भारत सोडावा?
नमस्कार.
बऱ्याच दिवसांनी मिपावर आलो आहे. डोक्यात एक विषय घोळत आहे त्याविषयी लिहितोय.
प्रश्न - भारताबाहेरच्या विकसित म्हणाल्या जाणाऱ्या जगात नोकरीची संधी आल्यावर भारत सोडावा ?
एक जवळचा मित्र सध्या भारतातच एका शहरात राहतोय. खाऊन पिऊन सुखी म्हणता यावे इतके उत्पन्न आहे. नौकरीही चांगली आहे. त्याचे आणि बायकोचे आई बाबा काही तासात घरी येऊ शकतील हि सोय हि आहे. लहान मुलगी आहे, तिच्यासाठी व्यवस्थित सपोर्ट सिस्टिम तयार केली आहे दोघे नौकरी करत असल्यामुळे. तो राहतो ते शहर दोघांनाही आवडते. त्यांचे आई वडीलही येऊन भरपूर दिवस राहतात.
युरोपमधल्या एका चांगल्या शहरात नौकरी त्याला स्वतःहून, न शोधता मिळत आहे. पगाराविषयी काही माहिती नाहीये, पण किती असेल तो अंदाज आहे.
सुरुवातीला दोघेही खुश होते पण आता विचार करताय तेव्हा तितकेसे खुश नाहीत.
+ कारणे ( महत्वाच्या क्रमानुसार)
दोघांना फिरण्याची खूप आवड आहे. पूर्ण युरोप तिथे राहून फिरून होईल असे वाटते. ते काय इथून जाऊन होणार नाही
पोरीला एक जागतिक अनुभव मिळेल, मित्रालासुद्धा - पुढे करियर मध्ये कामाला येईल
नवीन भाषा, संस्कृती आणि पाककृती
- कारणे
दोघांच्या आई वडिलांपासून दूर राहावे लागेल.
इथे जी सपोर्ट सिस्टिम आहे ती काही तिथे उभी राहणार नाही.
नवरा बायको दोघेही तसे इन्ट्रोव्हर्ट असल्यामुळे मित्रमंडळी कमी आहेत, तिथे गेल्यावर हे अगदीच एकटे पडायची हि शक्यता.
दोघांनाही एकाच वेळी नोकरी मिळाली नाही तर उत्पन्न कमी होऊ शकेल काही दिवस . ( हे सगळ्यात कमी महत्वाचे. उत्पन्न वाढेल हि पण तो सध्या तरी डिसिजन फॅक्टर नाहीये )
आणि- सगळे व्यवस्थित चालले असतांना स्वतःचा देश सोडावा का?
मिपाकरांपैकी कोणी हा डायलेमा अनुभवाला आहे का? असल्यास काय तोडगा काढला? इतर काही गोष्टींचा विचार केला पाहिजे?
धन्यवाद...
🗣 चर्चा
(53)
म
मराठी_माणूस
Tue, 04/30/2019 - 12:55
नवीन
गैरसमज
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Tue, 04/30/2019 - 15:55
नवीन
माझा असा समज होता
कारण गल्फ मध्ये सहज जावू शकतो पण अमेरिकन व्हिसा मिळवण्यासाठी जरा जास्तच kadak नियम आहेत .
त्या मुळे चाळणी लावून ठराविक लोकच अमेरिकेत प्रवेश करत असावीत असा समज होता .
चुकीच्या पोस्ट बध्दल क्षमस्व
- Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके
Wed, 05/01/2019 - 07:06
नवीन
काय झालं शेवटी ?
सोडला की नाही भारत ?
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2