Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

अतृप्त आत्मा -१

प
प्रमोद पानसे
गुरुवार, 11/15/2018 - 09:48
💬 1 प्रतिसाद
काल रात्री अचानकच आम्हाला आम्ही निवर्तल्याचं समजलं .म्हणजे आम्ही झोपलेलोच होतो आणी आजुबाजुला थोडी कुजबुज ऐकु आली.हळुहळु कुजबुजीचं रुपांतर मुसमुसण्यात आणी नंतर गदारोळ आणी गोंगाटात झाले.त्यामुळे झोप चाळावली.डोळे उघडले तर आम्ही सिलींगला आणि द्रोण कॕमेरातुन दिसतं तसं दृष्य दिसायला लागलं. आम्ही अंथरुणातच अर्धी लुंगी वर गेलेल्या आणी भोकं पडलेल्या गंजीफ्रॉकात उताणे पडलेलो.आणी भोवती आमचे हवे नको ते सर्व नातेवाईक ,सगे संबंधी,मित्रमंडळी ,आमच्या उधार्या थकलेले बरेचसे वाणगट,गवळी ,न्हावी सगळे हजर. ओढुन ओढुन आणलेली सुतकी तोंड .काहींच्या मनातला आनंद न दिसताही जाणवत होता. च्यायला ! या मंदा मावशीला दिड हजार दिलेले बुडाले या कल्पनेने आम्ही व्यथीत झालो.आणी ती त्या सुटकेचा आनंद लपवत आमच्या कुटुंबाचा आणी पर्यायाने जन्माला आलेल्या कबिल्याचं सांत्वन करत बळंच डोळे पुसत होती.आणी बाकी घेणेकरी बाहेर एकमेकांपेक्षा जास्तच दुःखी असल्याचा आव आणत होते. एकंदर परिस्थिती खुपच कंटाळवाणी होती.म्हणजे आम्ही मेलोय हे आम्हाला दिसत होतं पण त्या सगळ्यांना समजत नव्हतं की आम्ही हे बघतोय. आणी अचानक डोक्यात एक किडा वळवळला . इंटरेस्टींग वाटायला लागलं एकंदरीत सगळं. आम्ही भुत झालो होतो . क्रमशः..

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2077 views

💬 प्रतिसाद (1)
द
दुर्गविहारी Tue, 12/11/2018 - 09:13 नवीन
आज वाचायला सुरुवात केली. पण भाग छोटा टाकलाय.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 week ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 week ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 week ago
  • सुंदर !!
    1 week ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 week ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा