Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
भटकंती

स्टॅचू ऑफ युनिटी - सरदार पटेलांचा अतिभव्य पुतळा !!!!

म
माझीही शॅम्पेन
Sat, 12/29/2018 - 15:50
💬 55
३१ ऑक्टोबरला मोदींनी ह्या भव्य दिव्य पुतळ्याचं अनावरण केल्यावर कधी एकदा हा पुतळा पाहतो असं झालं होत , माहितीतील बऱ्याच जणांना काही अधिक माहिती आहे का हे विचारून झालेलं पण काहीही माहिती हाती लागली नाही , नंतर एकाशी बोलताना टेन्ट सिटी नावाचं काही तरी राहायला आहे एवढा धागा घेऊन आणि गुगल बाबाला साकडं घालून प्लॅन सुरु केला. २५ ला सकाळी ५:४५ निघून २७ ला रात्री घरी एक मस्त रोड ट्रिप मारून आलो सरदार वल्लभाई पुतळा :- १८२ मीटर्सचा जगातील सर्वात उंच पुतळा नुसताच उंच नाही तर बर्यापॆकी रुंद पण आहे , लार्सन आणि टुब्रो (आम्ही गमतीने ल आणि ट म्हणतो ) ह्यांनी अवघ्या ४ वर्षात उभा केला आहे , तुमच्या अमेरिकेच्या स्वातंत्र्य देवतेच्या दुपटीहून अधिक आहे , श्री राम सुतार हे ह्या पुतळयाचे शिल्पकार आहेत , पुतळ्या खालीच म्युसिम आहे तेथे सर्व माहिती सविस्तरपणे मिळते जवळच रेल्वे स्थानक / एअर पोर्ट :- बडोदा (गुगलला वडोदरा कळत म्हणे ) इथून नर्मदा सरोवर किंवा पुतळा साधारण पण ९० km / २ तासावर आहे. बडोदा शहरापासून सरदार सरोवर साठी बसेस सुटतात त्या बसने ये-जा करू शकतो किंवा बडोद्याहून एखादी प्रायव्हेट गाडी बुक करून तुम्ही येऊ शकता जर ठाणे / मुंबई हुन ड्राईव्ह करून जाणार असाल तर साधारण अंतर ४२० किमी आहे पण जायला सहजच ७/८ तास लागतात. सरदार वल्लभाई पटेल यांचा हा भव्य पुतळा केवडिया कॉलनी राजपिपला गुजरात येथे आहे मुंबईहून जाणार असल्यास सकाळी पाच वाजता निघावे जेणेकरून दुपारी बारा किंवा एक वाजेपर्यंत तिथे पोहोचता येईल राहायची सोय :- एकतर बडोद्याला राहावं आरामात किंवा मग सर्वोत्तम पण बऱ्यापैकी महाग पर्याय म्हणजे नर्मदा टेन्ट सिटी , टेंथ सिटी मध्ये राहणार थोडसं महाग असलं तरी तिथल्या सोयीसुविधा अत्यंत चांगल्या आहेत जर दिवसाचं तपमान जास्त असेल तर एअर कंडीशन चा पर्याय निवडावा अन्यथा एअर कंडिशन शिवाय चालू शकेल. टेन्ट सिटीचे वेगवेगळे पॅकेज येतात २ दिवस १ रात्र किंवा ३ दिवस आणि २ दोन रात्र , आम्ही दुसरा पर्याय निवडला एकदा टेंट सिटी रिसॉर्टमध्ये गेल्यानंतर सर्व खाणं-पिणं ब्रेकफास्ट चहा जेवण आणि साईट सीन याचा समावेश आहे , जेवणाची Quality अर्थातच उत्तम (सगळे गुजराती पदार्थ हादडुन झाले ) खूप छान आहे त्यामुळे आम्ही हाच पर्याय निवडला. टेंट सिटीमध्ये राहणार असाल तर बारा वाजता चेकिंग आहे चेक इन करून जेवण करून इतर स्पॉट बघता येतात पुतळ्याला जाण्यासाठी आणि गॅलरीचे तिकीट याची सर्व व्यवस्था टेंट सिटी व्यवस्थित पणे करते. रिसॉर्ट मधून पुतळ्यासाठी सरदार सरोवर धरणासाठी आणि आजूबाजूचे इतर छोटे-मोठे स्पॉट बघण्यासाठी बसेस आहेत या बसेस एअरकंडीशन आहेत तसेच रिसॉर्टचा एक गाईड तुमच्याबरोबर येतो आणि सर्व माहिती देतो पुतळ्यासाठी जर viewing गॅलरी जायचं असेल तर त्याची तिकीट बुक करता येतात. viewing गॅलरीतुन जे काही दृश्य आहे चित्तथरारक आहे , पुढे सरदार सरोवर धारण आणि भोवताल नर्मदा खोर डोळ्याचं पारणे फेडतात आणि तळ मजल्यावरून viewing गॅलरीला जाणारी लिफ्ट ३६ सेकंदात वर पोहोचवते सरदार सरोवर आणि सरदार वल्लभाई पटेल यांच्या पुतळ्याजवळ पास इतरही काही छोटी-मोठी सुंदर स्थळे आहेत ती पाहता येतात व्हॅली ऑफ फ्लॉवर हे एक नवीन उद्यान जे फक्त फुलांसाठी आहे ते हल्लीच उघडला आहे तसेच जवळपासच्या परिसरात एक राजवाडा आणि एक मंदिर आहे तेही छान आहे. (Statue of Unity Visit , Sardar Sarovar Dam , Visit Rajvant Palace, Rajpipla , Shoorpaneshwar Temple , valley of flower ) https://live.ipms247.com/booking/book-rooms-narmadatentcity सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आणि त्याचा परिसर अत्यंत मोहक आहे पुतळ्याच्या छातीमध्ये viewing गॅलरी आहे त्या गॅलरीचे तिकीट वेगळा आहे माणशी साडेतीनशे रुपये तिकीट आहे. तसेच पुतळ्या पुतळ्यावर संध्याकाळी सहा वाजून 40 मिनिटांनी जवळजवळ अर्धा तासाचा एक लेझर शो आयोजित केला जातो तोही अत्यंत सुंदर आहे शक्य असल्यास हा शो नक्की पाहावा. हेलिकॉप्टर चे १५ मिनिटाच्या राईडचे माणशी तीन हजार रुपये आहेत आता रिवाजानुसार सर्व फोटो , काहीही माहिती लागल्यास व्य नि करावा पुतळ्याचे आणि भोवतालचे काही फोटो image1 Narmda Nadi and Duravar Saradar sarovar पुतळ्याची भव्य सावली  आम्ही इवलुसे    Corroidor in front of Statue Huge Size Nameplate of statue  Sardar Sarovar Dharan Valley of flowers Vf2 VF3 VF4 vf4 लेझर शो क्षणचित्रे  टेन्ट सिटी tent city

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 45093 views

💬 प्रतिसाद
च
चामुंडराय Sat, 03/09/2019 - 23:46 नवीन
एकंदरीतच मराठी माणूस आणि मुख्यतः मराठी राजकारणी राज्यकर्ते यांची इच्छाशक्ती कमी पडते आहे असे दिसते आहे. महाराष्ट्रात असंख्य गड, किल्ले आहेत. तेव्हा योग्य अशी जागा निवडून ज्या टीमने हा सरदार पटेलांचा प्रकल्प साकारला आहे त्यांना हे काम दिले तर सुकर होईल असे वाटते. अर्थात ३० वर्षे पडलेले भिजत घोंगडे बघता मोदीमामांनी काही मनावर घेतले तरच शक्य होईल असे वाटते. (आता पळा, नाहीतर भक्त म्हणून शिक्का पडायचा !)
  • Log in or register to post comments
ग
गोरगावलेकर Wed, 03/06/2019 - 06:14 नवीन
असे काही जाणवले नाही किंवा निव्वळ उणिवा शोधण्याच्या दृष्टीने मी पाहिले नाही. पुतळा पूर्ण भरीव नाही. आधी काँक्रीटचे दोन उंच खांब उभारून त्याच्या बाजूने लोखंडाचा ढाचा बनवला गेला. या ढाच्यावर तुकड्या तुकड्यात ब्रॉन्झ धातूचे पत्रे जोडले गेले आहेत. कदाचित कुठेतरी जोड देतांना वगैरे चिरा राहिल्या असू शकतील. (काँक्रिटचे हे दोनही खांब पुतळ्याच्या पायात आहेत व यातूनच वर जाण्यासाठी दोन लिफ्ट आहेत) पुतळा उभारणीची माहिती येथे संध्याकाळी होणाऱ्या लेसर शो मध्ये दिल्या जाते. मुलीने या शो चे चित्रण केले होते. मी ते यु ट्यूबवर टाकले आहे. लिंक खाली देत आहे. १४ व्या मिनिटांपासून उभारणीची माहिती बघू शकाल. https://youtu.be/ErnmrovozGA
  • Log in or register to post comments
स
स्मिता. Wed, 03/06/2019 - 13:04 नवीन
मूळ लेख आवडला होताच पण तुमच्या व्हिडिओमुळे लेखाची शोभा वाढली. कॅमेरातून केलेले चित्रण लॅपटॉपच्या छोट्या पडद्यावर बघतांना सतत अंगावर रोमांच होते. प्रत्यक्षात हा अतिभव्य पुतळा बघणं हा खास असा अनुभव असणार यात काही शंका नाही. शक्य तेव्हा नक्कीच भेट देणार. अतिअवांतरः पॅरिसमधील जगप्रसिद्ध आयफेल टॉवर हेसुद्धा केवळ एक पोलादाचे स्ट्र्क्च्र आहे. दुरून पाहतांना त्याच्याही भव्यतेची जाणीव होत नाही. परंतु जसजसे जवळ जावे तसे त्याच्या भव्यतेने आणि तंत्रज्ञानाने आपण भारावून जातो. जेव्हा आय्फेल टॉवरची बांधणी आणि उभारणी होत होती तेव्हा अनेक फ्रेन्च लोक त्याच्या विरोधात होते. पण आज त्याच टॉवरमुळे जगभरातले पर्यटक तेथे आवर्जून येतात. जर या एकात्मतेच्या पुतळ्याजवळच्या सोयीसुविधांचा दर्जा उत्तम राखला (आणि योग्य जाहिरात केली) तर भविष्यात अनेक परदेशी पर्यटक तेथे भेट देतील.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 03/12/2019 - 15:40 नवीन
छान माहिती दिली आहे, फोटो आवडले.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- RAW - Romeo Akbar Walter | Official Trailer |
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 03/14/2019 - 12:54 नवीन
हा धागा वाचल्यावर १५-२० दिवसानी लगेचच म्हणजे १५ जानेवारीला स्टॅचू ऑफ युनिटीला भे्ट देन्य़ाचे योग आले. हा धागा वाचून टेन्ट सिटीलाच राहायचे होते, पण अहमदाबाद मुक्कामी परातायचे असल्याने ते शक्य झाले नाही. पुतळा पाहताना डॉ सुबोध खरे यांनी वर्णन केलेली : प्रत्यक्ष पुतळ्याचा जवळ गेल्यावर एक आश्चर्य, उत्सुकता आणि अवाक होणे यातील संमिश्र भावना मनात उचंबळून येते आणि भारतीय असल्याचा अभिमान वाटतो. पोलादी पुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या चरणाशी लीन होताना आदर, अभिमान आणि कृतज्ञता या संमिश्र भावाने डोळ्यात अश्रू उभे राहतात. हा पुतळा त्यांच्या उत्तुंग प्रतिमेला साजेसा आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील करारी भाव फोटोत अजिबात पकडता येत नाहीत. फोटोत किंवा प्रतिकृतीत हा पुतळा किंवा ताजमहाल यांचे सौंदर्य भव्यता आणि उत्तुंगता याची अजिबात कल्पना येत नाही. आयुष्यात एकदा तरी माणसाने हा पुतळा जरूर पाहावा यात कोणतीही शंका नाही. याची अनुभुती घेतली ! डॉ सुबोध खरे, धन्यवाद, खुपच अप्रतिम शब्दात पकडल्या आहेत आपण, आम्हा सर्वांच्या भावना ! सुर्यास्ताचा समय असल्याने मावळतीच्या रंग-उधळेणीच्या पार्शवभूमी वर पुतळ्याचे दर्शन संस्मरणीय़ झाले. आयुष्यातील लक्षात राहणारे क्षण ! सुर्यास्ताच्या पार्श्वभुमीवरील सरदार पटेलांचा भव्य पुतळा. सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जीवनावरील प्रदर्शन अप्रतिम आहे. क्लासिकच ! पोस्टर्स पाहताना, मजकूर वाचताना वेळ पुरत नाही. राजपिप्पलाचा रोड सुंदर आहे, दोन्ही बाजूनी असलेली झाडी सुखद होती. तसा हा प्रदेश रखरखाटीचा आहे. जानेवारी मध्ये देखिल हे जाणवत होते. इथं भेट द्यायचा कालावधी हिवाळ्यातच बेस्ट ! येता येता जवळच असलेले (पुतळ्यापासून ५५ किमी अलीकडे पोइचा येथिल नीळकंठधाम. स्वामीनारायण मंदिर पाहिले, सुंदर आहे, रात्री अप्रतिम विद्यूत रोषणाई पहायला मिळाली. ही रोषणाई चुकवू नये अशी आहे
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 7 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 8 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 8 hours ago
  • सुंदर !!
    1 day 8 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 8 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा