Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

लग्न - एक पांढरा हत्ती

व
विजुभाऊ
गुरुवार, 01/31/2019 - 06:22
🗣 63 प्रतिसाद
पांढरा हत्ती पाळणे/पोसणे हा मराठीतला एक वाक्प्रचार आहे. याचा शब्दशः अर्थ घेतला तर पांढरा हत्ती ( हा अल्बिनो असल्यामुळे पांढरा असतो ) त्याचा वापर युद्ध, खेळ किंवा भारवाहन या कशासाठीच वापर करता येत नाही. केवळ दिखाव्यासाठी बाळगता येतो. आणि हत्ती पाळला आहे असा बडेजाव करता येतो. मात्र त्याला खाणेपिणे सामान्य हत्तीएवढेच लागते. दिखाव्या शिवाय काहीच उपयोग नाही . म्हणजे फायदा अल्प ( बडेजाव करता येतो हा फायदा मानला तर ) आणि तोटे अनेक असणे म्हणजे पांढरा हत्ती पाळणे. सहज म्हनून ही अ‍ॅनॉलॉजी इतर काही गोष्टीना लावली. ( उदा चार चाकी गाडी घेणे इत्यादी.) सर्वात गोंधळात टाकणारी गोष्ट आढळली ती म्हणजे " लग्न" लग्न करणे हा पांढरा हत्ती पाळण्या सारखे आहे का? हे दोघानाही ( स्त्री आणि पुरूष ) समान पणे लागू आहे. लग्न करणे हा स्त्री साठी गृहसौख्य आणि सामाजीक/ आर्थीक सुरक्षा हा डबल फायदा आहे . बडबड ऐकून घेणारा हक्काचा श्रोता मिळणे , हा फायदा आहे. मात्र त्या सोबतच नको असलेले नातेवाईक , जन्मभर नवरा नामक तर्‍हेवाईक प्राण्याची बडदास्त सांभाळणे , स्वतःच्या आवडीनिवडीला, छंदाना कायमची तीलांजली देणे , सासूसासरे वगैरे असून अडचण नसून खोळंबाप्रकार सांभाळणे हे तोटे होतात. पुरुषांसाठी लग्न हा गृहसौख्य , जेवणासाठी, घरातला पसारा आवरणारी हक्काची दासी , आई वडीलाना चार्जेस न आकारता सांभाळणारी नर्स वगैरे फायदे आहेत. तोट्याच्या बाजूला मुले होणे,त्यांचा सांभाळ करणे , जबाबदारी या गोंडस नावाखाली स्वतःच्या आवडीना कोपर्‍यात ढकलाव्या लागणे , पगाराचा हिषेब द्यावा लागणे , सतत टोमणे ,चिडचीड ऐकून घ्यावी लागणे , इत्यादी गोष्टी आहेत. हा ताळा करत असताना " लग्न करणे " हा पांढरा हत्ती पाळण्यासारखे आहे की कसे या प्रश्नाने डोके खाल्ले. तुमची मते काय आहेत? ( आपली संस्क्रुती , स्त्री / पुरुष फरक यापेक्षाही लग्न करण्याचे फायदे तोटे यावर निरोगी चर्चा अपेक्षीत आहे. ) लग्न करणे ही गोष्ट पांढरा हत्ती पाळण्यासारखे आहे काय?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 33186 views

🗣 चर्चा (63)
म
मराठी_माणूस Mon, 02/04/2019 - 07:15 नवीन
ह्या विषया संबंधीत एक लेख https://economictimes.indiatimes.com/wealth/plan/want-to-live-independently-learn-to-manage-your-finances-first/articleshow/67776423.cms
  • Log in or register to post comments
ए
एमी Wed, 02/06/2019 - 01:47 नवीन
चांगला आहे तो लेख. मी वरती एका प्रतिसादात लिहले आहे "जसेजसे स्त्रीशिक्षण आणि आर्थिक स्वातंत्र्यची व्याप्ती वाढत जाईल तसतसे खरोखरच हुशार असणाऱ्या स्त्रिया लग्न करणार नाहीत, फक्त मुल जन्माला घालायचे आणि एकत्र वाढवायचा करार करतील." हे कमी प्रमाणात का होईना पण होताना दिसत आहे. आणि ते प्रमाण हळूहळू वाढत जाणार आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 02/07/2019 - 06:59 नवीन
फक्त मुल जन्माला घालायचे आणि एकत्र वाढवायचा करार करतील." हे कमी प्रमाणात का होईना पण होताना दिसत आहे. फारच तुरळक प्रमाणात आणि ते सुद्धा हुच्चभ्रू लोकात आहे (बऱ्याचदा फॅशन म्हणून) लग्न न करण्याचे प्रमाण म्हणालात तर मान्य पण लग्न ना करता मुलं जन्माला घालणं? फारच कमी
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 02/07/2019 - 08:52 नवीन
लग्न न करता मुल होवून देणे लग्नच न करणे ही आधुनिक (समज आहे तसा ) विचार सरणी फक्त नोकरी करणारे उच्विद्याविभूषित मध्यम वर्ग फक्त समाविष्ट आहे ते ना गरीब आहेत ना श्रीमंत . ना सुशिक्षित आहेत ना अशिशिक्षित आशाच समाजात आहेत . अति श्रीमंत आणि गरीब परंपरा पाळून राहतात
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 02/07/2019 - 06:15 नवीन
सद्बुद्धी देणार्‍या त्या दिवसाचे स्वागतच होईल
  • Log in or register to post comments
म
मनाचा राजा Sun, 02/17/2019 - 10:04 नवीन
मस्त लिहिलेय.......
  • Log in or register to post comments
C
Chandu Mon, 02/18/2019 - 09:00 नवीन
असे दिसून येते की येथील बहुतेक प्रतीक्रीया समाजातील पांढर पेशा नोकर वर्गा च्या/स्थिर उत्पन्न्ं गटा तील आहेत. लग्न या विषयातील आर्थिक बाजू विचारात घेता तो स्त्री व पुरुष दोघांनाही पांढरा हत्ती,(पक्षी: अनावश्यक,खर्चिक,केवळदेखाव्यासाठी केलेली व नन्तर न परवडणारी तडजोड)असावी असे कायम स्वरूपी कोणालाही वाटतनाही. व्यापार,शेती,उद्योग करणार्या व्यक्तींमधे लग्न ही स्त्री/पुरुष एवढ्या पुरती मर्यादीत बाब नसते.दोन कुटुंबातल्या संपत्ती चे वाटप,एकमेकांचे व्यापारी हित संबंध,जमीनीचे वाद सोडव न्याची तरतूद इत्यादी अनेक पैलू असतात. त्याचा विचार करता वरील असंख्य प्रतिक्रियान्मधील मुद्दे हे गैर लागू ठरू शकतात.शे ती ,व्यापार आणी उद्द्योग क्षेत्र्रतील व्यक्तींच्या बाबतीत लग्न हा पांढरा हत्ती आहे का .नाही हे त्या त्या जोडीच्या मधेस्त्री चे शिक्षणआणी पुरुषाची कमाईया वर अवलम्बून असते असे माझे मत आहे.मिपा वरील जाणत्या नी अधीक प्रकाश टाकावा.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 09/17/2025 - 08:56 नवीन
या बाबतीत मते बरीच बदलेलीआहेत आता.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Wed, 09/17/2025 - 09:49 नवीन
रंग बदलणारा हत्ती असतो असे अनुभवांती मत झाले आहे. लग्नानंतर एक दोन वर्ष गुलाबी असतो. पुढील चार पाच वर्ष थोडा गुलाबी ,थोडा लाल असा काहीसा. त्याच्या नंतर मळखाऊ रंगाचा असतो. उतारवयात मात्र तो सफेद होतो.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Wed, 09/17/2025 - 18:14 नवीन
'रंग' याचे सांकेतिक अर्थ विभिन्न संस्कृतीत वेगवेगळे असतात. -- या विषयावर एकादी जिलबी पाडता येईल. हाताशी कृबु आहेच.
  • Log in or register to post comments
श
श्वेता व्यास Wed, 09/17/2025 - 10:38 नवीन
बडबड ऐकून घेणारा हक्काचा श्रोता मिळणे ऑब्जेक्शन! आपण बडबड करत असणारा झोपा काढणारा श्रोता मिळतो, ते सुद्धा जोरजोरात घोरून!
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 09/17/2025 - 16:07 नवीन
लग्नानंतर गप्प बसलो तर म्हातारपणी ऐकून घ्यावं लागतं नाही.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Wed, 09/17/2025 - 18:16 नवीन
"तेंव्हा गप्प बसलात, भोगा आता कर्माची फळं" असं ऐकावं लगतं हो.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा