विलक्षण २.०
बांबूच्या झाडाला फुले येणे हि एक विलक्षण घटना आहे. बरीच बांबूची झाडे त्यांच्या संपूर्ण आयुष्यात ठराविक कालावधीत बहरतात व मग नष्ट होऊन जातात. हा ठराविक कालावधी बांबूच्या प्रजाती निहाय वेग-वेगळा आहे.
जसे;
1. Bambusa bambos या प्रजातीचा फुले येण्याचा कालावधी दर ३२ वर्षांनी एवढा आहे.
2. Phyllostachys bambusoides या प्रजातीचा फुले येण्याचा कालावधी दर १३० वर्षांनी एवढा आहे.
3. Chusquea abietifolia या प्रजातीचा फुले येण्याचा कालावधी दर ३२ वर्षांनी एवढा आहे.
4. Phyllostachys nigra f. henonis या प्रजातीचा फुले येण्याचा कालावधी दर ६० वर्षांनी एवढा आहे.
5. Arundinaria wightiana या प्रजातीचा फुले येण्याचा कालावधी दर ३ वर्षांनी एवढा आहे.
6. Melocanna baccifera या प्रजातीचा फुले येण्याचा कालावधी दर ५० वर्षांनी एवढा आहे.
केवळ ठराविक कालावधीने फुले येणे एवढच विलक्षण नसून, एक प्रजाती एकाच वेळी सगळी कडे फुलांनी बहरते मग ती पृथ्वीवर कोठेही असो.
झाडाला फुले येण्याबाबात जी प्रचलित थेअरी आहे त्या थेअरीने बांबूच्या झाडाला फुले येण्याचे स्पष्टीकरण देता येत नाही.
बरीचशी बांबुची झाडे समुहाने ठरावीक उच्च कालावधीत फुले उगवणारी याप्रकारात मोडत असली तरी, फुले येण्याच्या पद्धतीवरून बांबूच्या झाडांचे तीन प्रकार पडतात
1. दरवर्षी फुले येणारी बांबूची झाडे
2. समुहाने ठरावीक उच्च कालावधीत फुले उगवणारी बांबूची झाडे
3. अ-ठराविक कालावधीने फुले उगवणारी बांबूची झाडे
भारतातील मिझोरम राज्यातील जवळपास ४९% भू भाग हा Melocanna baccifera या प्रजातीच्या बांबूच्या झाडाने व्यापलेला आहे. या प्रजातीचा फुले येण्याचा कालावधी दर ५० वर्षांनी एवढा आहे. ज्यावेळी बांबूच्या झाडांना फुले येतात त्यावेळी उंदीर आणि तत्सम (rodent प्रवर्गात मोडणारे) प्राणी त्यावर तुटून पडतात. विशेषतः उंदीर यात आघाडीवर असतात. ही फुले खाऊन उंदीर खूप माजतात व त्यांचा प्रजननाचा वेग खूप वाढून जातो. कमी कालावधीतच उंदरांची संख्या जबरदस्त वाढून जाते. मग ते गोदामातील, शेतातील पिके फस्त करत सुटतात. बांबूच्या झाडाला आलेल्या फुलांच्या बहराच्या वेळी एकाच वर्षात २५ लाख उंदर गावक-यांनी मारली होती. म्हणूनच भारताच्या उत्तर पूर्व भागातील राज्यात बांबूच्या झाडाला फुले येणे म्हणजे संकट येणे असे मानले जाते.
बांबूच्या झाडांची समुहाने ठरावीक उच्च कालावधीत फुलण्या संबंधी Ecologist Mr Daniel Janzen यांनी दिलेली कारणमीमांसा, जी ब-यापैकी जगमान्य सुद्धा आहे, ती पुढील प्रमाणे आहे.
बांबूच्या झाडाला फुले उगविण्यासाठी खूप उर्जेची आवश्यकता लागते, दरवर्षी फुले उगवले तर ते खूपच अल्प असतात व इतर प्राण्यांच्या भक्षणा मुळे पुढील वंशवाढीला बीजच उरत नाहीत. म्हणून मग बांबूच्या झाडात म्युटेशन होत गेले. हे म्युटेशन, प्रामुख्याने फुले उगविण्याचा कालावधी वाढवून समुहाने एकत्रित प्रचंड प्रमाणात फुले उगवायचे जेणे करून कितीही प्राणी यावर तुटून पडले तरी पुढील वंशवाढीसाठी बीज उरतीलच, अश्या स्वरूपाचे आहे. फुले उगविण्याचा कालावधी वाढविल्याने बांबूच्या झाडाला प्रचंड प्रमाणात फुले उगविण्यासाठी आवश्यक उर्जा साठविता येते.
हे जर ग्राह्य धरलं तर, बांबूच्या झाडाने वंशवाढ व्हावी म्हणून निसर्गाच्या सहज नियमात बदल करुन स्वत:साठी वेगळी पद्धत तयार केली याला विलक्षणच म्हणावे लागेल.
अश्या विलक्षण पद्धतीने फुलणा-या बांबूच्या झाडांची फुले खाण्यासाठी त्यावर तुटून पडण्याची प्रेरणा उंदरांना होणे हे ही विलक्षणच म्हणावे लागेल. कारण ५० वर्षापूर्वी ही फुले त्यांच्या कित्येक पर पर...............पर दादांनी खाल्ली असणार!
मिझोरमच्या संकटाबाबत अधिक येथे वाचातायेईल
Ecologist Mr Daniel Janzen बाबत अधिक येथे वाचता येईल
बांबूच्या झाडांच्या फुलण्याबाबत अधिक येथे वाचता येईल 1
बांबूच्या झाडांच्या फुलण्याबाबत अधिक येथे वाचता येईल 2
बांबूच्या झाडांच्या फुलण्याबाबत अधिक येथे वाचता येईल 3
रायझोम हे अलैगिक प्रजननसाठी आहेRhizome म्हणजे जमिनीखालून जमिनीला समांतर वाढत जाणार्या खोडाचा एक प्रकार असतो. अश्या खोडाला, थोड्या थोड्या अंतरावर, जमिनीवर वाढणार्या फांद्या व जमिनीखाली राहणारी मुळे फुटत राहतात. (Rhizome is a continuously growing horizontal underground stem which puts out lateral shoots and adventitious roots at intervals.) झाडाच्या खोडाला आलेल्या फांद्यांना अलैंगिक प्रजनन म्हणत नाही ! Rhizome (या एका प्रकारच्या झाडाच्या खोडा)ला नवीन फांद्या येऊन बांबूचे बेट बनते... जमिनीवर दिसणारा प्रत्येक बांबू केवळ Rhizomeवर फुटलेली एक फांदी असते... स्वतंत्र नवीन झाड नसते. कोणत्याही (लैंगिक किंवा अलैंगिक) प्रजननपद्धतीमध्ये स्वतंत्र नवीन जीव निर्माण व्हावा लागतो, (किंबहुना, केवळ स्वतंत्र नवीन जीव निर्माण होण्याच्याच प्रक्रियेला प्रजनन म्हणतात,) हे सांगण्याची वेळ येईल असे वाटले नव्हते... पण असो. =)) Rhizomeपासून अलैंगिक प्रजनन करण्यासाठी, मानवी हस्तक्षेपाने त्याचे काही नोड्स असलेले तुकडे करून, ते स्वतंत्रपणे जमिनीत रुजवले जातात... ती बांबूच्या बेटात नैसर्गिकरित्या होणारी प्रक्रिया नव्हे. याशिवाय, त्या दुव्यातले खालील वाक्य, लेखात दिलेल्या, फुलोरा येण्याच्या बांबूच्या दर प्रजातीच्या ठराविक वर्षांच्या चक्रांशी ताळमेळ खात नाही...This occurs asexually whenever environmental changes affect the soil and plant growth.