Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

घालमेल

ल
लौंगी मिरची
Mon, 11/19/2018 - 06:44
💬 6 प्रतिसाद
“कबूल का करत नाहीस ? एकदाचं मान्य करुन मोकळी हो . रोजचं तीळ तीळ मरणं . त्यापेक्षा, एकदाच हो, आहे माझं तुझ्यावर प्रेम, तुझ्याशिवाय़ काहीच सुचत नाही, म्हण आणि मोकळी हो .” तो आज फार बोलत होता, माझी घुसमट पाहवत नव्हती त्याला. पण, मी एकटी ने मान्य करुन काय होणार होतं? जो मला हे मान्य करायला सांगतोय तो मात्र कुणा दुसरीतच अडकलाय आणि हो प्रामाणिकपणे हे पहिल्याच भेटीत सांगितलं. मग तरीही मी त्याच्यात का अडकली असेन? गुंतणं आपल्या हातात नसतं, हेच खरं. “मला समजून का घेत नाहीस? प्रेमाच्या भावना बदलता येत नसतात.. एकदा झालेलं प्रेम हेच शेवटचं असतं, मला तू आवडतेस, खूप आवडतेस, तुझं नसणं असह्य होतं मला, तुझी सवय लागलीये“. तो बोलून मोकळा व्हायचा पण मला .. ,मला मात्र भरुन आलं होतं, दाखवताही येत नव्हतं. तो ‘हो‘ म्हणू शकत नव्हता आणि मला ‘नाही‘ ऐकायचं नव्हतं. मनाचं द्वंद्व चालूच होतं. दूर जाण्याचाही प्रयत्न केला पण पुन्हा त्याच्या बारीक सारीक गोष्टीही भुलवू लागल्या . तिथे खड्डा आहे, नको जायला म्हटलं की, हा नकोच आपल्याला खड्ड्या कडे जास्त खेचतो. माझंही असंच झालं होतं. कितीतरी वेळा ठरवलं “नाही .. नको, हे बरोबर नाही, मला काय अधिकार आहे त्याच्या आयुष्यात असण्याचा, त्याला कदाचित मी एक व्यक्ती म्हणून आवडत असेल, एक मैत्रिण म्हणून तो माझ्याकडे पाहत असेल आणि मी मात्र या नात्याला, मला हव्या त्या नात्यात बदलण्याचा प्रयत्न करतेय. “ तू एकदा सगळं मनातलं बोलुन मोकळी हो , तुझी घुसमट थांबेल, कधी कधी काही गोष्टी अ‍ॅक्सेप्ट करुनच त्यावर मात करता येते .. जितकं नाकारशील तितकं जास्त त्रासदायक होईल .” तो हे रोज समजवायचा .. त्याला वाटायचं आपल्यापरीने बाहेर काढू. एकटीला सोडणं योग्य नाही. सोबत राहूनच या घुसमटीतून बाहेर काढू. पण मग त्याला माझ्यापासून दूर होण्याची भीती वाटत होती का? मी हवीये पण प्रेयसी म्हणून नव्हे तर मैत्रीण म्हणून, सुखदुखा:च्या गोष्टी शेअर करायला जवळची मैत्रीण. “अजून किती त्रास देणारेस स्वतःला? किती प्रश्न विचारणार असे? माझ्याजवळ नाही करायचंय मान्य तर नको पण निदान स्वतःच्या मनाशी तरी खोट बोलू नये माणसाने, त्याला तोंड दाबून बुक्क्यांचा मार का? अजूनही सांगतो कबूल कर आणि मोकळी हो, बघ खूप हलकं वाटेल, प्रेम करतेस मग ते निरपेक्ष असेल ह्यावर विश्वास ठेव “ त्याचे सल्ले म्हणजे उन्हातल्या पावसाच्या सरींसारखे .. अलगद येऊन मनावर बरसायचे. नकार घंटा वाजवणारं मन माझं क्षणभर हुरळुन जायचं, आपलं प्रेम म्हणजे किती सुंदर कल्पना आहे आणि आपण ती जगतोय असं लख्ख ऊन माझ्या डोक्यात पडायचं. त्याच्या ह्या पॉझीटिविटीने तर मी आणखीनच खेचली जायचे त्याच्याकडे. खरंच गुंतणं सोप्पं सरळ असतं, आपल्याला थांगपत्ताही लागत नाही त्याचा , अवघड असतं ते गुंतलेलं मन सांभाळणं , त्याच्या अपेक्षा पूर्ण करणं. ढग आले की वाटतं पाऊस पडेल, वातावरणात गारवाही येतो, पण ढग कुठे दुसरीकडेच जाऊन बरसण्याच्या तयारीत असेल तर तो गारवा थंडीत बदलतो .. त्रास देतो. माझं गुंतलेलं मन हळवं झालं होतं, त्याला छोट्या छोट्या गोष्टींचा त्रास होऊ लागला होता. पण एक होतं, तो मला अश्या परिस्थितीत एकटं पडू देत नव्हता, शब्दांची फुंकर सतत असायची, मन वळवणं, मन रमवणं हे नेमकं काय ते त्याच्याकडून शिकावं . कदाचित त्याच्या असण्यामुळे मी जास्तच अडकत चालली होते, पण तो नसल्यावर अक्षरशः वेड लागायची पाळी यायची . मलाच कळत नव्हतं की, कशापासून आणि कोणापासून दूर जावं, कुठे पळून जावं? मी कुठेही गेले, त्याच्यापासून लांब तरी त्याचे विचार माझा पिच्छा कधीच सोडणार नव्हते. त्याच्या गुंतण्याची वाट बघणं अपेक्षा ठेवणं कितपत योग्य आहे जर तो गुंतणारच नाही हे त्यालाही आणि मलाही माहीत आहे? मग फक्त कबूल करावं? एकतर्फा? मग, हे अपूर्ण प्रेम मला जगू देईल का ? लाखो प्रश्न घेऊन हे असं झुलतं प्रेम करण्यापेक्षा रोज थोडावेळ आपल्याच मनाशी थोडसं भांडायला हरकत काय ? त्यातून थोडं होकारार्थी, थोडं नकारार्थी विचारांचं एकमेकांशी जुंपून द्यावं अन् निघालेला निष्कर्ष अमलात आणावा का? की, हे द्वंद्व असच चालू ठेवायचं? शेवटपर्यंत कबूली द्यायचीच नाही? की, खरंच तो म्हणतो तसं एकदा स्वतःच्या मनाशी कबूल करुन घ्यावं ,“ हो, माझं तुझ्यावर प्रेम आहे , निस्सीम प्रेम“ वर्षा देशमुख .

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2821 views

💬 प्रतिसाद (6)
म
मराठी कथालेखक Tue, 11/20/2018 - 06:47 नवीन
नात्यांमधल्या नवनवीन गुंतागुंत हाताळण्याकरिता बॉलीवूडने नवनवीन संकल्पना दिल्यात तुमची कथा /लेख वाचून "हाफ गर्लफ्रेंड" ची आठवण झाली... या नायिकेकरिता तिचा प्रियकर "हाफ बॉयफ्रेंड" आहे हे तिने मान्य केलं तर तिची घालमेल कमी होईल.
  • Log in or register to post comments
ल
लौंगी मिरची Sat, 11/24/2018 - 06:32 नवीन
धन्यवाद .
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक गुरुवार, 11/22/2018 - 18:30 नवीन
का घेतात? घ्यायचं तर लेखनानंतर खरं का नाव का लिहितात? :-))
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 11/23/2018 - 03:12 नवीन
हे पेनाच्या टोपणासारखेच की. काढायचेच असेल तर मग टोपण कशाला. लिहीताना टोपण पेनाच्या शेवतीच अडकवतात की
  • Log in or register to post comments
ल
लौंगी मिरची Sat, 11/24/2018 - 06:31 नवीन
विजुभाऊ , खरय तुमचं .
  • Log in or register to post comments
ल
लौंगी मिरची Sat, 11/24/2018 - 06:30 नवीन
हा लेख कॉपी पेस्ट करताना नावासहित झाला . चला निदान तेवढं का होईना पण वाचलत तुम्हि ;)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 week ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 week ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 week ago
  • सुंदर !!
    1 week ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 week ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा