Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

अफगाणीस्तान पुन्हा एकदा तालीबानच्या ताब्यात जाताना

म
माहितगार
Sat, 12/22/2018 - 13:30
🗣 53 प्रतिसाद
जानेवारी २०१७ मध्ये अध्यक्षपदी आरूढ होताना आमेरीकेचे सद्य सर्वेसर्वा डोनाल्ड ट्रम्प महाशयांनी आपला जन्म व्यावसायिकतेत गेल्या मुळे आपण डिल मेकींगमध्ये काही खासच आहोत आणि आपल्या या कौशल्याचा फायदा आमेरीकन जनतेला करून देऊ अशा बढाया मारल्या. आंतरराष्ट्रीय राजकारण हा काही जाहीर बढाया फुशारक्यांचा आणि एवढ्या तेवढ्याने हुरळून जाण्याचा किंवा तांत्रम फेकण्याचा मंच नव्हे हे सर्वसामान्य सोडा भल्या भल्यांच्या गावी नसते. दोन वर्षे पुरी होता होता काल का परवा डोनाल्डरावांनी सिरीयातून त्यांची फौज काढून घेण्याचा आणि तोच मार्ग अफगाणीस्तानबाबत पत्करण्याचा निर्णय ट्विटर द्वारे जाहीर केला. डोनाल्डरावांनी गेल्या दोनवर्षात ट्विटरवरून घोषणाबाजी करुन एवढे धक्के देऊन ठेवलेत की त्यांनी दिलेल्या धक्क्यांचे आताशा कुणाला काहीच वाटेनासे झाले आहे. विश्वसम्राट लहरी असल्याचे माहित असले तरी त्याच्या लहरींनी होणार्‍या उलथापालथी बद्दल किमान भुवया उंच रहाणे स्वाभाविक असावे. मागच्याच दोन एक महिन्यात झालेल्या जी-२० आंतरराष्ट्रीय बैठकी दरम्यान सौदी राजक्पुत्राने रशीयन अध्यक्ष महोदयांना हाय फाईव्ह दिला त्याला त्यांच्या अरोगन्सचे स्वरुप असल्याचे मिडियाने मानले पण ते सिरीया आणि अफगाणीस्तानातील आमेरीकी पराजय साजरा करत असू शकण्याची शक्यता तेव्हा जाणवली नव्हती पण डोनाल्ड रावांचे अफगाणीस्तानातील माघारीबद्दलची निश्चित अंदाजा या दोघांना नसेलच असे नाही. कारण आमेरीकेच्या अफगाणीस्तानातून सन्मानाने बाहेर पडण्याच्यासाठी वाटाघाटीसाठी नेमलेल्या झालमे महोदयांकडुन या विषयी या दोघांना अंदाज आला असण्याची शक्यता असू शकावी. डोनाल्डरावांनी महिनाभरापुर्वी पाकिस्तानने आमेरीकेला कसे फसवले या बाबत ट्विटरवरून गहबज केला. त्याला इम्रानरावांनी उलटपक्षी पाकिस्ताननेच आमेरीकेवर हकनाक उपकार केल्याचा कांगावा केला. भारतात डोनाल्डरावांच्या पाकिस्तानविरोधी ट्विटने आनंदी आनंद झाला तरी आमेरीकन मिडियाने इम्रानखानच्या पाकिस्तानी कांगाव्याची खरडपट्टी दूरच वॉशींग्ट्न पोस्टाने इम्रानच्या इंटर्व्ह्यूमधून जेमतेम दखल घेतली तर न्युयॉर्क टाईम्सने या ट्विटर प्रदर्शनाची दखलही घेतली नाही उलटपक्षी डोनाल्डरावांनी इम्रानरावांना तालीबानसोबत वाटाघाटीत मदत करण्याची विनंती केली आणि इम्रानरावांनी कसा होकार भरला यासाठी पाकीस्तानची पाठ थोपाटली. आयएमएफच्या माध्यमातून आमेरीका पाकीस्तानवर दबाव वाढवेल अशी गोड स्वप्ने भारतीयांना पडत असतानाच डोनाल्डरावांचे खास प्रतिनिधी केवळ आमेरीकेवर तालीबानने दहशतवादी हल्ले करू नयेत एवढ्या बोलीवर अफगाणिस्तानातून आमेरीका बाहेर पडेल याचे सुतोवाच करत होते. त्यांच्या सुतोवाचाला किती गंभीर घ्यायचे याचा इतर सर्वांनाच प्रश्न होता पण डोनाल्ड ट्रंपांनी अफगाणीस्तानातून टप्प्याने फौज मागे घेण्याचे सुतोवाच करुन त्यांचे प्रतिनिधी खरेच बोलत होते हे दाखवून दिले. एकुण इम्रान , सौदी प्रीन्स, आणि पुतीन यांची अरेरावीची भाषा उगीच नव्हती त्यांचा ढळढळीत विजय होत होता. इम्रानची आयएसाआय 'आमेरीकेने अफगाणिस्तानातून आमेरीकेने बाहेरपडताना कटूता ठेऊन बाहेर पडू नये अफगाणीस्तानचा मित्र म्हणुन बाहेर पडावे' असे म्हटले. डिप्लोमसीत अशा वाक्यांचे अर्थ बरेच वेगळे असतात. ६० टक्के अफगानीस्तान तालीबानने वापस मिळवला आहे, अफगाणी फौज तालीबानचा बिमोड करण्यास अपयशी सिद्ध झाली आहे. आमेरीकेने नॉमीनल ५-७ हजार फौज ठेवली तर उरलेली हि ५ - ७ हजार फौज केवळ मुठभर आमेरीकी डिप्लोमॅट्सचे आणि स्वतःचे तात्पुरते संरक्षण तेवढे करू शकेल. अफगाणिस्तान तालीबानच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाकिस्तानी आय एस आयच्या पूर्ण वर्चस्वाखाली येण्यास अजून काही महिन्यांचा अवधी आहे असे म्हणावे लागेल. आमेरीकेचाच पैसा वापरून अफगाणिस्तानला स्वतःची कळ्सूत्री बनवणे, स्वतः नामा निराळे राहून आमेरीकेवर दहशतवादी हल्ले घडवणे, आमेरीकेने अफगाणीस्तान पादाक्रांत केल्या नंतर आमेरीकेच्याच पैशाने तालीबानींना आमेरीकेच्या विरुद्धा लढवून आमेरीकेची नाचक्की करणे आणि हे सर्व का तर अफगाणीस्तान आणि भारताचे संबम्ध चांगले होऊ नयेत आणि काश्मिर प्रश्नावर आमेरीकेने भारतावर दबाव आणावा यासाठी. अशा दुटप्पी पाकीस्तानी आयएस आयचे भले व्हावे वाटण्याचा प्रश्नच नाही पण आमेरीकी पैसा आणि अफगाणि दहशतवादी वापरून आमेरीकेचीच नाचक्की करण्याच्या पाकीस्तानी गुप्तच संस्थेच्या चातुर्याची दखल घेणे क्रमप्राप्त असावे. अफगाणिस्तानात तालीबांनीशी तडजोड करायला भाग पाडणे म्हणजे अफगाणीस्तानात नंतर कोणतेजरी सरकार आले तरी भारताचा पत्ता कटलेला असेल. भारतासाठी इफेक्टीव्हलि २००१ च्या आधीची स्थिती पुन्हा एकदा अफगाणीस्तानात आलेली असेल. आणि गेल्या सतरा वर्षात अफगाणिस्तानात भारताने खर्च केलेले २ अब्ज डॉलर म्हणजे जवळपास दिड हजार कोटी रुपायांची बहुतांश भारतीय गुंतवणूक अक्कल खाती जमा झालेली असेल. ( संदर्भ) नाही म्हणायला अफगाणीस्तानातील नद्यांवरील भारत सरकारने जी धरणे बांधून दिली त्यातील पाणी तालीबानने पाकिस्तानला सोडण्यास पुढेचालून नकार दिला तर भारतीय मदतीस छोटे मोठे फळ आले असे मानता येईल पण तुर्तास असे काही होण्यचा संभव कमी असावा असे वाटते. आंतरराष्ट्रीय राजकारणात कोण कोणावर केव्हा आनि कशी मात देईल हे सांगणे कठीण असावे. येती काही वर्षे पुन्हा एकदा तालीबान असेल आणि आपल्या पाताळयंत्राला आलेल्या यशात पाकीस्तान अधिकच मग्रुरी दाखवत असेल अशी शक्यता नाकारता येत नाही. संदर्भ आणि अधिक वाचन : * गूगल न्यूजवर अफगाणीस्तान बद्दलच्या न्यूज शोधताना येते काही महिने Zalmay Khalilzad यांच्या नावाने शोधणे श्रेयस्कर. Zalmay Khalilzad इंग्रजी विकिपरीचय ट्रंपची घोषणा होण्याची कुण कुण लागलेली असतानाचे सिएनएनवरचे विश्लॅषण * आणि न्युयॉर्क टाईम्सवरील ताजे विश्लेषण In Afghanistan, Alarm and a Sense of Betrayal Over U.S. Drawdown * Are We Ready to Lose Afghanistan? - theamericanconservative.com * The war in Afghanistan isn’t a ‘stalemate.’ The U.S. has lost * Is Trump handing over Afghanistan to Pakistan? * Taliban greets Pentagon's withdrawal of troops from Afghanistan with cries of victory * Afghans, diplomats surprised by report of Trump plan to pull out troops - पाकीस्तानी वृत्त संस्था जीओ न्यूज * अलजझीरावर पाकीस्तानी पत्रकाराची पाकिस्तानी भूमिक्चे मांडणी (युट्यूब) * Britain left in dark over US withdrawal from Afghanistan * We Know How Trump’s War Game Ends * Zalmay Khalilzad’s idea of paradise on earth – Asif Haroon Raja * Full Transcript: Khalilzad’s Exclusive Interview After UAE Meeting * ट्रंप घोषणे नंतर आमेरीकी मॅटीस या संरक्षण मंत्र्यानी राजीनामा दिला. आमेरीकी परराष्ट्रमंत्री माईक पाँपीओ यांनी एक मुलाखत दिली त्यात बाकी सर्व जगाबद्दल भूमिका मांडताना अफगाणिस्तातील फौजवापसी बद्दल मौनच पाळले * ईंडिया वॅरी ऑफ पाक रोल इन सोल्यूशनर्‍टू अफगाणीस्तान - हिंदूस्तान टाईम्स प्रेस रिडर * Blow to India as US to recall 50% troops in Afghanistan * Donald Trump इंग्रजी विकिपीडिया परिचय

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 24372 views

🗣 चर्चा (53)
R
Ramesh Patil Mon, 01/28/2019 - 22:14 नवीन
अमेरिकेने अफगाणिस्तानात हात पोळून घेतले, पण काही दशकांपूर्वी अमेरिकेने विएतनाममध्ये हात जाळून घेतले होते त्यामानाने अफगाणिस्तान युद्ध तस अमेरिकेसाठी ok च होत. कोरियन युद्धाने सुरु झालेली डॉमिनो थेयरी अमेरिकेचे विएतनाममध्ये हात पोळलाल्यानंतरच बंद झाली. आता अफगाणिस्ताना नंतर अमेरिका जगाचा मोरल पोलीस बनण्याचा भंपकपण बंद करेल ही आशा.
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Tue, 01/29/2019 - 17:51 नवीन
मला जरा वेगळा प्रकार आहे असे वाटते... आपल्याला ते अमान्य असेल कारण ज्या पद्धतीने ते घडते आहे त्यातून मानावे का नाही ते आपल्या मतानुसार ठरवावे. पिंकी पीरनी यांच्या काळ्या जादूटोणा करामतीचा प्रकार आहे... कोण ही पिंकी पीरनी? इम्रान खान यांनी तिसर्‍या वेळी ज्या विवाहितेशी निकाह केला. ती. तिच्या बद्दल पाकिस्तानात बर्‍याच लोकांनी यावर ती काय काय करते ते पहा पुढे पुढे... तीन महिने थांबा. मग पहा असे म्हटले जाई ते आता प्रत्ययास येते आहे... काही महिन्यांपूर्वी पाकिस्तान अर्थिक डबघाईला आली होती. सौदी सलमान पाकिस्तानी लोकांशी फटकून होते ते आता ग्वादर पोर्टवर रिफायनरी टाकून त्यांनी कदम मस्त पलटी खाल्ली. युएईने आयएमएफ कडे जायच्या आधी आम्ही पैसे देतो म्हणून आधीच्या धमक्या की जास्त आवाज केला तर तिथल्या कामकरूंना परत पाठवू. या वरून पलटी खाल्ली आहे. मोडी (मोदींना संबोधून) भारतात पुन्हा वझीरे आझम बनणार नाहीत. असे बरेच काही तिने आपल्या विद्येच्या जोरावर शोहर इम्रान खान यांना संकेत दिले आहेत. अमेरिकन प्रेसिडेंट धमक्या देत होते ते पाकिस्तानला आता तालेबानशी बोलणी करायला इम्रान खान यांनी मध्यस्थी करण्याची विनंती करायला आपल्या लोकांना पाठवून मनधरणी करावी लागते आहे. अफगाणिस्तान मधून जाऊदे, कोरियन लोकांना धमकाऊन मग पुन्हा भेटायला फेब्रुवारीत जायचे ठरते आहे... या प्रकारामुळे एकदम पलटी खायची मानसिकता निर्माण करायला ती कामे करते. मानो या ना मानो.
  • Log in or register to post comments
ए
एकुलता एक डॉन Sun, 02/03/2019 - 12:18 नवीन
same pinch for sanjay dutt mnyata dutt hiche total 3 lagna jhale tinhi navre jailmadhe gele
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा