कोळीगीत: शिडाशिडात भरारे वारा
आता देशावरून आपण कोकणात जावूया अन एक कोळीगीत ऐकूया.
शिडाशिडात भरारे वारा
होड्या निघाल्या किनारा || धृ ||
फिरवा सुकाणू सारी जाली भरली
मांदेली नगली करली तारली गावली
गोळा करुन घोळ चिंबोरी अन पाला
होड्या निघाल्या किनारा ||१||
घेवून दर्याची दौलत हाती
विकून होईल कमाई मोठी
पडो शिल्लक पैसा थोरा बरा
होड्या निघाल्या किनारा ||२||
उभी आसलं माझी बाय पाहत वाट
"कवा येईल धनी माझा परतून आज"
तिच्या कालजीचा आज होईल उतारा
होड्या निघाल्या किनारा ||३||
शिडाशिडात भरारे वारा
होड्या निघाल्या किनारा || धृ ||
- पाषाणभेद कोळी
०३/०४/२०१९
💬 प्रतिसाद
स
स्वोन्नती
Wed, 04/03/2019 - 18:35
नवीन
मस्त.
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 04/04/2019 - 05:59
नवीन
अरे वा मस्त जमली आहे.
छान चालीत म्हणता येते आहे
पैजारबुवा,
- Log in or register to post comments