवीन
पुढच्या पोस्ट लवकरच share करू
  • Log in or register to post comments
म
मनो Fri, 04/05/2019 - 05:53 नवीन
शपथेचा प्रसंग काल्पनिक आहे, त्याला पुराव्याचा आधार नाही. पण त्यामुळे महाराजांच्या कर्तुत्वाला आणि मोठेपणाला बाधा येत नाही. वरती केलेले काम नक्कीच कौतुकास्पद आहे!
  • Log in or register to post comments
व
व्लॉगर पाटील Fri, 04/05/2019 - 08:46 नवीन
दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Tue, 04/09/2019 - 13:44 नवीन
दुर्गसंवर्धन वाली भारी टीम आहे. पावसाळ्यात रायरेश्वरला गेलो होतो तेव्हा त्यांनी केलेल्या सोयींचा खूप उपयोग झाला होता. लोखंडी जिना चढत असताना तर त्यांना मनोमन धन्यवाद दिले होते आम्ही. आणि व्हिडीओ तर मस्तच आहे. धन्यवाद, व्लॉगर पाटील !
  • Log in or register to post comments
व
व्लॉगर पाटील Sat, 04/13/2019 - 18:59 नवीन
हो खूप चांगला काम करतात
  • Log in or register to post comments
स
सिक्रेटसुपरस्टार Wed, 04/17/2019 - 08:59 नवीन
उत्तम प्रकल्प!
  • Log in or register to post comments
भ
भीमराव Sat, 06/08/2019 - 11:21 नवीन
मधे महिन्यांपूर्वी सातारा येथे पहिले दुर्गसंमेलन पार पडले. गडकिल्ले संवर्धनाकरता कार्य करणाऱ्या कित्येक संस्था त्या ठिकाणी एकत्र आल्या होत्या. एकेकट्या काम करणाऱ्या संस्थांनी आता संयुक्त पणे चळवळ उभी केली आहे. यातुन गडकोट संवर्धन, वृक्षारोपण इत्यादी कामे श्रमदानातून सुरू आहेत.
  • Log in or register to post comments
व
व्लॉगर पाटील Sun, 06/23/2019 - 17:28 नवीन
अशा काही उपक्रमाची आपल्यास माहिती असेल तर नक्की कळवावे
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Sat, 06/08/2019 - 11:52 नवीन
खुप सुंदर व्हीडीओ. उत्तम उपक्रम.
  • Log in or register to post comments
व
व्लॉगर पाटील Sun, 06/23/2019 - 17:27 नवीन
आमचे पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की subscribe करा Youtube चॅनेल स्पॉटवर
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 06/09/2019 - 06:26 नवीन
मस्त ! एक सुचना... जमल्यास ऑडियो मध्ये सुधारणा करता आल्यास पहा कारण माहिती देताना आवाज कमी आहे आणि ऑडियो ट्रॅक मात्र मोठ्या आवाजात आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- वे तू लौंग, वे मैं लाची तेरे पीछे आ गवाची... :- Laung Laachi
  • Log in or register to post comments
व
व्लॉगर पाटील Sun, 06/23/2019 - 17:26 नवीन
आमचे नवीन विडिओ पहा, त्या मध्ये फरक जाणवेल नक्कीच !! दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद Youtube चॅनेल Spotvar ला नक्की subscribe करा
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 06/09/2019 - 19:10 नवीन
रायरेश्वर नक्की कुठे आहे उल्लेख नाही कसे जायचे उल्लेख उल्लेख नाही लेखकाने काय सांगायचे आहे ते पाहिजे ठरवावे
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 06/23/2019 - 17:41 नवीन
हा गड पूर्णतः दुर्लक्ष्य झालेला आहे. एक मंदिर आहे पत्र्याच्या छताचे . मूळ मंदिर बंद च असते . विरान पठार आहे छत्रपतींचा फायदा घेणारे इथे येत नाहीत . त्या विराण पठारावर वृक्ष रोपण करायची गरज आहे .लोकांना बसण्यासाठी जागा हवी . पिण्याच्या पाण्यासाठी टाकी आहे अत्यंत दुर्लक्ष्य झालेली . प्रदूषित पाणी आहे . गडावर धरणातून पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे . छत्रपतींचे नाव घेण्याचं आपल्याला अधिकार नाही असेच सर्व किल्ल्यांची अवस्था बघून वाटते
  • Log in or register to post comments
व
विनोदपुनेकर गुरुवार, 07/25/2019 - 07:00 नवीन
फक्त गडप्रेमी साठीच नाही तर तिथे वस्ती करून राहणारे जंगम (पुजारी) लोक जे मूळचे कर्नाटक मधील पण थोरल्या महाराजांनी त्यांना या शिवमंदिरासाठी नेमणूक देऊन त्यांची तिथे राहणायची सोय केली निवडणूक काळात तिथे एक निवडणूक केंद्र हि असते या संगळ्यांसाठी या सर्व कार्याचा फार मोठा फायदा होतो आहे
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 8 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 8 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 8 hours ago
  • सुंदर !!
    1 day 8 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 8 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा