Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

भूतबाधा की मनाचे खेळ?

ग
गावठी फिलॉसॉफर
गुरुवार, 03/28/2019 - 05:24
🗣 17 प्रतिसाद
मी चकवा, भूत बित यावर शक्यतो विश्वास ठेवत नाही. त्या गोष्टींकडे चाणाक्ष पणे पाहिलं तर सर्व काही लक्षात येते. ही घटना साधारण 5 6 दिवसांपूर्वी ची आहे. म्हणजेच होळीच्या तिसऱ्या दिवसाची. मामाचे गाव आमच्या गावापासून खूपच जवळ. धरणाच्या वरच्या बाजूला मामाचे गाव तर माझे गाव धरणाच्या खालच्या साईडला. मामाची छोटी मुलगी 10वीला आहे. तिचा शेवटचा पेपर संपला म्हणून ती आमच्याकडे आली होती. मला ही मामाला भेटायचे होत म्हणून मी तिला थोडं थांबवलं आणि साधारण रात्री साडेसात दरम्यान तिला घेऊन निघालो. मामाच गाव आडवळणी आहे. जायला यायला डोंगरा साईतून रिंग रोडन जावं लागतं. जाताना नदी साईटला त्यांच्याच गावचा स्मशानभूमी आहे. गर्द झाडी आणि उतार त्यामुळे तिथे एकट्या अर्ध्याला चालायला भीती वाटते. माझी बाईक आता त्या ठिकाणी आली. आणि बरोबर पुलावरच(स्मशानभूमी साईटला) धक्के खाल्ल्यागत वाटायला लागली. मामाची मुलगी जाम घाबरली. मी थोडा पुढे गेल्यावर थांबलो. तेव्हा मला समजलं गाडीला रिजर्व लागला होता. गाडीतील पेट्रोल संपलं किंवा रिजर्व लागला तर गाडी असच करती. पण मी थांबल्यामुळे आणि अफवांमुळे ती खूप भ्यायली आणि रडायला लागली. तिला समजवलं आणि पुढे निघालो. रस्त्यात आणि घरी पोचल्यावर भूत, प्रेत, चकवा असल्या सर्व गोष्टी(लोकल अफवा) समजल्या. अगोदरच मी लेट गेलो होतो. त्यातल्या त्यात जेवण आणि मामाच्या गप्पा. यामुळे तिथून निघायला मला साडेदहा वाजले. गावचे साडेदहा म्हणजे गाववाल्यांचा झोपायचा टायमिंग. घरबाहेर चार टवाळ कार्टी सोडली तर कुणीही नसत. मी ज्या वाटेने गेलो त्याच वाटेने येणे होतंच. झाला माझा प्रवास सुरु. जाताना मामाची पोरगी तरी होती...... येताना मात्र तिने सांगितलेल्या हॉरर अफवा आणि भीतीचे दडपण माझ्यासोबत होतं. मी येताना आता त्या नदीच्या एरियात पोचलो. वळणे आणि सरळ रोड यामुळे अपर डिपर चाललं होतं. सरळ रोड आला. साधारण खड्डे होते. अप्पर टाकला...... अप्पर टाकता क्षणी पुढे कवठ्या महाकाळ चे अद्ययावत व्हर्जन बाभळीच्या झाडाला लटकत होतं. आणि लाईट मूळ चमकत होत. गाडी फिरवून रिटर्न मामाकडे जायचं अस ठरवल पण थोडा विचार केला. भूत काय फिल्म मधल्या भुतांसारखी थोडी असणार?? गाडी हळू घेतली. लांबूनच निरीक्षण केले. तो काळा भावला होता. नदी, थंडी, भारी वातावरण आणि साधारण लाल माती यामुळे अमच्याकडे स्ट्रॉबेरी जास्त पिकते. आणि ते स्ट्रॉबेरी वाले शेतात भावले, कपडे वैगेरे असलं अडकवत असतात. आणि त्यातल्या कुणीतरी तर रस्त्यावरच भावलं अडकवलेलं. थोडा विचार केला, आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला म्हणून भूत वैगेरे अफवा यावर परत एकदा विश्वास बसला..... तरीपण खर सांगतो माजी जाम फाटली होती. तसाच पुढं गेलो. आता नदीचा पूल आला होता. स्मशानभूमी चा परिसर आला. परत अप्पर टाकला. पुढे पाहतो तर काय...... एक मुलगी हॅट घालून रस्त्याच्या बाजूने चालली होती. काही समजायच्या आत तिच्याजवळ पोचलो. ती मुलगी नव्हती कोणतरी दुबळा पतला मुलगा होता. कदाचित भिजवणी किंवा शेतात डुकरांच्या मुळे राखणीला आला असावा. आता मात्र मी पुरता भिलो होतो....... वैज्ञानिक दृष्टीकोन गेला तेल लावत..... जय श्रीराम बोललो...... आणि बाईकचा स्पीड वाढवला आणि जे सुटलो परत मग वळून पाहिलं नाही.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 8539 views

🗣 चर्चा (17)
श
शाम भागवत गुरुवार, 03/28/2019 - 06:16 नवीन
:)
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक गुरुवार, 03/28/2019 - 06:54 नवीन
मी चकवा, भूत बित यावर शक्यतो विश्वास ठेवत नाही.
सगळ्यांचं असचं असतं... "शक्य" होतं तितकं अविश्वासी बनता येतं... पण अशक्य जालं की लेखकांच्या भाषेत "माझी फाटली होती" अशी तारांबळ उडते... खरे तर मागे परतून त्या मामांना बाईकवरून योग्य त्या ठिकाणी पोचायला मदत करायचे काम करायला हवे होते...
  • Log in or register to post comments
ग
गावठी फिलॉसॉफर गुरुवार, 03/28/2019 - 07:35 नवीन
माजी भीती कमी झाल्यानन्तर मला जाणवलं की, कदाचित त्या मुलग्याला मदत हवी असेल.
  • Log in or register to post comments
ग
गावठी फिलॉसॉफर गुरुवार, 03/28/2019 - 07:36 नवीन
मी वर बोलल्या प्रमाणे भिजवणी करायला आला असावा.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 03/28/2019 - 06:25 नवीन
पण त्या मुलाचे पाय उलटे होते का हे पाहायला हवं होतं.
  • Log in or register to post comments
ग
गावठी फिलॉसॉफर गुरुवार, 03/28/2019 - 06:32 नवीन
गाडीच स्पीड जास्त होत. पाय बघत बसलो असतो तर पाय गळ्यात आले असते
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक गुरुवार, 03/28/2019 - 06:45 नवीन
गाडीच स्पीड जास्त होत. पाय बघत बसलो असतो तर पाय गळ्यात आले असते
नंतर सगळं सुचतं... वैज्ञानिकता, दृष्टी - कोन, मनाचे खेळ कि काय...
  • Log in or register to post comments
स
सोन्या बागलाणकर गुरुवार, 03/28/2019 - 07:20 नवीन
काय कळलं न्हाय बा म्हंजी भूत व्हतं का नव्हतं? काय राव, भावला न पोराला बघून घाबरला! आसं भूतबीत काय नसतं बघा, समदे आपल्या जीवाचे खेळ. हा समदा पिच्चरवाल्यांचा खुळचटपणा हाय. आता फुडल्या टायमाला नारबाच्या वाडीवाली ट्रिक करा, समदी कापडं काढा बघा भूत पळतं का न्हाई.
  • Log in or register to post comments
ग
गावठी फिलॉसॉफर गुरुवार, 03/28/2019 - 07:39 नवीन
परत अशी भूत भेटली की नारबाची वाडी ट्राय करतो.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा गुरुवार, 03/28/2019 - 09:11 नवीन
एखादं खट्याळ भूत असेल तर काढलेली कापडं घेऊन पळून जाईल. तेव्हा जरा सावधान.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा गुरुवार, 03/28/2019 - 09:35 नवीन
मला १९७३ चे सुमारास एक भूत चक्क मी झोपेतून अर्धा जागा झालो त्यावेळी दिसले होते . नंतर १९८८ ते २०१५ पर्यंत त्या भुताने व मी एका लेन मध्ये चिंचवड मध्ये काढले . भुताची दोन्ही मुले सध्या अमेरिकेत आहेत .
  • Log in or register to post comments
स
सोन्या बागलाणकर Fri, 03/29/2019 - 03:31 नवीन
वपुंची "दोंदे" आठवली =))
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी गुरुवार, 03/28/2019 - 15:19 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क गुरुवार, 03/28/2019 - 22:34 नवीन
ज्यांना अनुभव आलेले नसतात त्यांच्या दृष्टीने भूतपिशाच्च, करणी, काळी जादू वगैरे सगळं अंधश्रद्धा असते ज्यांना काही अनुभव आलेले असतात आणि कुठल्याच मार्गाने त्याचं स्पष्टीकरण सापडत नाही ते लोक या सगळ्यावर विश्वास ठेवतात.
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Sat, 03/30/2019 - 09:40 नवीन
एक सूचना : सध्या माणसेच जास्त भयानक झाली आहे सबब आम्ही या भूतलावरून गायब झालो आहोत. सूचना संपली मसणवट्या वरचा खविस शाखा : ओंकारेश्वर स्मशान
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Sat, 03/30/2019 - 13:42 नवीन
अगर आप भगवान पे विश्वास करते हो तो भुत पे भी विश्वास करना होगा.
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Sat, 03/30/2019 - 14:24 नवीन
ओ भुत , कल आना .
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा