Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

मुलाचा हट्टीपणा

स
सुरज भोसले
Tue, 12/25/2018 - 12:17
🗣 89 प्रतिसाद
माझा मुलगा वय ११ वर्षे 6th Standard. शाळेत जायला रोज त्रास देतो, बऱ्याच वेळा शाळेत जातच नाही व अभ्यास करतच नाही. आम्ही विचारून झालं, त्याच्या शाळेच्या Principal Madem नी व क्लास टीचर नी पण विचारल कोणालाही काहीच सांगत नाही. आत्ता पर्यत तीन मनोसोपचार तज्ञाची treatment घेतली. पण कुणाच्याच treatment चा काहीच परिणाम झाला नाही. तो हुशार आहे पण आभ्यास करण्याचा व लिहिण्याचा कंटाळा. परीक्षेत मार्क कमीच आहेत. आठवी पर्यंत पास होत जाईल, पण पुढे त्याचे नुकसान होईल. आता त्याला कोणती treatment द्यावी ते समजत नाही.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 50320 views

🗣 चर्चा (89)
य
यशोधरा Tue, 01/01/2019 - 14:15 नवीन
तुम्ही सांगितलेले उपाय कठीण आहेत, दोन महिन्यासाठी नाही पण एक महिन्यासाठी नक्कीच करून बघेन.
for real? मुलगा सुधारणार असेल तर दोन महिने सुद्धा तुम्ही देऊ शकत नाही? जरा odd वाटते आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 01/01/2019 - 14:59 नवीन
मुलगा सुधारणार असेल तर दोन महिने सुद्धा तुम्ही देऊ शकत नाही? जरा odd वाटते आहे. मुलासाठी अनेकांनी उपाय सुचवले आहेत सल्ले दिले आहेत काही तरी सकारात्मक फॉलोअप घेऊन उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अपडेट दिले पाहिजेत. भावनिक होऊन, कळवळा येऊन लोक उपाय सांगतात आणि आपण जमणार नै म्हणता तेव्हा मूळ विषयाबाबत नेमकं आपण गंभीर आहात की नाही असे वेगळे विषय डोक्यात यायला लागतात. क्षमस्व. -दिलीप बिरुटे -
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 01/01/2019 - 15:03 नवीन
अगदी खरे आहे. मुलासाठी दोन महिने सुद्धा एखादा उपाय करून पहायची तयारी नाही, असे कसे? माफ करा पण ही सत्य समस्या आहे ना?
  • Log in or register to post comments
स
समीरसूर Tue, 01/01/2019 - 12:25 नवीन
हा मोठा प्रॉब्लेम दिसतोय. माफ करा पण मला असं वाटतं तुमच्या घराला आणि घरातल्या माणसांना कुठलीच शिस्त नाही असे दिसते आहे. मोबाईल आणि टीव्हीमुळे फक्त तुमच्या मुलाचंच नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं प्रचंड नुकसान होतंय. माझं तुम्हाला कळकळीचं सांगणं आहे की मोबाईलवर वाट्टेल तितका वेळ व्हिडीओज बघणं, व्हॉट्सॅपवर वेळ दवडणं, वेबसीरीज बघणं या सगळ्या अतिशय भयानक सवयी आहेत. मेंदूला सुन्न करणार्‍या अशा या सवयी आहेत. शिवाय या सवयींमुळे आपल्याला फायदा शून्य असतो. नुसता वेळ फुकट जातो आणि इतर महत्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष होतं. मोबाईलवर खूप जास्त वेळ व्हिडीओज पाहिल्याने मेंदू शिणतो आणि त्याची क्षमता कमी होते. सगळ्यांनीच मोबाईलपासून थोडं लांबच राहिलं पाहिजे. त्यापेक्षा वाचन, पायी फिरणे, लोकांना प्रत्यक्ष भेटणे, गप्पा मारणे, नाटके बघणे, सहलींना जाणे, लिखाण करणे, एखादा छंद मनापासून जोपासणे (बागकाम, स्वयंपाक, सुतारकाम, चित्रकला, वाद्य, गायन, वगैरे) अशा मार्गांनी कौटुंबिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. तुम्ही कुटुंबासहित मासिक सहली आयोजित करा. दर वीकेंडला सहलीला जायचं. मुलाला जरा थकू द्या. त्याला निसर्गाचा आनंद चाखू द्या. त्याला सहल आयोजनात सहभागी करून घ्या. नातेवाईकांकडे जा. त्यांना घरी बोलवा. जिथे भपका आहे (मॉल, महागडी हॉटेल्स) अशा ठिकाणी जाणं टाळा. तुमच्या आयुष्यातील योजनांबद्दल तुमच्या मुलाशी बोला. त्याला एक जबाबदार व्यक्ती म्हणून ट्रीट करा. अकरा वर्षाचा मुलगा खूप काही नवीन आयडियाज देऊ शकतो. त्याला घरातल्या लहान-मोठ्या निर्णयांमध्ये सहभागी करून घ्या. आपल्या मताला घरात किंमत आहे हे त्याला कळू द्या. घरात खेळीमेळीचे वातावरण ठेवा. मोबाईलला घरावर वर्चस्व गाजवू देऊ नका. नवीन चित्रपट, पुस्तक, नाटक, बातमी, शोध, वगैरे बद्दल मुलाशी चर्चा करा. अनेक मुद्द्यांवर मुलाशी चर्चा करता येतात. पैसे, गुंतवणूक, राजकारण, इतिहास, भूगोल, अनुभव असे बरेच विषय तुम्ही मुलासोबत बोलतांना घेऊ शकता. हे सगळं व्यवस्थितपणे करण्यासाठी तुम्हाला दोघांना तुमच्या सवयी बदलाव्या लागतील. मोबाईलचे व्यसन बंद करावे लागेल. रोजचा पेपर वाचावा लागेल. पुस्तकं वाचावी लागतील. नवीन अनुभव घ्यावे लागतील. अभ्यास करावा लागेल. घरात खूप मोकळं, खेळकर वातावरण ठेवावं लागेल. मुलाच्या भविष्यासाठी हे सगळं करणं म्हणजे फार नाही. हे नक्की करून बघा. समुपदेशक मदत करेल पण पहिली आणि सगळ्यात भरीव अशी मदत आई-वडील म्हणून तुम्हालाच करावी लागणार आहे. ती मदत बाहेरची कुठलीच व्यक्ती करू शकणार नाही. मुलगा तुमचा आहे. त्याचं आयुष्य वाया जायला नको ही काळजी जितकी तुम्हाला असणार तितकी ती इतर कुणालाच नसणार. शुभेच्छा! मला खात्री आहे सगळं नीटच होईल.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 01/01/2019 - 16:15 नवीन
मस्त प्रतिसाद
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Tue, 01/01/2019 - 14:59 नवीन
@सूरज भोसले, माझ्या माहितीत एक अगदी अशीच केस आहे, त्याला पुण्यातल्या कोणत्यातरी वेगळ्या प्रकारच्या शाळेत घातल्यापासून तो खुष आहे, आणि प्रगती करतो आहे. तुम्ही पुण्यात असाल तर त्या शाळेचे नाव विचारून कळवू शकतो. समीरसूर यांचा प्रतिसाद मननीय वाटला.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Tue, 01/01/2019 - 16:06 नवीन
मी माझा वरील प्रतिसाद लिहीला, तेंव्हा फक्त मूळ धागा आणि शेवटला समीरसूर यांचा प्रतिसाद वाचला होता. आता सर्व प्रतिसाद वाचले. सर्वांनीच अतिशय कळकळीने, आपुलकीने उत्तमोत्तम, मननीय सूचना केलेल्या आहेत. धागाकर्त्याने आणि त्यांच्या पत्नीने मनावर घेऊन त्या सर्व सूचना काटेकोरपणे पाळणे अगत्याचे आहे. बाकी कमीअधिक प्रमाणात अनेक कुटुंबात या प्रकारच्या समस्यांचे प्रमाण वाढत चालले आहे ही बाब चिंतनीय आहे.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 01/02/2019 - 19:21 नवीन
सुरज भोसले, समस्या दिसते एकीकडे, तर प्रत्यक्षात असते दुसरीकडे आणि उपाय करायचा असतो तो तिसरीकडे. मला वाटतं की तुम्ही पतिपत्नींना समुपदेशनाची अधिक निकड आहे. हा निष्कर्ष कशावरनं काढला ते सांगतो. तुमच्या मुलाला प्रश्नाचं उत्तर येत असतं, पण तो लिहित नाही. उलट उत्तराच्या जागी फक्त प्रश्नच लिहून येतो. याचा अर्थ त्याला इच्छा व/वा आत्मविश्वास नाही. मुलाला या क्षणी या दोन्हींपैकी काहीही देण्यास तुम्ही पतिपत्नी दुर्दैवाने असमर्थ आहात. किंवा मग कार्टूनमध्ये दाखवतात तशी काहीतरी जादू होऊन उत्तर आपोआप उमटेल अशी त्याची अपेक्षा आहे. ही अपेक्षा निरर्थक आहे. कार्टून खोटं आहे हे तुम्ही त्यास अनेकदा सांगूनही तो ऐकंत नाही. कारण की त्याला कार्टूनमध्ये एक प्रकारचा मानसिक आसरा लाभतो. इथे आसरा म्हणजे इंग्रजीत ज्याला refuge (https://www.dictionary.com/browse/refuge) म्हणतात तो. असा आसरा त्याचे आईबाप असायला हवा, कार्टून नव्हे. त्यामुळे तुम्हांस अगोदर आपसांतले संबंध सुरळीत करावे लागतील. त्याकरिता एखादा वैवाहिक समुपदेशक प्रथम गाठा. त्याला तुमच्या मुलाच्या समस्येची पूर्ण कल्पना द्या. तसंच तुम्ही समुपदेशन कशासाठी घेताय याची तालिका (फॉर्म) भरून घेतली जाईल तिथेही मुलाच्या समस्येचा मुद्दा स्पष्टपणे लिहा. बऱ्याचदा संपूर्ण कुटुंबासाठी सामायिक समुपदेशक असतो. तसा कोणी भेटला तर उत्तमंच. बघा पटतंय का. शुभास्ते पन्थान: सन्तु. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ल
लई भारी Fri, 01/04/2019 - 12:03 नवीन
सगळ्यांनी म्हटल्याप्रमाणे डॉक्टर पेक्षा समुपदेशनाची गरज आहे. डॉक्टर खूप वेळ देऊ शकत नाहीत माझ्यामते. माझ्या ओळखीच्या एक चांगल्या समुपदेशक आहेत ज्या लहान मुलांच्या स्पेशालिस्ट आहेत. हवा असल्यास व्यनि करा, डिटेल देतो. (वाकड मध्ये आहेत) त्या कुटुंबाचेही समुपदेशन करतील गरज असल्यास. अगदी घरगुती संबंध आहेत, त्यामुळे खात्री देऊ शकतो.
  • Log in or register to post comments
स
सुरज भोसले Sat, 01/05/2019 - 13:05 नवीन
समीरसूर, तुमचा प्रतिसाद योग्य आहे. आमच्या घरातल्या लोकांना शिस्त नाही हे बरचस बोरोबर आहे. आमचं एकत्र कुटुंब असत तर घरात शिस्त असती. मिसेस ला सगळ्या पद्धतीने समजावून सांगितल पण तिचा TV किंवा mobile बघण कमी होत नाही. मी फारसा TV किंवा mobile बघत नाही. मी घरातली सगळीच कामे करतो. यात मला काही मोठेपणा वाटत नाही. मी घरातली काम करतो तेंव्हा मिसेस ने मुलाचा अभ्यास घ्यावा एवढीच अपेक्षा. चित्रगुप्त आम्ही पुण्यातच राहतो. शाळेच नाव नक्की कळवा.
  • Log in or register to post comments
न
नेत्रेश Tue, 01/08/2019 - 04:03 नवीन
ईथे बर्‍याचजणांनी बरेच उपाय सुचवले आहेत. पण ते सर्व करण्यासाठी तुम्हा दोघांचेही एकमत असणे आवश्यक आहे. जर कुणी डॉक्टर कींवा कंसल्टंटने घरातील सर्वांना स्क्रीनटाईम कमी करायला सांगीतला तर कदाचित मिसेसना पटेल. तुम्हाला व मुलाला शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
म
मनिमौ Sun, 01/06/2019 - 16:21 नवीन
तुमचा प्राॅब्लेम आणी तो सोडवण्याची कळकळ दोन्ही पोचले. मोबाईल वरचे व्हिडिओ है खरेच एक भयानक व्यसन आहे. माझी मुलगी पण हळुहळु आहारी जात होती. ते वेळीच लक्षात आल्यावर मी आणी नवर्याने दोन्ही मोबाईलमधून यूट्यूब डिलिट केले. तसेच टाटा स्काय पण बंद पडले होते ते दुरूस्त करून घेतले नाही. आता सकाळी शाळेत जाण्याआधी ती तिला हवा तसा वेळ घालवते ज्यात खाली खेळायला जाणे चित्र काढणे किंवा घरात खेळते. संध्याकाळी मी किंवा तिचा बाबा घरी आल्यावर तिच्याबरोबर पुन्हा वेळ घालवतो. जेवताना TV OR MOBILE बघणे घरी अलाऊड नाहीये. मग ते आई बाबा आजी आजोबा कोणीही असोत. सुरज जी मुलाबरोबर तुमही दोघांनी PLEASE वेळ घालवा. त्यात अगदी अभ्यासाचच बोलल पाहिजे हेजरूरी नाही अगदी घरात काय स्वयंपाक करावा हे सुध्दा विचारल तरी चालेल. जमत असेल तर दोन चार दिवस तुभ्ही तिघे सहलीला जाऊन या. तुमची काळजी लौकर दुर व्हावी हीच शुभेच्छा
  • Log in or register to post comments
य
यशवंत पाटील Mon, 01/07/2019 - 08:15 नवीन
दादा, पोराची काळजी खरी हाये तुमची, पर त्या नादात चावडीवर बायकोवर कामुन टिका करताय राव ? येक घोळ निसतरता निसतरता दुसराच घोळ तयार करून राहिलात ना दादा.. आवरा. काळजी घ्या हो दादा.
  • Log in or register to post comments
स
सुरज भोसले Tue, 01/08/2019 - 08:50 नवीन
मनिमौ रविवारी सकाळी किंवा सुट्टी असेल त्यावेळी सकाळी त्याच्या बरोबर खेळायला जातो, आणि इतर वेळेस त्याच्याबरोबर वेळ घालवतो. दिवाळीच्या वेळीच ट्रीप ला जायला जमते कारण इतर वेळी जोडून सुट्टी मिळत नाही. यशवंत पाटील चावडीवर बायकोवर टीका करू नये हे मला समजत कि.
  • Log in or register to post comments
व
वीणा३ गुरुवार, 01/10/2019 - 22:40 नवीन
शाळेत त्याला मुल मारायची असे तो म्हणाला म्हणून त्याच्या PRINCIPAL MADEM ला जाऊन भेटलो. PRINCIPAL MADEM नि त्याला सांगितल कि मुलांनी मारल कि मला सांगायला ये. -- माझ्या मुलाच्या शाळेत ५वि कि ६वि च्या वर्गात झालेली केस आहे. एक ग्रुप वर्गातल्या एका मुलाला त्रास देत होते. त्याने घरी सांगितल्यावर आणि घरून शाळेत गेल्यावर त्याला "कुकूल बाळ" टाईप कॉमेंट मिळाल्या. हा ग्रुप त्याला मारत नव्हता कारण मारलं कि शिक्षकांना मध्ये पडायला लागतं, पण त्याला एक प्रकारे वाळीत टाकलं. त्या ग्रुप च्या धाकाने इतर मुलं पण त्याच्या बरोबर नीट वागत नव्हती. हा रोज मनातून खंतावत होता, हुशार असून शाळेत जावंस वाटत नव्हतं, नशिबाने पुढच्या वर्षी शाळाच बदलली आणि तो पण बदलला मानसोपचार, समुपदेशन आणि तुमचं प्रेम, लक्ष त्याला मिळणं गरजेचं आहे. या वयातल्या मुलांना पालकांसमोर रडणं किंवा तक्रार करणं हळू हळू कमीपणाचं वाटायला सुरवात झालेली असती (किंवा होत असते) खासकरून मुलग्यांना. मला तरी वरची गोष्ट फार सिरीयस वाटली. कदाचित कुठल्यातरी खेळाला घालून बघा, इतर मित्र - मैत्रिणी मिळाले कि त्याला बरं वाटेल. वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे तुम्ही तिघे ट्रिप ला जा, विकेंड ला मोकळ्यावर फिरायला जा, कदाचित जास्त बरं वाटेल.
  • Log in or register to post comments
स
सुरज भोसले Fri, 01/11/2019 - 11:31 नवीन
वीणा३ शाळेत किंवा SCHOOL VAN मध्ये कोणी त्रास देत का आणि शाळेत जाणे व अभ्यासा बद्दल त्याला बर्याच वेळा सगळ्या पद्धतीनी विचारून झालं, पण तो काही बोलत नाही त्याला खेळण्याच्या क्लास ला घातले होते, काही दिवस गेला नंतर जाणे बंद केले. सुट्टीच्या दिवशी त्याच्या बरोबर खेळायला जातो, इतर दिवशी त्याची शाळा सकाळी असते त्यामुळे शक्य नसत.
  • Log in or register to post comments
न
नेत्रेश Mon, 01/14/2019 - 08:38 नवीन
"मिसेस ला सगळ्या पद्धतीने समजावून सांगितल पण तिचा TV किंवा mobile बघण कमी होत नाही." - TV आणी mobile बंद करणे याला पर्याय नाही. एकदम जमत नसेल तर ट्प्या-टप्याने कमी करण्याचा प्रयत्न करा. - जसे की मुलगा घरी असताना TV लावायचा नाही. मुलासोबत mobile वर काहीही प्रोग्रम पहायचा नाही, ईत्यादी. - नंतर केबल बंद करुन केवळ सुट्टीच्या दीवशी सिनेमागृहां मध्ये जाउन सीनेमा पहातचा, ईत्यादी. - मुलगा लहान असतानाच TV आणी mobile चा अतीवापर आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करा. TV आणी mobile च्या अतीरेकामुळे खुप कुटुंबांचे अगदी न भरुन येणारे नुकसान झालेले आहे. घरातली चांगली हुशार मुले आईच्या TV सिरीयल्सच्या वेडापाई,अभ्यास सोडुन TV समोर बसुन स्वतःचे नुकसान करुन घेताना पाहीली आहेत. आम्ही त्यांना कीत्येकदा समजाउन सांगुनही काही फरक पडला नाही, व शेवटी मुले १०वी / १२वी नापास झाली. त्यावरुन हे व्यसन कीती वाईट आहे याची मला कल्पना आहे.
  • Log in or register to post comments
स
सुरज भोसले Mon, 07/01/2019 - 10:18 नवीन
मागच्या वर्षीपण मुलाला खूप कमी मार्क मिळाले (२१%). मुलाने व मिसेस ने मोबाईल व T.V. कमी बघावा म्हणून मी बरेच प्रयत्न केले पण ते असफल झाले. एखादा समुपदेशकच दोघांचे मोबाईल व T.V. कमी बघण्याबद्दल व मुलाच्या प्रॉब्लेम बद्दल सांगू शकेल. पुण्यात कोणी समुपदेशक असल्यास कृपया सांगा
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Wed, 07/03/2019 - 14:11 नवीन
हे नाही सोडता येत हे accept करा व पुन्हा इन्ट्रोस्पेक्ट करा की मुलाच्या स्वच्छनदिपणाचे नेमकं रहस्य काय. सांप्रत स्थितीत त्याची मैत्री कोणत्या प्रकारच्या मुलांशी जास्त असते/जुळते. जर याचे उत्तर सर्वच असेल तर आपल्या मुलाची अवस्था फार एकटेपणाची आहे. त्याला विश्वास कोणावरही नाही म्हणून त्याचे स्वतःचे अस्तित्व जसे आहे तसे मान्य करणारे कोणीही सध्या आजूबाजूला नाही त्याचा हा एकटंपणा तोडायला हवा जो मुख्य प्रॉब्लेम आहे. तसेच कबीर सिंग प्रमाणे इज ही अ रेबेल विदाऊट अ कॉज ऑर विथ कॉज... हे स्पष्ट झालेच पाहिजे. इफ ही इज अ रिबल विथ कॉज प्रयत्न करा की हे कारण दूर होईल. इफ नॉट घाबरू नका तुमच्या परीने प्रयत्न कौटुंबिक वातावरण खराब न करता चालू ठेवा एक दिवस त्याचा मार्ग तो स्वतः निवडेल फक्त त्याच्या आड येऊ नका आणि चुकीच्या गोष्टीच्या आहारी जाण्याची किंमत समजावा. तुमच्या हातात तेव्हढेच आहे. सकृतदर्शनी बुलिंग पेक्षा त्याला कनेक्ट होणे जमत नाही असं अल्पमतीला वाटत आहे.
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Wed, 07/03/2019 - 14:15 नवीन
आज पासून सकाळी अंघोळ बंद करा त्याची. फक्त हातपाय धुऊन शाळेत पाठवा. शाळेतून परतल्यावर अंघोळीची सवय लावा. हा प्रयत्न किमान करून पहाच_/\_
  • Log in or register to post comments
N
nishapari Wed, 07/03/2019 - 11:58 नवीन
वर खूप अनुभवी लोकांनी सल्ले - प्रतिसाद दिले आहेत ... मला लहान मुलांचा काडीचाही अनुभव नाही ... तरी काहीतरी सांगावंसं वाटलं म्हणून सांगत आहे , पटलं तर पाहा नाहीतर सोडून द्या . हे मी वैयक्तिक अनुभवातून सांगत आहे असं समजा ... वर कोणीतरी मुलगा कार्टून मध्ये मानसिक आसरा घेत आहे , असं म्हटलं आहे ... ते जर खरं असेल आणि काहीतरी जादू होऊन सगळे प्रश्न एक दिवस सुटतील अशी आशा खोलवर त्याच्या मनात असेल तर तो ती उघड बोलून दाखवणार नाही ... कारण बोलून दाखवली तर सगळे हसतील किंवा असं काही नसतं हेच पटवण्याचा प्रयत्न करतील हे त्याला माहीत आहे ... मोठी शिकलीसवरलेली माणसंसुद्धा जेव्हा त्यांच्यापुढचे प्रश्न त्यांच्या कपॅसिटी बाहेरचे असतात तेव्हा देवाची भक्ती कोणी ना कोणी सांगितलेले उपाय , तोडगे यांच्या नादाला लागतात ... त्याचा तात्काळ परिणाम दिसो वा न दिसो , कारण त्यात त्यांना एक मानसिक आसरा / आधार मिळत असतो ..... पण ते करत असताना त्यांची व्यवहारिक बुद्धी त्यांना आपला पोटापाण्याचा उद्योग सोडून दिवसाचे 8 - 9 तास देवपूजा करू देत नाही ... मनाला माहीत असतं आपले प्रश्न सोडवायचे तर हातपाय हलवायलाच हवेत , सगळं आपोआप होणार नाही . ही विवेकबुद्धी वर्षानुवर्षाच्या आयुष्याच्या अनुभवातून आलेली असते . प्रत्येक अकरा - बारा वर्षाच्या मुलाकडे ही विवेकबुद्धी असू नाही , शिवाय लहान वयात कल्पनाशक्ती / मनाची एखाद्या गोष्टीवर श्रद्धा किंवा विश्वास ठेवण्याची क्षमता जबरदस्त असते... जी पुढे वयानुसार कडू गोड अनुभवांनी ठिसूळ होत जाते प्रत्येक माणसातच ... पण ही सध्या ठिसूळ न झालेली , स्ट्रॉंग असलेली विश्वासाची क्षमता आणि त्याला न पेलवणारे प्रश्न यांचं कॉम्बिनेशन झालं असेल तर त्याने एखाद्या काल्पनिक गोष्टीत आधार शोधला तर त्याला दोष देणं बरोबर नाही . त्याला काल्पनिक जगातून वास्तवाच्या जगात आणण्यासाठी त्याने कार्टूनचा आधार सोडणं गरजेचं आहे ... स्क्रिनचं व्यसन एक वर्षात सुटलेलं नाही असं तुम्ही म्हटलं आहे ... टीव्ही - कार्टून हा जर मुलाचा कोपिंग मेकॅनिजम बनला असेल ( म्हणजे मन त्यात गुंतवून ठेवायचं जेणेकरुन शाळा , अभ्यास , परीक्षा असले टेन्शन देणारे विषय मनाजवळ फिरकणारच नाहीत ) तर तो अचानक पूर्ण बंद करणं मला वैयक्तिकरित्या चुकीचं वाटतं .... त्याचे उलट वाईट परिणाम होतील असं मला वाटतं ... क्षुल्लक कारणावरून मुलांनी भलताच निर्णय घेतल्याच्या दुर्दैवी बातम्या आपण वर्तमानपत्रातून वाचतो आजकाल ... शिवाय तुम्ही म्हटल्याप्रमाणे टीव्ही बंद करण्यासारखी परिस्थिती सध्या नाहीच आहे तुमच्या घरी ... तेव्हा त्याच्या स्क्रिनच्या आवडीचाच उपयोग करून त्याला हळूहळू कार्टून आणि जादूच्या जगातून बाहेर काढण्याचा प्रयत्न उपयोगी ठरेल . त्याला कार्टून ऐवजी खऱ्या माणसांच्या मालिका - चित्रपट पहायची आवड लावा ... सुरुवातीला चटकन लक्ष आकर्षित करून घेणारे लहान व्हिडीओ दाखवा ... तुम्ही त्याच्याबरोबर बसून बघा , एकट्याने पाहण्यापेक्षा दोघांनी मिळून पाहण्यात खूप आनंद मिळेल त्याला ..... एकट्याला लावून दिलं तर तो बोअर होऊन बंद करण्याची किंवा कार्टून लावण्याची शक्यता अधिक . तारे जमीं पर , चक दे इंडिया , दंगल , ओएमजी ओह माय गॉड यासारखे चित्रपट दोघांनी मिळून पहा , टीव्हीवर आणून लावणं शक्य असेल तर किंवा मोबाईलवर ... सुपर 30 येतो आहे तो दोघांनी किंवा तुम्ही , पत्नी आणि मुलाने थिएटर मध्ये जाऊन बघा , काहीतरी किंचित तरी परिणाम होईल मुलाच्या मनावर ... युट्यूब वर असंख्य शॉर्ट फिल्म्स आहेत त्यातल्या त्याला समजतील आवडतील अशा दर्जेदार निवडून त्याच्यासोबत बघा .... आपल्या जुन्या मिथिओलॉजिकल मालिका रामानंद सागरचा श्रीकृष्ण , देवों के देव महादेव युट्युब / हॉटस्टारवर आहेत ... त्यांची गोडी लागते का पाहा ... देवों के देव महादेवचे 1 - 2 एपिसोड हॉटस्टार वर दोघांनी मिळून बघा , आवडतात का त्याला ... त्याला फॅन्टसीची आवड आहे , त्यामुळे कार्टून बाहेरच्या मालिकांची सुरुवात फॅन्टसी निगडित जेनर मधून केली तर कदाचित उपयोग होईल ... पण पूर्ण फॅन्टसी नको असं वाटतं - हॅरी पॉटर / जादूची पेन्सिल वगैरे नको .... मालगुडी डेज , पृथ्वीराज चौहान ( हॉटस्टार ) , जोधा अकबर ( ऐतिहासिक ज्ञानाच्या दृष्टीने शून्य उपयोग पण कौटुंबिक कलह वगैरे नसलेली लहान मुलांनाही आवडेल अशी वाटते ) , बा बहू और बेबी ( हलकीफुलकी आहे ) राजा शिवछत्रपती , दिल दोस्ती दुनियादारी यासारख्या मालिकांचे सुरुवातीचे काही एपिसोड दोघांनी मिळून बघा ... त्याला जी आवडेल ती पुढे पाहू द्या ... मॅचेस आवडत असतील तर पहा ... इंग्रजी संवाद समजत असतील तर फॅमिलीने बघता येण्यासारखे , लहान मुलांना आवडतील असे चांगले इंग्रजी चित्रपट , मालिका मिळून पाहा . त्यामुळे हळूहळू कार्टून्स मधला रस निघून जाईल .. आधी छोटी छोटी आणि मग जरा मोठी पुस्तकं आणून वाचनाची गोडी लावण्याचा प्रयत्न करा , फास्टर फेणे , गोट्या , कॉमिक्स वगैरे .. शिवाय वर अनेकांनी सांगितल्याप्रमाणे त्याला बाहेर फिरायला नेणं , त्याच्याशी गप्पा - त्याच्याबरोबर जास्त वेळ घालवणं हे सुद्धा महत्वाचं आहे ... कदाचित कार्टून्स बघून जादू होण्याची त्याची अपेक्षा नसेलही ... पण त्याला न पेलवणाऱ्या गोष्टी टाळण्यासाठी तो टीव्ही , गेम , मोबाईल यांची मदत घेतो आहे ही तरी खरी गोष्ट आहे . न पेलवण्यासारखे असे काय प्रश्न पडलेत 11 वर्षाच्या मुलाला असं म्हणू नका ... तुम्हाला क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टी त्याच्या दृष्टीने खूप मोठ्या असू शकतात .... तो इतर मुलांसोबत जाऊन खेळतो आहे म्हणालात ती खूप चांगली गोष्ट आहे , त्याचा इतर मुलांमध्ये वावरण्याचा आत्मविश्वास शाबूत आहे ... म्हणजे प्रॉब्लेम फक्त शाळेशी निगडित आहे ... वर्गात जे शिकवत आहेत ते बरोबरच्या सगळ्यांना समजत आहे फक्त आपल्यालाच समजत नाही ही खूप वेदनादायी गोष्ट असू शकते काही मुलांसाठी .. ते तुम्हाला नाही समजणार , त्या भूमिकेतून ज्यांना जावं लागत आहे त्यांनाच समजेल . तो शाळेत जायला नाही म्हणतो यात नवल काहीच नाही ... ( दहावीत चांगले % पडले म्हणून सगळ्यांबरोबर मीही सायन्सला प्रवेश घेतला , पुढे 2 वर्षांनी सायन्स सोडून कला शाखा निवडली .. दहावीत मला गणितात 150 पैकी 139 गुण पडले होते पण 11 वी आणि 12 वीत आमच्या गणिताच्या शिक्षकांनी शिकवलेलं एकही अक्षर / आकडा माझ्या डोक्यात शिरला नाही , कुणालाच त्यांनी शिकवलेलं कळत नव्हतं , काही मुलं दुसऱ्या एका शिक्षकांकडे 11 वीत क्लासला जाऊ लागली , मी 11 वीत गेले नाही आणि बारावीत " इतकं बेसिक म्हणजे 11 वीचं तुला कसं येत नाही " असा अपमान तिथे होईल सगळ्यांसमोर ... म्हणून 12 वीतही गेले नाही ... सुदैवाने काही प्रकरणं सोपी होती , त्यांचा अभ्यास आपला आपण करून पासिंग पुरते मार्क मिळवता आले . फिजिक्सच्या वर्गात 70 % भाग डोक्यावरून जायचा आणि लॅबोरेटरी मधल्या प्रॅक्टीकल मध्ये तर 100 % , आपल्याला काही समजत नाही आहे याच्यापेक्षा टॉर्चर माझ्यासाठी दुसरं कुठलं नव्हतं . दोन वर्षं म्हणजे शुद्ध नरकवास ठरली असती पण केमिस्ट्री , बायोलॉजी , इंग्रजी , आयटी सारखे विषय बऱ्यापैकी सोपे होते म्हणून निभाव लागला नाहीतर मीपण रोज सकाळी उठून मला कॉलेजला जायचं नाही असा सिन केला असता . ) अभ्यासातलं सगळं समजतं आहे पण मुद्दामून अभ्यास करायचा , फक्त मजामस्तीच करायची अशी भूमिका कुठलंही मुल घेत नाही.. अभ्यास / विषय नीट समजत असतील तर आपोआपच अभ्यासाची गोडी लागते ... तो सहावीत / सातवीत आहे ... तुम्ही सांगितलंत त्याला लिहिता वाचता नीट येतं ... गणित - इंग्रजी हे विषय कसे आहेत ? उत्तर येत असून लिहीत नाही याचा अर्थ त्याचा कॉन्फिडन्स गेला असण्याची शक्यता आहे .. पहिली ते सातवी पर्यंतची गणिताची पुस्तकं आणून पहिलीच्या पुस्तकापासून सुरुवात करून पाहा .... प्रत्येक व्याख्या / गणित त्याला नीट कळलं आहे याची खात्री करून घ्या , नसेल तर ते सोपं करून शिकवा ... सोप्यापासून सुरुवात करा . जर चौथीतलं एखादं गणित आलं नाही तर रागावू नका , एवढं कसं येत नाही हे तर चौथीचं आहे अशी भाषा वापरू नका ... एक एक गणित , थोडं थोडं इंग्रजी व्याकरण जसं जसं त्याला जमत जाईल तसा तसा त्याचा कॉन्फिडन्स वाढत जाईल ... शिकवताना त्याला समजलं की कौतुकाचा सूर असू दे ... छोट्या छोट्या प्रगतीने आपल्या वडिलांना आनंद होत आहे हे त्याला स्पष्ट कळू दे तुमच्या चेहऱ्यावरून .... तुम्ही शिकवलेलं जर त्याला समजत नसेल ( प्रोफेशनल शिक्षकाचं शिकवणं अधिक चांगलं असू शकतं ) आणि तुम्हाला आर्थिकदृष्ट्या शक्य असेल तर त्याला एकट्यालाच घरी येऊन शिकवणारा / शिकवणारी प्रायव्हेट ट्यूटर ठेवा , ट्यूटरला सगळा प्रॉब्लेम समजावून सांगून बेसिक पासून शिकवून बेसिक पक्के करून घ्यायला सांगा , गणित , इंग्रजी या विषयांचे . एकट्याचाच क्लास असल्याने बेसिक शिकून घेताना इतर मुलांसमोर त्याला संकोच - लाज वाटणार नाही .. शिवाय परक्या शिक्षकासमोर खेळायला जातो किंवा झोप येते यासारखी कारणंही देता येणार नाहीत ... तुमच्या घरात शिकवत असल्यामुळे मुलगा भावनिकदृष्टया कम्फर्टेबल असेल . क्लास घेणारा शिक्षक / शिक्षिका शक्यतो पंचवीस ते तिशीच्या वयातील , हसत - खेळत शिकवणारा प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचा पण त्याचबरोबर आवश्यक तेवढा कडक असलेला , सबबी टाळाटाळ चालवून न घेणारा शिक्षक असेल तर उत्तम .. जास्त प्रौढ , कडक शिक्षकाचं मुलावर दडपण येतं , अशा शिक्षकाला प्रश्न - शंका विचारायला तो धजावणार नाही . शिक्षक मिळू शकत नसल्यास तुमच्या जवळच्या परिचयातील - विश्वासातील एखादा हुशार कॉलेज विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी एखादा तास त्याला बेसिक गणित - इंग्रजी शिकवण्यास मिळाला तर पाहा... त्याचं मिडीयम इंग्रजी असेल तर ते त्याला जड जात नाही ना याची खात्री करून घेतलीत का ? वाचता येणं वेगळं आणि 8 - 10 ओळींच इंग्रजी उत्तर लक्षात ठेवून लिहिणं वेगळं ... त्याच्या शालेय पुस्तकांपैकी इतिहास / भूगोल विषयाचं मराठी मिडीयम मधलं शालेय पुस्तक आणि गाईड खरेदी करून आणा आणि एक धडा वाचून दाखवून , त्याच्याकडून वाचून घेऊन मग त्या धड्यावरची 2 - 3 मध्यम लांबीची प्रश्नोत्तरं गाईड मध्ये बघून एका वहीत लिहून घ्या त्याच्याकडून आणि त्यातलंच एखादं 4 - 5 तासांनी न बघता दुसऱ्या वहीत लिहायचं ... 2 किंवा 3 च प्रश्न वाचायचे आहेत तेव्हा कोरं अजिबात ठेवायचं नाही , जे येतं ते लिहायचं असं बजावून सांगायचं .... असं 4 - 6 दिवस केल्यावर मराठी आणि इंग्रजी मिडीयम मधल्या त्याच्या ग्रहणक्षमतेत काही फरक वाटतो का हे तुम्हाला आणि त्यालाही समजेल .... तसं जर असेल आणि पूर्ण मराठी हा पर्याय स्वीकारायचा नसेल तर सेमी इंग्लिश हा पर्याय असतो , विज्ञान आणि गणित हे विषय फक्त इंग्रजीत बाकी इतिहास , भूगोल मराठीत ... त्यामुळे त्याच्यावरचा ताण कमी होईल कदाचित ... पण पहिली ते आताच्या इयत्तेपर्यंतचं गणित आणि भाषा व्याकरण कच्चं असेल तर ते पक्कं करणं ही सगळ्यात महत्त्वाची प्रायोरिटी असली पाहिजे . सकाळी उठायला त्रास होतो याचं कारण रात्री तो खूप वेळ जागा असतो हे तर नाही ना ? मोबाईल रात्री दहा नंतर हातातून काढून घ्यावा ... तेवढा तरी तुमचा धाक असलाच पाहिजे ... पत्नीला मोबाईलला पासवर्ड घालायला सांगा .... मुलगा लहान आहे तरी तो युट्यूब वर काय बघतो याकडे लक्ष ठेवा ... देखरेखीशिवाय मोबाईलचा मुक्त वापर असू नये .... युट्युब हिस्ट्री वेळोवेळी चेक करा .... "तसलं" काही सापडलं तर खडसावा ... 8 - 15 दिवस मोबाईल मिळणार नाही म्हणून सांगा . पत्नी तर गेम्स खेळत नाही ना .. मग दोघांच्या मोबाईलमधले गेम काढून टाका .. हुशार मोबाईलवाल्याकडे जाऊन मोबाईलची स्पेस कशानेतरी भरून टाका , हिडन ऍप्स वगैरे , जेणेकरून गेम परत इन्स्टॉल करता येणार नाहीत .... दुसऱ्या ऑनलाइन साईटवर गेम खेळत असेल तर गेम साईट मधून तुमच्या बँकेच्या खात्याचा पासवर्ड मिळवतात आणि अशी काही जणांची खाती पूर्ण रिकामी झाली , मग चवकशी केल्यावर कळलं की ते अमुक गेम खेळत होते ऑनलाइन असं काहीतरी लॉजिकल रचून त्याला पटेल खरं वाटेल असं सांगा .... चांगल्या गोष्टीसाठी खोटं बोलण्यात काही वाईट नसतं ... मुलाच्या मोबाईल वापरायच्या वेळेवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करा .. सांगून ऐकणं कठीण आहे ... रात्री लवकर झोपायचा नियम करा , सगळ्यांनाच झोपायला उशीर होत असेल तर मुलाला एकट्याला तरी लवकर 8 वाजता जेवायला घालून दहा वाजेपर्यंत झोपवणं शक्य होतं का पाहा , वेगळी खोली असेल तर सोपं होईल . नवीन डॉक्टरांनी सांगितलं आहे म्हणून सांगितलं की त्या सक्तीला आधार येईल त्याच्या नजरेत ... नाईलाजाने का होईना मान्य करावं लागेल ... सुरुवातीला कठीण जाईल पण थोडे प्रयत्न केले तर जेवण आणि झोपायची वेळ थोडी अलीकडे आणणं शक्य आहे ... दिवसा तो झोपतो याचा अर्थ रात्री त्याची झोप पूर्ण होत नाही , 12 वाजता झोपून 6 ला उठून शाळेच्या तयारीला लागावं ही अपेक्षा सगळ्याच मुलांना पूर्ण करता येऊ शकेल असं नाही ..... त्यातही शाळेत शिकवलेलं कळत असेल तर मुलं जातात उठून आवडीने ... पण शाळेत शिकवलेलं काही धड समजत नाही , शरीराची झोप पूर्ण झालेली नाही ... तशात उठून , जबरदस्तीने पाठवतात , तिथे जाऊन ते टॉर्चर सहन करायचं .... त्याची चिडचिड होणं साहजिकच आहे ... शाळेतून काहीच फायदा होत नसेल आणि होम ट्यूटरिंगने फरक पडतो आहे हे लक्षात आलं तर शाळेत विनंती करून शाळेत न जाता सरळ वार्षिक परीक्षेला बसण्याची मुभा मागून घ्यावी .. आणि शाळेत पाठवण्याऐवजी 3 - 4 तास घरी येऊन शिकवणारा शिक्षक शोधावा ... पण त्याआधी मुलाकडून त्या क्लासमध्ये तक्रार न करता अभ्यास करण्याची , रोजचा अभ्यास त्या त्या दिवशीच करण्याची , समजत नसेल ते क्लास घेणाऱ्या व्यक्तीला किंवा तुम्हाला विचारून समजून घ्यायचंच आणि ठरवून दिलेल्या वेळीच खेळायला जाणे यासारख्या गोष्टी कबूल करून घ्याव्यात ... एका कागदावर लिहून सही घ्यावी नाहीतर सगळ्यांना हळूहळू सोयीस्कर विसर पडतो .... अमुक कालावधीने उदाहरणार्थ 2 महिन्यांनी क्लासच्या सर किंवा मॅडमनी शिकवलेल्या बेसिक नॉलेज वर तुझी परीक्षा घेतली जाईल आणि त्यात नापास झालास तर परत शाळेत जावं लागेल असं कबुल करून घ्यावं . रात्री 11 पर्यंत झोपून सकाळी 7 - 8 वाजता उठून झोप व्यवस्थित पूर्ण झाली , आंघोळ - नित्यकर्म सावकाश आटोपली की सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 - 2.30 तास असा क्लास , मधला वेळ वाचन , ठराविक टीव्ही / युट्युब कार्यक्रम ... जे काही त्याला आवडतं ते .... दिवसाची झोप नाही .. असा दिनक्रम केला तर त्याच्यावरचा शाळेचा ताण जाऊन शिकण्यासाठी त्याच्या मनाची अधिक तयारी होईल असं मला वैयक्तिकरित्या वाटतं ... पण मी काही तज्ज्ञ नाही ... चांगल्या समुपदेशकांचा सल्ला घेण्याची गरज आहेच ... काही कमी जास्त बोलून गेले असेन तर माफ करा .
  • Log in or register to post comments
प
पलाश Wed, 07/03/2019 - 14:25 नवीन
सांगोपांग विचार करून दिलेला हा प्रतिसाद आवडला. फार चांगल्या सूचना केल्या आहेत. धागालेखकास व पाल्यास ही समस्या सोडवण्यात यश मिळो हीच शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
व
विनिता००२ गुरुवार, 07/04/2019 - 09:50 नवीन
खूप विचारपूर्वक लिहील आहे निशापरी :)
  • Log in or register to post comments
स
सुरज भोसले Tue, 07/09/2019 - 10:03 नवीन
निशापरी छान सल्ला दिला आहे. होमटयूटर बहुतेक ठेवावाच लागेल. आत्ता त्याला एका ठिकाणी ट्युशन ला पाठवतो आहोत. बऱ्याच वेळा तो ट्युशन बुडवतो. तो दुपारी आजी कडे असतो, तीच ऐकत नाही सारखा टीव्ही बघत असतो. (पत्नी तर गेम्स खेळत नाही ना .. ) पत्नी मोबईल वर गेम्स खेळात नाही पण सिरीयल बघत बसते. मी घरातली काम करतो. मिसेस नि एक तास मोबाइल बघून एक तास भर त्याचा अभ्यास घ्यावा. पण तीच मोबाइल बघणं कमी होत नाही, व तो टीव्ही किंवा मोबाइल बघत बसतो चांगला समुपदेशकच दोघांचं मोबाईल व टीव्ही च व्यसन कमी करू शकेल. आत्ता पर्यत तीन मनोसोपचार तज्ञाची treatment घेतली. पण कुणाच्याच treatment चा काहीच परिणाम झाला नाही. तो हुशार आहे पण आभ्यास करण्याचा व लिहिण्याचा कंटाळा. आजून कोणी समुपदेशक पुण्यात असतील तर कृपया सांगा.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 07/09/2019 - 12:49 नवीन
तुम्हांला लोकांनी ह्या धाग्यामध्ये समुपदेशक सुचवले होते की. त्यांच्यापैकी कोणाला काँटॅक्ट केलेत का? नेत्रेश ह्यांनी अनेक उत्तम उपाय सुचवले होते, त्यापैकी काही केलेत का? हे अपडेट्स धाग्यावर द्याल का? अजूनही आपल्याला समुपदेशक मिळाले नाहीत का? तीन मानसोपचार तज्ज्ञ बदलले म्हणजे कोणतीच उपाय योजना आपण धड करत नाही आहात, असे काहीसे म्हणावेसे वाटते. उपचारांचा परिणाम होत नाही, हे कसे ठरवता? त्यातील तज्ज्ञ व्यक्ती हे ठामपणे म्हणून शकेल ना? घरातील टीव्ही काही काळ तरी बंद का करीत नाही? पाल्याची व बायकोची ह्या व्यसनाबद्दल तुम्हाला खरेच काळजी असेल तर हे कितीसे कठीण असेल? केबलवाल्याला पुढील महिन्यापासून टीव्ही च्यानल बंद करायला सांगा.
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Tue, 07/09/2019 - 23:13 नवीन
  1. पी हळद आणि हो गोरी असे मानसोपंचाराच्या बाबतीत अजिबात होत नाही.
  2. आपल्या केसमधे समुपदेशन न्हवे औषधाची गरज आहे(Go to psychiatrist not psychologist) असे सकृत दर्शनी ठामपणे वाटते
  3. हे उपचार नेमके निदान व पुढील ट्रीटमेंटची दिशा ठरवायला किमान 5 महिने तरी घेतात तो पर्यंत साधारण मोठ्या शहरात पर सेशन/विसीट ₹५०० असा सरासरी तपासणी खर्च असतो
  4. औषध खर्च वेगळा परंतु तो महिन्याला ₹500 एव्हडाही होत नाही अर्थात औषधे आणि त्यांचे अर्थकारण हा विषयच गहन असल्यानं याबाबत डॉक्टरच काय ते योग्य बोलतील
  5. वरील मुद्दे लक्षात घेता सहज समजेल कि हे उपचार खर्चिक नसले तरी प्रचंड पेशन्स चे काम आहे, आणि बहुतेक पेशन्ट इथेच हार मानून उपचार मधेच सोडून देऊन अजून निराश होतात तसे होता कामा नये
  6. कोणत्याही शारीरिक आजारपणात पेशण्ट कधी एकदा हा त्रास थांबतोय दूर होतोय याचीच आतुरतेने वाट बघत असतो प्रयत्न करत असतो परंतु मनाच्या आजारपणात बरेचदा नेमके याच्या उलट असते, पेशन्ट डिनायल मोड मधे असतो ज्यामध्ये आपण वर्तनाने आजारी आहोत चुकत आहोत हेच त्याला मान्य होत नसते परिणामी आपल्यात काही बदल अपेक्षित आहेत हेच अमान्य असल्याने शारीरिक रोगाप्रमाणे मानसोपचारहि आपल्याला आवश्यक आहेत हेच गांभीर्याने घेतले जात नाहीत मान्य केले जात नाही मग रोगमुक्ती तर दूरच पण ब्लेम गेम मात्र नक्कीच सुरु होतो आणि आपणहि तो सध्या करत आहात
  7. परंतु असे करू नये, आपल्या कृती हया आपल्या इच्छा नियंत्रित करत नसून आपल्या इच्छा या शरीरातील (मेंदूतील) कार्यप्रणालीशी बांधील व अंकित असून त्यानुसार आपली कृती होते हे वास्तव चटकन मान्य करणे उमजून घेणे हा यावरील रामबाण
  8. आणि आपले वर्तन हे फक्त आपले ज्ञान, अनुभव व संस्काराचा भाग नसून मेंदूच्या संपूर्ण अंकित असलेल्या गुंतागुंतीच्या कार्यप्रणालीचा परिपाक आहे जो औषधांनी नियंत्रित होणे हे एक साधे सोपे व तर्कशुद्ध वास्तव आहे जे आपल्याच अहंकारात झाकोळले जाते व फार मोठ्या नुकसानास कारणीभूत ठरते
बाकी जर कोणी नाहीच मिळाले तर मला व्यनि करा असे नमूद करून जाहिरात टाळतो. मी या विषयातील तज्ञ अजिबात नाही.
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Tue, 07/09/2019 - 23:28 नवीन
आणि हो सकृतदर्शनी मुलाला हट्टीपणा त्याच्या दोन्ही अथवा एका पालकांकडून मिळालाय असेही आपले लेख वाचून स्पष्टपणे वाटते तेंव्हा तेंव्हा यात काही अनैसर्गिक आहे असे अजिबात वाटून घेऊन नका ती आपल्याच स्वभाव, अनुभव व संस्काराची पुढील आवृत्ती आहे. योग्य व्यक्ती त्याच्यात हे नियंत्रित कसे करायचे हे नक्कीच उतरवू शकतील निश्चीन्त व्हा.
  • Log in or register to post comments
स
सुरज भोसले Wed, 07/10/2019 - 13:02 नवीन
यशोधरा, सगळ्यांनी यौग्य सल्ले दिले आहेत. मी घरातील टीव्ही व मोबाईल बंद करण्याचे बरेच प्रयत्न केले पण ते असफल झाले (टीव्ही ठराविक वेळीच लावायचा, सुट्टीच्या दिवशी फिरायला जायचे किंवा सिनेमाला जायचे असे करत होतो, पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही) बऱ्याच जणांनी समुपदशेक सांगितले ते मुंबई किंवा ठाणे येथील होते. केबलवाल्याला पुढील महिन्यापासून टीव्ही च्यानल बंद करायला सांगा .... डिश किंवा टीव्ही चॅनेल बंद करता येतील पण मोबाईलच काय करणार? जॉनविक्क, पहिले दोन डॉक्टर डॉक्टर मुलाशी फक्त २ मिनिटे बोलायचे व औषधे द्यायचे, डॉक्टरांनी मुलाशी जास्त वेळ वेळ बोलायला पाहिजे असे आम्हाला वाटते (फी ५००/-रुपये), एक- दोन महिन्यातच मुलगा डॉक्टरांकडे यायला टाळायला लागला. तिसरे डॉक्टर मुलाशी बोलायचे, चार महिने त्यांची ट्रीटमेंट घेतली, पण चार महिन्यात १% पण त्यात फरक दिसला नाही (डॉक्टरांची फी १५००/- पंधरा दिवसांसाठी व औषधाचे ३५००/- पंधरा दिवसांसाठी, १०,००० एक महिन्यासाठी ) मुलात थोडाजरी फरक दिसला असता तरी काहीही करून आम्ही हि ट्रीटमेंट continue केली असती
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 07/10/2019 - 13:17 नवीन
केबलवाल्याला पुढील महिन्यापासून टीव्ही च्यानल बंद करायला सांगा .... डिश किंवा टीव्ही चॅनेल बंद करता येतील पण मोबाईलच काय करणार?
क्षमस्व, पण अशा प्रश्नांमुळे काही स्ट्रिक्ट ऍक्शन घेण्याची तुमची तयारी (इच्छा) आहे की नाही असा मुळात प्रश्न पडतो. "पण मोबाईलचं काय?" हे ठीक, पण निदान ती केबलतरी निग्रहाने बंद केली का? एकेक करुन स्टेप्स घेता येणार नाहीत का?
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Wed, 07/10/2019 - 13:23 नवीन
आणि 10,000 हा खर्चही मला पटत नाही. जर कोणी नाहीच मिळाले तर मला व्यनि करा, शक्य असेल तर मला 10k वाल्या डॉक्टरचे रोगनिदान अथवा प्रिसक्रिप्शन देखील व्यनी करावे. माझ्या माहिती बाबत मी आश्वस्थ आहेच, आणि आपली हरकत नसेल तर मी स्वतः सुद्धा डॉक्टरांसोबत उपस्थित असेन. आपण योग्य तो निर्णय घ्यावा.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 07/10/2019 - 13:29 नवीन
टीव्ही ठराविक वेळीच लावायचा,
घरात टीव्ही ठेवूच नका. विकून टाका. मोबाईल बेसिक वापरा, वापरायला द्या. ज्यात गेम्स वगैरे खेळता येतील असा वापरू नका, वापरायला देऊ नका. खरंच रिझल्ट हवे असतील तर हे उपाय करायला हरकत नसावी.
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Wed, 07/10/2019 - 13:43 नवीन
असा किती लोकांचा विदा आपल्याकडे आहे ज्यांची मुले वरील उपायांनी सुधारली ? कदाचित एकही नाही, विशेषतः असे जे टीव्ही आणि मोबाईल मुळे अजिबात बिघडले न्हवते, मग आपण वरील कारणेच रूट कॉज आहेत हे कसे ठाम मानता ? असेच जगायचे असेल तर गुहेतच रहायला जाणे जास्त श्रेयस्कर. टीव्ही मोबाईल कमी करणे वेगळं आणि प्रतिबंधित करणे वेगळं. जेवण प्रतिबंधित करून किती लोकांना भूक लागले बंद झाले ?
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 07/10/2019 - 14:15 नवीन
हा एकच उपाय आहे हे नी कुठे म्हटले आहे, ते दाखवा. पण अगदी प्रथमपासून ह्या धाग्यावर मुलगा व बायको टीव्ही बघत बसतात, मोबाईल वर गेम्स खेळत बसतात इत्यादि लिहिले आहे. त्यासाठी हा एक उपाय करण्यासारखा आहे. टीव्ही आणि मोबाईल हे जर distraction होत असेल, तर ते मार्गातून हतवणे ह्या गृहस्थांच्या हातातले आहे ना? त्याने काही अपाय तर होणार नाही ना? म्हणजे मला तरी वाटते की त्यात काही अपाय नसावा, तुम्हांला वाटत असल्यास व त्यामुळे होणारा अपाय माहीत असल्यास कल्पना नाही.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 07/10/2019 - 14:19 नवीन
नी= मी* आणि टीव्ही+ मोबाईल हेच रूट कॉज आहेत असेही मी म्हटले नाहीये. जे मी लिहिले नाही, ते माझ्या नावावर खपवू नये. हे नक्की म्हणेन की हे अनेक कॉजेसपैकी एक नक्कीच आहेत.
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Wed, 07/10/2019 - 16:24 नवीन
फक्त धोनीखेळाला नाही म्हणून किवीं विरुद्ध भारत हरला अशी ओरड मलाही पटत नाही
  • Log in or register to post comments
स
सुरज भोसले गुरुवार, 07/11/2019 - 07:57 नवीन
जॉनविक्क, त्या डॉक्टरांचं क्लीनिक पुण्यात आपटे रोड वर आहे (त्या डॉक्टरांचं नाव येथे देऊ शकत नाही), ते पुण्यातले प्रसिद्ध डॉक्टर आहेत. त्यांच्या Fee व औषधाच्या खर्चाचा तपशील वरती दिलेला आहेच. ते डॉक्टर मुलाशी व आमच्याशी बोलायचे व त्यांच्याकडचीच औषधं देत होते त्यामुळे प्रिसक्रिप्शन दिलंच नाही. त्या डॉक्टरांकडे आम्ही नोव्हेंबर २०१८ मध्ये शेवटचे गेलो होतो विदा किंवा व्यनि म्हणजे काय?
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ गुरुवार, 07/11/2019 - 08:30 नवीन
व्यनि म्हणजे व्यक्तिगत निरोप
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क गुरुवार, 07/11/2019 - 11:52 नवीन
https://youtu.be/U21_fIKOzXM
  • Log in or register to post comments
स
सुरज भोसले गुरुवार, 07/11/2019 - 13:18 नवीन
जॉनविक्क, व्हिडिओ नक्की बघीन
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा