Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

करायला गेलो आत्महत्या

ख — खिलजि, Wed, 01/30/2019 - 14:25
केलेल्या कृत्यांचा पश्चाताप म्हणून करायला गेलो आत्महत्या टाकला दोर उभा वर पंख्यांला राहत्या नव्या घरी गच्चं मारुनी गाठ दाखवणार होतो आयुष्याला पाठ घेतला गळफास तेव्हा गदागदा हलु लागले सिलिंग फुसका बार निघतोय कि काय ? याचे हळूहळू येऊ लागले फिलिंग साला , नको तो डोक्याला ताप झाला सिलिंगसकट वरचा माणूस खाली आला दोघेही उताणे एकावर एक पडलो दोघेही जागच्या जागीच मोडलो घातली बिल्डरच्या नावाने शिवी साला बिल्डर हाय कि न्हावी ? साल्याने एवढी मोठी इमारत बांधली पण आत्महत्या करता येऊ नये याची पुरेपूर काळजी घेतली आत्महत्या बाजूलाच ह्रायली पोलिसांची सूत्रं भराभर हलली उचलून टाकले बिल्डरला तुरुंगात माझे उर्वरित दिवस मात्र गेले फुकटचे सत्कारात कुठली आत्महत्या नि कसलं काय ? आजकाल कशाचाच भरवसा राहिला नाय {{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 8219 views

💬 प्रतिसाद
स
समीरसूर गुरुवार, 01/31/2019 - 06:42 नवीन
कविता आवडली... :-)
  • Log in or register to post comments
ख
खिलजि गुरुवार, 01/31/2019 - 08:32 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 01/31/2019 - 10:14 नवीन
अल्लाऊद्दीन खिलजी पागोटे सरसावून विनोदी कविता लिहायला बसला आहे असे चित्र मनासामोर उभे राहिले ! =))
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 01/31/2019 - 10:28 नवीन
सोनू तुला माज्याव भरवसा नाय का
  • Log in or register to post comments
म
मित्रहो गुरुवार, 01/31/2019 - 19:22 नवीन
कविता आवडली
  • Log in or register to post comments
व
वीणा३ Fri, 02/01/2019 - 17:19 नवीन
मजेशीर :)
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Sat, 02/02/2019 - 02:21 नवीन
ज्जे बात!
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sat, 02/02/2019 - 05:06 नवीन
फर्मास कविता.
सिलिंगसकट वरचा माणूस खाली आला दोघेही उताणे एकावर एक पडलो दोघेही जागच्या जागीच मोडलो....
....सिलिंगसकट वरची बाई खाली आली ..... असे असते तर काय घडले असते तेही लिहा.
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Sat, 02/02/2019 - 08:47 नवीन
चित्रगुप्त साहेब , हि बाईची कल्पना एकदम जबरदस्त होती ... भन्नाट झाली असती कविता , आधीच डोक्यात आली असती तर.. अन हो पुनश्च धन्यवाद सर्व वाचकांना आणि प्रतिसादकांना ..
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा