दाराआडची मुलगी
एक मुलगी दाराआडून बघते आहे बाहेर
किती बाहेर?
स्वत:च्या बाहेर, समुद्राच्या पार
जिथे एक मुलगा बसला आहे स्तब्ध....
करत असेल का तो ही तिचा विचार?
जात असेल का तो ही
स्वत:च्या बाहेर, समुद्राच्या पलीकडे?
मुलगी दाराआडून बाहेर येऊ शकत नाही...
मग ती तिचे संपूर्ण डोळे पाठवते,
ते डोळे डोळ्यात घेऊन
मुलगा शांतपणे जागा राहतो....
डोळे हरवलेली मुलगी
घर नसलेल्या दाराआडून बघत राहते...
बघतच राहते....
-शिवकन्या
💬 प्रतिसाद
त
तुषार काळभोर
Wed, 04/03/2019 - 19:26
नवीन
काहीतरी गहन अर्थ आहे.
- Log in or register to post comments
श
शिव कन्या
गुरुवार, 04/04/2019 - 05:09
नवीन
धन्यवाद. गहन अर्थ लावू पाहताय....
- Log in or register to post comments
स
सोन्या बागलाणकर
गुरुवार, 04/04/2019 - 01:12
नवीन
गूढ गहन! एखाद्या कोड्यासारखी कविता.
आवडली.
- Log in or register to post comments
श
शिव कन्या
गुरुवार, 04/04/2019 - 05:10
नवीन
सगळे डोळे तसे कोडेच .... धन्यवाद.
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 04/04/2019 - 06:18
नवीन
ही कविता त्या चर्चिलचा सिगार आणि व्हिस्की बॉटल च्या कोड्या सारखी आहे.
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
अ
अन्या बुद्धे
गुरुवार, 04/04/2019 - 07:17
नवीन
छान!
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
गुरुवार, 04/04/2019 - 08:22
नवीन
माझ्याच डोळ्यांनी वाचली कविता
भिंतीला दरवाजा नव्हता
पाठवलेल्या डोळ्यांनी वाचली कविता
दरवाज्याला भिंती नव्हत्या.
.
मस्त
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
गुरुवार, 04/04/2019 - 08:57
नवीन
आरं ते काय कमी गहन आहे का... तू अजून क्रिप्टीक केलंस!
- Log in or register to post comments
श
शिव कन्या
गुरुवार, 04/04/2019 - 17:58
नवीन
जाणत्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
- Log in or register to post comments
त
तिमा
गुरुवार, 04/04/2019 - 10:11
नवीन
मी डोलेकर, डोलेकर, डोलेकर दर्याचा राजा!
- Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे
गुरुवार, 04/04/2019 - 12:07
नवीन
मुलगी कुठे बसलेय? कोकणात? मुंबईत?
मुलगा कुठे बसलाय? दुबईत? साउथ आफ्रिकेत?मादागास्कर मध्ये?
मुलगी दाराबाहेर का येउ शकत नाही? दाराला घर नाही म्हणजे काय? डोळे पाठविले म्हणजे काय?
निस्ता राडाsssss
- Log in or register to post comments
ग
गवि
गुरुवार, 04/04/2019 - 12:28
नवीन
न समजलेल्या प्रामाणिकांनीनी इकडे रांग लावावी.
अर्थाबद्दल काही हताश अंदाज:
-नेत्रदान श्रेष्ठ दान
-स्त्रीवरील बंधने
-क्रूझ शिप कंपनी
-कोडाईकॅनालचे भूछत्र
-कॅनाबीज कायदेशीर करा आंदोलन
-कोंकणात समुद्रकिनाऱ्यावर आपले स्वप्नातील टुमदार घर (स्वतंत्र सातबारा व N/A प्लॉट्स)
की आणखी काही?
- Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे
गुरुवार, 04/04/2019 - 12:35
नवीन
नाणार प्रकल्पाला विरोध
कोकणात किनार्यावर शॅक्स लावायला परवानगी
सी आर झेड कायद्याचे उल्लंघन
- Log in or register to post comments
ग
गवि
गुरुवार, 04/04/2019 - 12:37
नवीन
अय्यो रामा.
खरंच की. या बाजू कशा निसटल्या .. ?
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
गुरुवार, 04/04/2019 - 22:05
नवीन
गवि,
उगाच गुंतागुंत वाढत्येय. ही एकदम सोप्पी कविता आहे. सार्वजनिक संडासात बसून मोबाईलवर च्याटिंग केलेलं दिसतंय.
आ.न.,
-गा.पै.
तळटीप : मुलगा मात्र उघड्यावर बसलाय.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 04/04/2019 - 12:47
नवीन
>>>कोंकणात समुद्रकिनाऱ्यावर आपले...
मलाही असंच वाटतं. समुद्रकिना-यावर वाळूत एक खोपा असावा. तो असावा, मग सोबत ''हम तूम बने एक दूजे के लीये'' गाणं असावं. किराणा आणायला तो गेलेला असल्यामुळे मुलगी बंद दाराआड़ून त्याची वाट पाहते, खूप सुंदर कल्पना आहे.
-दिलीप बिरुटे
(बंद दाराआड तांदूळ निसायला घेतलेला)
- Log in or register to post comments
श
शिव कन्या
गुरुवार, 04/04/2019 - 17:59
नवीन
:)))
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 04/04/2019 - 13:11
नवीन
क्रिप्टिक.
कोडं सुटता सुटता परत नव्या कोड्यात अडकतंच जावं अशी.
- Log in or register to post comments
ख
खिलजि
गुरुवार, 04/04/2019 - 13:30
नवीन
गहन वाटतेय , शक्य झाल्यास आपल्याला असलेला अर्थ व्यनि केला तर फार उपकार होतील .. आणि बाकीची इडंबने बघितली त्यामुळे माझेही हात जरा शिवशिवू लागले आहेत .. आधीच माफी मागून ठेवतो .. धन्यवाद
- Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज
गुरुवार, 04/04/2019 - 16:07
नवीन
- Log in or register to post comments
श
शिव कन्या
गुरुवार, 04/04/2019 - 18:05
नवीन
सर्व रसिक वाचकांचे आभार.
अर्थ उकलीचे अनेक प्रयत्न चालू .... चालू द्यात...
सर्व विडंबनकारांचे आभार. कविता गहन असली तरी पोहोचली, छान वाटले.
- Log in or register to post comments
श
शिव कन्या
गुरुवार, 04/04/2019 - 18:05
नवीन
सर्व रसिक वाचकांचे आभार.
अर्थ उकलीचे अनेक प्रयत्न चालू .... चालू द्यात...
सर्व विडंबनकारांचे आभार. कविता गहन असली तरी पोहोचली, छान वाटले.
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
गुरुवार, 04/04/2019 - 21:01
नवीन
सर्व विडंबने वाचली सर्वच्या सर्व आवडली.
कच्चा माल जितका चोख तितकी त्याची उत्पादनं दर्जेदार हेच यावरून सिद्ध होतं.
Sandy
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
गुरुवार, 04/11/2019 - 13:51
नवीन
कच्चा माल जितका चोख तितकी त्याची उत्पादनं दर्जेदार हेच यावरून सिद्ध होतं.
+१, चांदणे संदीप
अनेकांना आपाअपल्या कल्पना मांडण्यासा ठी स्फुर्ती देणारी प्रेरक कविता !
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
Sat, 04/06/2019 - 23:02
नवीन
काही गहन अर्थ असावा, असे वाटायला लावणारी कविता आवडली.
अनेकांना या कवितेने प्रेरणा देऊन काहीतरी निर्मिती करायला लावली, हे विशेष.
कवियत्रीने कवितेचा एक सुंदर घाट इथे निर्मिला आहे, त्या घाटावर येऊन काव्यगंगेत डुबकी मारण्यात एक आगळीच मौज आहे. 'शिव कन्या' यांना अनेक धन्यवाद.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Sun, 04/07/2019 - 06:19
नवीन
शिवकन्या, सुरेख लिहिता तुम्ही.
- Log in or register to post comments
श
शिव कन्या
Fri, 04/19/2019 - 03:01
नवीन
सर्व रसिक वाचकांचे आभार.
भलेबुरे विडंबन पाडणार्यांचेही आभार.
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Fri, 04/19/2019 - 09:00
नवीन
ते ठीके, पण अर्थ सांगा की!
- Log in or register to post comments