आता पुलवामा.
सगळ्या न्यूज चॅनलवरची आजची ही बातमी. सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झालेला आहे. यात आपले चाळीसहून अधिक जवान शहीद झालेले आहेत.जैश -ए - मोहम्मदने याची जबाबदारी घेतली आहे.
या हल्यात माझ्या माहितीप्रमाणे दोन थिअरी समोर आल्या आहेत. एका कारमद्दे सुमारे दोनशे किलो स्फोटके भरलेली होती हा यातला समान धागा. एका थिअरीप्रमाणे ही स्पोटकाने भरलेली कार जवानांच्या ताफ्यावर जावून धडकली आणि स्फोट झाला. दुस-या थिअरीप्रमाणे रिमोटने कारमधील स्फोटके उडवण्यात आली.
यानंतर ठरलेली छापील 'मुहतोड जवाब'ची उत्तरे आपण ऐकत राहायची. निशेषाचे फलक नाचवायचे.
पुन्हा सर्जिकल स्ट्राईक की अजून काही यावर चर्चा होणार आणि प्रश्न तसाच भिजत पडणार.
बाहेरचे लोक येऊन स्थानिक तरूणांना भडकावतात हे समजू शकते पण हे तरूण भडकले जातातच कसे ? जर ते लोक ब्रेन वॉशकरु शकतात आपले सरकार काही लोकांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे नेमून पडद्याआड वा समोरासमोर तरूणांना समजावू शकत नाहीत का ? सेनेपेक्षा पुर्ण सायलॉजिस्टकडून ट्रेन झालेले धर्मोपदेशक तरूणांना असल्या मार्गापासून जाण्यास का बरे रोखू शकणार नाहीत ?
असे करायचे कि सरळ मिलिटरीला मोकळे मैदान द्यायचे ? बंदूकीचा धाकावर शांतता किती दिवस टिकवून ठेवता येते ?
बाकीचे देश सरळसरळ दुस-या देशात आपले सैन्य घुसवतात तेव्हा आंतरराष्ट्रीय दबाव नसतो. भारतानेच हे असले दबावाचे अोझे किती दिवस वागवायचे ? असला दबाव न झुगारता येण्यासारखा असतो का ?
आर्थिक निर्बंध लागल्यास काही दिवस आर्थिक निर्बंध सहन न होण्याइतकी आपली अर्थव्यवस्था कमकुवत आहे का ?
आपल्याच भागावर दुसरा देश राज्य करतो आहे , तिथून दहशतवादी कॅंप चालवत आहे हे उघड असताना आपण तो मिळवण्यासाठी काहीच का करायचे नाही ?
एवढे आधुनिक तंत्रज्ञान आणि सैन्य केवळ स्वसंरक्षणार्थच का वापरावे ? स्वताः युद्धाची सुरवात आपण करत नाही ही मिरवण्याची गोष्ट आहे का ?
छोटमोठ्या उपचारच सतत घेत रहावे की सरळ एक शस्त्रक्रिया करून, त्यातला धोका स्विकारून मोकळे व्हावे ?
मुद्दे विस्कटलेले आहेत ह्याची जाणीव आहे. काहिंना हे बालीशही वाटतील तरीही जाणकारांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत. अवांतर वादावादी नसतील ही अपेक्षा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- खून का बदला खून