अनन्तयात्री
अनाम नक्षत्रातील तारा
झळाळताना गगनी
अनाहताच्या झंकाराची
दुमदुम आली कानी
इंद्रियगोचर विभिन्न अनुभव
एकवटोनी गेले
स्थूल सूक्ष्म जड चेतन यातील
भेदही गळून पडले
सुदूर बघता बघता अवचित
क्षितिज बिंदूवत उरले
अडले पाऊल कुंपण तोडून
अनन्तयात्री झाले
💬 प्रतिसाद
ज
ज्ञानोबाचे पैजार
Mon, 12/24/2018 - 04:54
नवीन
आशयगर्भ कविता अतिशय आवडली.
इतक सहज लिहीलय की वाटतय किती सोपे आहे सगळे,
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
Mon, 12/24/2018 - 07:49
नवीन
क्लासिक!
Sandy
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Mon, 12/24/2018 - 08:54
नवीन
वा!!
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
Tue, 12/25/2018 - 15:13
नवीन
धन्यवाद!
- Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर
गुरुवार, 12/27/2018 - 15:17
नवीन
अत्यंत उत्कृष्ट रचना !!
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
Fri, 12/28/2018 - 08:40
नवीन
धन्यवाद!
- Log in or register to post comments