Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

मिस शलाका B.A.

उ
उपयोजक
Wed, 11/28/2018 - 03:52
💬 53 प्रतिसाद
"शलाका!" बसस्टॉपवर काकांनी एका पाठमोर्‍या मुलीला हाक मारली. त्या मुलीनं मागे वळून पाहिलं. "देशपांडे काका! काय म्हणताय? बर्‍याच दिवसांनी गाठ पडली." "हो.हल्ली फारसं येणं होत नाही इकडे!" "हो.बाबा बोलले मला.काळजी घ्या बरं तब्येतीची!" "हो तर घ्यायलाच पाहिजे.तुझ्या लग्नात हिंडता फिरता यायला हवं मला.काका हसत हसत म्हणाले." "लग्न!" शलाकाच्या कपाळावर आठ्या! का गं? काय झालं? "नै काही नाही!" "अगं योग्य वयात लग्न झालेलं चांगलं" "हो काका पण मनासारखं स्थळ तरी यायला पाहिजे ना?" "कसं स्थळ हवंय तुला? सांग मला" "आता पुण्यातले खर्च तुम्हाला माहितीच आहेत.त्यामुळे पगार जरा चांगलाच हवा हो!" "चांगला म्हणजे किती?" "किमान ५ लाखाचं तरी पॅकेज असावं" "हे किमान?" "हो.तेवढे लागतातंच" "शलाका! अगं ३२ वर्षांची आहेस तू! जेमतेम BA आहेस.केवढ्या या अपेक्षा?" "काका! आता आहेत भरपूर अॉप्शन मुलींसाठी मग काय बिघडलं? शलाका हसत हसत म्हणाली" "बरं तुझ्या दादाचं काय? त्याची ती 'ऐटीतली नोकरी' काय म्हणतेय? त्याचं कुठे जुळलं की नाही?" "चाललीय बरी! परवा आली होती एक मुलगी सांगून" "मग? सरकलं का पुढे?" "छे हो! मुलीनंच नकार दिला!" "का बरं?" "दादापेक्षा तिचं पॅकेज जरा जास्त होतं.म्हणजे दादाला ३९ आहे तिला ४१ होता." "२ हजारासाठी?" "हो" "कठीणाय" "जाऊ दे नाहीतरी ती मुलगी तोंडावरुन जरा गर्विष्ठच वाटत होती.होकार दिला असता तरी शोभली नसती दादाला" "तू म्हणतेस म्हणजे असेल तसंच!" काकांनी कसंबसं हसू दाबत म्हटलं. "अच्छा! काका बाय!" बसकडे पळता पळता शलाका! बस डोळ्यापुढून जाईपर्यंत काका हसतंच होते. (काल्पनिक संवाद)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 13321 views

💬 प्रतिसाद (53)
उ
उपयोजक Wed, 12/05/2018 - 16:34 नवीन
१.
  • Log in or register to post comments
ए
एमी गुरुवार, 12/06/2018 - 01:38 नवीन
ओके. पण प्रतिसाद दांभिकतेवर आले नाहीयत फारसे :D
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice गुरुवार, 12/06/2018 - 02:58 नवीन
१+ (अँमीजीं तुम्हीं नाही, परंतु काही इतर लोक़्स) दांभिकतेवर, दंभिक स्टाइल प्रतिसाद दिले, की लोक़्स पितल उघड़े पडले वैगरे बोलुन, स्वतःचीं दंभिकता लपवतात.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 week ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 week ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 week ago
  • सुंदर !!
    1 week ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 week ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा