Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

अनामिक

अ — अत्रुप्त आत्मा, गुरुवार, 01/17/2019 - 20:18
खरी कविता कधी येते माहितीये का? जेव्हा ती आतून हाक मारते ना! तेंव्हा!!! तीच तिची खरी-यायची वेळ.. तिला मग यमकांची, छंदांची, वृत्तांची, कसलीच गरज उरत नाही.. खरोखर अनावृत्त होऊन छंदमुक्तीचा खरा ध्यास घेऊनच धावत येते ती! . वेदना जागायची, स्वतःहुन चालत बोलत घडत धडपडत बाहेर यायची खरी वेळ.. काहीही सुचायची, सांगायची, बोध शिकवायची, ओझी डोक्यावर न घेता ती सताड उमटते बाहेर! जशी आत आहे तशीच!!! हीच तिची खरी सुरवात मानायची का हो!??? असेल, असेल कदाचित..आणि असू दे ..असली तरीही! अंतरीच्या बोल वाटे तू आता जवळी रहा मीच माझे शब्द सांडू का मला सांगू पहा. हीच आता वाट नवखी चालतो तुझिया सवे वेदनेचे अर्थ कथिशी ,बोलतो ..असू दे नवे! काय गाठू शब्द आणखी आशयाला तोकडे सोडूनि देतो तुला मी जा कशी तुझिया सवे... मुक्तछंदी मुक्तबंधी जा आता जगती जरा लागला तर अर्थ थोडा दे मला सत्यी खरा..... आत्मबन्ध..

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3914 views

💬 प्रतिसाद
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 01/18/2019 - 06:27 नवीन
अरे? एकाच दिवशी दोन कवितेवरच्या कविता? ही पण आवडली, जीओ गुर्जी पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 01/18/2019 - 09:46 नवीन
अंतरीच्या बोल वाटे तू आता जवळी रहा मीच माझे शब्द सांडू का मला सांगू पहा. हीच आता वाट नवखी चालतो तुझिया सवे वेदनेचे अर्थ कथिशी ,बोलतो ..असू दे नवे!
आवडले!
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Fri, 01/18/2019 - 10:27 नवीन
सुंदर.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Fri, 01/18/2019 - 15:43 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Fri, 01/18/2019 - 17:07 नवीन
खरी कविता कधी येते माहितीये का? जेव्हा ती आतून हाक मारते ना! तेंव्हा!!!
त्याच हाकेची वाट पाहतोय :( तुमची कविता पोहचली.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 01/19/2019 - 01:54 नवीन
क्या बात है अत्रुप्तजी आत्मा. सहज सुंदर लिहिलंत. कवीच्या मनातली आंदोलनं उत्कटपणे टिपलीत आपण.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 01/19/2019 - 07:22 नवीन
(आतून आलेली हाक?)
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 01/19/2019 - 08:29 नवीन
कविता आवडली. बुवांची कविता दुपट्यातून बाहेर पडली आणि दूडुदूडु धावू लागली आहे.आताच्या कविता कसोशीने होत नसून असोशीने असतात हे नमूद करण्यात आम्हाला अतिशय आनंद होत आहे. अखिल मिपा चारोळी ते आरोळी कवीसंघाच्या "कवीची काकवी" अनियतकालिकातून साभार. संकलक आणि आस्वादक वाचकांची पत्रेवाला नाखु
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 01/20/2019 - 09:18 नवीन
@ज्ञानोबाचे पैजार, यशोधरा, पद्मावति, अनन्त्_यात्री, मिसळलेला काव्यप्रेमी, कंजूस :---- मन:पूर्वक धन्यवाद. ------------------------------------------------- @ प्रचेतस ~~~ क्या बात है प्रचेतसजी आगोबा. सहज सुंदर साधा प्रतिसाद दिलात. आमच्या मनातली (आपणास आधीच माहीत असलेली) आं-दोलनं निवडकपणे टपाटप टिपलीत आपण! आपल्या निर् मळ, विद्वत्ताप्रचुर, आशयघन प्रती पादनास वीणम्र अभिवादण! --------------- नाखून अंकल - लउल्लूल्लूल्लू !
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Mon, 01/21/2019 - 08:57 नवीन
अगदी मनकवडा आहेस बघ तू मलाबी ह्येच म्हणायचं व्हतं कशाला हवंय व्याकरण , काना नि मात्रे नको कुठली छंद यमक नि वृत्ते भावना येताच जशीच्या तशी प्रसवावी मग थेट काळजाला जाऊन भिडते
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा