Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

मालिका बघणारे

अ
अविनाशकुलकर्णी
Mon, 02/04/2019 - 12:47
🗣 3 प्रतिसाद
मालिका बघणारे म्हणजे बुद्दू मती व गती मंद असा सोयीस्कर समज मालिका निर्माते लेखक दिग्दर्शका नी करून घेतलेला अशी एक शंका येते वानगी दाखल उदाहरण द्यायचे झाले तर राधा प्रेम रंगी रंगली ही मालिका म्हणजे तद्दन बालिश प्रकार आहे नायीका राधा व अन्विता ह्या वर्ष सव्वा वर्षा पासून प्रेग्नेंट आहेत पण त्याचे पोट मात्र प्रेग्नेंट बाईसारखे पुढे आलेले दिसत नाही नायिका राधा तर सर्व गुण संपन्न अशी नायिका आहे ती मनात आले की पाच हजार कोटींचा व्यवसाय सांभाळते तर मनात आले की फ्याशन डिझाइनर बनते व साडी या विषयावर कीर्तन करते तिचा भाऊ आदित्य तर टपोरी असून त्याने खून केले आहेत तरी पोलीस त्याला पकडत नाही दीपिका व तिची आहे देवयानी ह्याना तर खून करण्याचा छंदच आहे पोलीस अधिकारी विकत घेतलेत असे ते अभिमानाने सांगतात नायक प्रेम हा काही काम न करता पाच हजार कोटी चा व्यवसाय करतो विवाह बाह्य प्रकारणे लफडी आदीचे उदात्तीकरण जोरात केलेले आहे राधाची आई दिवाळीचा फराळ व्यवसाय करत असते व ती पण २-३ लाखाचा व्यवसाय करत असते प्रेम कायम चाळीतल्या खोलीत सासुर वाडी ला पडीक असतो त्याचा ५ कोटिचा बंगाला असतो तो दीपिका व राधा या दोघींचा पण यथेछय उपभोग घेत असतो राधाचे पिताश्री कीर्तन करतात व राधा पेटी वाजवत असते श्रावणी काकू हे एक पात्र आहे जे तोंडाला येईल तसे वाट्टेल ते बकत असते चाळीतले चाळकरी व दामुअण्णा पूर्ण हुकलेली पात्रे आहेत व ते अशक्य आहेत सर्व मिळून दर्शकाचा अंत व सहन शक्तीची परीक्षा घेतात

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3021 views

🗣 चर्चा (3)
आ
आनन्दा Mon, 02/04/2019 - 13:11 नवीन
तुम्ही कशाला अमची परीक्षा घेताय?
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 02/04/2019 - 13:42 नवीन
खरे बोललास रे अवी. ती राधिका सुभेदार लोणची बनवून ३०० कोटींची उलाढाल करते.'तुला पाहते रे' ही पण अशीच एक मालिका. एक घराणे श्रीमंत दाखवायचे. दुसरे घराणे अतिशय गरीब. अगदी ५० वर्षापुर्वी दादर्/गिरगावात राहणार्या शहरी मध्यमवर्गाची आठवण व्हावी. "लंडनला जाणार' हे ऐकल्यावर घरातली सर्व मंडळी चकित होऊन हाता-पायाची सर्व बोटे तोंडात घालतात..स्वयंपाक घरात अगदी पितळेची भांडी दाखवतात. घरी कुणी पाहुणा आला की एक पाण्याचा तांब्या हातात देतात. तो पाहुणापण न आलेला घाम पुसतो.. गेला तो काळ.. सांगायला हवे ह्या सिरियलवाल्यांना कुणीतरी.
  • Log in or register to post comments
द
दीपक११७७ Mon, 02/04/2019 - 15:11 नवीन
माई ( भिक्षुकाच्या आवाजात) खरं बोलते आहे!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा