Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

ऑफिस मध्ये नेहमी पडणारे प्रश्न.

ब
बाप्पू
गुरुवार, 01/17/2019 - 20:21
🗣 101 प्रतिसाद
मला कार्यालयात काम करताना नेहमी पडणारे प्रश्न खाली देत आहे. माझ्याबरोबर हे प्रश्न इतर लोकांना देखील पडत असतीलच. जाणकार उत्तरे देऊ शकतील का? 1) ऑफिस मध्ये पुरुषांना ड्रेस कोड आहे हे माहिती आहे. माझ्या मते फॉर्मल शर्ट आणि पॅन्ट, आणि फॉर्मल शूस. त्यात परत शर्ट आणि पॅन्ट प्लेन पाहिजे. डिझाईन किंवा ब्रॉड लायनिंग नासावी, शूस पॉलिश केलेले असावेत. इ इ खूप बारकावे आहेत. बहुतांश पुरुष लोक हे कटाक्षाने पाळतात. हेच स्त्रियांच्या नेमकी फॉर्मल ची डेफिनेशन काय आहे? त्यांनी काहीही म्हणजे अगदी निम्म्या नग्न असलेल्या शॉर्ट घातल्या तरी ते फॉर्मल च आणि पंजाबी ड्रेस घातला तरी ते फॉर्मल. एच आर लोक पुरुष कर्मचारी वर्गाला कित्येकदा फॉर्मल नाहीये म्हणून समज देतात. तेच महिलांच्या बाबतीत बोटचेपे धोरण का? 2) ऑफिस मध्ये मुस्लिम लोकांनी डोक्यावर टोप्या घालणे (त्यांच्या स्वतःच्या :D) हे कुठपर्यंत ठीक आहे? हे फॉर्मल च्या डेफिनेशन मध्ये बसते का? आणि मग बसत असेल तर आपण गांधी टोपी किंवा भगवी टोपी घालून गेले तर चालेल का? इमॅजिनेशन करून हसू येईल पण आजकाल आमच्या ऑफिस मध्ये या टोप्या जास्तच होत चालल्या आहेत. त्यामुळे सिरिअसली हा प्रश्न विचारत आहे. HR मधले कोणी मिपाकर त्यांच्या कंपनी तील अश्या टोप्याबद्दलची policy सांगू शकतील का ? कि धार्मिक सौदार्ह्य या नावाखाली हे चालवावे लागते? 3) इंग्रजी लोकांची भाषा आपण बोलतो हे ठीक आहे पण ओढून ताणून त्यांच्या अक्सेंट ची कॉपी करण्याचा प्रयत्न करणे ठीक आहे का? माझ्या ऑफिस मध्ये काही लोक विनाकारण काही उच्चार चुकीचे (माझ्या मते ) करतात. जसे कि डाउन ला डॉsssन, कॅन ला खैन किंवा शेवटचा एखादा शब्द अस्पष्ट बोलणे जसे कि टूगेदर ला टुगेद. अश्या पद्धतीने बोलून पुढच्यावर छाप पडता येते का? कि हा निव्वळ एक फार्स आहे,? मी जी इंग्रजी बोलतो ती समोरच्या ला नीट समजते. पण असे तोंड वेडेवाकडे करून बोलल्यावर जास्त चांगली समजते का?? :D 4) ऑफिस मध्ये तुम्ही एखादा प्रोजेक्ट वर काम करता आणि अचानक कोणीतरी येऊन तो प्रोजेक्ट किंवा ती आयडिया हायजॅक करून स्वतः च्या नावावर खपवण्याचा प्रयत्न करतो किंवा त्यात यशस्वी होतो. अश्या सिच्युएशन कश्या पद्धतीने हाताळाव्यात? 5) माझे असे निरीक्षण आहे कि साऊथ चे लोक तामिळ, मल्याळी, हैदराबादी, ओरिया (ओडिसा ) हे लोक आपल्या इकडच्या लोकांना आप आपल्या ऑफिस मध्ये व्यवस्थित रित्या प्लांट (किंवा सेटल ) करण्याचा प्रयत्न करतात. मराठी लोक या बाबतीत खूप मागे आहेत. किंवा मराठी लोक एक दुसऱ्याला मागे पडायला बघतात. मिपाकरांची मते काय आहेत? 6) एखादी व्यक्ती ऑफिस मध्ये आवडत नसेल, त्याला करणे अनेक असू शकतात पण मी फक्त ऑफिस च्या कामाशी निगडित असलेल्या कारणांबाबत बोलतोय. अश्या लोकांना कसे हॅन्डल करावे? त्यांच्याशी साप भी मरे और लाठी भी ना तुटे या उक्ती नुसार कसे वागावे? बस तूर्तास इतकेच.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 42957 views

🗣 चर्चा (101)
ए
एमी Sat, 01/26/2019 - 01:52 नवीन
> तुमची जळजळ होतेय कारण तुम्ही वा विषय म्हणजे स्त्री च्या कपडे परिधान करण्याच्या स्वातंत्र्यावर हल्ला आहे या नजरेतून पाहत आहात. पण ही चर्चा फक्त कार्यालय आचारसंहिते बद्दल ची आहे.! > गंडलय उत्तर आणि अझमप्शन. माझे सगळे प्रतिसाद वाचले तर मी फक्त हापिसातील कपड्यांबद्दलच बोलतेय, आणि अल्टरनेट सोल्यूशन सुचवतेय हे लक्षात येईल.
  • Log in or register to post comments
स
स्मिता. गुरुवार, 01/24/2019 - 13:04 नवीन
माझं तरी मत असं आहे की ऑफिसमधे पोषाखाची संहिता नक्कीच असावी. त्यामुळे ऑफिसात 'प्रोफेशनल' वातावरण टिकून राहतं. मी आधुनिक विचारांची स्त्री असूनही हे सागावसं वाटतं की ऑफिसमधे तोकडे कपडे घालणे हे खालची वैचारीक पातळीच दाखवत असते. अनेकींचा पहेराव इतका तोकडा किंवा विचित्र असतो की पुरुषच काय स्त्रियासुद्धा त्यांच्याकडे वळून वळून बघत असतात. भारतात स्त्रियांना पंजाबी ड्रेस किंवा साडी नेसण्याची परवानगी असते कारण बर्‍याच स्त्रिया पाश्चात्य पोषाख कधीच करत नाहीत (किंवा नव्हत्या म्हणू). पुरुषांना त्याची गरज नाही कारण असंही पुरुषांनी रोजच्या व्यवहारात धोतर नेसणं अनेक वर्षांपूर्वी सोडलंय. आमच्या ऑफिसात तरी स्त्रियांकरतासुद्धा पोषाखसंहिता होती आणि ती पाळली जायची. एकदा तर HRने संहितेबाहेरचे कपडे घातलेल्या कर्मचार्‍यांना रू. ५०० चं गिफ्ट वाउचर दिलं होतं, योग्य कपडे घेण्यासाठी मदत म्हणून ;) थोडक्यात काय, तर कश्याप्रकारचा पोषाख चालवून घ्यावा हे पूर्णपणे ऑफिसच्या पॉलिसीवर अवलंबून असते.
  • Log in or register to post comments
स
समीरसूर Fri, 01/25/2019 - 06:47 नवीन
अतिशय संतुलित आणि वास्तवदर्शी प्रतिसाद. आवडला. आपण मुलींनी (कार्यालयात का असेना) तोकडे कपडे घालण्याविषयी खरा प्रतिसाद दिलात त्याबद्दल अभिनंदन! इथे काहींना हे मान्यच नाहीये की अशा तोकड्या कपड्यांमुळे प्रॉब्लेम्स होतात/होऊ शकतात. त्यांचा आपला एकच धोशा "मुलींनी वाट्टेल ते कपडे घातले तरी सगळ्यांनी त्यांचे कौतुकच केले पाहिजे आणि त्यांच्याकडे अजिबात न बघता संतपुरुषासारखे स्थिर राहिले पाहिजे". काहीतरी बिनडोक अपेक्षा! मी जिथे राहतो तिथल्या एका इमारतीजवळ सकाळी बहुतेक सगळ्या शाळांच्या बसचा स्टॉप असतो. ही इमारत जेव्हा बांधली जात होती तेव्हा तिथे एक वॉचमन होता. परप्रांतीय होता. या इमारतीजवळ बर्‍याच तरुण स्त्रिया त्यांच्या मुला/मुलींना सोडायला येतात. मी चालून परत येत असतांना त्या वॉचमनकडे बघत असे. कित्येक स्त्रिया घरच्या किंवा जिमच्या कपड्यांवर यायच्या. अजूनही येत असतील. माझे सकाळचे चालणे १० महिन्यांपासून बंद आहे. त्यावेळेस मी रोज निरीक्षण करायचो. वॉचमनच्या नजरेत वखवख स्पष्ट दिसायची. जिमचे किंवा जिममध्ये घालतात तसे तंग कपडे घालून स्त्रिया अर्धा तास तिथे उभ्या असायच्या. काहींच्या थोड्या मोठ्या मुलीदेखील तिथे असायच्या. तो वॉचमन अधाशासारखा हे सगळं पाहत असायचा. तो त्याच्या युपी किंवा बिहारच्या घरापासून हजार किलोमीटर लांब! एकटा. तरुण. जेमतेम २५ च्या आतबाहेर. गरीब. महिन्याचा जेमतेम सात-आठ हजार पगार. त्यातून एक-दोन हजार तो त्याच्या घरी पाठवत असणार. दिवसभर रस्त्यावरची सुखवस्तू, सुखद वर्दळ पाहतांना त्याला काय वाटत असेल याची कल्पना सहजच करता येते. भयंकर उपासमार झालेल्या माणसासमोर कुणी जर सुग्रास अन्नावर ताव मारत असेल तर त्याच्या तोंडाला पाणी सुटणारच. त्याचा तसा दोष नाहीच पण म्हणून अशा भावनांना वेसण घालणे जमले नाही तर काय होऊ शकते याची हजारो उदाहरणे भारतात आहेत. रोज अशी कित्येक उदाहरणे जन्म घेतच असतात. अशा कृत्यांना सरसकट विकृती म्हणणे योग्य असले/नसले तरी अशा विकृती/अविचार जगात असतातच; त्या कधीच जाणार नाहीत. अशी अपेक्षा ठेवणंच मुळी भाबडेपणाचं आहे. आमच्या कार्यालयात २९ जानेवारी २०१७ (रविवार) रोजी एका सेक्युरिटी गार्डने एका तरुण मुलीचा एका मीटींग रूममध्ये काँप्युटरच्या वायरने गळा आवळून खून केला होता. तो तिच्याकडे एकटक बघत असायचा. तिने त्याला तक्रारीची धमकी दिली होती. त्याच्याशी भांडली होती. मुळात तो गार्ड होता. गरीब. कमी शिकलेला. घरापासून हजारभर किलोमीटर लांब. कार्यालयात तरुण, आकर्षक, उत्तेजक कपड्यांमधल्या मुली बघून त्याचे डोळे न दिपते तर नवलच. पण तो एक किरकोळ गार्ड आहे म्हणून त्याच्याशी पातळी सोडून भांडणे हे त्याला रुचले नाही. त्या मुलीने त्या गार्डच्या नकळत त्याच्या वरिष्ठांना सांगीतले असते तर त्याची ताबडतोब दुसर्‍या इमारतीत किंवा दुसर्‍या लांबच्या कंपनीमध्ये उचलबांगडी झाली असती. किंवा त्याला रजा दिली असती. त्या मुलीचा जीव सहजच वाचला असता. समोरच्याच्या साध्याशा चुकीवर भडकून तमाशे करणे हे काही प्रत्येक समस्येवरचे उत्तर असू शकत नाही. दुर्दैवाने त्या मुलीला ही समज नव्हती. आजकाल वयाच्या ७-८ वर्षांपासून पुढच्या मुलींचे कपडेदेखील चिंतेचा विषय वाटतो. या वयात मुली झपाट्याने वाढत असतात. सुखवस्तू कुटुंबातल्या असल्याने या वयातल्या मुलींची वाढ शरीरावर दिसत असते. पार्किंगमध्ये, पार्कमध्ये, बाहेर कुठेही अशा मुली तंग कपडे घालून फिरतात तेव्हा आसपासच्या लोकांचे निरीक्षण करा. अक्षरशः सत्तरीतले म्हातारे ज्यांच्या दिव्यातले तेल संपत आलेले आहे ते देखील अगदी न्याहाळून निरखून बघत असतात. अर्थात सगळेच असे असतात असे अजिबात नाही. मी जिथून कंपनीची बस घेतो तिथे सकाळी एक आजोबा बसलेले असायचे. वय ७०-७५ च्या घरात. सकाळी बर्‍याच कंपन्यांच्या बसेस तिथे येतात. हे आजोबा तिथे वाट बघणार्‍या मुलींना न्याहाळत असायचे. समोरून जर कुणी मुलगी/स्त्री गेली तर अपादमस्तक ती नजरेच्या टप्प्याआड जाईपर्यंत तिला बघत बसायचे. काही गोष्टी आपल्या हातात नसतात पण काही सोप्या गोष्टी नक्कीच असतात. अगदी घाबरून, आपले स्वातंत्र्य सोडून जगायचे असे अजिबात नाही पण थोडे तरी तारतम्य ठेवून जगावेच लागते ना! आपली आणि आपल्या जवळच्या माणसांची काळजी आपण नाही घेणार तर कोण घेणार? कुचकामी सल्ले आपण प्रत्येक व्यक्तीला तर देऊ शकत नाही. ते प्रॅक्टिकल नाहीच. असे निरर्थक सल्ले देऊन दुनिया सुधरली असती तर तर आज चित्र वेगळे दिसले असते. प्रत्येक क्षणी जगाचं भान असणं आवश्यक!
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 01/25/2019 - 07:39 नवीन
अशा भीतीने आपल्या बिल्डिंगमध्येही जिमचे कपडे घालणं टाळून किंवा अन्य काही प्रकारचे कपडे टाळून बचावात्मक पवित्र्याने सेफ कपडे घालणं हे दुर्दैवी आहे. असं करण्याची आवश्यकता पडू नये. कोणा वॉचमन किंवा थेरड्याच्या वासनयुक्त नजरांमुळे आपल्या सवयी बदलाव्या हे फारच वाईट आहे. ऑफिसातला मुद्दा वेगळा. तिथे कामातून विचलित न होऊ देण्याचा प्रयत्न म्हणून संकेत ठरवले जातात. ते पाळले जात नसतील किंवा एका गटालाच लागू होत असतील तर ते चूकच.
  • Log in or register to post comments
स
समीरसूर Fri, 01/25/2019 - 07:57 नवीन
पण जिमचेच कपडे असं मी म्हणत नाहीये; मी ते एक फक्त उदाहरण दिलं. अतिशय तंग कपडे हा मुद्दा आहे. इतके तंग की त्यामुळे अशा नजरा जास्तच प्रमाणात वळाव्यात. प्रत्येक अंग अगदी ठाशीवपणे दिसेल असे जर कपडे असतील तर मग मात्र नजरा वळणारच. बाकी जिमचे किंवा इतर कुठलेही नॉर्मल, बर्‍यापैकी कंफर्टेबल, स्टायलिश पण व्यवस्थित कपडे घालणं याला बंधनं नसावीत हे योग्यच. आणि नाहीतच. अजूनही ६०-७० टक्के बायका असेच कपडे घालून वावरतात. सेफ कपडे घालायला लागणं हे दुर्दैवी खरं पण त्याला पर्याय नाही असं मला वाटतं. आणि अनसेफ कपडे (तोकडे, खोल गळ्याचे, अतितंग वगैरे) घालण्याचं तसं काही तार्किक, पटेल असं कारणही दिसत नाही. असे कपडे सर्रास घतले जातात हा मुद्दा अलाहिदा!
  • Log in or register to post comments
स
स्वलेकर Fri, 01/25/2019 - 08:04 नवीन
छान प्रतिसाद!!!
  • Log in or register to post comments
ज
जिन्क्स Fri, 01/25/2019 - 12:09 नवीन
बुर्ख्याची निर्मिती यातुनच झाली असेल ना?
  • Log in or register to post comments
स
समीरसूर Sat, 01/26/2019 - 09:36 नवीन
माहिती नाही. तो मुद्दा निराळा आणि धर्माशी निगडित आहे. इथे सुरु असलेल्या चर्चेशी तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचा अर्थाअर्थी संबंध नाही असे वाटते. एनीवे, तुम्हाला या प्रश्नाचे कधी उत्तर मिळाल्यास नक्की सांगा.
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ Fri, 01/25/2019 - 13:13 नवीन
रॉंग ऑन सो मेनी लेव्हल्स!!!! प्रतिसाद द्यायचा कंटाळा होता खर तर पण हे सगळं वाचलं आणि खरोखर धक्काच बसला!! किती आणि काय काय बोलायचं याच्यावर?! विषय कार्यालयीन पोषाखावरती होता पण तो आपण बराच पुढे नेला आहे आणि त्यातूनही खूप चुकीची उदाहरणे दिलेली आहेत! १. "
मुलींनी वाट्टेल ते कपडे घातले तरी सगळ्यांनी त्यांचे कौतुकच केले पाहिजे आणि त्यांच्याकडे अजिबात न बघता संतपुरुषासारखे स्थिर राहिले पाहिजे. काहीतरी बिनडोक अपेक्षा!
=>कौतुक करायला कोणीही सांगितले नाहीये पण "अजिबात न बघता संतपुरुषासारखे स्थिर राहायक्ला कोणाला काही प्रॉब्लेम?" मुळात फक्त संतपुरुषच स्थिर राहू शकतात हा सिद्धांतच "गुन्हेगारांना सहानुभूती देणारा आहे" उद्या एखादा मुलगा रात्री बर्मुडा घालून चहाला जाताना मुलींच्या घोळक्याने त्याला अडवून जबरदस्ती केली तर चालेल? "मुली चंचल असतात" असा काहीसा युक्तिवाद करून "मुलांचेच चुकले" हि गाडी रेटत नेता येईल पुढे? कपड्यांचे भान असावे पण कमी कपडे म्हणजे सगळ्या पुरुषांना आमंत्रण असतात का? सलवार कुर्ता घातलेल्या मुली नजरेतून सुटल्या आहेत का लोकांच्या? कि साडी घातलेल्या सुटलेल्या आहेत? २. "वॉचमनच्या नजरेत वखवख स्पष्ट दिसायची", "तो वॉचमन अधाशासारखा हे सगळं पाहत असायचा. " =>हे आपल्याला दिसत असून आपण त्याला कधी दम दिल्याचे लिहिले तरी नाहीये (म्हणजे प्रसंग तुम्ही लिहिला आहे म्हणून तुम्हाला विचारतोय) किंवा सोसायटीला सांगून त्याला कामावरून घालवला का? का जोपर्यंत काही घटना घडत नाही तोपर्यंत काहीच करायचं नाही? यावर कहर म्हणजे "तो त्याच्या युपी किंवा बिहारच्या घरापासून हजार किलोमीटर लांब! एकटा. तरुण. जेमतेम २५ च्या आतबाहेर. गरीब." त्याला कोणी आमंत्रण देऊन बोलावलंय नोकरी करायला? त्याने एखादी चोरी केली तरी याच न्याय लावाल? हे म्हणजे गुन्हेगारीला अधिकृत अधिष्ठान देणे झालं! आणि बदल कोणी करायचा तर जे लोक जिम चे कपडे घालून बाहेर येतायत त्यांनी (त्यात पण स्त्रियाच नाही का?), वॉचमन मध्ये बदल करणे गैरच असावे. ३. "भयंकर उपासमार झालेल्या माणसासमोर कुणी जर सुग्रास अन्नावर ताव मारत असेल तर त्याच्या तोंडाला पाणी सुटणारच. त्याचा तसा दोष नाहीच" =>काही लिहायची पण गरज नाही खर तर!! असं कोणी लिहू शकत याचाच आश्चर्य वाटतंय! "तोंडाला पाणी सुटणार?" "त्याचा दोष नाही?" काय मानसिकता आहे हि? आणि कुठून येतेय? ४. मुलीचा खून झाल्याची घटना बहुतेक पुण्यात इन्फी मध्ये झालेली त्यानंतर तुमची वाक्य पहा. वॉचमनच्या साठी : "मुळात तो गार्ड होता. गरीब. कमी शिकलेला. घरापासून हजारभर किलोमीटर लांब. कार्यालयात तरुण, आकर्षक, उत्तेजक कपड्यांमधल्या मुली बघून त्याचे डोळे न दिपते तर नवलच. " आणि मुलीच्या बाबतीत: "त्या मुलीचा जीव सहजच वाचला असता. समोरच्याच्या साध्याशा चुकीवर भडकून तमाशे करणे हे काही प्रत्येक समस्येवरचे उत्तर असू शकत नाही. दुर्दैवाने त्या मुलीला ही समज नव्हती." भडकणे! तेही दुसऱ्याच्या चुकीवर.... हि मुलीची चूक होती तुमच्या मते!

म्हणजे तो बघतोय तर बघु देत पण भडकू नका.

.. धन्य आहात! शेवटचे वाक्य पटले तुमचे त्यात भर घालून म्हणेन "लोकांनी असे निरर्थक सल्ले न देऊन दुनिया सुधरली असती तर तर आज चित्र वेगळे दिसले असते. " राग तुमच्यावर नाही पण गुन्हेगारांना सहानुभूती देऊन मुलींनाच दोषी ठरवणारी मनोवृत्ती फारच चुकीची आहे. बाकी, कार्यालयात कपड्यांचे नियम असावेत कि नसावेत हा त्या व्यवस्थापनाचा निर्णय आहे जर असतील तर सगळ्यांना असावेत आणि नसतील तर कोणालाही नसावेत.
  • Log in or register to post comments
स
स्रुजा Fri, 01/25/2019 - 17:44 नवीन
चला ! एक तरी विवेकी प्रतिसाद दिसला या धाग्यावर .. समीरसूर चे प्रतिसाद वाचून हबकायलाच झालं होतं. येता जाता दिसणार्‍या दुर्दैवी उदाहरणांवर पण सोयीस्कर मानसिकतेने कसा नॅरेटीव बदलता येतो याचं उत्तम प्रदर्शन आहे त्यांचे प्रतिसाद म्हणजे. एनिवे , हे काही एवढ्यात बदलत नाही. मिपावर चर्चा करुन काय होणार आहे ;)
  • Log in or register to post comments
स
समीरसूर Sat, 01/26/2019 - 08:59 नवीन
मिपावर चर्चा करुन काय होणार आहे ;) हे खरंच पण ज्या आपल्या हातातल्या गोष्टी आहेत त्यावर चर्चेने उपयोग होऊ शकतो. :-) बाकी मला अजून मुली तोकडे, खोल गळ्याचे, वगैरे कपडे का घालतात याचं उत्तर मिळालेलं नाहीये. अतिशय सोयिस्करपणे या प्रश्नाला बगल दिली जातेय. :-) असो.
  • Log in or register to post comments
ए
एमी Sat, 01/26/2019 - 01:59 नवीन
अगदी माझ्या मनातलं!
  • Log in or register to post comments
स
समीरसूर Sat, 01/26/2019 - 08:55 नवीन
आपला प्रतिसाद वैचारिक आणि सैद्धांतिक पातळीवर अगदी बरोबरच आहे; माझा मुद्दा आहे की आजच्या काळात व्यावहारिकदृष्ट्या शक्य आहे का? वैचारिक, सैद्धांतिक, तात्विक वगैरे पातळीवर अनेक आदर्श गोष्टी १००% बरोबरच असतात. दुर्दैवाने खर्‍या जगात त्यांना फारशी किंमत नसते. आणि जग आपल्या तत्वांनुसार चालत नाही. स्थिर रहाण्याला काय प्रॉब्लेम हाच प्रश्न किती सैद्धांतिक आहे. असं शक्य आहे का? असं खरंच जगात घडतंय का? बाहेर ९५% स्थिर प्रवृत्तीची माणसे आहेत असे चित्र आहे का? बाकी जी विषमता मी सांगीतली तो एक सामाजिक प्रश्न आहे. गुन्हेगारीची पाळेमुळे तिथे रुजतात हे सत्य नाकारून कसे चालेल? आपण त्याबाबतीत काय आणि किती तात्विक विचार करतो याला खरोखर किती महत्व आहे? मुलींकडे बघणे ही सर्वांसमोर भांडण करण्याएवढी घटना आहे? हेच जर तिच्या एखाद्या वरिष्ठ अधिकार्‍याने केलं असतं तर ती अशीच वागली असती? गार्ड चुकीचाच होता पण त्याला अधिक संयतपणे हँडल करता आलं असतं हे माझं मत. आणि कंपनीमध्ये एकंदरित बर्‍याच लोकांचं असच मत होतं. जीव गेला त्या मुलीचा हे विसरून कसं चालेल? प्रश्न मी दम देण्याचा - असे कितीतरी वॉचमन, गार्ड्स असतात. असे अजून कितीतरी लोक असतात. जो दिसेल त्याला मी दम देत सुटणे किती सयुक्तिक आहे तुम्हीच विचार करून बघा. शिवाय असं बेधडक कन्फ्रण्ट करायला लोकं बिचकतात कारण आजकाल कोण कसे डूख मनात धरून काय करेल याचा नेम नाही. असं सिंबागिरी करायला हा सिनेमा नाही. कथा-कादंबरी नाही. असो.
  • Log in or register to post comments
स
समीरसूर Sat, 01/26/2019 - 09:06 नवीन
माझा वरील प्रतिसाद शब्दबंबाळ यांच्या प्रतिसादासाठी आहे.
  • Log in or register to post comments
प
पुंबा Wed, 01/30/2019 - 08:59 नवीन
++++१११११ गुन्हेगारांना, गुन्हेगारीच्या मागच्या विकृत वृत्तीला खतपाणी घालणारे प्रतिसाद आहेत लेखकाचे.
  • Log in or register to post comments
स
स्मिता. Fri, 01/25/2019 - 14:06 नवीन
समीरसूर, तुमचे इतर ठिकाणी लिखाण पटत असले तरी वरचा प्रतिसाद काहीसा खटकला. (तुमची कळकळ पोहोचली ... पण कारणमीमांसा नाही) मी मा़झं मत कार्यालयातल्या पहेरावावर दिलं, रस्त्यावरच्या कॅज्युअल पोषाखासाठी नाही. तुम्ही कदाचित विचार करता करता सगळीकडच्याच स्त्रियांच्या पोषाखावर पोहोचलात. तुम्ही सांगितलेलं बचावात्मक धोरण बहुतेक मध्यमवर्गीय घरांमधून दिसतं, मीसुद्धा तेच करते. पण येवढं सांगू शकते की वरच्या वॉचमनच्या उदाहरणात बसस्टॉपवरच्या स्त्रिया अंगभर, ढगळ, ओढणी 'व्यवस्थित' पांघरलेला असा पंजाबी ड्रेस घालून आल्या असत्या तरी त्या वॉचमनने त्यांना तसंच पाहिलं असतं. त्याची कारणं शोधणं हा वेगळा विषय. पण त्यात त्या वॉचमनचा दोष नाही हे मात्र मनाला पटत नाही. दुसर्‍या एका प्रतिसादात आल्याप्रमाणे जर त्या वॉचमनने सोसायटीत चोरी केली तरी त्याला अशीच सहानुभूती दाखवाल का? दुसरा विचारः पण सध्या हीच दुर्दैवी वस्तुस्थिती आहे हे सुद्धा नाकारता येत नाही.
  • Log in or register to post comments
स
समीरसूर Sat, 01/26/2019 - 09:04 नवीन
ढगळ कपड्यातल्या मुलीकडेही त्याने तसंच पाहिलं असतं हे खरंच. पण तोकडे कपडे घातलेल्या मुलीकडे त्याचं तसं बघण्याची इंटेसिटी जास्त असू शकेल का? कुठलेतरी गैरकृत्य करण्यास तो धजावेल इतकी? बाय द वे, आपले प्रतिसाद सगळ्यात संयत, दोन्ही बाजूंचा विचार करून लिहिलेले, आणि वैयक्तिक इज्जत न काढणारे आहेत हे नमूद करू इच्छितो. :-) धन्यवाद.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Fri, 01/25/2019 - 19:50 नवीन
समोरच्याच्या साध्याशा चुकीवर भडकून तमाशे करणे हे काही प्रत्येक समस्येवरचे उत्तर असू शकत नाही. दुर्दैवाने त्या मुलीला ही समज नव्हती.
त्या मुलीने केला तो तमाशाच होता आणि त्या गार्डने केली ती साधीशीच चूक होती हे इतक्या ठामपणे कसं काय म्हणताय तुम्ही? आणि ते ही इतक्या सहजपणे की त्यातून एक खून झाला ही गोष्टच नॉर्मलाईज करून टाकलीत! बायकांनी घातलेल्या कपड्यांचा पुरुषांच्या वागणुकीशी फारसा संबंध नसतो हे कैकवेळा सिद्ध झालंय. बुरखा घातलेल्या बायकांना वळून वळून बघणाऱ्या पुरुषांचा एक फोटो सतत फिरत असतो इंटरनेटवर. बायकांनी तंग कपडे घालणं म्हणजे त्यांच्या लोकांनी आपल्याला बघावं आणि कौतुक करावं ह्या स्वभावाचा भाग आहे हे ठासून सांगितल्या जातं आणि त्या स्वभावाला बायकांनी मुरड घालायलाच हवी हे ही. पण पुरुषांच्या स्वभावाला मात्र "स्वभावच आहे त्यांचा तो, काय करणार बिचारे" ,"भुकेला माणूस, घरापासून लांब" , "boys will be boys" अशी अत्यन्त "लॉजिकल" कारणं दिली जातात. बायकांनी घातलेल्या कपड्यावर पानं भरून लिहिताय तुम्ही. पण पुरुषांनी कसं वागावं ह्यावर 1% सुद्धा बोललं जात नाही. पुरुषांचे मेंटल कंडिशनिंग करणं जणू काही शक्यच नाहीये. बायकांनी मात्र सेफ कपडे घालावेत कारण ते "प्रॅक्टिकल" आहे. स्पष्ट म्हणा ना की ते पुरुषांच्या सोयीचं आहे. तुम्ही बायकांसाठी असलेल्या असुरक्षित वातावरणा करिता पुरुषांना जबाबदार कधी ठरवणार? पुरुष कधी जबाबदारी स्वीकारणार? दुसऱ्या माणसाने घातलेले कपडे हा आपल्या नाक खुपसण्याचा विषय नाही हे पुरुष कधी शिकणार? आणि पुरुषांमुळे त्रास होत असेल (आपल्या जवळच्या माणसांना वगैरे..) तर त्याचा भार बायकांवरच टाकायचं कधी बंद करणार? अरे एकदा तरी म्हणा की आम्ही पुरुषांनी वागणुकीत काही बदल केले पाहिजेत. (जिलेटच्या ऍडला मिळालेला रिस्पॉन्स बघता ते अवघडच आहे) आणि एक मिनिट, तुम्ही ऑफिसमध्ये घातलेल्या कपड्यांबद्दल बोलत होतात (कितीही असभ्यपणे अनावश्यक वर्णनं करत होतात) तोवर एकवेळ ठीक होतं. पण आता तुम्ही जिमला जाणाऱ्या बायका आणि देव जाणे अजून कोण कोण ह्या चर्चेत ओढून आणलं आहे. तेव्हा मुद्दा हा तुम्हीच समस्त बायकांच्या पेहराववर नेलाय. फक्त ऑफिस पुरता विषय असेल तर HR ला "सभ्य" भाषेत मेल करता येईल. अमी म्हणतात तसं युनिफॉर्म ठरवून देता येईल. स्त्रियांना गाईडलाईन देता येईल. ऑफिस मध्ये सगळं काही सगळ्यांसाठी समान नसतंच. जगभर स्त्रिया नाही का समान वेतना साठी लढा देत आहेत. तुम्ही ड्रेस कोडसाठी द्या. पण बायकांना वळून बघता त्याचा दोष बायकांवर काय टाकता? तसं असतं तर लहान लेकरू किंवा बुरख्यातल्या बाईला भयंकर गोष्टींना सामोरे जावे लागले नसते कधी. जगाचं भान असावं म्हणे...
  • Log in or register to post comments
स
समीरसूर Sat, 01/26/2019 - 09:32 नवीन
तुम्ही जे जे लिहिलं आहे तसलं मी काहीही करत नाहीये. :-) तुमचं अ‍ॅनॅलिसिस वाचून मला धक्काच बसला. कृपया असला विचार करू नका. वॉचमनचं चुकलंच आहे. प्रश्नच नाही. मी दोन्ही बाजूंमधला फरक नमूद करून तिथे गुन्हा घडण्यासाठी किती पोषक वातावरण आहे हे सांगतोय. मी पुरुषांच्या मनोवृत्तीचं समर्थन वगैरे करत नाहीये. असे अगदी "स्त्रीमुक्ती" टाईप मला पुरुषी मानसिकतेचे समर्थक वगैरे लेबलं लावू नका. मी तसा नाहीये. तुमच्या प्रतिसादात तुम्ही अतिअ‍ॅनॅलिसिस (जरा जास्तच) करून अगदी संबंध नसलेले निष्कर्ष काढता आहात. मी फक्त बाहेरच्या जगात काय चाललंय आणि त्यातलं फारच थोडं आपल्या हातात आहे हे सांगतोय. तुमच्या सगळ्या सुपर अ‍ॅनॅलिसिसचं माझ्याकडे हेच उत्तर आहे. "कितीही असभ्यपणे अनावश्यक वर्णनं करत होतात" - असभ्य वगैरे अजिबातच नाहीये. अशी बरीच वर्णनं मिपावर आधी येऊन गेलीयेत आधी. शिवाय ते कसं सांगायचं हा प्रश्न होताच. कित्येक अनौपचारिक गप्पांमध्ये (मेन + वुमेन) कुठल्याप्रकारची भाषा नॉर्मल आहे हे बघूनच मी असे लिहिले. मला वैयक्तिकरीत्या यात आक्षेपार्ह काहीच वाटत नाही. * आमच्या कार्यलयातल्या एका मुलीने आम्ही चहा पिऊन येत असतांना थोड्या विचित्र आडनावांचा विषय निघाला आला असता आम्हाला सांगीतले "मला सगळ्यात कॉमेडी आडनाव महाडिक वाटतं." आणि असं सांगून ती खदाखदा हसली होती आणि बाकीचे सगळेदेखील. बाकी मला अजून मुली तोकडे, खोल गळ्याचे, वगैरे कपडे नक्की कशासाठी घालतात याचं उत्तर मिळालेलं नाहीये. अतिशय सोयिस्करपणे या प्रश्नाला बगल दिली जातेय. :-) असो.
  • Log in or register to post comments
न
नेत्रेश Sat, 01/26/2019 - 20:32 नवीन
तुमचे कळकळ समजली पण तुमच्या प्रतिसादा मागची भावना समजुन घेण्यापेक्षा शब्दाचा कीस काढला गेलेला पाहुन वाईट वाटले. "बाकी मला अजून मुली तोकडे, खोल गळ्याचे, वगैरे कपडे नक्की कशासाठी घालतात याचं उत्तर मिळालेलं नाहीये. अतिशय सोयिस्करपणे या प्रश्नाला बगल दिली जातेय. :-) असो." तुमच्या या प्रश्णाने उत्तर अजुनही कुणी दीले नाही, ते द्यायचा प्रयत्न करतो: कदाचित आपण बाकीच्यांना आकर्षक वाटावे, लोकांनी आपल्याकडे वळुन पहावे अशी अशी सर्वांचीच सुप्त ईच्छा असते. त्यासाठी काही केस रंगवतात, मेकप, कपडे, हेअरस्टाईल, इत्यादीवर वेळ व पैसा खर्च करतात. (त्यात काही चुकीचे करत आहेत असे म्हणायचे नाही). अंगप्रदर्शन करणारे कपडे घालण्यामागे आपण ४ जणांत जास्त उठुन दीसावे, जास्त लोकांनी आपल्याला नोटीस करावे, आपल्या सुडौल व प्रमाणबध्द शरीराला अ‍ॅप्रिशीएट करावे हा उद्येश असावा. पण 'मी कसेही कपडे घालेन, लोकांनी माझ्याकडे वाईट नजरेंने बघु नये' हे म्हणणे आणी 'चोरी करणे गुन्हा आहे, व तो कुणी करु नये, मी माझ्या घराला कडी / कुलुप लावणार नाही' असा पवित्रा घेणे यात फारसा काही फरक नाही. उघडे टाकलेले घर म्हणजे चोरी करण्यासाठी परवानगी नव्हे, पण झालेल्या चोरीसाठी काही प्रमाणात घरमालक जबाबदार ठरतो. (ईंशुरंस कंपन्या कायदेशीररीत्या मालकाला जबाबदार ठरउन भरपाई नाकारु शकतात). आपल्या मालमत्तेचे व शरीराचे संरक्षण करण्याची प्राथमीक जबाबदारी आपली स्वतःची असते हे वाद घालण्यासाठी प्रतिसाद देणार्‍यांना हे समजावणे अशक्य आहे. ज्या समाजात लोकांना बेसिक डीसेंसी समजत नाही (कुठेही थुंकणे / कचरा टाकणे, वहातुकीचे नियम पाळणे, ईत्यादी ) त्या समाजातील सर्वांचा आपल्या भावनांवर, विचारावर, ईंद्रींयांवर १००% काबु असावा ही भाबडी (व अवास्तव) अपेक्षा आहे. * वरील प्रतिसाद स्त्री व पुरुष दोघांनाही लागु पडतो.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Sun, 01/27/2019 - 05:45 नवीन
मुळात इथे चर्चा इन्शुरन्स कंपनीने भरपाई बद्दल नाही, तर दरोडेखोरांची बाजू घेण्याबद्दल आहे. घर बंद असले तरी जबरी चोरी होते, आणि दार उघडे ठेवले तरी चोरी होते. दार उघडे होते म्हणून चोर आत शिरले यात चोरांचा काय दोष असे म्ह्णून चोरीचे नैतिक समर्थन देता येत नाही.
  • Log in or register to post comments
स
समीरसूर Sun, 01/27/2019 - 09:10 नवीन
अहो दादा, इथे दरोडेखोरांची बाजू कुणीही घेत नाहीये! ते माझे नातेवाईक नाहीत. मुद्दा हा आहे की दरोडेखोर कधी, कुठे, किती क्रूर पद्धतीने हल्ला करतील याचा नेम नाही म्हणून आपल्या घराची सुरक्षा व्यवस्थित ठेवणे हा आहे. दरोडे पडले तरी चालतील, मी माझे घर सताड उघडे ठेवेल; हे माझं घर आहे आणि मी ते वाट्टेल तसे उघडे ठेवेल असे करून नाही ना चालत? जरा मुद्दा समजून घ्या. नैतिक-बितिकचा संबंधच नाहीये इथे!
  • Log in or register to post comments
स
स्वलिखित Sun, 01/27/2019 - 18:23 नवीन
नाण्याला दुसरी बाजू असते हे यांना कोण सांगणार , तुम्ही यांना घराचे उदाहरण देताय , हे काय काय उघडे ठेवतील याचा भरवसा नाही ..
  • Log in or register to post comments
स
समीरसूर Sun, 01/27/2019 - 07:40 नवीन
आपण माझा मुद्दा योग्य पद्धतीने समजून घेतल्याबद्दल धन्यवाद! बाकी बहुतेकांनी नानाविध अ‍ॅनॅलिसिस करून अतार्किक असे निष्कर्ष काढून मुद्दा नीट समजून न घेता नुसते ठोकण्याचे धोरण ठेवले. मुद्दा निष्कारण पोलिटिसाईझ केला गेला. काही मुद्दे असे असतात की त्यांविषयी तुम्ही थोडे वेगळे मत मांडले की समाजाच्या आणि ठोकळेबाज विचार करणारांच्या दृष्टीने खलनायक, देशद्रोही, पुरुषप्रधान संस्कृतीचे पाईक, वगैरे लगेच ठरता. सध्या वुमन एमपॉवरमेंट हा असाच एक सेन्सेटिव्ह मुद्दा आहे. एक अक्षर वेगळे बोला; सगळे पॉलिटिकली करेक्ट लोक तुमच्यावर तुटून पडतात. हे दुर्दैवी आहे. वर एका प्रतिसादात तर कसले भयंकर अ‍ॅनॅलिसिस केलेले आहे. ते विद्वत्ताप्रचूर अ‍ॅनॅलिसिस वाचून मला हसावे की रडावे हेच कळेना. :-) असो. आपण अतिशय समर्पक प्रतिसाद दिलेला आहे हे नमूद करतो.
  • Log in or register to post comments
स
समीरसूर Sun, 01/27/2019 - 07:41 नवीन
माझा वरील प्रतिसाद नेत्रेश यांच्या प्रतिसादाला आहे
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sun, 01/27/2019 - 06:04 नवीन
अजून मुली तोकडे, खोल गळ्याचे, वगैरे कपडे नक्की कशासाठी घालतात
त्याच कारणासाठी ज्यासाठी काही तरुण दंडावरच्या बेडक्या , शेहेचाळीस इंच छाती आणि चार-सहा-आठ पॅकचं पोट उठून दिसेल असे टीशर्टस घालतात. त्याच कारणासाठी ज्यासाठी काही तरुण केविनक्लेन अंडरवेअरची पट्टी दाखवण्यासाठी लो वेस्ट जीन्स घालतात. पण त्यांच्याकडे स्त्रिया वखवखलेल्या नजरेने पाहत नसाव्यात. त्यांचा विनयभंगही होत नसावा. त्यांच्यावर बलात्कार होत नसावेत आणि त्यांचा खूनही होत नसावा. म्हणजे प्रॉब्लेम कपड्यांचा नसून ज्यांच्या नजरेत वासना आणि मनात विकृती आहे त्यांचा आहे.
  • Log in or register to post comments
स
समीरसूर Sun, 01/27/2019 - 09:22 नवीन
माझ्या कंपनीत असे तरुण आणि अशा तरुणी याचे गुणोत्तर १:१०० असे असेल. एकूण कर्मचारी संख्या २५,०००. शिवाय, तरुण शर्टलेसदेखील वावरू शकतात; मुली वावरू शकतात काय? फरक आहेच आणि तो असणारच आहे. नाकारण्यात काय हशील? आपल्या देशात बलात्कार स्त्रियांवर होतात; पुरुषांवर होतात का? होतही असतील तर प्रमाण काय? दिवसाला संपूर्ण देशात शेकडो बलात्कार स्त्रियांवर होतात. अहो, माझा मुद्दा समजून घ्या. प्रत्यक्ष जगात काय चालतं हे बघायला पाहिजे. मी रात्री १ वाजता बिनधास्त मंगला टॉकीजवरून एकटा घरी येऊ शकतो. वाटेत लघूशंकेला थांबू शकतो. मुली/स्त्रिया हे करू शकतील काय? करू शकतील; नाही असं नाही पण किती रिस्की आहे याची कल्पना आहे का? आमच्या इथली एक मुलगी आठ दिवस कामासाठी दिल्लीला जायला तयार नाही कारण तिला दिल्लीची भीती वाटते. हे वास्तव आहे. हे तुम्ही आम्ही आपल्या स्वप्नाळू तत्वांनी नाही बदलू शकत. म्हणूनच आपण काळजी घ्यायला हवी हा माझा मुद्दा! वास्तव नाकारण्याने ते बदलत नाही.
  • Log in or register to post comments
न
नेत्रेश Sat, 01/26/2019 - 21:33 नवीन
"समोरच्याच्या साध्याशा चुकीवर भडकून तमाशे करणे हे काही प्रत्येक समस्येवरचे उत्तर असू शकत नाही. दुर्दैवाने त्या मुलीला ही समज नव्हती. त्या मुलीने केला तो तमाशाच होता आणि त्या गार्डने केली ती साधीशीच चूक होती हे इतक्या ठामपणे कसं काय म्हणताय तुम्ही? आणि ते ही इतक्या सहजपणे की त्यातून एक खून झाला ही गोष्टच नॉर्मलाईज करून टाकलीत!" "समोरच्याच्या साध्याशा चुकीवर भडकून तमाशे करणे हे काही प्रत्येक समस्येवरचे उत्तर असू शकत नाही." हे समिरसुर यांचे म्हणणे बरोबर आहे. १. वाईट नजरेने बघणे ही खुन करण्याच्या तुलनेत साधी चुक वाटते. २. विशेषतः हा गुन्हा पुरुष श्रेष्ठत्वाच्या मानसिकतेमुळे झालेला वाटतो आहे. त्या मुलीच्या ऐवजी एखाद्या मुलाने गार्डचा पाणउतारा केला तर कदाचित त्याने गुपचुप सहन केला असता. पण एका मुलीने सर्वांसमोर केलेला पाण उतारा त्याला खुप जास्त झोंबला असावा. कारण स्त्री म्हणजे पुरुषापेक्षा कमीच हे मनात कायम भीनलेले. अशी माणसे खुप धोकादायक असु शकतात हे लक्षात ठेवायला हवे. हळुहळु प्रबोधनाने लोकांचि मेंटॅलिटी बदलेल, पण ही मानसिकता उच्चशिक्षीतांमध्येही अद्यापही बर्‍याच प्रमाणात आहे. अशा माणसांचे प्रबोधन करणे सोपे काम नाही. अपमान करुन ही मेंटॅलिटी बदलणे कदापी शक्य नाही, उलट आपण स्वतःला धोक्यात घालत असतो. (पाळीव हतींना माहुत अंकुश लाउन कंट्रोल करु शकतो, पण जंगली हत्ती त्याला चिरडुन मारतील. तेव्हा जंगली हती प्रशिक्षीत होईपर्यंत वाट पहाणे ईष्ट.) ३. म्हणुनच अशा केसेसमध्ये कंपनी पॉलीसी फॉलोकरणे केव्हाही सेफ. सर्व कंपन्याची पॉलिसी असे मॅटर HR व Legal कडे रीपोर्ट करणे अशीच असते. त्याचे कारण employees ची सुरक्षीतता सर्वात महत्वाची. त्या मुलीची चुक ही की तीने कंपनी प्रोटोकॉल फॉलो केला नाही. गार्डला स्वतः जाब विचारायला गेली व त्याचा सर्वांसमोर पाणउतारा केला, परीणामतः स्वतःचा जीव गमाउन बसली. त्यात गार्डची चुक आहेच, पण त्या गार्डला फारतर ५ - १० वर्षांची शीक्षा होईल. मुलीचा गेलेला जीव काय परत येणार आहे का?
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sun, 01/27/2019 - 03:03 नवीन
१००% सहमत.
आमची विचारसरणी अशी आहे, त्याचा कार्यकारण भाव समजून घ्या, पण तुम्ही आम्हाला उत्तेजित करणारे कपडे घालू नका. शिवाय आम्हाला चारचौघात/एकट्यानेही समज देऊ नका. नाहीतर जे काही परिणाम होतील त्याला आमची विचारसरणी कमी आणि तुमचे कपडे जास्त कारणीभूत असतील.
ही विचारसरणी केवळ घातकच नव्हे तर विकृतीचे समर्थन करणारी आहे. 'त्या' मुलीने प्रोटोकॉल फॉलो केला असता तरी, नोकरी गेल्याने/समज, दंड, शिक्षा दिल्याने त्या गार्डने सूड उगवला असता, याची शक्यता खूप जास्त आहे. एखादया पुरुषाने हेच केलं असतं तरी त्या गार्डने गुपचूप ऐकून घेतलं असतं, असं काही नाहीये. दुसरीकडे, समजा तशाच नजरेने स्टाफ पैकी कोणी वारंवार बघितले असते, तरी त्या मुलीने/कोणत्याही मुलीने तक्रार केलीच असती. करायलाच पाहिजे. गार्डने बघितलं, मुलीनं तक्रार केली/तमाशा केला, त्याने खून केला यात गार्डची सांस्कृतिक जडणघडण समजून घेऊन त्याला सहानुभूती दाखवण्याचा प्रश्नच येत नाही!
  • Log in or register to post comments
स
समीरसूर Sun, 01/27/2019 - 09:29 नवीन
विकृतीचे समर्थन? :-) तो गार्ड काही माझा भाऊ नव्हता. मला त्याचं नावही आठवत नाही. त्या मुलीचं मात्र आठवतं. तिचा चेहरादेखील आठवतो. आणि ती या जगात नाहीये हे ही आठवतं. माझ्या इतर प्रतिसादात मी माझा मुद्दा मांडलेला आहे त्यामुळे नव्याने या प्रतिसादाला प्रतिसाद देत नाही. माझ्या कुठल्याच प्रतिसादात मी गुन्हेगाराचे समर्थन केलेले नाही; त्यांना सहानुभूती दिलेली नाही. मी फक्त मानसिक पातळीचं विश्लेषण करून गुन्हे घडण्यास विशिष्ट परिस्थिती/घटना कशी पोषक असते हे नमूद केलं आहे. खून करणार्‍या गार्डचं मी समर्थन करतोय??????????????????? अहो, किती विनोदी आहे हे. :-) दहा वर्षे झाली मला मिपावर. थोडातरी विचार करा....
  • Log in or register to post comments
प
पुंबा Wed, 01/30/2019 - 08:57 नवीन
आमच्या कार्यालयात २९ जानेवारी २०१७ (रविवार) रोजी एका सेक्युरिटी गार्डने एका तरुण मुलीचा एका मीटींग रूममध्ये काँप्युटरच्या वायरने गळा आवळून खून केला होता. तो तिच्याकडे एकटक बघत असायचा. तिने त्याला तक्रारीची धमकी दिली होती. त्याच्याशी भांडली होती. मुळात तो गार्ड होता. गरीब. कमी शिकलेला. घरापासून हजारभर किलोमीटर लांब. कार्यालयात तरुण, आकर्षक, उत्तेजक कपड्यांमधल्या मुली बघून त्याचे डोळे न दिपते तर नवलच. पण तो एक किरकोळ गार्ड आहे म्हणून त्याच्याशी पातळी सोडून भांडणे हे त्याला रुचले नाही. त्या मुलीने त्या गार्डच्या नकळत त्याच्या वरिष्ठांना सांगीतले असते तर त्याची ताबडतोब दुसर्‍या इमारतीत किंवा दुसर्‍या लांबच्या कंपनीमध्ये उचलबांगडी झाली असती. किंवा त्याला रजा दिली असती. त्या मुलीचा जीव सहजच वाचला असता. समोरच्याच्या साध्याशा चुकीवर भडकून तमाशे करणे हे काही प्रत्येक समस्येवरचे उत्तर असू शकत नाही. दुर्दैवाने त्या मुलीला ही समज नव्हती.
सिरियस्ली???? समीरसूर, तुम्हाला नक्की हेच म्हणायचे आहे का? धक्कादायक विचार आहेत तुमचे.
  • Log in or register to post comments
ए
एकुलता एक डॉन Tue, 02/19/2019 - 10:31 नवीन
त्यांचे विचार आदर्शवाडी नसले तरी वास्तव वादी आहे
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Fri, 01/25/2019 - 03:00 नवीन
स्मितातै, धन्यवाद सर्वप्रथम तुम्ही विषयाला अनुसरून प्रतिसाद दिल्याबद्दल.. !! चर्चेचा विषय हा आहे कि बहुतांश स्त्रिया कार्यालयात काम करताना वेशभूषेची आचारसहिंता का पाळत नाहीत? या गोष्टीमुळे ऑफिस चे वातावरण नक्कीच बिघडते तरीही दुर्लक्ष का केले जाते या विषयावर? हा माझा प्रश्न होता, पण नेमक्या हा मुद्दा सोडून धागा इकडे तिकडे भरकटत राहिला. आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Fri, 01/25/2019 - 15:12 नवीन
" मी म्हणे उगा रहावे, जे जे दिसेल ते ते पहावे"
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 01/26/2019 - 10:45 नवीन
शेवटी सारांश काय ? काय ठरलं ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Sun, 01/27/2019 - 03:24 नवीन
किंचित अवांतराबद्दल क्षमस्व ! "स्त्रीयांना कसेही कपडे घालण्याचे स्वातंत्र्य हवे , त्यांच्याकडे बघताना पुरूषांना तारतम्य हवे" असे स्पष्ट मत असलेल्या लोकांना एक साधा प्रश्न : मी बॉडी बिल्डर आहे (समजा) अगदी पार्श्व भागावर फुलपाखरू निघण्या एवढा . तर मला दैनंदिन कामकाज करताना (बस , आॕफिस , भाजी मंडई इत्यादी ठिकाणी वावरताना ) बॉडी बिल्डर घालतात (माझे फुलपाखरू दिसेल अशी) तशी शॉर्ट घालता येईल का ?
  • Log in or register to post comments
झ
झेन Sun, 01/27/2019 - 03:51 नवीन
समीरसूर यांचा सूर जरा चूकल्यासारखा वाटतो पण त्यांचा उद्देश वाईट नसावा. जसे ट्रॅफिक मधून जाताना कोण बरोबर कोण चूक या पेक्षा आपले नूकसान न होता वेळेत पोचणे महत्त्वाचे. यात नियम न पाळणा-या माजूर्ड्या कूत्र्यांचे समर्थन नाही. त्यांचे प्रबोधन वगैरे जन्मात शक्य नाही.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sun, 01/27/2019 - 06:19 नवीन
म्हणून ते माजोरडे कुत्रे बिचारे किती गरीब आहे, बिचाऱ्याला वीस सेकंद सिग्नलला थांबायलासुद्धा वेळ नव्हता, बिचाऱ्याला पेट्रोल परवडत नसल्यामुळं 200 मीटर पुढे जाऊन यूटर्न घेण्याऐवजी 150 मीटर उलट्या दिशेने यावं लागलं, बिचाऱ्यांना गाडी आणि पेट्रोल परवडत नसल्यामुळे एका मोटारसायकलवर तीन जण जातात. आणि त्यांच्यामुळे तुमच्या सजवलेल्या गाडीला अपघात झाला तर तुम्ही चूक आहात. हे गरीब बिचारे असतील तिथे तुम्ही जायला नको होतं किंवा तुमची गाडी महिंद्रा जीप सारखी दणकट हवी, जेणेकरून तुमच्या गाडीला ते गरीब बिचारे धडकणार नाहीत किंवा धडकले तरी तुमच्या गाडीचं फारसं नुकसान होणार नाही किंवा झालंच तर ते सोसलं पाहिजे किंवा धडकल्यावर त्या गरीब बिचाऱ्यांना तिथेच थांबण्याची विनंती करून तुम्ही वाहतूक पोलिसांना सांगायला हवं. पण तुम्ही तुमची नाजूक गाडी रस्त्यावर नाही आणायची आणि सजवायची तर बिलकुल नाही.
  • Log in or register to post comments
स
समीरसूर Sun, 01/27/2019 - 09:49 नवीन
अहो, तुमचं म्हणणं पटतं मला पण याला आपण काहीही करू शकत नाही हे लक्षात घ्या. हे असंच चालणार आहे. हे आपण बदलूच शकत नाही. म्हणून आपण आपली काळजी घ्यायची. माझा बंगळूरचा सहकारी हेल्मेट घालून होता. नीट चालला होता. कुठलीतरी एसयुव्ही वेगात आली आणि आदळली त्याच्या बाईकच्या मागे. कुठलीही चूक नसतांना तो गेला. आपण हे सगळं बदलूच शकत नाही हे ल्क्षात घ्या. एक वेळ होती मला आशा होती की हे कधीतरी बदलेल पण भारतीय लोकं हे बदलण्यापलिकडे आहेत. आपण कधीच बदलणार नाही. भ्रष्टाचार, जातीभेद, गलिच्छ राजकारण, पाणीटंचाई, बकालपणा, प्रदूषण, मुजोरी, ढोंगीपणा, स्त्रीभ्रूणहत्या, गटारं झालेल्या नद्या, अप्रामाणिकपणा, आळस, वशिलेबाजी, मग्रुरी...हे सगळं असंच चालू राहणार आहे. हे आपण बदलूच शकत नाही कारण कुणाचीच बदलण्याची मुळात इच्छाच नाहीये.
  • Log in or register to post comments
स
समीरसूर Sun, 01/27/2019 - 09:41 नवीन
मी माझा मुद्दा वेगवेगळी उदाहरणे देऊन विशद केला आहे. त्यातून लोकांना माझ्या लिखाणाचा उद्देश कळू नये हे मोठे आश्चर्यच आहे. कसलं प्रबोधन हो? जगात कुणाकुणाचं प्रबोधन करत फिरणार आहोत आपण? भारतात तरी ती अशक्य गोष्ट आहे. उगीच आदर्शवादाच्या नादाला जाण्यात काही अर्थ नाही. फूटपाथवरून बेफाम दुचाकी नेणार्‍यांना आवरून बघा म्हणा एकदा. मग कळेल आपले प्रबोधनाचे प्रयत्न किती सफल होतायेत ते. एखादा येऊन कानफाटात देऊन जाईल ते एक वेगळंच. नेमकं हेच काही लोकांना कळत नाहीये. ते आपले गुन्हेगारांचं समर्थन, पुरुषप्रधान संस्कॄतीचे समर्थक, बुरखा संस्कृतीचे समर्थक, दरोडेखोरांचं समर्थन, स्त्री स्वातंत्र्यावर घाला, विकृतीचे पुजारी वगैरे काय काय बरळत चाललेत...धन्य आहेत सगळे.
  • Log in or register to post comments
स
समीरसूर Sun, 01/27/2019 - 10:09 नवीन
काही प्रतिसादातले अ‍ॅनॅलिसिस्/निष्कर्ष्/आरोप वगैरे वाचून मला आश्चर्यच वाटले. हसूही आले. काही प्रतिसादांमधला अतिआदर्शवाद तर भाबडेपणाचा कळस होता. बहुतेकांनी नानाविध अ‍ॅनॅलिसिस करून अतार्किक असे निष्कर्ष काढून मुद्दा नीट समजून न घेता नुसते ठोकण्याचे धोरण ठेवले. मुद्दा निष्कारण पोलिटिसाईझ केला गेला. काही मुद्दे असे असतात की त्यांविषयी तुम्ही थोडे वेगळे मत मांडले की समाजाच्या आणि ठोकळेबाज विचार करणारांच्या दृष्टीने खलनायक, देशद्रोही, पुरुषप्रधान संस्कृतीचे पाईक, गुन्हेगारांचे समर्थक, विकृतीचे पुजारी, स्त्री स्वातंत्र्याचे विरोधक वगैरे वगैरे अगदी लगेच ठरता. सध्या वुमन एमपॉवरमेंट हा असाच एक सेन्सेटिव्ह मुद्दा आहे. एक अक्षर वेगळे बोला; सगळे पॉलिटिकली करेक्ट लोक तुमच्यावर तुटून पडतात. हे दुर्दैवी आहे. वर एका प्रतिसादात तर कसले भयंकर अ‍ॅनॅलिसिस केलेले आहे. ते विद्वत्ताप्रचूर अ‍ॅनॅलिसिस वाचून मला हसावे की रडावे हेच कळेना. :-) ४९८ अ या एका कलमाच्या आधारे कित्येक स्त्रियांनी अकारण पुरुषांना अडकवले. इतके की कोर्टाने या कलमावर विचार करण्याचे ठरवले. पण हे कुणी बोलले की सगळे स्त्री स्वातंत्र्यवादी चवताळून अंगावर येतात. ह्युमन राईट्सवाले जसे दहशतवादी मेले की गळे काढत येतात, अगदी तसे! अशा सरफेस-लेव्हलवर विचार करणार्‍या लोकांना आपली विचारशक्ती प्रगल्भ करण्याची गरज आहे. निदान मुद्दा काय आहे हे तर समजून घ्या...पण लगेच यांचा उद्धटपणा, तिरकसपणा, कुजकटपणा, वैयक्तिक हल्ले, उद्दामपणा वगैरे चालू. विनोदी आहेत आहेत सगळे! :-) मी गुन्हेगाराचं समर्थन करत नाहीये. आपण काळजी घेणं आवश्यक आहे हे सांगतोय तर काय काय दिव्य प्रतिसाद आलेत...मजाच आहे सगळी! :-) आय रेस्ट माय केस हिअर!
  • Log in or register to post comments
म
मोदक Sun, 01/27/2019 - 11:37 नवीन
..आणि आता दहशतवादी आणि ह्युमन राईट्सवाल्यांना तुम्ही मध्ये आणलेत.. म्हणजे अजून २० - २५ प्रतिसादरूपी क्षेपणास्त्रे तुमच्यावर डागली जाणार. :D
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Mon, 01/28/2019 - 01:33 नवीन
हो, एका बाजूने ऍटोमॅट कलाश्निकोव्ह आणि दुसऱ्या बाजूने मेणबत्त्या, जय हो
  • Log in or register to post comments
ए
एकुलता एक डॉन Tue, 02/19/2019 - 09:29 नवीन
मी सामीर्सूर ह्यांच्या सहमत आहे ,आपली काळजी आपण घ्यावी
  • Log in or register to post comments
उ
उपेक्षित Mon, 01/28/2019 - 11:22 नवीन
समीर भाऊ तुम्हारा चुक्याच... हापिस कि गाडी आईसा कैसा तुम घर पे और जिम कि तरफ लेके जाता ? फिर हमारा घोटाळा होता न ;) ;) काही आवेशपूर्ण प्रतिसाद पाहून लयी दिसांनी मजा आली.
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Wed, 01/30/2019 - 03:20 नवीन
१. ऑफिसमधील ड्रेसकोड: याचे भारतात उगाच अवडंबर माजवले आहे असं वाटतं. क्लायंट येणार असेल तर किंवा तुम्हाला अगदी कुठल्या वरच्या पातळीवरच्या मीटिंग मध्ये जायचं असेल तर ठीक आहे. पण उगाच आपलं रोज एवढ्या गर्दीतून फॉर्मल घालून येणं जरा त्रासाचंच आहे. खरं तर पाय गरम आणि डोकं थंड ही झोप येण्यासाठी आदर्श स्थिती आहे. एसी मुले डोके मस्त थंडगार झालेले असते आणि सतत बुटात राहून पाय गरम झालेले असतात. अश्या परिस्थितीत मला तरी मस्त झोप येते, दुपारी जेवण झाल्यावर तर नक्कीच गपागप डोळे मिटतात. या बाबतीत मुलींची चंगळ असते हे मात्र खरंय. विविध प्रकारचे ड्रेस आणि पादत्राणे घालता येतात आणि त्यांना कोणी बोलतही नाही. इथे आम्ही नुसता टीशर्ट घातला किंवा शर्ट खोचला नाही तर लगेच इन्फॉर्मल म्हणून सूचना मिळते. ज्यांना नियमांना बगल द्यायचीच आहे ते कसेही करून देतात. आजच Quora वर या विषयाशी संबंधित एक उत्तर वाचलं. एका ऑफिसमध्ये एक मुलगी असेच तोकडे कपडे घालून यायची, जे सरळ सरळ नियमांचं उल्लंघन होतं. पण त्याची समज त्या मुलीला देणे हे त्यावेळी उपस्थित असेल त्या सुपरवायझरचे काम असायचे. बहुतेक वेळा पुरुष सुपरवायझर असायचा आणि त्यांना हे अवघड जायचं, पण तरीही सांगितले जायचेच. एक दिवस प्रकरण जरा जास्त झाल्यावर आरडाओरडा झाला, म्हणून त्या मुलीने आपण असे तोकडे कपडे घालणार नाही म्हणून कबुल केलं. दुसऱ्या दिवशी ती मुलगी पायघोळ झगा घालून आली ज्याला अगदी वरपर्यंत स्लीट होती. त्यामुळे कोणाला कल्पना करायला पण वाव ठेवला नव्हता. आता ती स्कर्टच्या लांबीच्या नियमात बसत होती आणि ऑफिसनी बाकी अंगप्रदर्शन करू नये असे काही नियम बनवले नव्हते. तात्पर्य काय - तर ज्यांना जे करायचे असते ते ते करतात. आपण आपली खोल श्वास घ्यायची सवय ठेवायची. २. टोप्या तर घालतातच पण विचित्र दाढी वाढवतात, २ इंच लांडी प्यांट घालतात आणि वर हातातले काम सोडून अगदी मीटिंग असली तरी नमाज पढायला जातात. अगदी पॅसेजमध्ये किंवा जागा मिळेल तिथे चादर अंथरून चालू होतात. एवढंच नव्हे तर वॉशरूममध्ये वर पाय करून बेसिनमध्ये पाय धुतात. ३. विनोदी वाटतं खरं... आपल्या सहकाऱ्यांसोबत असं बोलायची खरंच गरज नाही. ४. सर्व गोष्टी लिखित स्वरूपात ठेवाव्यात. कोणी उगाच गोड बोलत असेल तर ती धोक्याची घंटा समजावी. म्हणजे लगेच प्रतिकार करावा असे नाही, पण सावध राहावे हे नक्की. ५. तामिळ लोकांबरोबर काम करणे हा एक दिव्य अनुभव असतो. ऑफिसमध्ये, लिफ्टमध्ये एवढंच नव्हे तर मीटिंगमध्ये सुद्धा त्यांचे भाषाप्रेम उफाळून येते. ते प्रेम जपण्यासाठी शक्य तेवढे तामिळ त्यांना टीममध्ये हवे असतात. तामिळ म्यानेजर असेल तर त्याला तामिळ लोकच टीम मध्ये पाहिजे असतात. अमेरिकेत आमचा एक क्लायंट मीटिंगमध्ये सर्वांसमोर सांगायचा की त्याला टीममध्ये फक्त तामिळ लोकच पाहिजेत. मग त्याला पाहिजे ते काम आलं नाही तरी चालेल. तामिळ नसेलच तर हैद्राबादी किंवा नाईलाज म्हणून कन्नड किंवा केरळी चालेल. पण इतर राज्यांमधील कितीही चांगला रिसोर्स मात्र नाकारला जायचा. ६. न आवडणे हे दोन्ही बाजूने असू शकते. पण आपल्याला काही तिकडे कोणाशी लग्न करायचे नसते त्यामुळे जेवढ्यास तेव्हढे संबंध ठेवणे चांगले. सगळ्यात वाईट म्हणजे तुमचा बॉस किंवा तुमच्या पेक्षा वरच्या पदावरील व्यक्तीला तुम्ही न आवडणे. अशावेळेला तुम्हाला कॉर्नर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. माझे संपूर्ण २०१८ साल अश्या परिस्थितीत गेले. एवढा त्रास झाला की तो एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे.
  • Log in or register to post comments
K
king_of_net Fri, 02/22/2019 - 14:06 नवीन
२. टोप्या तर घालतातच पण विचित्र दाढी वाढवतात, २ इंच लांडी प्यांट घालतात आणि वर हातातले काम सोडून अगदी मीटिंग असली तरी नमाज पढायला जातात. अगदी पॅसेजमध्ये किंवा जागा मिळेल तिथे चादर अंथरून चालू होतात. एवढंच नव्हे तर वॉशरूममध्ये वर पाय करून बेसिनमध्ये पाय धुतात. ^^^^^^^^^^^^^^^^ Wipxx का???
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Wed, 01/30/2019 - 14:54 नवीन
ट्रेड मार्क,. तुमची उत्तरे आवडली. मुद्दा क्रमांक 2 : पूर्ण सहमत. डोक्यावर टोपी, पायात सॅंडल, अंगात झब्बा आणि खाली पायजमा टाईप पॅन्ट, अश्या अवतारातील एका कलीग ला मला क्लायंट ला इंट्रोड्युस करावे लागले होते.. त्याला नंतर काय वाटले असेल देव जाणे.. पण त्यावेळी HR कडे मी गेलो नव्हतो कारण त्या कंपनीत तो माझा शेवटचा महिना होता.. पण जरी गेलो असतो तरी वाटत नाही कि काही ऍक्शन घेतली गेली असती...!! काही वर्षापूर्वी, एकदा ऑफिस वॉशरूमध्ये " Do not wash legs in wash basin" असे प्रिंट करून पेपर चिटकवलेला दिसला त्यावेळी मी शॉक झालो होतो कि कायच्या काय बोर्ड लावलाय.. असे कोणी कधी करते का.. पण त्यानंतर थोड्याच दिवसात तो साग्रसंगीत पायधुनी सोहळा पाहिला आणि धन्य झालो... त्या व्यक्तीला खटकल्यानंतर तो फक्त बोलला कि करना पडता है.. वूडु का लिये..!
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Wed, 01/30/2019 - 22:56 नवीन
अमेरिकेत ऑफिसमध्ये मी हा पायधुनी सोहळा बघितला आणि त्या इसमाला सांगितलं की बाबारे तळमजल्यावर एक पूर्ण बाथरूम आहे जिथे तू अंघोळही करू शकतोस. पण त्याचं आपलं "नही, इधरही ठीक है" चालू झालं. मग त्याला विचारलं की इथे प्रेयर रूम आहे का? तर म्हणे तो ५-७ मैल लांब असलेल्या मशिदीत जाणार आहे. मग ऑफिसमध्ये पायधुनी करायचं प्रयोजन काय? उगाच आम्ही किती कट्टर हे दाखवणे का ते दाखवूनही कोणीच विरोध करत नाही व करू शकणार नाही म्हणून आनंद मिळवणे?
  • Log in or register to post comments
ख
खंडेराव Tue, 02/19/2019 - 08:30 नवीन
"
2) ऑफिस मध्ये मुस्लिम लोकांनी डोक्यावर टोप्या घालणे (त्यांच्या स्वतःच्या :D) हे कुठपर्यंत ठीक आहे? हे फॉर्मल च्या डेफिनेशन मध्ये बसते का? आणि मग बसत असेल तर आपण गांधी टोपी किंवा भगवी टोपी घालून गेले तर चालेल का? इमॅजिनेशन करून हसू येईल पण आजकाल आमच्या ऑफिस मध्ये या टोप्या जास्तच होत चालल्या आहेत. त्यामुळे सिरिअसली हा प्रश्न विचारत आहे. HR मधले कोणी मिपाकर त्यांच्या कंपनी तील अश्या टोप्याबद्दलची policy सांगू शकतील का ? कि धार्मिक सौदार्ह्य या नावाखाली हे चालवावे लागते?
हे फरकाने सगळीकडेच आहे हो. इथे सौथमध्ये ४० दिवस काळे कपडे आणि बिना पादत्राणांचे भरपूर लोक्स ऑफिसला येतात..डिव्हर्सिटी चा भाग म्हणून HR या बाबतीत मोठ्या कंपन्यांमध्ये तरी सढळ असतात..
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा