Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

कविते.....!

फ — फिझा, Fri, 11/23/2018 - 02:55
कविते......!. तू, तुला हवं तसं जग !! उमलत राहा, फुलत रहा, कागदांवरून मनांवर बहरत रहा, नेहमी सारखीच! पण एक लक्षात ठेव आता ...... तू ना माझी , ना त्याची ! मी लिहिलं तुला म्हणून तो वाचेल तुला, एवढाच काय तो उरलेला दुआ ! कारण भेटलो तर , स्वप्न वाटेल, नाही भेटलो तर, विरक्त वाटेल ! नव्याने काही केलं तर पाप वाटेल, जुन्यातच अडकुन राहीलो तर श्राप वाटेल! हात दिला तर स्वार्थ वाटेल, ढळणारा अश्रूच, सार्थ वाटेल! काही केलं तर...काय केलं? वाटेल नाही केलं तर...का नाही केलं? वाटेल ! आमचं काय ??...... आम्हाला काहीही वाटेल...! तर कविते, तू जगलीस काय आणि मेलीस काय ! आता आम्हाला पर्वा नाही कशाचीच सगळेच दुवे संपलेत कदाचित ! सगळ्या वाटाही बंद झाल्यात एकमेकांपर्यंत जाण्याच्या !! --------------फिझा.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1789 views

💬 प्रतिसाद
व
विजुभाऊ Fri, 11/23/2018 - 03:10 नवीन
ही कविता " मला लागली कुणाची उचकी " या चालीवर म्हणता येवू शकते
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Fri, 11/23/2018 - 07:53 नवीन
मान राखून गुरुजनांचा दिला निरोप मी कल्पनांना कसा उडू मी इथेतिथे ? छाटून त्या पंखांना शब्द गहन भार वाही , नाळ जरी तुटलेली सुबक काही येत नाही , अशीच आत घुस्मटलेली सरण रोज रचितो , रोज देतो भडाग्नी नित्य नवी कल्पना असे चितेवर पहुडलेली
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Wed, 11/28/2018 - 18:25 नवीन
जमलिये..
  • Log in or register to post comments
व
वन Sat, 12/08/2018 - 09:37 नवीन
जमली आहे. आवडली
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 12/09/2018 - 14:48 नवीन
आवडली कविता. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा