Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

अतृप्त आत्मा 13

प
प्रमोद पानसे
Mon, 12/17/2018 - 14:54
💬 12 प्रतिसाद
एरवी आमच्याशी प्रेमाचे धड चार शब्दही न बोलणारी आमची बायडी आज आमच्या विरहाने एवढी व्याकुळ झालेली बघुन आम्हालाही गलबलुन आलं. थोड्या वेळात सावरलेली बायडी अचानक सावध होत तिथुन उठली.आणी आलेच असं म्हणत स्वयंपाकघरात गेली.तीच्या एकंदर हलचाली संशयास्पद वाटल्याने आम्हीही तरंगत तीच्या मागे गेलो.आत सर्व सन्नाटाच होता .भराभरा तांदुळाचं पिंप उघडत तीने आतुन रुमालाचं एक छोटंस गठुडं बाहेर काढलं. अॉ ! आम्ही आश्चर्याने बघत होतो.तीथेच ओट्यावर ते उघडत तीने पुडक्यातल्या नोटा त्यात उपड्या केल्या.एकंदरीत प्रकार बघुन आम्ही हादरलोच. रुमालात आधीच्याच बर्याच नोटा बांधलेल्या दिसल्या.अंदाजे वीस पंचवीस हजार तरी असावेत. काल संध्याकाळ पासुन भुत बनुन आम्ही बाबल्या आणी नानाला ज्या पॉवरचा धक्का दिला नव्हता तो धक्का आत्ता आम्हाला बसला होता. मेल्यावर देखील आपल्या कुटुंबाच्या काळजीने आम्ही काल नानाला आमच्या दहशतीने जे द्यायला भाग पाडलेलं होतं ते एका क्षणात शुन्य झालं. आमची बायडी भलतीच कर्तव्यदक्ष निघाली .आमच्या अपरोक्ष तीने बरीच माया राखली होती. उर भरुन आलं गर्वाने.आम्ही मुर्ख समजत होते तीनेच आज आम्हाला संसार कशाला म्हणतात हे दाखवलं होतं. एवढ्यात दरवाजापाशी हालचाल जाणवल्याने आम्ही तिकडे वळलो.मंदा मावशी आत येत होती. या थेरडीला सगळीकडे लक्ष घालण्याची फार सवय .जरा कुठं काही अक्षेपार्ह्य अढळलं की खोलांत शिरुन चौकश्या करणे ,समजलेल्या गोष्टीची गावभर बोंबाबोंब करणे असले भोचक कारभार करण्यात भयंकर उत्साही होती ती.आमचं जयडीबरोबरचं प्रेम प्रकरण देखील याच बयेने आप्पाच्या निदर्शनास आणून दिलेलं. जयडीची कॉलेजला जाण्याची आणी आमची प्रेसमधे जाण्याची वेळ एकच कशी काय ?आणी कॉलेजला निघालेली जयडी हिच्या लेकीसोबत का जात नाही ?? एकच वर्ग दोन वेगवेगळ्या वेळी कसा चालू होतो ??? हे सर्व प्रश्न तीलाच सर्वात आधी पडलेले.हिच्याच कार्टीने आमचं झेंगट हिच्या कानी घातलेलं.आणी एक दिवस वाडीतच दबा धरुन बसलेल्या मावशीने जयडीला आमच्या हातात हात घेतलेलं रंगेहात पकडलं. स्वयंपाकघरात घुसून आमच्या कलंत्राच्या खाजगी गोष्टींत लक्ष घालू पहाणार्या मावशीला कोणताही विचार न करता आम्ही मागे ढकलले.आमच्या कुटुंबाचा आर्थिक घोटाळा तीच्या नजरेस येउ द्यायचा नव्हता आम्हाला. धप्पदिशी मागे असलेल्या खुर्चीचा आधार घेत ती जमिनीवर आदळली.आणी भयचकीत होत आमच्या दिशेने बघु लागली.धक्का मारताना झालेल्या स्पर्शाने तीला आमचं दर्शन घडलं होतं. "बापु !! मला बापुने ढकललं ,आत्ता इथे दिसला बापू" तीला सावरायला आलेल्या महिलामंडळाला ती रडत बोंबलत सांगू लागली. झालेल्या गदारोळाने बायडा देखील भराभरा पिंपाचं झाकण लावत बाहेर आली. आता हे सगळं प्रकरण गावभर होणार होतं.आणी ते होउ नये म्हणुन म्हातारीला गप्प करणं गरजेचं होतं. भेदरलेली मंदा मावशी भराभरा उठुन तीच्या खोलीकडे निघाली .नाइलाजाने आम्हालाही तीच्यामागे जावे लागले.घरी पोहचल्या पोहचल्या तीने हात पाय धुवून देवासमोर बैठक मारली.आणी रामरक्षा म्हणायला सुरुवात केली.आम्ही देखील लगेच हात जोडुन तीच्याच शेजारी बैठक जमवली.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6080 views

💬 प्रतिसाद (12)
ट
टवाळ कार्टा Mon, 12/17/2018 - 15:31 नवीन
खिक्क
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Mon, 12/17/2018 - 16:34 नवीन
भाग मोठे टाका कि ओ मालक....
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Tue, 12/18/2018 - 17:36 नवीन
येवद्या
  • Log in or register to post comments
ज
जेडी Tue, 12/18/2018 - 18:30 नवीन
सर्व भाग वाचले. पुढच्या भागाची वाट पाहतेय. मजा आली वाचताना.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Wed, 12/19/2018 - 10:17 नवीन
<<<तीने हात पाय धुवून देवासमोर बैठक मारली.आणी रामरक्षा म्हणायला सुरुवात केली.आम्ही देखील लगेच हात जोडुन तीच्याच शेजारी बैठक जमवली.>>> हे मस्तंय =)) पु.भा.प्र
  • Log in or register to post comments
व
वीणा३ Wed, 12/19/2018 - 23:09 नवीन
हॅहॅहॅ मस्त लिहिलंय एकदा, फक्त मोठे भाग टाका ना प्लिज
  • Log in or register to post comments
श
शित्रेउमेश गुरुवार, 12/20/2018 - 04:23 नवीन
रामरक्षा म्हणायला सुरुवात केली.आम्ही देखील लगेच हात जोडुन तीच्याच शेजारी बैठक जमवली. लय भारी.....
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी गुरुवार, 12/20/2018 - 05:22 नवीन
मस्तच लिहीताय पानसे साहेब, फक्त मोठे भाग टाका.
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Fri, 04/19/2019 - 05:11 नवीन
पु भा प्र!!!!!!१
  • Log in or register to post comments
उ
उपेक्षित Fri, 04/19/2019 - 16:42 नवीन
आम्हाला वाटल गुरुजींची खेचली असेल, असो वेगळी कथा आवडली.
  • Log in or register to post comments
व
वीणा३ Fri, 04/19/2019 - 19:39 नवीन
पु भा प्र!!
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Wed, 06/19/2019 - 10:39 नवीन
आत्मा विलीन झाला कि काय?
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 week ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 week ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 week ago
  • सुंदर !!
    1 week ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 week ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा