पुलवामा : काही प्रश्न
लोकहो,
काश्मिरातल्या पुलवामा जिल्ह्यात अवंतीपूर जवळ गोरीपोरा येथे राष्ट्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांच्या बसवर हल्ला झाला. त्यासंबंधी काही प्रश्न उद्भवले आहेत.
१. हे सैनिक नसून निमलष्करी दलाचे जवान होते. सेनेची माणसं नेआण करायची काटेकोर चाकोरी (routine) असते. अशी काही पद्धती या दलाची होती का?
२. एप्रिल २०१० मध्ये दंतेवाडा येथे नक्षल्यांनी ७६ निमलष्करी जवान हल्ला करून ठार मारले. त्यापासनं काही धडे घेतले गेले होते का? ते विसरले गेले का?
३. आदिल अहमद दर या आतंकवाद्याने स्फोटकांनी (IED) भरलेली जीप जवानांच्या बसवर आदळली. हा अतिरेकी स्फोटतत्ज्ञ समजला जातो (बातमी कुठे वाचली ते आठवंत नाही). मात्र खरा स्फोटतत्ज्ञ असा मरंत नसतो. तो पुढच्या स्फोटांच्या तयारीस लागतो. तर या आदिल अहमद दरचा आगापिछा काय? स्फोटके खरोखरीची IED होती का? तशी असल्यास आख्खी जीप आदळवण्याची गरज बहुधा नसावी. जीप आदळतांना दिशा निश्चित नसू शकते. IED स्फोटकांची दिशा बदलली तर परिणामकारकता कमी होते.
४. बसवर गोळीबाराच्या खुणा दिसताहेत. स्फोटासोबत गोळीबारही झाला काय? म्हणजे दहशतवाद्यांचा पूर्ण चमूच सक्रीय होता काय?
५. राजकीय परिणाम : मोदी म्हणाले की जवानांचं बलिदान वाया जाणार नाही. समजा जर भारताने बदला घेतला तर तो अधिकृतपणे जाहीर होईल काय?
झाल्यास त्याचे राजकीय परिणाम काय होतील?
६. नुकतंच काही दिवसांपूर्वी अजित दोभाल यांनी एक वक्तव्य केलं : https://youtu.be/N7ESR5RU3X4?t=147
यांत ते म्हणतात की ३ पातळ्यांवर संरक्षणकार्य चालतं.
क. निव्वळ बचाव : यांत शत्रू आक्रमक असतो व आपण फक्त बचाव करतो.
च. आक्रमक बचाव : यांत भारत आक्रमणाचं मूळ सक्रीयपणे नष्ट करतो. पण आक्रमकांचं मूळ तसंच राहतं.
ट. उघड आक्रमण : यांत भारत आक्रमकांवर प्रत्याक्रमण करून त्यांना नष्ट करतो.
या तीन पातळ्यांपैकी कोणत्या पातळीवर कृती केली जाईल?
असो.
जाणकारांनी कृपया उत्तरे सुचवावीत. तसेच अधिक प्रश्न जरूर विचारावेत.
धन्यवाद!
आपला नम्र,
-गामा पैलवान
ज्या हायवे ज्या चेक पोष्ट होत्या त्या काही कारणाने local सरकारनी हटवल्या होत्या आस मी वाचलं आहे .हे मुख्य दुखणे आहे, जे हितसंबंधी माध्यमे जनतेसमोर आणत नाही. काही काळापूर्वी, जम्मू-कश्मिरमध्ये, बॅरिकेड उभारण्यासाठी कडक नियमावली होती. त्या वेळेस स्वतःला महत्वाचा समजणारी एक व्यक्ती (आता नाव आठवत नाही) बॅरिकेडवर थांबणे म्हणजे अपमान समजली आणि तिने दोन बॅरीकेड्सना धडक देऊन गाडी पुढे काढली. तिसर्या बॅरिकेडला तो धडक मारत असताना तेथे असलेल्या सुरक्षासैनिकाने, अर्थातच, त्याच्यावर गोळीबार केला. त्यात ती व्यक्ती मरण पावली. या घटनेवर, त्याकाळी मुख्यमंत्री असलेल्या मेहबुबा मुफ्ती आणि (अर्थातच) मानवतेच्या तथाकथित पाठीराख्यांनी, गदारोळ केला. त्या सुरक्षासैनिकावर खटला भरला गेला आणि त्याला शिक्षा होऊन तो आता (बहुदा तिहार) तुरुंगात खितपत पडला आहे. त्यानंतर, Confidence building च्या नावाखाली सुरक्षादलांच्या बॅरिकेड्स उभारण्याच्या कृतीवर लक्षणीय बंधणे घालण्यात आली. इतर कारणांबरोबरच या कारणामुळे, पुलवामा येथे, अतिरेक्याला कॉन्व्हॉयच्या जवळ जाणे शक्य झाले. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता बॅरिकेड्सचे नियम परत कडक केले जात आहेत, अश्या बातम्या आहेत.हे सिद्ध करून दाखवा हे तुम्हाला आव्हान आहे.
नाही तर अशा धादांत खोट्या प्रतिसादाबद्दल माफी मागा/join-indian-army-as-a-doctor-army-medical-corps
https://www.ssbcrack.com/2018/03/join-indian-army-as-a-doctor-army-medical-corps-notification.html