चालू घडामोडी - मार्च २०१९
एकीकडे भारतीय उपखंडात दाटून आलेले युद्धाचे ढग अजून निवळलेले नसताना, दुसरीकडे पश्चिम आशियात भरलेल्या इस्लामी देशांच्या सहकार्य परिषदेच्या उदघाटन समारंभात भारत सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहिला आहे. याप्रसंगी भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री श्रीमती सुषमा स्वराज यांनी प्रभावी भाषणातून इस्लामी जगताशी मैत्री, सहकार्य आणि परस्पर सहजीवनाचा संदेश दिला आहे. भाषणाचा मजकूर इथे आणि विडिओ इथे आहेत.
२०१९ वर्ष हे राष्ट्रीय व जागतिक पातळीवर निश्चितच मोठ्या उलथापालथीचं ठरेल असं मला व्यक्तिशः वाटतं.
१. या महिन्यातच (३१ मार्चपर्यंत) भारताकडून पाकिस्तानला अजून एक धक्का दिला जाईल -
अ. मौलाना मसूद अझरला पकडणे / मारणे
आ. सर्जिकल स्ट्राइक ३.०
इ. अजून असंच काहीतरी
२. श्री नरेंद्र मोदी हे प्रचंड बहुमताने निवडून येऊन पुन्हा पंतप्रधान बनतील.
- महाराष्ट्रातील विधानसभेच्या मुदतपूर्व निवडणूका लोकसभेच्या निवडणुकीसोबतच होतील.
३. या वर्षाअखेरीपर्यंत पाकिस्तानचे किमान दोन तुकडे होतील.
४. इझ्रायल चे पंतप्रधान श्री.बेंजामिन नेतान्याहू यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे कदाचित पंतप्रधानपद सोडावे लागेल.
या धमकीमुळे पाकिस्तानचा अणुबॉम्ब हा कागदी वाघ आहे हे सिद्ध झालंय आणि पाकिस्तानच्या बाबतीत त्यांचा हा निर्वाणीचा उपाय बोथट केल्यामुळे त्यांच्या लष्करी आणि लोकशाही नेत्यांची गोची झाली आहे. हि या हल्ल्याची सर्वात मोठी उपलब्धी आहे.हजारवेळा सहमत! पाकिस्तान अतिरेक्यांचे उगमस्थान आणि आश्रयस्थान आहे हे तरी पाकिस्तान कुठे मान्य करते? ओसामा पाकिस्तानात नाही म्हणून किती जाहिरात चालू होती, पण शेवटी अमेरिकेने सर्जिकल स्ट्राईक करून मारलाच ना? मसूद अझर किडनी फेल झाल्याने आर्मी हॉस्पिटलमध्ये आहे अशी बातमी आहे. त्यातून दुसराही एक मतप्रवाह आहे की बालाकोट हल्ल्यात मसूद अझर सुद्धा मारला गेला असावा किंवा जखमी झाला असावा. तो हल्ल्यात मारला गेला हे मान्य केलं तर नाचक्की तर होईलच पण पाकिस्तानातले धर्मांध त्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी दबाव आणतील. म्हणून तो आजारी असल्याची हूल उठवण्यात आली असावी अशी शंका आहे.मुळात तेथे एक अतिरेकी होता कि १०० होते हा एक मुददा अलाहिदा आहे.सहमत. अतिरेकी मारणे हे जरी आपले उद्दिष्ट होते आणि आहे. पण जरी एकही अतिरेकी मारला गेला नसेल (याची शक्यता फारच कमी आहे) तरी आंतरराष्ट्रीय सीमा पार करून ८० किमी आत असलेल्या अतिरेक्यांच्या तळावर हल्ला करणे हे पाकिस्तानचे नाक कापणेच आहे. विशेषतः पाकिस्तानी एअरफोर्स ने "Sleep tight because PAF is awake." हे ट्विट ज्या दिवशी केले त्याच रात्री भारताने हल्ला केला. आणि आपली विमाने पाकिस्तानात ८० किमी आत येऊन हल्ला करेपर्यंत "जाग्या" PAF ला कळले सुद्धा नाही. त्यामुळे तर जाहीररीत्या इज्जतीचा फालुदा झाला. पुलवामा हल्ल्यानंतर PoK मधील लॉन्चिंग पॅड्स वरून सगळे अतिरेकी हलवले होते. उरीसारखा हल्ला PoK मध्ये करू शकतील असे पाकिस्तानला वाटत होते, त्यामुळे त्यांनी त्या अतिरेक्यांना पाकिस्तानात नेऊन ठेवले. आता हा पाकिस्तानला हे नक्कीच माहित आहे की परत जर त्यांनी आपली कुरापत काढली तर भारत पाकिस्तानात कुठेही हल्ला करेल. अर्थात पुढच्या निवडणुकीत मोदी पंप्र नाही झाले तर चित्र वेगळे असेल.