Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

हमसे तो छूटी महफ़िलें…

म — मनिष, Tue, 02/26/2019 - 10:02
Lonely Journey काव्य, शास्त्र, विनोदाने दरवळणार्‍या मैफिलीत हुरळून आपण सामिल होतो. संवादासाठी, मैत्रीसाठी आसुसलेले आपण चार दोस्तांच्या सहवासात हरखून जातो. मैफिलीतल्या अनवट कविता, एखादी नेमकी दाद, तिथली व्यासंगी चर्चा, आणि मनसोक्त गप्पा. अशा हव्याहव्याशा वातावरणात आपणच नकोसे आहोत, हे अवचितच झालेले दंशभान…. शरीरात एखादे विष पसरत जावे तसा पसरत जाणारा तुटकपणा. आपल्याच हाताने तोडून सर्व पाश खुलाशाचाही न करता अट्टहास, पुन्हा एकदा मौन प्रवास. एकट्याचा…. कधीही न परतण्यासाठी. ~ मनिष

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6082 views

💬 प्रतिसाद
म
मनिष Tue, 02/26/2019 - 10:09 नवीन
फोटो/इमेज आंतरजालावरुन घेतला आहे, खूप ठिकाणी वापरल्यामुळे नेमके श्रेय कुणाला द्यायचे ते कळत नाही, पण हा फोटो माझा नाही हे नमूद करतो.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 02/26/2019 - 10:32 नवीन
ऐसा मायुस नही होनेकारे बाबा.. फटाकसे एक डू आयडी बनानेका और मैफिलमे वापस घूस जानेका, दो देनेका दो लेनेका हिसाब बराबर हाय काय अन नाय काय पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 02/26/2019 - 10:32 नवीन
ओ मनीषसेठ... आपणच नकोसे आहोत, हे अवचितच झालेले दंशभान…. असं काही नसतं. सगळेच सर्वांना हवे असतात. लिखते रहो. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 02/26/2019 - 10:58 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
म
मनिष Tue, 02/26/2019 - 11:05 नवीन
@पैजारबुआ आणि @बिरुटेसर - हे लिहायचं राहिलंच, ही कविता सोशल-मिडिया किंवा संकेतस्थळाविषयी नाही. :)
  • Log in or register to post comments
झ
झेन Tue, 02/26/2019 - 15:50 नवीन
हम हस दीए हम चूप रहे मंजूर था चर्चा तेरा... छान आहे
  • Log in or register to post comments
म
मनिष Tue, 02/26/2019 - 17:47 नवीन
... मंज़ूर था पर्दा तेरा। :-)
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 02/26/2019 - 15:56 नवीन
सुंदर कविता !
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 02/26/2019 - 18:37 नवीन
आवडले. फोटोही चपखल! बाकी मित्रांची मैफल हरवणं म्हणजे काय ते सांगायला हवं काय.. त्रास त्रास म्हणतात तो हाच.. असो. अवांतरः राजकारणाच्या भाऊगर्दीत असं काही वाचून जरा गार वाटतं. :-)
  • Log in or register to post comments
म
मनिष Tue, 02/26/2019 - 18:44 नवीन
बाकी मित्रांची मैफल हरवणं म्हणजे काय ते सांगायला हवं काय.. त्रास त्रास म्हणतात तो हाच.. असो.
नेमके!
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 03/04/2019 - 12:36 नवीन
ओ भाव असा का करुन राह्यलाय. या जरा कट्टे करुया झकास. एकदम झ्ह्याक हुईल तब्येत तुमची
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Tue, 03/12/2019 - 14:24 नवीन
बर्याच दिवसांनी कविता विभागात चक्कर टाकली आणि सुंदर कविता वाचायला मिळाल्या. खुपच छान! पु.ले. शु.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 03/12/2019 - 15:37 नवीन
मस्त !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- RAW - Romeo Akbar Walter | Official Trailer |
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा