Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

तुझ्या कवितेची ओळ

अ — अनन्त्_यात्री, Mon, 01/21/2019 - 07:17
तुझ्या कवितेची ओळ अवचित ओठी येते जिंदगीच्या निवडुंगा इवलेसे फूल येते तुझ्या कवितेची ओळ अवचित ओठी येते कालियाच्या डोहातून कृष्णधून उमटते तुझ्या कवितेची ओळ अवचित ओठी येते पाखराच्या लकेरीने हिर्वी वेल थर्थरते कवितेची ओळ तुझ्या पुन्हा पुन्हा ओठी येते पुन्हा पुन्हा रुजूनिया पुन्हा पुन्हा उगवते

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5784 views

💬 प्रतिसाद
च
चांदणे संदीप Mon, 01/21/2019 - 22:57 नवीन
आम्ही यमकहराम... तुझ्या कवितेची ओळ घाली मनामध्ये घोळ रात्रीला झोप नाही दिवसा बट्ट्याबोळ.... असेच लिहिले असते! ;) Sandy
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 01/23/2019 - 15:07 नवीन
चुकून "छान आहे पण पीठ कमी पडलंय" असे वाचले :D
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 01/22/2019 - 12:13 नवीन
कविता आवडली आणि त्यावर चांदणे पैलवानांचा प्रतिसाद सुद्धा... मग प्रश्ण पडला आपण काय लिवले असते? (चुलीत घाल) तुझ्या कवितेची ओळ पाठीला ग साबण चोळ नाका मधे हात फिरव काढ कानातला मळ (चुलीत घाल)तुझ्या कवितेची ओळ का ग करशी वेडं चाळं उतार वयात आता देवापुढती कुट टाळं (चुलीत घाल)तुझ्या कवितेची ओळ पिवळं वसईच केळ त्याचा पाहून रुबाब डाळींबाची सुटे लाळ (चुलीत घाल)तुझ्या कवितेची ओळ म्हणा वदनी कवळ ओरपावा आमरस फळ मधुर रसाळ असे काहिही लिहिले असते... पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Tue, 01/22/2019 - 12:29 नवीन
हा..हा..ही..ही..ही =)) पैजारबुवा म्हणजे, साक्षात, कसल्याही वस्तूला पुडीत बांधणारे वल्ली. Sandy
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री गुरुवार, 01/24/2019 - 05:15 नवीन
पैजारबुवांची फ्याक्टरी खतरी कच्च्या मालाची पक्की खात्री वाग्देवीची कृपाछत्री जोवरी अमुच्या मस्तकी :)
  • Log in or register to post comments
द
दमामि Sat, 01/26/2019 - 08:19 नवीन
खिखिखि
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 01/22/2019 - 12:32 नवीन
तुझ्या कवितेची ओळ अवचित ओठी येते कालियाच्या डोहातून कृष्णधून उमटते
सुरेख, आवडलं.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Wed, 01/23/2019 - 11:26 नवीन
कालियाच्या डोहातून कृष्णधून उमटते सुरेख.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 01/23/2019 - 16:57 नवीन
सुंदर कविता ! आणि तिला वाचून मिपाशीघ्रकवींच्या काव्यस्फुर्तीला फुटलेले धुमारेही तितकेच मस्तं ! ;) :)
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Sat, 01/26/2019 - 07:01 नवीन
देणार्‍या सर्वांना धन्यवाद.
  • Log in or register to post comments
द
दमामि Sat, 01/26/2019 - 08:20 नवीन
कविता लई आवडली. इडबंन करतोय माफी असावी._/\_
  • Log in or register to post comments
न
नाखु Wed, 01/30/2019 - 10:48 नवीन
माफी मागूनच आमची कलाकुसर पहिला बेल बालबुद्धी करीता*** भाषणाची ओळ तुझ्या पुन्हा पुन्हा मोठी येते पुन्हा पुन्हा गांजुनिया पुन्हा पुन्हा हसवते उगळणार्या कोळश्यासाठी**** तुझ्या विद्वत्तेचा घोळ अवचित दृष्टी येतो जाती द्वेषाच्या डोहातून कालियाच डोकावतो सतत आदळणारे ब्रिगेडी विचार आणि त्यांचे मूक संमती पाठीराखे*** तुमच्या निस्पृहतेची ओळख अवचित पुढे येते पाखंडीच्या गलोलीने मूर्ती (पुतळा) जागीच थर्थरते कडवा सैनिक आणि त्याचेच कल्याण*** ज्याच्या प्रतिभेची झळ अनुयायी ओठी येते तर्क शून्यता हिरीरीने आम्रतरुपोटी कडुनिंब प्रसवते वाचकांची पत्रेवाला नाखु
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा