Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

ऐलान

श — शार्दुल_हातोळकर, Sun, 12/09/2018 - 05:24
आयुष्याच्या रणांगणात होतच राहतील स्वाऱ्या वाघासारख्या चढाया कर संकट परतविणाऱ्या जरी होतील किती वार तरी हार नकोस मानु पराभवाचा विचारसुद्धा तू मनात नकोस आणु घोंगावणारी वादळेही शिकवण देतात नवी नवं त्यातुन शिकण्याची तुझी दृष्टी मात्र हवी बेडरपणे तुटुन पड संकटांवर आता थांबु नको येईल म्हणत वाचविण्याला त्राता झेलत राहा पाऊसवारा कणखर बनत जाशील हार मानेल संकटसुद्धा सक्षम असा होशील नसेल जरी जगात साऱ्या आज तुझे काही तरी नसेल भविष्यातही असे मुळीच नाही थकु नकोस लढत राहा निधडेपणाच शान आहे मदमस्त या दुनियेविरुद्ध हा लढ्याचा ऐलान आहे - शार्दुल हातोळकर

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3072 views

💬 प्रतिसाद
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 12/11/2018 - 11:05 नवीन
छान आहे कविता, आवडली... पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Wed, 12/12/2018 - 10:13 नवीन
सहमत .. पैंबुकाकांशी .. मस्त कविता आहे ... एक ठिणगी कुठेतरी आत लपलेली धगधग धगधग चालू होती थोडीशी बावरलेली कौल वाऱ्याचा हवा तिला मिळता मिळता राहिला आतल्याआत विझून गेली वणवा नाही पहिला
  • Log in or register to post comments
न
नंदिनी Fri, 12/14/2018 - 18:33 नवीन
उत्तम !! आयुष्याशी लढायला प्रेरणा देणारी कविता !!
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Sat, 12/15/2018 - 10:51 नवीन
आवडली कविता.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Sat, 12/15/2018 - 16:31 नवीन
मस्त लय भारी. आवडली. हिंदीतील " कोशिश करनेवालों की कभी हार नाही होती" सारखी मराठीतली कविता . प्रत्येक आत्महत्या करणार्याचा विचार मनात येणाऱ्या शेतकऱ्यानं एकदा तरी वाचावी. निराशा पळून जाईल त्याची.
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Mon, 12/17/2018 - 07:21 नवीन
एका कवीसाठी यापेक्षा अधिक सन्मान काय असु शकेल कि ज्याची कविता एखाद्या निराश माणसाचा जीव वाचविण्याइतपत प्रेरणादायी समजली जावी !! पैजारबुवा, खिलजि, नंदिनी, पद्मावती, प्रमोदजी सर्वांचे मनापासुन आभार !! __/\__
  • Log in or register to post comments
द
देशप्रेमी गुरुवार, 02/21/2019 - 07:22 नवीन
अत्यंत स्फुर्तीदायक कविता !! प्रमोदजींच्या प्रतिक्रियेशी प्रचंड सहमत !!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा