Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

पर्याय

अ
अनाहूत
Sat, 11/24/2018 - 08:01
💬 1 प्रतिसाद
" अशी जवळ ये ना " नाही म्हणायचं होत तिला पण तिच्या तोंडातून शब्दच बाहेर नाही पडले . तो जवळ येतच गेला .... " आई " ती कळवळली . एक जोरदार फटका पडला होता . हि बसायची जागा आहे कि फटाके मारायची आईला तर काही कळत नाही . " अग कार्टे किती वेळ लोळत पडली आहेस उठ आणि आवर तुझं " छे किती भारी स्वप्न होत आणि आईनं काय वाट लावली त्याची . परत असं पालथं झोपायचं नाही किती जोरात मारलय सगळी बोट उठली असतील . लाल झालं असेल . बघावं म्हटलं तर तेही सोपं नाही असू दे . ती पार्श्वभाग चोळत मनात म्हणाली . ============================================================= " अग काय कशी लाली आली आहे ? " शमाने रूपालीला विचारलं . " तू कधी आणि कशी पहिली " " अग लाल दिसतायत कि गाल " " ते होय " " का तुला काय वाटलं ? " " काय नाही . बर ते सोड तू बोल काय म्हणत होतीस ? " " अग किती प्रेमात पडली आहेस त्याच्या दुसरं काही सुचत कि नाही तुला ? " " नाही सुचत तुझी काही हरकत आहे का ? " ती तडक बोलली " नाही बाई तू काही बोलू देणार आहेस का आम्हाला " शमाला आता बोलायला काही नव्हतं " त्याला पाहिलस का ? " रुपाली स्वतःत मग्न राहून बोलली . " अशी का त्याच्या माग फिरतेय ? चांगलं दिसत का ते ? आणि पोरांची डोकी काय सरळ असतात का ? " " त्यांचं त्यांना माहित पण इथं माझं डोकं कुठं थाऱ्यावर आहे " " का ग काय झालं " शमान काळजीनं तिला विचारलं पण ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती . ती तशीच पुढे निघाली . तेव्हढ्यात प्रणवने तिचा हात पकडला व तोंडावर बोट ठेऊन तिला न बोलायची खूण केली व तो तिला कुठेतरी घेऊन जाऊ पाहत होता . " हात सोड माझा " तिने हात सोडवण्याचा प्रयत्न केला पण त्याने तिचा हात सोडला नाही . " तोंड बंद कर आणि ऐक काय बोलतायत ते " तिनेही तिकडे लक्ष दिल . " अरे तिला नुसतं फिरवायच आपली जान तर आशा आहे " :- राहुल " अरे ती आशा आणि हि कोण निराशा ? " :- सतीश " नाही ती आशी आणि हि आधाशी ; जगाला माहित आहे माझं, तरी आहे माझ्या माग मग का सोडू . हो तर नाही म्हणायचं पण नाही पण नाही म्हणायचं राहतेय तोपर्यंत राहू दे सोबत " :- राहुल " पुढे काय use and throw " त्याच वाक्य कुणीतरी पूर्ण केलं . त्यांच्यात हशा पिकला . ते एकमेकांना टाळ्या देत होते . तिच्या डोळ्यात पाणी तरळलं होत तिच्या भावनांची अशी चेष्टा तिला सहन झाली नाही आणि ती तिथून तडक निघाली . " तुला काय वाटलं तो नाही तर तुला चान्स आहे ? " तिला राग आला होता राहुलचा पण समोर असलेल्या प्रणववर तो निघत होता . " माझं असं काही नाही . मला फक्त खर काय ते तुला दाखवायचं होत . " " दाखवलंस ना मग आता जा कि काही हवं आहे माझ्याकडून त्याबदल्यात " " मला काही नको " तो शांतच होता पण ती शांत व्हायला तयार नव्हती . " एक मिनिट थांब असे उपकार नको माझ्यावर चल जाऊया " आपण म्हणत तिने त्याचा हात पकडला आणि त्याला घेऊन ती जाऊ लागली . त्याने तिला अडवलं " कशासाठी करते आहे हे " " मला हवं आहे हे " " मूर्ख आहेस का ? त्याला दाखवण्यासाठी कशाला हे करायचं ? " " मग तुला काय हवं आहे फिजिकल व्हायचंय का ? " ती थांबायला तयारच नव्हती . " उगा काही बडबडू नकोस " " काय होतंय त्याने तुला हि आनंद मिळेल आणि मला हि , तुम्हाला आमच्यात दुसरं काय हवं असत आमच्या भावना शून्य , फक्त हेच महत्वाचं " " आणि पुढे काय प्रेग्नंट होणार ? " " कशाला एक गोळी घेतली कि झालं " " काय वाटतंय तुला लेमन च्या गोळ्या आहेत का ? " " तुला काय करायचं आहे काय होईल तो त्रास मला आहे . आताही होतो आहेच नंतरही होईल " " हे बघ माझं प्रेम आहे तुझ्यावर आणि मी तुला लाईफ पार्टनर म्हणून पाहतो . मला त्या वे नि तुझ्याकडे पाहायचं आहे . असं क्षण दोन क्षणासाठी physical relation बनवून तुझ्यापासून दूर नाही जायचं मला . " " हे बघ आपल्यात फार age difference आहे " " मग त्यानी काय होत हि गोष्ट तोट्याची थोडीच आहे . दोघांमध्ये एकजण समजून घेणारा असेल तर काय वाईट आहे का ? " " हे बघ मला कॉन्सेलर नको आहे लाईफ पार्टनर हवा आहे जो माझ्यासोबत माझ्यासारखं बेधुंद आयुष्य जगू शकेल " " असं थोडीच आहे कि आपण लाईफ पार्टनरच व्हावं . आपण बोलू तर शकतो . हे बघ मी तुला तेव्हा तस विचारलं होत आणि तुझ्या एका नाहीमुळे मी पूर्ण थांबलो होतो . पण त्यामुळे आपल्यातली फ्रेंडशिपसुद्धा संपली . जेव्हा मला मदतीची गरज होती तेव्हा हे भाऊ म्हणणारे कोणीही मदतीला आले नव्हते . फक्त तूच मदतीला आली होतीस . तू एक ट्रू पर्सन आहेस . म्हणूनच मला तू मैत्रीण म्हणून हवी आहेस . एक तूच अशी आहेस जिच्यावर मी संपूर्ण विश्वास ठेऊ शकतो . आणि तू पण मान्य करशील कि मीही तितकाच ट्रू आहे तुझ्याबाबतीत . सो मित्र म्हणून सोबत राहू शकतो ना आपण . आणि बोलून तर बघ माझ्यासोबत तुझे प्रॉब्लेम सुटतील किंवा तुला हे कळेल कि हा प्रॉब्लेमच नाही . मोकळेपणाने बोल आणि समोर समोर बोलायला ऑड वाटत असेल तर कॉल कर . हे बघ माझ्या मनात काय आहे ते मी तुझ्या समोर ठेवलं आहे , त्यामुळे मी तुला परत अप्रोच करण चुकीचं ठरेल . आता तू ठरवायचं आहे एकदा बोलून तर बघ किंवा एक कॉल करून तर बघ . मी वाट पाहीन तुझ्या कॉलची . "

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1943 views

💬 प्रतिसाद (1)
श
शित्रेउमेश गुरुवार, 11/29/2018 - 10:40 नवीन
सुंदर चित्रण...
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 week ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 week ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 week ago
  • सुंदर !!
    1 week ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 week ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा