Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

अतृप्त आत्मा -३

प
प्रमोद पानसे
गुरुवार, 11/15/2018 - 11:55
आता जयडी आमच्या गालावरुन हात फिरवतीये हे बघुन आमच्या बायडीचा मत्सर जागा झाला नसता तर आश्चर्य होतं.त्याही परिस्थितीत डोळ्यातल्या अश्रुंआडुन ? आमच्या कलंत्राने ते सर्व हेरलच.आणी खस्सदिशी जयडीचा हात बाजुला करुन हि बया हात फिरवत हमसायला लागली. च्यामायला ! अगं बया जिवंत असताना नाही कधी फिरवलास आणी आत्ताच का गं सुचलं तुला ? असे विचार मनात येत असतानाचा शंभ्या पाटलाचा "सामान आणलय बरं का !" आवाज आला. या भाड्याला मला पोहचवायची फार घाई झालेली.परिस्थिती बघुन एकेकाळी आम्ही त्याची तिन खोल्यांची जागा एकविस रु.भाडं वाढवुन लाटलेली .आणी त्याला दिड खोल्यांत जावं लागलेलं.हाच राग त्याच्या मनात होता. मग जरा बाहेर जाउन आम्हाला उचलण्याची काय व्यवस्था केलीये हरामखोराने ते बघावं.अस म्हणुन आम्ही द्रोण घेउन बाहेर गॕलरीत गेलो. जाताजाता दारावरची पाटी वाचली खुप दिवसांनी. 'श्री बापु (सुरेश)जोशी येथे रहातात.' खाली नोटही होती. 'दुपारच्यावेळात कोणत्याही कारणास्तव आणी विनाकारण दरवाजा वाजवु नये.अपमान केला जाईल' अभिमानच वाटला स्वतःचा .

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1565 views

💬 प्रतिसाद

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 week ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 week ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 week ago
  • सुंदर !!
    1 week ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 week ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा