Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

बोका-ए-आझमला भावपूर्ण श्रध्दांजली

ग
गॅरी ट्रुमन
गुरुवार, 11/29/2018 - 16:26
💬 78 प्रतिसाद
बोका गेला. अरे ४२ हे काय जायचे वय होते का?त्याला झालेल्या आजाराविषयी ६-७ महिन्यांपासूनच कल्पना होती आणि त्यातून तो बरा होणे फारच कठिण आहे हे पण माहित होते. तरीही मानवी वेडं मन शेवटपर्यंत हार मानायला तयार होत नाही. अगदी कालपर्यंत वाटत होते की काहीतरी चमत्कार होईल आणि एक दिवस व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर त्याचे मेसेज बघायला मिळतील. पण आज ती वाईट बातमी समजली आणि मन दु:खाने भरून आले. boka मिपावर सदस्य अनेकविध नावे घेतात पण काही नावे अशी असतात की लगेच लक्ष वेधून घेतात. ऑनलाईन सदस्यांमध्ये तसेच एक नाव एकेदिवशी दिसले "बोका-ए-आझम". कुतुहल चाळवले गेल्यामुळे त्याचे सदस्यपान बघितले. पण त्यातून फार काही समजले नाही. पण २०१४ च्या विधानसभा निवडणुकांवरील चर्चांमधील एका प्रतिसादानंतर त्याचा मला व्य.नि आला. मग फोनवर बोलणे झाले. हळूहळू बोका म्हणजे काय चीज आहे हे समजून यायला लागले. त्याचे आणि माझे आवडीचे विषय सारखेच असल्यामुळे हळूहळू जवळीक कशी वाढत गेली हे कळलेच नाही. मागे मी मिपावर कधीतरी लिहिले होते की मला स्वातंत्र्योत्तर भारताच्या राजकीय इतिहासावर एक लेखमाला लिहायची आहे. अर्थात मी मुलखाचा आळशी माणूस असल्याने याविषयी मी काहीही पावले उचलली नाहीत. एक दिवस मला त्याचा फोन आला की त्याला पण त्या लेखमालेत सहभागी व्हायला आवडेल.त्या निमित्ताने दोन-तीन वेळा फोनवर बोलणे झाले. संदर्भासाठी पुस्तके कोणती वाचायची, कोणती मासिके चांगली वगैरे बोलणे झाले. आपण नीलकांतला सांगून एक संयुक्त आय.डी या लेखमालेसाठी म्हणूनच घेऊ हे पण तो म्हणाला. पण मीच त्याला म्हटले की अरे लेखमालेतला एकही लेख अजून तयार नाही. एवढ्यात संयुक्त आय.डी कशाला?नेहमीप्रमाणे मी चालढकल केली. पुढच्या महिन्यात काम सुरू करू, पुढच्या आठवड्यात काम सुरू करू असे म्हणत म्हणत एक वर्ष तरी उलटले असेल. :( रिचर्ड थेलरना मागच्या वर्षीचे नोबेल पारितोषिक मिळाल्याचे कळले का हा मेसेज मी त्याला लगेच केला होता. बहुतेक फोन नंबर बदलल्यामुळे त्याला तो मेसेज मिळाला नसावा. या वर्षी २ आणि ३ एप्रिलला पुण्यात गोखले इन्स्टिट्यूटमध्ये बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्सवर वर्कशॉप झाले. या वर्कशॉपविषयी मला १५ मार्चच्या आसपास कळले. त्या वर्कशॉपला रिचर्ड थेलर यांचे विद्यार्थी प्रा. दिलीप सोमण येणार होते. त्यामुळे तिथे मी न जायचा प्रश्नच नव्हता. मी लगेचच जायचे नक्की केले आणि पैसे पण भरले. त्या वर्कशॉपला बोक्याने पण यावे असे मला फार वाटत होते. तसे मी त्याला कळवले पण. त्यावर त्याचे काहीच उत्तर नाही. बरं वर्कशॉपला येणे शक्य झाले नाही तरी मी २ एप्रिलला पुण्यात असेन तेव्हा निदान भेटू तरी असा मेसेजही त्याला टाकला. त्यालाही त्याचे थोडे त्रोटकच उत्तर आले. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी मी बाहेरगावी होतो. तिथून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मेसेज केला. त्यालाही नुसते _/\_ एवढेच उत्तर त्याचे आले. २ एप्रिलला वर्कशॉपसाठी पुण्यात असताना त्याच्याकडून कसलाच संपर्क झाला नाही. बोका असे काही करत आहे म्हणजे नक्कीच काहीतरी बिघडले आहे हे समजलेच. सर्वकाही आलबेल असते तर तो किती उत्साहाने भेटायला आला असता. त्यानंतर महिन्याभराने म्हणजे २ मे रोजी ध्यानीमनी नसताना ऑफिसजवळ तो मला भेटला. त्यावेळी त्याने त्याला झालेल्या आजाराविषयी सांगितले. आणि त्या बोलण्यातून कळले की तो एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच त्याच्या आजारासाठीच्या चाचण्या करायला गेला होता. :( :( खरं सांगायचं तर त्यानंतर काय बोलावे हे खरोखरच सुचेना. तरी मी त्याला उसने अवसान आणून धीर द्यायचा खोटा प्रयत्न करत होतो. तो दर दोन आठवड्यांनंतरच्या शनीवारी चेंबूरला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येतो हे कळले. पुढची तारीख १९ मे होती. त्याला म्हटले की मी तिथे तुला भेटायला येईन. त्याप्रमाणे त्याला भेटायला गेलो होतो. त्याचे उपचार म्हणजे कुठल्या बंद खोलीत होणार नव्हते तर सलाईनद्वारे होणार होते त्यामुळे त्याच्या खोलीतही जाता आले. आमच्या नेहमीप्रमाणे गप्पा झाल्या. असा काही आजार त्याला झाला आहे हे कोणाला खरेच वाटले नसते त्याला बघून. हळूहळू त्याचा आजार वाढत गेला. रोग शरीरात बराच जास्त पसरला असल्यामुळे चेंबूरच्या हॉस्पिटलमधला तो उपचार करून काहीही फायदा होणार नाही असे डॉक्टरांचे मत झाले असे एकदा मेसेजवर त्याने कळवले. तेव्हाच कल्पना आली की वाईट बातमी कधीतरी येणार. :( :( मग त्याच्याशी संपर्क व्हायचे प्रमाणही कमी झाले. दसर्‍याच्या शुभेच्छा, दिवाळीच्या शुभेच्छा असे मेसेज इतपतच संपर्क राहिला. खरं सांगायचं तर त्याच्याशी काय बोलावे हे खरोखरच मला समजत नव्हते. दिवाळीच्या शुभेच्छांचा त्याला पाठवलेला मेसेज त्याने बघितला पण नव्हता. तेव्हा त्याची प्रकृती अजून ढासळली असेल ही कल्पना आली. आणि शेवटी आज ती कटू बातमी आलीच. बोका, तुला मी खूप मिस करणार आहे. तुझ्यासारखे चतुरस्त्र माहिती असलेले आणि तितकेच विनयशील लोक फार नसतात. तुझी उणीव नक्कीच भासणार आहे. फार तर चार वर्षांपासूनची थोडीची ओळख, १०-१२ फोन आणि मेसेज इतकाच काय तो आपला संपर्क झाला. ३-४ वेळाच भेटलो असू. तरीही खूप वर्षांपासून तुला ओळखत आहे असे वाटायचे. एक गोष्ट सांगतो. मी तुझ्यासारखा कष्टाळू नाही. त्यामुळे त्या लेखमालेचे काम माझ्याकडून कधी आणि किती होईल हे मला माहित नाही. पण समजा शक्य झाले तर जितके लेख होतील तितके तुला भेटायला यायच्या आधी एखाद्या ब्लॉगवर जरूर लिहेन. वचन वगैरे देत नाही. फार स्वार्थी आहे मी. माझा जीव त्या वचनासाठी टांगणीला नाही लावायचा मला आणि तसे करायची टापच नाही माझ्यात.... :( :( :( :( :(

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 32674 views

💬 प्रतिसाद (78)
स
सिरुसेरि Fri, 11/30/2018 - 11:15 नवीन
बोका-ए-आझम ह्यांना भावपूर्ण श्रध्दांजली . पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा .
  • Log in or register to post comments
ल
लाल टोपी Fri, 11/30/2018 - 11:48 नवीन
मिपा वरील अभ्यासपूर्ण लिखाण करणारे बोकाभाऊ गेल्याचे खरेच वाटत नाही, भावपूर्ण श्रद्धांजली
  • Log in or register to post comments
व
वेदांत Fri, 11/30/2018 - 12:01 नवीन
बोका-ए-आझम यांना भावपूर्ण श्रध्दांजली.
  • Log in or register to post comments
R
rahul ghate Fri, 11/30/2018 - 12:53 नवीन
बोका शेठ ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली . काही लोक ना भेटता वा न बोलता देखील आपले वाटतात , बोका शेठ त्यामधलेच . ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना व मित्रमंडळींना हा धक्का पचवण्याची शक्ती देवो .
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक Fri, 11/30/2018 - 13:17 नवीन
मिपावरून एका अभ्यासू, शैलीदार आणि सिद्धहस्त लेखकाचा असा अकाली अस्त होणे अत्यंत क्लेशदायक आहे. बोका-ए-आझम यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Fri, 11/30/2018 - 15:51 नवीन
फारच धक्कादायक बातमी. बोकाशेटना भावपूर्ण श्रध्दांजली.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 11/30/2018 - 16:42 नवीन
गॅरी ट्रुमन, तुमचं दु:खं समजतंय. ही हानी चटकन भरून येणारी नाही. माझा बोकोबांशी परिचय नव्हता. त्यांच्यासमवेत जी काही थोडीफार चर्चा झाली ती त्यांच्या लेखांच्या अनुषंगाने. त्याव्यतिरिक्त गप्पा मारायला व चर्चा करायला आवडलं असतं. विशेषत: तुम्ही व ते ज्या लेखमालेची सहनिर्मिती कारण होतात, तिच्यासंबंधी चर्चा फारंच उद्बोधक व रोचक झाली असती. नाईलाजाने 'झाली असती' असा वाक्प्रयोग करायला लागतोय. ईश्वरेच्छा बलीयसी. ती लेखमाला बोकोबांना एक श्रद्धांजली होऊ शकते. आपला नम्र, -गामा पैलवान
  • Log in or register to post comments
द
दादा कोंडके Fri, 11/30/2018 - 18:57 नवीन
भावपुर्ण श्रद्धांजली! _/\_
  • Log in or register to post comments
न
निशाचर Fri, 11/30/2018 - 23:57 नवीन
बोका-ए-आझम यांना भावपूर्ण आदरांजली
  • Log in or register to post comments
अ
अमित खोजे Sat, 12/01/2018 - 01:46 नवीन
बोक्यांशी माझा तसा अगदी जवळचा परिचय नव्हता परंतु त्यांच्या लिखाणाने मी वेडा झालो होतो. आज प्रथमच फोटो पहिला. त्यांचे वय फक्त ४२ होते हे पाहून खूपच वाईट वाटले. त्यांच्या कथा कायम स्मरणात रहातील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Sat, 12/01/2018 - 02:24 नवीन
श्रद्धांजली. मिपावर एवढ्या मोठ्या संख्येने त्यांच्याविषयी लेख प्रसिद्ध झाले यावरूनच त्यांचा लोकसंग्रह कळतो. स्पार्टाकस यांच्या लेखातून त्यांचे व्यक्तिविशेष कळले. इतर लेखातील त्यांच्या आठवणीतून त्यांच्याविषयी आणखी माहिती कळली आणि मोसादपासून मनांत निर्माण झालेला त्यांबद्द्लचा आदर दुणावला.
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Sat, 12/01/2018 - 03:44 नवीन
एक दिवस गुगल वर मोसाद बद्दल लिखाण सर्च केले असता मिसळपाव आणि बोकशेठ यांची ओळख झाली . कुठल्याही आर्थिक फायद्याची अपेक्षा न करता सकस लिखाण करणारी माणसे कसे काय या स्वार्थी जगात असू शकतात ? हे कोड बोकशेठ चें लिखाण वाचून मला पडल आहे . त्यांना विनम्र श्रद्धांजली , त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कशी भरून निघणार हे त्या विधात्यालाच ठाऊक .
  • Log in or register to post comments
म
मालविका Sat, 12/01/2018 - 05:39 नवीन
भावपूर्ण श्रध्दांजली!
  • Log in or register to post comments
M
marathibana Sat, 12/01/2018 - 09:35 नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली
  • Log in or register to post comments
M
marathibana Sat, 12/01/2018 - 09:50 नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली
  • Log in or register to post comments
आ
आवडाबाई Sat, 12/01/2018 - 10:09 नवीन
बोका-ए-आझम यांना भावपूर्ण श्रद्धांजली. (त्यांचे समग्र लिखाण कसे शोधावे? लिंक लेखात देता येईल काय? काही दिवस मिपाच्या मुख्य पानावरही ही लिंक ठेवता येईल .)
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 12/01/2018 - 18:21 नवीन
बोका ए आझम यांचे लेख
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Sat, 12/01/2018 - 18:36 नवीन
कायम स्मरणात राहणाऱ्या लेखकास यथायोग्य श्रद्धांजली _/\_
  • Log in or register to post comments
आ
आवडाबाई Mon, 12/03/2018 - 11:12 नवीन
धन्यवाद पैलवान त्यांचे कितीतरी लेख वाचले गेलेच नाहित हे लक्षात आले. वाचायला सुरूवात केली आहे. पुन्हा एकदा श्रद्धांजली .
  • Log in or register to post comments
स
स्वलेकर Sat, 12/01/2018 - 18:12 नवीन
बोका-ए-आझम यांना भावपूर्ण श्रध्दांजली
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Sun, 12/02/2018 - 02:05 नवीन
एवढ्या कमी वयात जाणं खरंच धक्कादायक आहे. काय बोलणार!
  • Log in or register to post comments
क
कापूसकोन्ड्या Sun, 12/02/2018 - 09:15 नवीन
बोका-ए-आझम यांना भावपूर्ण श्रध्दांजली य.कु गेला तेव्हा असाच चटका लागला होता.
  • Log in or register to post comments
प
पिशी अबोली Sun, 12/02/2018 - 15:25 नवीन
धक्कादायक आहे हे! बोकाशेठना श्रद्धांजली...
  • Log in or register to post comments
A
Anand More Sun, 12/02/2018 - 15:36 नवीन
ओंकार माझा शाळू सोबती. जीवश्च कंठश्च मित्र. फार मनस्वी व्यक्ती होता. थोडासा अव्यवहारी पण अतिशय हुशार आणि अभ्यासू. त्याचं जाणं हा मोठा धक्का आहे.
  • Log in or register to post comments
स
स अर्जुन Tue, 12/04/2018 - 07:11 नवीन
बोका-ए-आझम यांना भावपूर्ण श्रध्दांजली_ _/\_
  • Log in or register to post comments
झ
झपाटलेला फिलॉसॉफर Fri, 12/07/2018 - 17:51 नवीन
बोका गेला, आपण सगळेच जाणार आहोत हे स्मरण ठेवून त्यांना श्रद्धांजली! कॅन्सर भिकारचोट च असतोय.
  • Log in or register to post comments
ज
जगप्रवासी Tue, 12/11/2018 - 10:58 नवीन
नूलकर काकांसोबत शिवडीला फ्लेमिंगो बघायला गेलो असताना बोकोबांशी फक्त ५ मिनिटे बोललो. पण त्या ५ मिनिटांत पण या माणसाने त्याच्या दिलखुलास व्यक्तिमत्वाने घर केले, नंतर अधे मध्ये व्हाट्सअँप वर बोलणं होत होते. मिपावरच्या माझ्या आवडत्या लेखकाला भेटून जाम भारी वाटलं होत. आणि त्यादिवशी नूलकर काकांचा मेसेज आला "बोका गेला". मनात पहिला पहिला प्रश्न आला "हे कसं शक्य आहे" देवाला चांगल्या माणसाचं काय वावडं आहे, जे तो त्यांना इतक्या लवकर बोलावून घेतो. डोकं सुन्न झालं वाचून, बायकोने हलवून विचारलं तेव्हा कुठे कळलं की ती कितीतरी वेळ हाका मारत होती. बोकाशेठ फसवलंत मला, आपण परत फ्लेमिंगो बघायला जाणार होतो.
  • Log in or register to post comments
स
समीरसूर गुरुवार, 12/13/2018 - 11:21 नवीन
बोका-ए-आझम यांच्याशी वैयक्तिकरीत्या कधी संपर्क नाही झाला पण त्यांचे लेखन नेहमीच आवडत आले आहे. एक दिलखुलास व्यक्तिमत्व खूपच लवकर आपल्याला सोडून गेले...त्यांना मनापासून श्रद्धांजली!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 week ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 week ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 week ago
  • सुंदर !!
    1 week ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 week ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा