Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

जीव झोपला (विडंबन)

च — चांदणे संदीप, Sat, 12/08/2018 - 13:33

विडंबनाचे निमित्त: परवा, एका बॅचलर मित्राकडे कामानिमित्त जाणं झालं. कामाचं बघता बघता रात्री उशीर झाल्यावर त्याला म्हटलं, आता घरी जातो, उद्या बघू. तर, पठ्ठ्या आपला, "झालं रे! किती वेळ लागतोय! पाचच मिनिटे अजून." असं म्हणून दुसऱ्याच नवीन कामाला सुरूवात करीत होता. मलाही मग डुलु डुलु डुलक्या सुरू झाल्या. झोप अनावर झाल्यावर मी तिथेच झोपायचं हे दोघानुमतें ठरलं. आता, बॅचलरची रूम म्हणजे, जास्त काही सांगायलाच नको. पांघरायला दिलं त्याने पण त्याचा असा काही सुगंध येत होता की, मी कुडकुडून मरायचं मरण निधड्या छातीने अंगाशी कवटाळलं! रूमची अवस्था, गॅलरीतून येणारे मित्राचे गुणगुणणारे मित्र यातून झोपेचा बोऱ्या वाजलाच पण त्यानिमित्ताने हे विडंबन सुचवून गेला. बऱ्याच दिवसांनी लिहिणं झालं म्हणून त्या वटवाघूळ मित्राला हे विडंबन समर्पित!

जीव झोपला (विडंबन) ('जीव रंगला'च्या चालीवर) जीव झिंगला, पेंगला, निजला असा, दुलईची आरजू जीव गुंगला, झोपला गाढ ह्यो माझा, आता मला उठवू नको तू डुलकीनंतर नेशील, उशी मला देशील, मैतर माझा तू श्वास हळुवार चालं, अंग ढील्ल ढील्ल झालं, थोडी जागा मला दे तू काय नशिबात आलं, कशी ही रात जाईल, सारी खोली तुझी, ढेकणांची वस्ती, बघ बघ तू खुळं कुडतं ढगळ, लई अघळपघळ माझ्या खास मितरा, तेच मला आता पांघर रे तू खुलं दार गॅलरीचं,नाही झालं तुला लावण तुझ्या टकुऱ्यात, डास आल्यावर, असा असा हाणीन जीव झिंगला, पेंगला, निजला असा, दुलईची आरजू जीव गुंगला, झोपला गाढ ह्यो माझा, आता मला उचल तू - संदीप चांदणे (०८/१२/१८)


वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4002 views

💬 प्रतिसाद
त
तुषार काळभोर Sat, 12/08/2018 - 13:38 नवीन
लै दिवस झाले काही वर्जिनल नाही केलं. पण हे पण झक्कास आहे.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 12/08/2018 - 16:44 नवीन
=)) =)) =)) झकास !
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 12/08/2018 - 17:21 नवीन
लै भारी हो चांदणे पैलवान, पैजारबुवा
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Wed, 12/12/2018 - 02:41 नवीन
हा हा हा ! भारी लिवलयं. बर्याच मित्रांच्या खोल्या डोळ्यासमोर तरळून गेल्या.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 12/12/2018 - 04:04 नवीन
एकच नंबर..
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 12/12/2018 - 09:04 नवीन
संदीप चांदणेसाहेब, लै फर्मास विडंबन ! मझा आया !
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा