Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

कोरडं रान

प — पाषाणभेद, Wed, 04/03/2019 - 00:33
किती भाग्यवान तुह्या पैंजणाचं घुंगरू ग मी आसा दुर अन ते तुह्यापाशी राहतं ग नको निघू भर दुपारचं उन्हातानाची ग कमरेवर जरी पाणी तरी डोईवरी आग ग चालतांना चाल तुही लचकेदार ग रानामधी धावती हारीणी नाजूक ग सगळीकडं आसती काटेरी बाभळी ग तु रानामधी उगवलं गुलाबाचं फूल ग किती वाटतं दोन शब्द तुह्याशी बोलू ग पन बोलतांना वठी नाही काही येत ग तुह्या नजरंला जवा नजर माझी भिडती ग ढगातली वीज पडं लक्कन काळजात ग एकडाव तरी तु माह्यासंग मनातलं बोल ग तुझ्या बोलानं फुटलं मह्या काळजाचं डेकूळ ग किती सांगू माझी रामकथा माह्याचं तोंडून ग सारीकडं पावसाचं पानी पन माह्य रानं कोरडं ग - पाषाणभेद ३/४/२०१९

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3794 views

💬 प्रतिसाद
N
Nitin Palkar Wed, 04/03/2019 - 03:21 नवीन
आवडली....
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 04/03/2019 - 06:19 नवीन
तुमच्या कोरड्या रानात लवकरच मुळा मुठा उजव्या कालव्याचे पाणी पोचावे आणि तुमची होणारी ही काहिली कमी व्हावी ही सदिच्छा. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
म
मनिष Wed, 04/03/2019 - 14:27 नवीन
आवडली!
किती भाग्यवान तुह्या पैंजणाचं घुंगरू ग मी आसा दुर अन ते तुह्यापाशी राहतं ग
https://www.youtube.com/watch?v=-yK6sb024D0
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Wed, 04/03/2019 - 14:56 नवीन
जमलीये!
  • Log in or register to post comments
स
स्वोन्नती Wed, 04/03/2019 - 19:11 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 04/03/2019 - 20:39 नवीन
तुझ्या बोलानं फुटलं मह्या काळजाचं ढेकूळ ग ढेकूळ = दुरूस्ती
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा