Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

तुला चाहते रे नवी कोरी मालिका

अ
अविनाशकुलकर्णी
Sat, 12/29/2018 - 14:31
💬 16 प्रतिसाद
तुला चाहते रे नवी कोरी मालिका मालिका सस्पेन्स प्रेम बदला प्रेमाचा त्रिकोण आदी मसाला ठासून भरला असून ती प्रत्यक्ष पाहण्यात मजा आहे साधारण गोषवारा असा आहे विक्रम पायमोजे ह्याच्या हजारो एकर चहा च्या बागा असतात उलाढाल साधारण पाच रे सहा हजार कोटीच्या घरात असते एकदा पायमोजे व त्यांच्या मातोश्री मळ्याची पाहणी करण्या साठी येतात शेतात कामगार काम करत असतात व त्याच मळ्यात ईशा हातमोजेा ना वाची अल्लड मुलगी काम करत असते तिच्या अनुपम सौंदर्या मुळे पायमोजेच तिच्या कडे लक्ष जाते व पायमोजे तिच्या प्रेमात पडतो ईशा मात्र "तुला चाहते रे तुला चाहते जरी आंधळी मी तुला चाहते " हे गाणे गुणगुणत चहाची पाने तोंडत असते ईशा २० वर्षांची वारुणी असते तर पायमोजे ४० वर्षांचा युवक असतो त्या मुळे त्याला प्रेम व्यक्त कसे करावे ते समजत नाही त्याच वेळी ईशा हातमोजे विक्रांत ला सजेशन देते की किलोमागे जर आपण चहाची किंमत दोन रु कमी केली तर टर्न ओव्हर वाढेल व नफा हि विक्रम ते मान्य करतो व त्याचा टर्न ओव्हर पाच हाजारावरून १५ हजार कोटीवर जाऊन पोहोचतो विक्रम ईशाला कंपनीत वरची जागा देतो पण तिची बॉस मायरा नावाची जुनी मैत्रीण असते मायरा ला ईशा आवडत नसते - इशाचे विक्रम स्तरावर प्रेम आहे असा तिला संशय असतो त्यातच विक्रम ची आई ईशाला टर्न ओव्हर वाढला म्हणून २५ लाख किमतीचा रत्नहार व चांदीचा टी सेट देते या मुळे मायराचा जळफळाट होतो शिवाय ती चकल्या करते व एक्स्पोर्ट करून कंपनीचा टर्न ओव्हर पाच हजार कोटीने वाढवते यशासारखे यश नसते त्यामुळे ती कॅलेंडर्स काढते व तिथे पण तीन हजार कोटीने टर्न ओव्हर वाढवते प्रेमाचा त्रिकोण असल्याने मालिकेत खलनायक अपहरण उसासे आदी मसाला खच्चून भरला आहे पाय मोजे चे ईशा वर प्रेम असते पण यशाच्या आईवडलांना पटवायचे असते त्या साठी विक्रम चहा च्या पानाच्या कोथिंबीर वड्या करतो ती अफलातून रेसिपी खाल्यावर दाम्पत्य लग्नास होकार देते विक्रम यशाचे लग्न होते कालांतराने ईशाला उषा नावाची मुलगी होते उषा वयात आल्यावर बिझनेस चा गाडा सांभाळत टर्न ओव्हर ३५ हजार कोटीवर नेते त्याच सुमारास राधिका मसाले मालकिणीचा मुलगा अथर्व इशाच्या प्रेमात पडतो अथर्व च्या मसाले कंपनीचा टर्न ओव्हर ४० हजार कोटी इतका असतो त्यांचे लग्न होते व अथर्व चहा मसालाची निर्मिती करतो उशाचा चहा व अथर्व चा चहा मसाला जगात फेमस होतो दोन हि कंपन्यांचे विलीनीकरण होते व टर्न ओव्हर ८० हजार कोटीवर जातो व सारे जण सुखाने नांदतात

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5003 views

💬 प्रतिसाद (16)
ट
टवाळ कार्टा Sat, 12/29/2018 - 15:51 नवीन
खिक्क
  • Log in or register to post comments
व
वेडसर Sat, 12/29/2018 - 15:58 नवीन
मस्तच हो. मजा आया! :)
  • Log in or register to post comments
म
मास्टरमाईन्ड Sat, 12/29/2018 - 18:51 नवीन
मस्तच. मजा आली.!
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Sat, 12/29/2018 - 19:12 नवीन
:D
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 12/30/2018 - 07:04 नवीन
एक-दोन पिढ्यांची सोय झाली.
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Sun, 12/30/2018 - 12:35 नवीन
लई भाहरी लिवलयं. पण यात हेलिकॉप्टर आले नाही. च्यायला या सिरीयल्सच्या ! @#$"$
  • Log in or register to post comments
व
विशुमित Sun, 12/30/2018 - 14:23 नवीन
खरेतर तब्कडी वापरायला पाहिजे होती!
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 12/30/2018 - 17:49 नवीन
तुला चाहते रे नवी कोरी मालिका की नवी 'कोर्‍या मसाला चहाची' मालिका ?
  • Log in or register to post comments
न
निनाद आचार्य Mon, 12/31/2018 - 09:10 नवीन
झकास!!! लेखाच्या प्रिंट काढून गावभर वाटल्या पाहिजेत..... तुम्ही झी मराठी ला मेल करून कळवा हि कथा.... मजा येईल....
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 12/31/2018 - 18:18 नवीन
तुम्ही झी मराठी ला मेल करून कळवा हि कथा +१ 'चला हवा येऊ द्या' चा एक इपिसोड बनण्याइतका मसाला आहे या लेखात.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 12/31/2018 - 09:35 नवीन
मजा आ गया, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Mon, 12/31/2018 - 18:32 नवीन
आरारारारा... खतरनाक...
  • Log in or register to post comments
श
शित्रेउमेश Mon, 01/28/2019 - 04:26 नवीन
जांगडगुंता सगळा.... शेवट भयंकर....
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Mon, 01/28/2019 - 06:15 नवीन
फक्त पुष्पे गप बस की आणि इशा चे बाबा हातात पेटी आणि पिशव्या घेऊन रस्त्यावर बसायला लागतात.
  • Log in or register to post comments
र
रिम झिम Wed, 01/30/2019 - 15:23 नवीन
त्याच सुमारास राधिका मसाले मालकिणीचा मुलगा अथर्व इशाच्या प्रेमात पडतो' उषा कि इशा ???
  • Log in or register to post comments
र
रिम झिम Wed, 01/30/2019 - 15:24 नवीन
बाकी धमाल आली वाचून...
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 week ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 week ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 week ago
  • सुंदर !!
    1 week ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 week ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा